Rolls Royce

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 2:00 pm

..

ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते

तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..

७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो.

ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत.

गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक ब्रिटिश माणसाच्या २ सुप्त इच्छा / स्वप्न असतात १..दारासमोर रोल्स उभी असावी.२राणीचा महाल आतुन बघावा..

"रोल्स रॉयस" अशीच एक "लिजंड" कार आहे..

* एक माणसाने एकदा जुनी रोल्स विकत घेतली अन प्रवासात त्याची गाडी हाय वे वर बंद पडली.. त्याने लोकल डीलर ला फोन करून ते सांगितले काही वेळातच त्यांचा मेकॅनिक आला व त्याने आपली गाडी वापरायला दिली जेणे करुन त्या व्यक्तिचा खोळंबा होऊ नये व त्याने त्या बंद पडलेल्या रोल्स चा ताबा घेतला.

काही दिवसानंतर त्या व्यक्तीस रोल्स रिपेअर करून तिची डिलिव्हरी दिली..आठवड्या नंतर त्याच्या लक्षात आले की रिपेअरिंग चे बिल त्याला मिळाले नाही.व त्याने विचारले की आपण माझी रोल्स रिपेअर केली पण बिल पाठवले नाही..

त्या वर तो मॅनेजर हसून फोन वर म्हणाला “Sir, you must be mistaken,” “Everyone knows that Rolls Royce cars simply don’t break down.”

* रोल्स बद्दलचा एक किस्सा आहे की रोल्स च्या बॉनेट वर ५० पेन्स चे नाणे उभे ठेवले जाते व गाडी चालू झाली तरी नाणे पडत नाही..कारण शून्य व्हायब्रेशन असलेली ति कार आहे

* माझा एक कार्स मधे रस असलेला अभ्यासक मित्र आहे त्याने सांगितले की रोल्स चे असे एक मॉडेल बाजारात आहे ज्याचे हुड/बॉनेट बंद आहे..बाजूला २ जागा केल्या आहेत ज्यातुन कुलंट व एकातून ऑइल भरता यावे या साठी..कारच्या इंजिन ला लाईफ टाइम गॅरंटी आहे..व इंजिन उघडायचा प्रश्नच येत नाही....

* परवाच असे वाचनात आले की रोल्स आता खास भारत व भारतीय लोकासाठी एक मॉडेल आणत आहे..

कुठलेही असे "इंजिनीअरिंग मार्व्हेल्स" उच्च तंत्रज्ञान कुशल व तन मन ओतून काम करणारे कामगारा च्या टीम शिवाय शक्य नसते.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

16 Jul 2019 - 5:33 pm | प्रलयनाथ गेंडास...

रोल्स रॉयस चे इंजिन चांदीचा धातू वापरून बनवतात , अशी एक किवंदंती लहानपणी ऐकण्यात आलेली !

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 10:26 pm | जॉनविक्क

कारच्या इंजिन ला लाईफ टाइम गॅरंटी आहे..व इंजिन उघडायचा प्रश्नच येत नाही....

कारचे माहीत नाही पण सुझुकी फिएरो नामक दुचाकींचे हे वास्तव आहे

जॉन आण्णा, अकुकाकांचा लेख तर काय बोलावे आता ह्या लेव्हलला आहे. रोल्स रॉयस बाबतीत अनेक दंतकथा आहेत हे मात्र खरे आहे. 8 हात पेंट चे दिले जातात पासून प्रत्येक पार्ट एक्सरे केला जातो इथपर्यंत. एका हिंदुस्तानी संस्थानिकाने रोल्स रॉयस चा माज उतरवण्यासाठी त्या गाड्या खरेदी करून संस्थानात कचरा उचलायला ठेवल्या अशाही कथा वाचनात आहेत. अर्थात त्यातल्या किती खऱ्या किती पेरलेल्या आणि किती पार गंडलेल्या हा संशोधनाचा विषय आहे. नाणे ना पडणे, ब्रेकडाऊन ना होणे हे तर जोक्स आहेत. मला शुअर ग्यारंटी आहे माझी बेस्ट हाफ असले लेख वाचून खदाखदा हसेल कारण ती रोल्स रॉयस लाच काम करते.
बाकी सुझुकी फियेरो चे बाबतीत तसेच आहे कारण मी स्वतः फियेरो एफ टू मेकानिककडून इंजिन काम करून घेतलेलं आहे. फियेरो अप्रतिम गाडी होती, रेसिंगमध्ये चॅम्पियन होती पण तितकीच मार्केटमध्ये अयशस्वी होती. तिचे जीलेक्स आणि एफ टू हे व्हेरियन्तस ही फेल झालेले. शहरात इन मिन दहा बारा वापरातल्या असतील गाड्या. फियेरो आणि व्हिक्टर सिरीज फेल गेल्यावरच टिव्हीएस ने स्टार सिटी सिरीज बाजारात आणली.

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 2:01 pm | जॉनविक्क

अप्रतिम गाडी होती, रेसिंगमध्ये चॅम्पियन होती पण तितकीच मार्केटमध्ये अयशस्वी होती.

सहमत आहे, गाडी अपयशी ठरली. माझे परिचित सरकारी गाड्या (पोलिसांच्या 2 व्हीलर वगैरे) सर्व्हिसिंगचे काम नोकरदार म्हणून करतात. त्यांनी फिएरोचा अनुभव सांगितला. (बाकी कोणतीही गाडी इतकी टफ असते यावर मलाही विश्वास नाही)

आणि रोल्स रॉईसची संस्थानिकाबाबत घडलेली घटना सत्य आहे. दन्तकथा नाही.

अभ्या..'s picture

17 Jul 2019 - 2:40 pm | अभ्या..

हो हो, ती संस्थानिकाची सत्यकथा आहे. अलवरचा महाराजा जयसिंग प्रभाकर ची कथा आहे ती. झाडू लावलेल्या रोल्स रायसचे फोटो पाहिलेले आहेत.

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 3:16 pm | जॉनविक्क

तीच तीच, सही पकडे हाय

अभ्या..'s picture

18 Jul 2019 - 11:12 am | अभ्या..

त्या फोटोतली आणखी एक गंमत म्हणजे झाडू लावलेली ती कार रोल्स रॉयस नाही, फोर्ड फेटान आहे. फोटोवर हिब्रू भाषेत लिहिलेले आहे आणि मागची पार्श्वभूमी, झगे घातलेल्या स्त्रिया हे भारतातले चित्र नाही हे सिद्ध करतात. हीच कथा हैदराबाद चा निजाम, अलवार महाराजा, जयपूर महाराज आणि इतर तीन चार संस्थानिकांच्या नावावर खपवली जाते. निजामाच्या संग्रहालयात ती कार आहे पण ती पिवळी आहे व फोटोतल्या मॉडेल पेक्षा पूर्ण वेगळे मॉडेल आहे. भारतातील सद्यकालीन रोल्स रॉयस मध्ये फंटाम आणि घोस्ट हे दोन मॉडेल उद्योगपती आणि सिनेसृष्टीतील दिग्गज वापरतात.

mrcoolguynice's picture

18 Jul 2019 - 11:30 am | mrcoolguynice

क्काय्य हे...
ज़रा कूठ भारताच्या दैडिप्यामान भुतकाला विषयी
लोक अश्या फ़ॉर्वर्ड माध्यमातुन ग़ौरोंउद्गार कढतात...
की आले लगेच खोट ठरवायला ...
सोन्याचा धुर निघायचा भारतात पूर्वी ....मिष्टर

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 4:14 pm | जॉनविक्क

हा हा हा

फार व्यवस्थित माज उतरवला गाडीवाल्यांचा

प्रसाद_१९८२'s picture

17 Jul 2019 - 1:24 pm | प्रसाद_१९८२

राजस्थानातील कोणत्यातरी संस्थानिकाला, लंडन मधील त्याच्या वास्तव्यादरम्यान, रोल्स रॉईस शोरुम मधे तिथल्या कर्मचार्‍यानी प्रवेश दिला नव्हता. यावर तो संस्थानिक इतका चिडला की भारतात परत आल्यावर त्याने २५ रोल्स रॉईस गाड्यांची खरेदी करुन त्या भारतात मागवल्या व लंडनमधे झालेल्या अपमाना बदला, खरेदी केलेल्या २५ रॉल्स रॉईस गाड्यांचा उपयोग, त्याच्याच संस्थानातील कचरा गोळा करण्याकरता, करुन घेतला.

शेखरमोघे's picture

18 Jul 2019 - 7:53 am | शेखरमोघे

छान आहे लेख.

हिंदुस्तानी संस्थानिकाने रोल्स रॉयस चा माज उतरवण्यासाठी त्या गाड्या ......... कचरा उचलायला ठेवल्या ....... ही सत्यकथा आहे. हैदराबादच्या निजामाने त्याला रोल्स रॉयसने योग्य तो मान न दिल्याने "रोल्स रॉयस ......कचरा उचलायला ठेवल्या". जास्तीची माहिती पुढे मिळेल.
https://www.bhavinionline.com/2013/12/nizam-of-hyderabad-who-used-his-ro...

आता रोल्स रॉयस चा लेखातला "logo" फक्त विमानांच्या इंजिनांना लावला जातो. आता रोल्स रॉयसची मालकी BMW कडे आहे.

सुबोध खरे's picture

18 Jul 2019 - 10:33 am | सुबोध खरे

Every new Rolls-Royce is protected by a four-year, unlimited mileage, regional warranty* from the date of first retail or registration whichever is earlier. The warranty encompasses a wide range of serviceable vehicle components to minimise any inconvenience to you during the warranty period. It extends to the region in which your car was first registered, ensuring the vehicle is optimised for its environment. Wherever you drive your Rolls-Royce within your delivery region, we’ll make sure any necessary repairs are carried out quickly and efficiently by an authorised Rolls-Royce dealer or workshop.
*Excludes tyres and glass. Unlimited mileage does not apply to commercially-used vehicles.

https://www.rolls-roycemotorcars.com/en-GB/ownership.html

रोल्स रॉईसने आपल्या गाडयांना कायम ४ वर्षाचीच वॉरंटी दिलेली आहे.

बाकी सर्व दंतकथा मुद्दाम पसरवलेल्या असतात आपल्या उत्पादनाचा खप होण्यासाठी.

उदा. रोलेक्स आपले घड्याळ किती अचूक आहे याची सुरुवातीला जाहीरत करत (४-५ लाख रुपयाला मिळणारी) कि दिवसात ते फक्त ३-४ सेकंड पुढे किंवा मागे होते. जेंव्हा क्वार्ट्झ ची घड्याळे आली तेंव्हा हे दावे किती फोल आहेत ते समजले कारण साधे ९०० रुपयात (आजही) मिळणारे कॅसिओ चे घड्याळ दिवसाला फारतर एक सेकंद पुढे किंवा मागे जाते.शिवाय त्याची बॅटरी ७ वर्षे टिकते.

डी बिअर्स गटाने हिऱ्याच्या बद्दल असाच उदो उदो करून त्याची किंमत वाढवून ठेवली आहे.

https://www.theatlantic.com/international/archive/2015/02/how-an-ad-camp...

हिरा परत विकला तर त्याची २५ ते ५० % च किंमत परत मिळते हे किती लोकांना माहिती आहे?

या उलट सोने हॉल मार्क असले तर त्याची संपूर्ण किंमत बाजारभावाने परत मिळते.

जालावर खोदकाम केल्यावर आयुष्यभराची खात्री रोल्स रॉईस ने कोणत्याही मोटारीची दिलेली नाही असे स्पष्ट जाणवते.

बाकी मोटारीवर सुद्धा हाच लोगो आहे हे वरील दुव्यात स्पष्ट होत आहे.

कोणी उजेड टाकेल काय ?

मराठी_माणूस's picture

19 Jul 2019 - 5:12 pm | मराठी_माणूस

संस्थानीक : अहं दुखावला म्हणून कचर्‍यासाठी गाड्यांचा वापर केला त्यापेक्षा इथेच गाड्या तयार करण्या साठी काही प्रयत्न करायला हवे होते. (उदा: ताज हॉटेलची निर्मीती)
नूसते स्वतःच्या ऐश्वर्याचे हीडीस प्रदर्शन करण्यातच ह्या लोकांनी धन्यता मानली.

नाखु's picture

19 Jul 2019 - 7:23 pm | नाखु

(तथाकथित वारसदार) यांनी कॉलर उडवणं, बेफाम होऊन बेफाट बोलणं हेच शौर्य आणि भरीव कार्य समजलं जातं तिथे मराठी माणसाने उभे केलेल्या जिद्दीने नावारूपाला आणलेल्या सर्कसचे साहित्य जाळताना लुटताना खंत न वाटणे स्वाभाविक आहे

ते सहन करणारे होते छत्रे सर्कस वाले आणि जाळपोळ गांधीहत्या निमित्ताने केली होती.त्याची कुठेही खंत नाही का बातमी आली नाही.

आताही गुंडगिरी म्हणजेच नेतृत्व असा सिद्धांत शहरांत सुरु आहे, ग्रामीण भागातील परिस्थिती माहित नाही.

सगळ्यांना टाटा, किर्लोस्कर यांच्या सारखी जिद्द आणि हिंमत असेल असे नाही.

सुबोध खरे's picture

19 Jul 2019 - 9:06 pm | सुबोध खरे

बऱ्याच संस्थानिकांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून असे सरसकट विधान करीत आहेत असे वाटते.
१९०७ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हि संस्था आठपण करण्यासाठी म्हैसूर च्या महाराणी यांनी ३७१ एकर जमीन आणि ७ लाख रुपये दिले (तेंव्हा सोन्याचा भाव १६ रुपये १० ग्रॅम ला होता) म्हणजे आजच्या भावाने एक अब्ज ३१ कोटी २५ लाख रुपये होतात.
https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/date-with-history...
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड ज्यांनी १८९३ साली मुलांनाच नव्हे तर मुलींना सुद्धा प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि नि:शुल्क केले जे आधुनिक भारताच्या शिल्पकारांना १२५ वर्षानंतरहि करता आलेले नाही.
https://www.dnaindia.com/analysis/column-maharaja-sayajirao-gaekwad-iii-...
किंवा
औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी (किर्लोस्कर वाडी ओगले वाडी येथे उद्योग उभे करण्यासाठी) यांची अशीच उदाहरणे देता येतील.

मराठी_माणूस's picture

20 Jul 2019 - 6:07 pm | मराठी_माणूस

काही दानशुर मंडळी असतील , पण त्यांचे प्रमाण कीती असेल