फाशीची कार्य वाही होण्या पुर्वि काही मिनिटे आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधू श्री दत्तात्रेय यांच्या कडे आपली अंतिम इच्छा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले त्या साठी कितीही वर्षे लागोत..कितीही पिढ्या येवो जाओ तो पर्यंत माझ्या अस्थीचे विसर्जन करू नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर अस्थी कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडे सोपवण्यात आला नव्हता..
जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थी व रक्षा कुंभ रेल्वे पुलावरून खाली वहाणा~या नदीत फेकून दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने हि घटना एका दुकादारास सांगितली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने हि बातमी हिंदू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्य्कत्यांना घेऊन नदीवर गेले..व तो अस्थी व रक्षा कुंभ सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय कॉलेज चे एक प्रोफेसर ओमप्रकाश कोहल यांच्या कडे सुपूर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जाऊन सुपूर्द केला...
पुढे हा अस्थी-कलश 1965 मध्ये नथुराम गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते शिक्षा भोगून जेल च्या बाहेर आले..
15 नोव्हेंबर1950 ते आज पर्यंत प्रत्येक 15नोव्हेंबर ला गोड़से यांचा "शहीद दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस पुष्पहार घातला जातो व त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत तितके दीप प्रज्वलित केले जातात व भारत मातेची आरती केली जाते..व नंतर उपस्थित सर्वलोक गोडसे यांच्या अखंड भारताच्या स्वप्ना साठी काम करीत राहू अशी शपतघेतात....
आजही नथुराम गोडसेंच्या अस्थींचे अद्याप विसर्जन झालेले नाही आहे. त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही तो पर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करण्यात येऊ नये भले त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील तो पर्यंत त्या पिढी
दर पिढी हस्तांतरित करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस) इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक केला जातो
देशभक्ती जर पाप असेल
तर मी पापी घोर भंयकर|
माञ पुण्य ते असेल
माझा नम्रापरी अधिकार तयावर
वेदवर्या राही मी स्थिरवर।
प्रतिक्रिया
15 Nov 2018 - 11:50 am | माहितगार
एक समजत नाही
नथूराम गोडसें असो वा तत्कालीन इतर जहाल राष्ट्रवादी बद्दल एक कधी समजत नाही अखंड हिंदूस्थानसाठी महात्मा गांधीवर फोकस करण्याआधी तकालिन पाकीस्तान धार्जीण्या मुस्लिम लीग नेतृत्वावर या जहालांनी आपला फोकस (लक्ष्य) का केला नाही ?
आता झाल ते झाल धागा लेखकाची श्रद्धा अखंड हिंदूस्थ्नानवर असेल तर आमच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश धाग्यात २९४७ मधल्या अखंड हिंदूस्थानसाठी एक अभिनंदन संदेश लिहून ठेवा बघू !
16 Nov 2018 - 1:05 pm | गामा पैलवान
माहितगार,
गांधींना लक्ष्य करण्याआधी जिनाला का मारलं नाही असा प्रश्न आहे. देशाची फाळणी माझ्या प्रेतावरनं होईल असं गांधींनी वचन दिलं होतं. Vivisect me before vivisecting India असे ते शब्द होते. त्यावर हिंदू विसंबून राहिले. त्यामुळे जिनाला ठार मारायचा प्रश्नंच उद्भवंत नव्हता.
मात्र फाळणी स्वीकारली गेली ती एप्रिल १९४७ नंतर. प्रत्यक्षात झाली ती लगेच ऑगस्ट १९४७. मात्र फाळणीची तयारी सप्टेंबर १९४६ पासून पडद्याआड चालू होती. एकंदरीत खंडप्राय भारताची फाळणी हा अत्यंत घिसाडघाईने घेतलेला व राबवलेला निर्णय आहे. त्यातंच ऑगस्ट १९४६ पासून जिनाने डायरेक्ट अॅक्शन चे दंगे सुरु केले होते.
एकंदरीत दंगे हिंदूंनी थांबवायचे आणि त्याच वेळेस गांधींनी फाळणी रोखायची असं अलिखित श्रमविभाजन ठरलं होतं. मात्र फाळणी स्वीकारल्यावर ती रोखण्यासाठी जिनाला उडवायची तयारी करायला वेळंच मिळाला नाही. गांधी हा तोवर गोडसेंचा कधीच लक्ष्य नव्हता.
गोडसेंचा गांधी लक्ष्य झाला तो गांधीच्या टेररिस्ट फायनान्सिंग च्या आचरट कृत्यामुळे. त्याचा फाळणीशी थेट संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
16 Nov 2018 - 3:09 pm | माहितगार
माझ्या इंप्रेशननुसार नथुराम गोडसे तसेही गांधींचा शब्द मानण्या एवढे गांधींच्या प्रभावळीतले नसावेत -म्हणजे तसा माझा समज आहे . चुभूदेघे . दुसरीकडे गोडसेंनी मु.लीग नेतृत्वावर चिडण्याएवढी पायाभरणी आधीच केली होती आणि जिनांचा डायरेक्ट अॅक्शनचा कॉल त्त्कालीन मु.लीग नेतृत्व आणि जिनांच्या मागे लागण्यासाठी कळस नक्कीच होता. थँक्यू म्हणायचेच तर आधी जिनां आणि प्रभावळीला थँक्यू का केले नाही .
.
गोडसेंचा म गांधींवर एवढा विश्वास होता ?
ओह ओके आपण म्हणता तसे असेलही पण अखंद भारत होई पर्यंत अस्थिकलश विसर्जित करु नका म्हणतात तर फाळणीलाच विरोध तीव्र असून फाळणीचा विषय काढणार्यांच्या जिभा लगोलग हासडायला हव्या होत्या. नथुराम गोडसे मुस्लिम लीगच्या नेतृत्वाच्या फाळणीच्या मागणीवर लगोलग का संतापले नाही आणि मुस्लिम लीग नेतृत्वालाच का थँक्यु केले नाहि हा प्रश्न माझ्या दृष्टीने शिल्लक रहातोय असे वाटते.
16 Nov 2018 - 3:12 pm | शित्रेउमेश
कारण, त्यावेळी महात्मा गांधी हे एकमेव असे व्यक्ति होते, जे फाळणी रोखु शकत होते...
16 Nov 2018 - 4:07 pm | डँबिस००७
नथुराम गोडसेंची ईच्छा लवकर पुर्ण होवो
ही देवाकडे मागतो !
सिंधु नदीशिवाय हिंदुस्तान पुर्ण असु शकत नाही हेच तेंव्हाच्या लोकांच्या लक्षात कसे आले नाही ? तरी सुद्धा फाळणीला मान्यता दिली ?
16 Nov 2018 - 9:26 pm | गामा पैलवान
माहितगार,
मुस्लिम लीगला कोणी गांभीर्याने घेत नव्हतं. १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत अगदी मुस्लिमबहुल प्रांतातही मुस्लिम लीगला ५०% सुद्धा जागा नव्हत्या (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Indian_provincial_elections,_1946#cite_ref-20 ). भारताची फाळणी होईल अशी सुतराम शक्यता वाटंत नव्हती. तरीपण घिसाडघाईने फाळणी झालीच. गांधींनी फाळणी टाळण्यासाठी उपोषण घोषितसुद्धा केलं नाही. गांधी एरव्ही उपासाला बसायचे, पण प्रत्यक्ष वेळ पडल्यावर नुसती घोषणाही केली नाही. याला विश्वासघात म्हणतात. हिंदूंच्या भावना पिसाळलेल्या होत्या.
अशा वातावरणात गांधींनी केलेलं टेररिस्ट फायनान्सिंग हे उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरलं.
आ.न.,
-गा.पै.
16 Nov 2018 - 10:55 pm | माहितगार
गा.पै.
१) आपल्या उपरोक्त वाक्यात लीग शब्दाच्या ठिकाणी आक्रमक हा शब्द ठेऊन १४०० वर्षांचा इतिहासाची पाने उलटा आणि आपल्या उपरोक्त वाक्या आता. 'हिंदू महासभा, संघ आणि नथुराम गोडसे मुस्लिम लीगला गांभीर्याने घेत नव्हते' असे वाचून पहा आणि मुस्लिम लीगला गांभीर्याने न घेण्याची पहिली जबाबदारी 'हिंदू महासभा, संघ आणि नथुराम गोडसे यांची स्वतःची नव्हे काय याचे उत्तर द्यावे.
२) सार्वजनिक हिंसेची भिती असेल तर महात्मा गांधी त्यांचे पाय मागे घेतात हा महात्मा तब्बल चाळीस वर्षांचा गांधी इतिहास नथुराम गोडसेंना माहित नव्हता म्हणून महात्मा गांधींवर विश्वासून तत्कालीन मुस्लीम लीग नेतृत्वा विरुद्ध नथुराम प्रभृतींनी काहीच केले नाही हा नथुराम गोडसेंचा स्वतःचा हलगर्जीपणा नसेल तर नासमझी म्हणायचे का ? (चुभूदेघे)
आता याच गोष्टीची तुलना सुभाषचंद्र बोसांच्या धोरणाशी करा त्यांनी महात्मा गांधींचा खूनही केला नाही आणि महात्मा गांधीवर विसंबलेही नाहीत
सार्वजनिक हिंसाचार होईल असे कृत्य करायचे नाही अशी त्यांची स्वतःची उहड भूमिका होती - ते त्यांच्या स्वतःच्या भूमिकेनुसार वागले. पण तशी बोटचेपी भूमिका सावरकर आणि संघाची नव्हती ना ? सावरकरांनी गोडसेंनी संघाने स्वतःच्या भूमिकेला जागून, काँग्रेस लीग ब्रिटीश कृत फाळणी मानत नाही , 'वुई आर ऑप्टींग फॉर अनरिलेंटेड सिव्हील वॉर विथ पाकीस्तान अटीळ वुई गेट बॅक द सेम ' अशी घोषणा करुन गृहयुद्ध का केले नाही ? व्हिएतनामने गृहयुद्ध करुन आमेरीकेसारख्या बलाढ्य महासत्तेस पाणि पाजले, अफगाणांनी दोन दोन महासत्ताम्शी दोन हात करण्यासाठी दोन पिढ्या डावावर लावल्या सुभाषचंद्र बोसांनी ब्रिटीशांशी जेव्हाच्या तेव्हा संघर्ष केला त्या प्रमाणे जेव्हाच्या तेव्हा पाकीस्तानशी किमान संघर्ष पुकारुन तर दाखवायचा होता त्यांनी ते तसे केले आणि मला माहित नसेल तर चुभूदेघे पण निव्वळ महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नावाने बोटे मोडण्या पेक्षा स्वतः पाकीस्तान वादींशी वेळीच दोन हात केले नाही आणि नंतर ही नेहरुंना न जुमानता युद्धाची हिंमत दाखवली नाही . कुठे चुकत असेल तर दाखवून द्या माझे विश्लेषण बदलताना कदाचित मला आनंदही होऊ शकेल. मी माझ्या शंकांची उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
17 Nov 2018 - 1:20 pm | नितिन थत्ते
लिबरल लोकांवर (हल्लीच्या भाषेत फुर्रोगामी लोकांवर) नेहमी असा आरोप केला जातो की ते हिंदूंना शहाणपण शिकवतात पण मुसलमानांना काही सांगायची वेळ आली की शेपूट घालतात. कारण तिकडून येणार्या बॅकलॅशची भीती वाटते.
तुमचा प्रश्न आणि त्याचं उत्तर बहुधा याला समांतरच आहे. मुस्लिम लीग आणि जिन्ना यांच्यावर कारवाई करण्याची भीती वाटली. त्यापेक्षा हा म्हातारा सोपा आणि निर्धोक.
17 Nov 2018 - 5:10 pm | माहितगार
आपण माझा दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना हा धागा लेख वाचला नसावा, वस्तुतः हिंदू फिलॉसॉफीकल नॅरेटीव्हमध्ये हिंसेच्या तात्विक समर्थनासाठीच्या अटींची संख्या बर्यापैकी अधिक आहे. यात तेवढी तार्कीक आणि तात्वज्ञानिक उंचीची गरज भासते, हिंसेसाठी मनाचे समर्थन करे पर्यंत नदी खालून बरेच पाणि वाहून जाऊन आधीच कालापव्यय झालेला असण्याची शक्यता असते . उद्देश जातीय स्टीरीओ टायपिंगचा नाही पण मला वाटते विशेषतः ब्राह्मणांसाठी ;ब्राह्मणात पश्चात बुद्धी; असा काही वाक्प्रचार पण असावा . इंग्रजीत, सहन करु नका पण संयम ठेवा' अशा अर्थाची म्हण आहे आधी उगाचच सहन करत गेले की संयम अचानक नको तिथे तुटण्याची शक्यता असते , म्हणजे मुस्लिम लीग आणि जिन्ना यांना नथुराम गोडसे हकनाक सहन करत गेले आणि संयम नेमका नको तिथे तुटला.
बॅक क्लॅशचे म्हणाल तर तो गांधींना मारुनही झालाच आणि राजकीय हेतु होता तर राजकीय दृष्ट्या हा बॅकक्लॅश हिंदूत्ववाद्यांना सातत्याने महागच पडत गेला असावा.
लिबरल आणि तथाकथित लिबरल या दोन गोष्टी वेगळ्याच असतात. Ex-Muslim असा युट्यूबर साधा शोध देऊन मुस्लिम धर्माचा त्याग करणार्या नास्तिकांची युट्यूब कथने ऐकली तरी डोळ्यावरचा फुरोगामी चष्मा साफ करण्यास बरीच मदत होऊ शकावी. नुसत्याच पिंका टाकून नंतर उत्तरे न देणारे फुरोगामी पिंकारु मिपावरही भेटतातच . ते असो. अखंड भारताच्या स्वप्नाला हसणारे फुरोगामी जो पर्यंत आपल्यात आहेत तो पर्यंत जसे काही असतील त्या उजव्या राष्ट्रवाद्यांची राष्ट्राला नक्कीच गरज असावी.
उत्पात मुल्यापुढे बॅकक्लॅशच्या भितीने केरळात कम्युनीस्ट सरकारही नांगी टाकून तृप्ती देसाईंना वापस पाठवण्याची घटना ताजीच असते. पण फुरोगाम्यांच्या बाबतीत बॅकक्लॅश का यावा ? ते तर सर्व गोष्टींची विवेकी मांडणी करतात ना ? स्वतःस खर्या अर्थाने निष्पक्ष ठेवण्यातले फुरोगाम्यांचे अपयश त्यांच्या समोर बॅकक्लॅशची स्थिती निर्माण करते मग ती या बाजूने असो वा त्या बाजूने ते फुरोगाम्यांनी स्वतःच्या पक्षपाती धोरणांनी ओढावून घेतलेले असते यात तथ्य असावे असे वाटते.
असो मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार.
अरे धागा लेखक कुठे गेले ?
17 Nov 2018 - 1:29 pm | विजुभाऊ
असो कोणी काय इच्छा व्यक्त करावी ह एकसे ठरवणार.
अखंड हिंदुस्तान नाकारण्यामागे काही इतिहास होता.
नथुरामला हा इतिहास माहीत असेलच.
पण सिंधु नदी भारतातून वहात असेल तर ...हे म्वणजे अतीच झाले.
17 Nov 2018 - 6:05 pm | माहितगार
आपली नेमकी भूमिका काय आहे ?
17 Nov 2018 - 8:42 pm | गामा पैलवान
माहितगार,
तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं व्यक्त करतो.
१.
ही जबाबदारी सर्व हिंदूंची आहे. फक्त गोडसेंची नाही.
तसं पाहायला गेलं तर आज औवेश्यास कोणी गांभीर्याने घेतो का? समजा औवेश्याने कुठल्याश्या कांग्रेश्याला (उदा. : कमलनाथ) हाताशी धरून भारताचे तुकडे पाडले. त्यामुळे प्रवीण तोगडिया नामे कोण्या हिंदूस राग आला आणि त्यानं कमलनाथाला परलोकवासी केलं. मात्र भारताचा तुकडा पडलाच आहे अगोदर. अशा प्रसंगी औवेश्याला का मारलं नाही म्हणून तोगडियाला दोष द्यायचा का?
२.
१९४५ भारतीय आणि १९४६ च्या प्रांतिक निवडणुकांत काँग्रेसला हिंदूंनी भरघोस मतांनी विजयी केलं ते भारत अखंड ठेब्ण्याच्या (अलिखित) वचनामुळेच.
संदर्भ :
मुस्लिम लीगला खुद्द मुस्लिम मतदारही गांभीर्याने घेत नव्हता. मग गोडसेंवर आरोप करण्यात काय अर्थ?
३.
तुमचा प्रश्न रास्त आहे. गोडसेचमू हा नगण्य घटक होता. सावरकरांचं वय ६५ च्या आसपास होतं. मात्र गोळवलकर काय करीत होते हा प्रश्न उरतोच.
या संदर्भात एक गोष्ट पहिली पाहिजे. ती म्हणजे पाकिस्तान ओरबाडून घेतला गेला तो दंगलींच्या जोरावर. पंजाबात युनियनिस्ट पार्टीचं सरकार होतं. नावातंच युनियन असलेल्या या पार्टीला फाळणी पार अमान्य होती. हे सरकार जिना व लीगने दंगली करून पाडलं. सिंध प्रांतसमितीने (हल्लीच्या भाषेत विधानसभा) पाकिस्तानात सामील न व्हायचा निर्णय घेतला होता. पंजाबासारखेच दंगे करायची भीती घालून त्यांना निर्णय फिरवायला लावला.
तर मग दंगली थांबवायच्या कोणी? संघाचे लोकं दंगलग्रस्त हिंदूंना मदत करण्यास झटत होतेच. मग त्यांना लोकनिर्वाचित नेत्यांचा पाठींबा नको का? नेहरू पंतप्रधान होण्यासाठी गुढघ्यास बाशिंग बांधून बसले होते. गांधी उपोषण घोषितसुद्धा करू धजले नाहीत. पटेल वयाने ७०+ होते. सुभाषबाबूंचा पत्ता नव्हता. संघर्ष करायचा कोणी?
तरीही हिंदूंनी फाळणी कशीबशी रडतखडत का होईना स्वीकारली. पण गांधीचे टेररिस्ट फायनान्सिंगचे चाळे नंतरही चालूच राहिले. म्हणून त्याला उडवला.
अधिक माहिती इथे व त्याखालील चर्चेत आहे : https://www.misalpav.com/comment/917076#comment-917076
आ.न.,
-गा.पै.
18 Nov 2018 - 1:48 pm | माहितगार
मी काँग्रेस/संघ/किंवा कम्युनीस्ट समर्थक नाही तरीपण, मी फाळणी कधी स्विकारली ? फाळणी स्विकारली नसेल तर मी हिंदू नाही का ? किंवा पाकीस्तानातले चार नास्तिक मुस्लिम तरुण घ्या मी / आम्ही कोणत्या पुर्वजाला माझ्या देशाची फाळणी स्विकारण्याचा आधिकार कधी दिला ?
आपणही जिन्ना प्रमाणे हिंदू= काँग्रेस आणि काँग्रेस = हिंदू अशी गल्लत करत नाही आहात ना ? संघ आणि सावरकरीय हिंदू महासभेने फाळणी नेमकी कोणत्या तारखेस स्विकारली ? आपण म्हणता तसे फाळणी सर्व हिंदूंनी स्विकारली तर गोडसेंच्या अस्थिकलश विसर्जन न केले जाण्याचे आणि त्या बाबतच्या लेखाचे कोणते नेमके कोणते प्रयोजन शिल्लक रहाते ?
गांधी-नेहरु आणि त्यांची काँग्रेस -एकसंघ देशाशी ईमानापेक्षा धर्मनिरपेक्षता अहिंसा या मुद्यांशी ते अधिक बांधील असणे उघड गुपित नव्हते का/? हा वेगळा मुद्दा पण - किमानपक्षी हे दोघे त्यांच्या दोघा स्वतः पुरते स्वतःच्या धर्मनिरपेक्षतेच्या आणि हिंसेपुढे बोट्चेपेपणा दाखवण्याच्या व्यक्तिगत संकल्पनांशी प्रामाणिक होते. संघ आणि सावरकरांच्या भूमिका वेगळ्या नव्हत्या काय ? ते (इनक्लूडींग गोडसे) त्यांच्या देशाच्या एकसंघतेसाठीच्या व्यक्तिगत संकल्पनांशी प्रामाणिक राहीले का ? त्यांनी दिशाभूल करणार्या तत्कालीन मुस्लिम लीग नेतृत्वाशी संघर्षच कुठे केला ? फाळणी कालीन दंगलीत जे काही संघर्ष झाले ते सामान्य जनतेशी आगा पिछा न तपासता झाले नाही का ? आपल्या स्वतःच्या इतर धाग्यातील प्रतिसादातून असो वा अगदी तारेक फताह म्हणतात तसे असो मुस्लिम लीगच्या प्रत्यक्ष समर्थनापेक्षा उत्पातमुल्याचे भय अधिक होते आणि मग सामान्य जनतेशी संघर्ष करण्या पेक्षा उत्पात मुल्य दाखवणार्या तत्कालीन मुस्लिम लीग नेतृत्वाशी संघर्ष का नाही केला ? गृहयुद्धाच्या नावा खाली दंगली करता येत नसतात समोरच्या सशस्त्र व्यक्तिशी लढावे लागते, संघ आणि हिंदू महासभेने रोज दहा माणसे लाहोरवर हल्ला करण्यासाठी पाठवली असती तर ईस्वी १९९७ पर्यंत पन्नास वर्षात तब्बल दिडलाख हल्ले लाहोरवर चढवता आले नसते का ?
संघर्षकरणार्याच्या वयाचा तुमचा मुद्दा तकलादू आहे शांततेच्या धर्माच्या प्रेषिताने आक्रमणे वयाच्या चाळीस ते ६२ वया पर्यंत केली आणि त्यांचे दूत जगभर त्यांचा संदेश शांततामय मार्गे त्यांच्या नंतरही पोहोचवताहेत ह्याचा १४ शे वर्षांचा अनुभव नाही का ? दूर कशाला जाता बाळासाहेब ठाकरेंचे उदाहरण घ्या चुक का बरोबर वेगळी गोष्ट किमान आवाहन करण्यात स्व-विचारधारेशी प्रामाणिक !
संघ/सावरकर गोडसेंसमोर अनुयायांना गृहयुद्धाचे आवाहन करण्याचा तर प्रश्न होता ना ? तेवढे ही करुन स्वविचारधारेशी प्रामाणिक रहाता आले नाही ? १९४७ मध्ये अटल बिहारी वाजपेयी तर तरुण सळसळत्या रक्ताचे होते ना नतृत्व उपलब्ध नव्हते असे कसे म्हणता येईल ?
वड्याला तेलात तळायची हिम्मत झाली नाही की वांगी तळतात, तसे कुठे कमलनाथ कुठे म.गांधी यांचे आयुष्य वेठीस धरणे याचे समर्थन कसे होते ते अद्याप उमगत नाही.
17 Nov 2018 - 9:00 pm | गामा पैलवान
नितीन थत्ते,
त्याचं काय आहे की गांधी पंजाबी हिंदूंना उपदेश करीत होता की मुस्लिमांना ठार मारू नका म्हणून. सध्या कापणीचा हंगाम चालू आहे, तर शेतात कां करायला पाहिजे. यावर पंजाबी हिंदू म्हणाले की शेतात हे मुसलमानी मुंडक्यांचं पीक आलंय ते आधी कापूया.
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की तत्कालीन पूर्व पंजाबातले (म्हणजे आजचा पंजाब + हरियाणा + हिमाचल प्रदेश ) सर्वच्या सर्व मुसलमान साफ करण्यात आले. आज या तीन राज्यांत मुस्लिम प्रश्न नाही. गांधी नामे म्हाताऱ्याला उडवण्यापेक्षा ही बरीच मोठी कामगिरी आहे. तस्मात हिंदूंच्या पराक्रमांची चिंता नको.
आ.न.,
-गा.पै.
18 Nov 2018 - 11:53 pm | गामा पैलवान
माहितगार,
तुमचा वरचा संदेश वाचला. तुम्हाला काय म्हणायचंय ते नीटसं कळलं नाही.
गोडसे नामे व्यक्तीने फाळणी स्वीकारली नाही. तो त्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो ना? फाळणीच्या वेळची वस्तुस्थिती कळल्यावर मी सुद्धा मनोमन फाळणी धिक्कारली आहे. मला हे मतस्वातंत्र्य निश्चितंच आहे. मग गोडसेलाही असायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
19 Nov 2018 - 10:05 am | माहितगार
आपण माझ्या दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना धागा चर्चेत सहभाग घ्यावा असे सुचवू इच्छितो. इथली उर्वरीत चर्चा त्यानंतर पुढे नेणे कदाचित अधिक सुलभ होईल असे वाटते. मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार
19 Nov 2018 - 2:53 pm | रविकिरण फडके
विषय कोणताही असला तरी लिहिताना काही किमान पथ्य पाळावे अशी माझी कळकळीची विनंती आहे.
लेखावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचा उल्लेख एकेरी, म्हातारा, अशा संपूर्ण हेटाळणीच्या शब्दांत काही लोकांनी जो केला आहे तो रीतीला धरून नाही. अशा तऱ्हेने लिहिणे म्हणजे (शाब्दिक) हमरातुमरीवर उतरणे होय. कशासाठी? तुम्हाला कोणी अपशब्द वापरले आहेत का?
गांधींबद्दल काय मत असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारताची फाळणी हा जुना, अनेक विद्वान लोकांनी भाष्य केले आहे असा विषय. मी त्यावर काही लिहावे अशी माझी पात्रता नाही. तथापि, ज्याअर्थी भावना इतक्या तीव्र आहेत तर त्यास काही सबळ पुरावे असणार, ते सर्वांपुढे मांडल्यास आम्ही उपकृत होऊ. उदा. अखंड भारताबद्दल नेमकी काय कल्पना होती/आहे? ज्या कारणास्तव स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली ती कारणे काय होती, व ती कशी दूर झाली असती? इ.इ.
जाता जाता: बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "जर भारत अखंड राहिला असता तर, जरी हिंदू स्वतंत्र झाले असते तरी त्यांना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार झाले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी निश्चितपणे मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती. जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान, आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे." (संदर्भ: श्री. शेषराव मोरे यांचा काँगेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? हा ग्रंथ)
यावर आपले विचार मांडलेत तर आवडेल.
अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतरी झाकोन असावे,
प्रकटोनि नासावे, हे बरे नोहे... (असे काहीतरी संत रामदास म्हणाले होते)
19 Nov 2018 - 7:20 pm | माहितगार
ते असेही काही म्हणाले असावेत
समास नववा “…. विरक्तें शास्त्रें धांडोळावी । विरक्तें मतें विभांडावी । (विरक्ताने शास्त्रांचे शुद्ध व सखोल ज्ञान मिळवावे. निरनिराळी मते खोडून काढावीत. )
समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते हा वाद बाजूला ठेवला तरी, किमान शिवाजी महाराजांना प्रतिपक्षासोबत संघर्ष सोडण्याचे सल्ले दिल्याचे पुरावे नसावेत. इतर काही नाही तर हनुमानाची मंदिरे उभारली असावीत असो.
अखंड वा विभाजित भारतात दलितेतर दुबळे होते म्हणून बाबा साहेबांनी त्यांना देशात सवर्णांच्या दयेवर जगावे लागेल वगैरे अशी काही भूमिका घेतली होती की देशात राहून अधिकारासाठी संघर्षरत रहाण्याची भूमिका घेतली होती ?
ज्याचे विभाजन झाले त्याला एकसंघ कसे म्हणतात ? ज्या कुटूंबाचे तुकडे तुकडे होत जातात ते महान नेमके कसे होते ? अधिक वैभव प्राप्ती एकसंघतेने होते की तुकड्या तुकड्यात विभाजन झाल्याने होते ?
भारताच्याच इतिहासात १७१५ नंतर मुघल सत्ता कमकुवत झाल्या पंजाब आधी शीख मिसल आणि नंतर सावकाश रणजीतसिंगच्या अधिन झाला मध्यंतरात पेशवाई येऊन गेली त्यांनी इतर घटकांप्रमाणे मुस्लिमांवरही यशस्वीपणे राज्य केले. काश्मिरात नेपाळी डोगरा ते रणजितसिंघ ते नंतरचे राजे यांनी यशस्वी राज्य केले. अनेक वसाहतवादी युरोपीयनांनी अनेक मुस्लिम बहुल देशांचे वसाहतीकरण केले. चीन त्यांच्या मुस्लिम बहुल राज्यांवर यशस्वीपणे एकसंघ राज्य टिकवून आहे. आख्ख्या मध्य आशियात रशियाची मर्जी/वर्चस्व चालते. आणि मध्यपुर्वेत आमेरीकेचे वर्चस्व चालते. किती बोंबलू द्यात इज्राएल पॅलेस्टाईनवर वर्चस्व टेवून आहेच. भारताचे मालदीववर बर्यापैकी प्रभाव ठेवण्याची क्षमता अगदी अलिकडेपर्यंत बाळगून होता. बहुसंख्य मुस्लिम जनते सोबत इंडोनेशियातील बाली बेटावक्ची हिंदू संस्कृती कठीण परिस्थितीतही तगून आहेच. सारीच उदाहरणे आदर्श प्रभावकर्ते अथवा आदर्श राज्यकर्ते म्हणून नसतीलही पण किमान त्यात रडकू नेभळटपणा नाही.
अर्थात राजकीयदृष्ट्या पहाता भारत एकसंघ नसल्यामुळे अफगाणिस्तानात दोन दोन महासत्तांना लगोलग लुडबूड करता आली. पाकीस्तानात सौदी, चीन आणि आमेरीका लुडबूड करतात, तर दुसर्या बाजूला भारताला चीनची लुडबूड सहन करावी लागते.
फाळणीने १९४७ मधल्या दंगलींची संख्या कमी राहीली असेल किंवा फारफार गृहयुद्ध अथवा यादवीस काही वर्षे सामोरे जावे लागले असते पण पाकीस्तानच्या अण्वस्त्रांवर अतिरेक्यांचे बोट पडताक्षणी आज किती भारतीयांचा जीव टांगणीवर लागून आहे. फाळणी झालेल्या भारतातही मुसलमानांना शरीयाची सवलत रहात आली आहे एकसंघ भारतातही शरीयाला जरा आणखी डोक्यावर घेऊन त्यांनी त्यांच्याच मुस्लिम बांधवांचे मानवाधिकार संकुचित केले असते त्या पलिकडे कोणते नुकसान होते.
महात्मा गांधी लोकांना भगवद गीता वाटत फिरत होते . गीता वाटणार्याकडून प्रसंगी कृष्णावताराची अपेक्षा असते ते गांधी गांधीचे समस्त अनुयायी ते नाण्याची दुसरी बाजू असलेले संघ ते सावरकर गीता माहित असूनही गर्भगळित होऊन यादवीच्या धमक्यांना बळी पडले आणि आमच्या नव्या पिढ्यांवर अण्वस्त्रांनी नेस्तनाबूत होण्याचा धोका आला ! आम्ही आमच्या कोणत्याही भावी पिढ्यांनी भारताच्या विभाजनाची परवानगी आमच्या कोणत्याही पुर्वजांना दिलेली नव्हती. आमचे आमच्या बांधवांचे जीव अण्वस्त्र युद्धाच्या डावावर लावायचे आणि मग द्विराष्ट्रवाचाच्या शहाणपणाला काय ओवाळून घ्यायचे ?
मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार. अरे धागा लेखक कुठे हरवलेत ?
20 Nov 2018 - 2:45 am | गामा पैलवान
रविकिरण फडके,
तसंही पाहायला गेलं तर फाळणी होऊनही हिंदूंना मुसलमनांच्या दयेवरच राहायला लागतंय. हिंदूंनी राजीव गांधीस प्रचंड बहुमत देऊन निवडवून आणलं. पण त्यानं शहाबानो प्रकरणात मुस्लिम धर्मांधांची बाजू घेतलीच ना? मग फाळणीचा फायदा काय हिंदूंना? शिवाय फाळणीच्या वेळेस निरपराध हिंदू मेले त्याचं काय?
मी पश्चातबुद्धीने आंबेडकरांच्या विचाराशी सहमत नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Nov 2018 - 12:23 pm | रविकिरण फडके
Let us agree to differ.