ग्रीन बुक : माणूस होण्याचा प्रवास

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
22 Apr 2019 - 12:39 pm

प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. विशेषतः आपल्या शहराच्या बाहेर, आपल्या राज्याच्या बाहेर, आपल्या देशाच्या बाहेर पडलो की एका वेगळ्याच जगात आपण जातो. जे जात-पात-धर्म-वर्ण या पलीकडे माणुसकी म्हणून एक धर्म आहे, ज्यामुळे आपण जगाकडे वेगळ्याच नजरेने पहायला शिकतो. ज्यात आपल्याला सगळी माणसं सारखीच आहे याची जाणीव होते.
Peter Farrelly चा यंदा तब्बल 03 ऑस्कर जिंकणारी डॉक्टर डोनाल्ड शर्ले (मेहेरशाला अली) आणि टोनी लिप (विगो मॉर्टेन्सन) यांची माणूसकी उलगडत जाण्याची कथा म्हणजे ‘ग्रीन बुक’. १९६० च्या दशकात अमेरिकेतल्या प्रसिद्ध पियानो प्लेयर असणाऱ्या डॉ. शर्ले यांना त्यांच्या कॉन्सर्ट टूर साठी ड्रायव्हर हवा असतो, न्यूयॉर्क मधला बार बंद झाल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या टोनी लिप ला त्या ड्रायव्हर कम बाऊन्सर असण्याच्या कौशल्याने नोकरी मिळते आणि लिमोझिन मधून दोघांच्याही आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरवात होते. हलके फुलके विनोदाची पखरण करत हा चित्रपट तितक्याच ताकदीने ६० च्या दशकात असलेला वर्णभेद त्यामुळे तेव्हाच्या निग्रो लोकांना दिली जाणारी वागणूक यावर परखडपणे भाष्य करतो.
मेहेरशाला अली आणि विगो मॉर्टेन्सन या दोन तगड्या कलाकारांनी हा रोड मुव्ही आपल्या अभिनयाने परफेक्टली बॅलन्स केलाय. दोघांमधली अभिनयाच्या जुगलबंदीत सरस कोण हे ठरवणं कठीणच आहे. “You never win with violence. You only win when you maintain your dignity” या सारखे दोन सेकंद का होईना पण विचार करायला लावणारे डायलॉग असो अथवा पियानो वर वाजणारं संगीत सगळं काही जबरदस्त आहे.
‘ग्रीन बुक’ ची कथा ६०च्या दशकातील जरी असली तरी त्यात दाखवलेल्या लोकांच्या वागण्यात फारसा काही बदल झालेला नाही. कथा जरी अमेरिकन असली तरी थोड्याफार फरकाने साऱ्या जगात ती लागू होते. आधी वर्ण भेद होता आता जाती भेद आहे. हा चित्रपट आपल्याला खूप काही शिकवून जातो फक्त आपण यातलं किती घेतो ते महत्वाचं ! भारतात थेटरमध्ये फार वेळ चालला नाही,अगदी ऑस्कर जाहीर झाल्यानंतरसुद्धा थेटर मध्ये बोटावर मोजता येतील इतकेच प्रेक्षक होते. पण इंटरनेट वर जर का सापडला तर माणूस होण्याची गोष्ट न चुकता पहा !

चित्रपटआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

22 Apr 2019 - 1:19 pm | राजाभाउ

आयला!! मी वाट बघत होतो, पुण्यात येउन गेला का?

महासंग्राम's picture

22 Apr 2019 - 1:53 pm | महासंग्राम

हो ऑस्कर जाहीर झाले होते त्यानंतर पुण्यात शो होते ग्रीनबुकचे , जेमतेम आठवडाभर होता.

यशोधरा's picture

22 Apr 2019 - 8:13 pm | यशोधरा

कधी? :(
एक वेगळा धागा काढा बरं, त्यावर असे सिनेमे आणि त्यांचे शो ह्याबद्दल माहिती देता येईल.