पर्वाची गोष्ट आहे
सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली
चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे
नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली
जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो
वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी
लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती
तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली
मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण
कसे दिले ?
१० ला एक
४० ला ६ दे -हि म्हणाली
५ देईन -गजरे वाला मुलगा
ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले
हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला
तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्षावाल्याने रिक्षा वेगाने दामटली
अहो त्या मुलाचे पैसे द्यायचे राहिले रिक्षा वळवता का ?
हि म्हणेस्तोवर रिक्षा लकडी पुलाच्या मध्यावर आली होती
रिक्षा वळवणे शक्य नसल्याने आम्ही समजून घेतले
घरी आलो हि हूश्श्स्य करत सोफ्यावर बसली
मी स्कुटर ची चावी घेतली अन स्यांडल पायात सरकवत बाहेर जायला निघालो
कुठे निघालास ?
त्या मुलाला पैसे द्यायला
एव्हढी दगदग करायची गरज नाही -उद्या पर्वा त्या बाजूला जाणार त्या वेळी दे ती मुले तिथेच असतात
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी ल्याच ची मूठ फीरवत असताना " तू कधी ऐकतोस का कुणाचं ? मनमानी करायची जुनी खोड आहे " असे काहीतरी पुटपुटली
वीर सावरकर पुत ळ्याला वळसा घालत चौकात आलो मुले शोधली अन त्याला पैसे दिले
माझं आयुष्य एम आय डी सी त गेले
सुखासीन आयुष्य जगणा-या वर्गाला "हातावरचे पोट " म्हणजे नसते
कारख्यान्या त असताना -शटर रिपेर करणारे त्याला ग्रीज ऑइल करणारे --छत गळत असेल तर वर चढून सिमेंट पत्र्यावर डामरी शिट चिकटवणारे - कार पुसणारे - खिडकीची काच बसवणारे -मशीन साफ करणारे मुले येत असत
दिवसभर एम आय डी सी हिंडत काम शोधणे मिळालेली मजुरी घेत सायंकाळी घरी जाणे -मग झोपडीत रॉकेल भाजी वाणी सामान येत असे व चूल धडधडत असे
आमचा कामगार म्हणत असे "चूल बंद की अक्कल बंद "
हे दयाघना प्रत्येक घरातली चूल पेटती ठेव हीच पार्थना
प्रतिक्रिया
16 Jul 2019 - 6:52 am | अविनाशकुलकर्णी
क्षमा करा
धागा चुकून पुन्हा पोस्ट झाला
16 Jul 2019 - 9:38 am | गड्डा झब्बू
हरकत नाही! त्यानिमित्ताने तुमच्या लेखणीचा संवेदनशील पैलू समोर आला.
16 Jul 2019 - 9:47 am | गवि
छान आहे.
16 Jul 2019 - 10:12 am | उगा काहितरीच
याच (याअगोदर वाचलेल्या) चांगल्या लेखावर अकु कथा महोत्सवाची सांगता व्हावी .
16 Jul 2019 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
या धाग्याबद्दल क्षमायाचना कशाला ? छान लिहिले आहे. छोट्या प्रसंगाने आणि साध्या शब्दात तुमचा संवेदनाशील पैलू समोर आला. असे काही लिहा.
16 Jul 2019 - 2:24 pm | स्वधर्म
लिहिले अाहे, अावडले.
16 Jul 2019 - 5:23 pm | ट्रम्प
शिंगार कथा पेक्षा हे नक्कीच चांगले !!
16 Jul 2019 - 5:24 pm | ट्रम्प
शिंगार कथा पेक्षा हे नक्कीच चांगले !!
16 Jul 2019 - 6:26 pm | मुक्त विहारि
लेखन आवडले.
16 Jul 2019 - 7:15 pm | झेन
हे अकु अनोळखी वाटले तरी चांगले वाटतात हो.
16 Jul 2019 - 7:24 pm | हस्तर
" तू कधी ऐकतोस का कुणाचं ? मनमानी करायची जुनी खोड आहे " असे काहीतरी पुटपुटली
अश्लील अश्लील अश्लील
16 Jul 2019 - 9:38 pm | जॉनविक्क
ते उगाच नाही