खिंड बोगदा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
6 Apr 2019 - 12:58 pm

खिंड बोगदा

या डोंगररांगा निघती
माझ्या घराच्या पुढती
किती बघावे उंचावूनी
नच कोणत्या वाटा दिसती
अनामिक भिती मनात असे
वर जावे की खाली यावे प्रश्न मनी वसे
केवळ एकच खिंड बोगदा
लांबून दिसे कुणी खोदला
एकदा जावे वाटते त्यातूनी
वाट परतीची येई का तिथूनी?

पाषणभेद
०६/०४/२०१९

अद्भुतरसशांतरसकविता

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

7 Apr 2019 - 8:40 am | चित्रगुप्त

ही काहीएक गूढार्थ असलेली कविता वाटते, परंतु तो अर्थ नीटसा उलगडला नाही. अर्थात कलाकृतीत काहीतरी गूढ, अस्पष्ट, धूसर असणेही चांगलेच.
'खिंड बोगदा' म्हणजे मृत्युविषयक जाणीव असावी का ?
काही दिग्दर्शन केल्यास उत्तम.