कला आणि अध्यात्म यांचा पूर्वीपासून सबंध आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना जसा दैवी साक्षात्कार झाला होऊन देवाचे वरदान लाभले होते. त्याबाबतची प्रचलित कथा अशी आहे कि लहानपणी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या मामांकडून (उस्ताद अलिबक्ष खान) सनईची तालिम घेत असत तेंव्हा ते गंगा नदीच्या काठावरील एका हवेली मध्ये रियाज करीत असत. एके दिवशी मामांची तब्येत ठीक नसल्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना दुसऱ्या खोलीमध्ये रियाझ करण्यास सांगितले. त्यांच्या रियाजाची खोली त्या हवेलीच्या चौथ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीच्या एका बाजूला खिडकी जी गंगेकडे उघडत होती आणि त्या खिडकीच्या विरुद्ध दिशेला पायऱ्या होत्या. त्यांनीं उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना ताकीद दिली कि "उधर कूछ देखोगे तो कहना नही". तेंव्हा उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना त्याच्या अर्थ काळाला नाही अन ते रियाजाला निघून गेले.
असंच एके दिवशी उस्ताद बिस्मिल्लाह खान रियाजामध्ये तल्लीन होऊन गेले होते आणि अचानक त्यांना एक अत्यंत सुवासिक असा गंध आला. त्यांचे डोळे मिटले होते त्यांना आश्चर्य वाटले कि इतक्या वर असा अचानक सुगंध कसा आला पण त्यांनी त्यांच्या रियाझ तसाच चालू ठेवला. अजून अर्ध्या तासाने त्या सुंगंधाची तीव्रता वाढली, उस्ताद बिस्मिल्लाह खान आणखी अस्वस्थ झाले पण ते सनई वाजवतच राहिले. आणखी थोड्या वेळाने पूर्ण खोली सुंगंधाने भरून गेली. उस्ताद बिस्मिल्लाह खान काही कळेना आणि ना राहवून त्यांनी डोळे उघडले...
संपूर्ण खोलीमध्ये धुकं पसरले होते. समोर एक मनुष्याकृती तेजोवलय उभे होते, हातात त्रिशूळं आणि कमंडलु, व्याघ्रचर्म नेसलेले साक्षात महादेव समोर उभे होते. त्यांच्या संपूर्ण शरीरातून तेजाची किरणे बाहेर पडत होती. इथे उस्ताद बिस्मिल्लाह खान थक्क होऊन पाहत होते. त्या तेजाने, प्रकाशाने त्यांचे डोळे दिपून गेले. त्यांचे पूर्ण अंग गळून गेले. त्यांचे डोळे उघडे होते पण ते पापण्या मिटू शकत नव्हते. कानाने ऐकू शकत होते पण बोलू शकत नव्हते आणि हात हलवू शकत नव्हते. असे वाटत होते कि माझे शरीर अचानक हजारो मण जड झाले आहे. त्या तेजोवलयातुन हिमशितल असा ध्वनी आला "बजा बेटा, बजा"! असे तीन वेळा झाले आणि त्या नंतर ते तेज नाहीसे झाले. त्यानंतर उस्ताद बिस्मिल्लाह खान झपाटले सारखे घरी आले. प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांना मामा भेटले उस्ताद बिस्मिल्लाह खान पळत पळत गेले, तेंव्हा मामाना कळले काही तर झाले आणि त्यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना काही तरी काम सांगून टाळले. असे दोन तीन वेळा झाले. शेवटी काम करून झाल्यावर उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी सर्व घडलेले मामांना सांगितले. मामानी सर्व काही ऐकून घेतले आणि खाडकन उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या कानशिलात मारली. "तुम्हे मना ना किया था के कूछ देखोगे तो कहना नही" मामानी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना सांगितले "अच्छा, अब कुछ देखोगे तो कहना नही".
त्यानंतर उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा रियाज चालू राहिला आणि त्यांना त्यानंतर हि दोन वेळा असा अनुभव आला.
प्रतिक्रिया
3 Apr 2019 - 10:27 am | अन्या बुद्धे
म्हणजे त्यांनी तो आदेश नंतर देखील मानला नाहीच..
त्यांची साधना आणि कला उच्चकोटीची होती हे निर्विवादच.
4 Apr 2019 - 5:45 am | पाषाणभेद
"उधर कूछ देखोगे तो कहना नही" असे का सांगितले असावे?
4 Apr 2019 - 6:45 pm | गामा पैलवान
.... कारण की या जगी रत्नपारखी विरळे व गाजरपारखींची मांदियाळी आहे. थोडक्यात काय की स्वत:ला आलेल्या अध्यात्मिक अनुभूतींची वाच्यता करायची नसते.
-गा.पै.
5 Apr 2019 - 3:50 pm | king_of_net
ध्वनी आला "बजा बेटा, बजा"!>>>>
चक्क हिंदी मध्ये सांगितल?
6 Apr 2019 - 2:42 am | दीपा माने
गामा पैलवान यांच्या वरील विधानाशी सहमत आहे.