भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.
आता अवतारी देवता म्हणाल तर, त्या देवतेची पत्नी, पोरे-पोरी, सासू- सुना इत्यादी मंडळी हि येतीलच. मुख्य देवते सोबत मंदिराच्या आवारात त्यांची हि स्थापना केलेली होती. मुख्य देवेतेप्रमाणे याही देवता शक्तिशाली होत्या. भारी-भरकम दक्षिणा मोजल्यावरच देवतेची अनुकंपा भक्तांवर व्हायची. अर्थात देवतेचा कृपा प्रसाद त्या भक्तांना मिळायचा. बाकी भक्त फक्त देवतेचे दुरून दर्शन घेऊन कृतकृत्य व्हायचे. माझ्या देवतेचे मंदिर किती भव्य आहे, याचे वर्णन करून स्वत:ला धन्य समजायचे.
मी असेच एका भक्ताला विचारले, बाबा एवढी तुझी देवतेप्रती निष्ठा आहे तरी देवता तुला प्रसन्न का होत नाही. तुझे दु:ख का दूर करत नाही. तो म्हणाला पूर्वी सत्ययुगात देवता भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होऊन स्वर्गातून थेट पृथ्वीवर यायचे, भक्ताच्या मदतीसाठी. आता देवता इथे पृथ्वीवरच मंदिरात विराजमान असतात. भक्तांना तपस्या करायची गरज नाही. जो भक्त भरपूर दक्षिणा मोजतो, देवताची अनुकंपा त्या भक्तावर होते. मी काही पुढे विचारणार, तेवढ्यात भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे कपाट उघडले. देवतेची जयजयकार करीत भक्तांनी मंदिरात प्रवेश केला.
प्रतिक्रिया
8 Apr 2019 - 7:30 pm | शब्दानुज
यात कुठले रुपक आहे हो ? घडणारे प्रसंग आहे तसेच तर लिहीले आहेत. प्रातिनिधीक म्हणा हवे तर.
का आम्हाला कळाले नाही रुपक?
8 Apr 2019 - 10:24 pm | पाषाणभेद
"मंदिराचे कपाट उघडले" असा वाक्यप्रचार किंवा वाक्य मराठीत आहे?
केदारनाथ के कपाट खोले गये यावरून तर आले नाही ना?
9 Apr 2019 - 1:41 pm | अन्या बुद्धे
हे वास्तव आहे खरे.. दुर्दैवाने.. पण यात रूपक काय?