आमच्या आवडत्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि त्यातली ही कविता वाचून आम्हाला आमचे गेलेले तें दिन याद आले. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला...
हाय :)
दिवाळी अंकाला, गझलकारांना आणि विडंबनकारांना शुभेच्छा
झाले होते जरि माझे मुंडण तेंव्हाही
उगाच नव्हते केले मी भांडण तेंव्हाही!
मला ठोकण्यासाठी जरि तू फिरून थकलिस
मिटले नव्हते डोळे... तू कारण तेंव्हाही...
कशास वाटे काळ थांबला कालच्यापरी
असह्य झाले होते... सारे.. क्षण तेंव्हाही...
तुझे नि माझे हिशेब होते चुकते झाले
(तुझेच भरले पाकिट... मी तारण तेव्हाही...)
मिठीत घेऊ नको! गुन्ह्यांना माफी असते
शिक्षेचे ना दिलेस, तू कारण तेंव्हाही!
कलाप सारे थांबवले मी केसांचे जरी...
कुठे थांबली टकलाची पसरण तेंव्हाही?
कशास केली फक्त सखे श्वासांची भाषा..
(माऊथवॉशचे केले का तोरण तेंव्हाही!! )
कसे तुला पाहुनी, खुलुनी छान म्हणावे?
कशी कळेना तुला जमे भणभण 'तेंव्हाही' ;)
कशी तुला, कळली माझी ही, भगवद गीता
घरी माजले, नंतर होते, रण तेंव्हाही
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 11:41 pm | विसोबा खेचर
उत्तम आहे विडंबन.. :)
3 Nov 2008 - 7:27 am | बिपिन कार्यकर्ते
:) छान आहे...
बिपिन कार्यकर्ते
3 Nov 2008 - 7:52 am | चतुरंग
विडंबन आवडले! :)
(खुद के साथ बातां : विडंबनात आणखी एक नवीन प्रतिस्पर्धी!? रंगा, जरा सावधच रहायला हवं बरं का! B) :? )
चतुरंग
4 Nov 2008 - 5:00 am | आजानुकर्ण
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
आपला,
(आभारी) आजानुकर्ण