*इ.स.२०३० मधल्या इयत्ता दुसरीतल्या दोन मुलांचे फोनवरचं संभाषण!*
चिन्मय: अरे अन्वय तुला माहिताय का? या मोठ्या लोक्सची लँग्वेज काही वेगळीच असते.
अन्वय: म्हणजे?
चिन्मय: अरे आपल्याला तो कम्पल्सरी सब्जेक्ट नै का? मराठी? त्यात आपण नंबर्स कसे प्रोनन्स करतो? म्हणजे २०१ ला आपण वीस आणि एक म्हणतो किंवा ४९ ला चाळीस नऊ म्हणतो ना?
अन्वय: हो बरोबर!
चिन्मय: अरे पण हे मोठे लोक्स तसं नै म्हणत.ते २०१ ला दोनशे एक म्हणतात. ४९ ला चाळीस नऊ न म्हणता एकोणपन्नास असं काहीतरी म्हणतात.
अन्वय: हो.मी पण पाहिलंय.परवा मम्मा,पप्पा इव्हन ग्रॅनी अँड ग्रँपा पण याच लँग्वेज मधे बोलत होते.काहीतरी कॅलक्युलेशन्स चालू होते.मला तर त्यांची लँग्वेज कळेचना यार!
चिन्मय: पण ही कोणती लँग्वेज आहे?आपल्याला का नै शिकवली?
अन्वय: जाऊ दे यार! तू नको एवढं टेन्शन घेऊ.अरे आपण अॅडव्हान्स आहोत ना? हे मोठे लोक्स आपल्याएवढे शार्प नसणार;म्हणून त्यांना असं शिकवलं असणार.
चिन्मय: राईट! असंच असणार! ह्ये! वी आर ब्रिलियंट!वी आर जिनिअस!
अन्वय: राईट ब्रो!
प्रतिक्रिया
21 Jun 2019 - 7:48 pm | जॉनविक्क
21 Jun 2019 - 9:56 pm | जॉनविक्क
सतत इंग्रजी चित्रपट बघितल्याने संपूर्ण इंग्रजीत संवाद चालू असताना लाख ही संख्या इंग्रजीत बोलताना हँडरेड थोउसंड असेच तोंडात येते.
तेथे एक सीनिअर सिटीजन वयाचा प्राणी माझे सर्व म्हणणे ऐकत होता व त्याने मला एकूण किती App डाउनलोडस झाले तर निव्वळ ads through फायदेशीर उत्पन्न जमा होईल हा प्रश्न विचारला. मी उस्फुर्ततेने a few hundread इतके बोलताच तो उसळून म्हणाला नॉट hundread but at least a few of thousands is must, you need to calculate correctly असे बोलला. मला a few hundreads नंतर ऑफ thousands हा शब्द बाब्याने पूर्णच करू दिला नाही आणि त्यावेळी मी ही मनात नेमका या लेखात लिहले आहे असाच विचार केला होता :)
थोडक्यात हो, हे विडंबन नाही हे आता हा प्रसंग आठवल्यावर मनापासून वाटतय.
21 Jun 2019 - 8:01 pm | जालिम लोशन
विडंबन
21 Jun 2019 - 9:52 pm | ज्योति अळवणी
कदाचित होईलही असं
21 Jun 2019 - 10:47 pm | उपयोजक
भारी अनुभव! :-)