यशाचे आता गा मंगल गान
विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ||
बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||
युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||
- पाषाणभेद
२५/११/२०१९
प्रतिक्रिया
26 Nov 2019 - 4:13 pm | मुक्त विहारि
आवडली. .