एका एस्कीमोची गोष्ट
एका तरुण एस्कीमोने टुंड्रा मेट्री मोनीवर आपले लग्न जुळवले. सध्या सहा महीने रात्र असल्याने लग्नाचा मुहूर्त साखरपुडा आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम सहा महीने नंतर होता. एस्कीमो व्हीडीयो कॉल द्वारे आपल्या भावी वधूच्या संपर्कत होता. पण रात्र असल्याने त्यांना केवळ एक मेकाच्या आवाज ऐकून समाधानी होणे भाग होते. अखेर विरहाचे सहा महीने संपले. प्रेमाचा वसंत ऋतू उगवला. एस्कीमोने बुकीन्ग मध्ये एक इग्लू बुक केले होते. रेरा रजिस्ट्रेशन प्रमाणे त्याचे बांधकाम तीन महिन्याने पूर्ण व्हायचे होते. आतले फर्नीचर त्याने कस्टमाइज करुन घेतले होते. अखेर वधू दर्शनाच्या दिवशी एस्कीमोने शालजोडीतला नवीन कोट काढला त्यावर बॉडी स्प्रे मारला आणि ओला ऐप वर रेनडियर ची गाड़ी बुक केली होती पण प्राइम टाइम असल्या मुळे त्या ऐवजी कुत्र्यांची गाड़ी आली. रेंडीयरच्या एस्कीमोने शिवी घातली आणि आपला ओ टी पी सांगून गाडीत बसला. गूगल मैप वर 30 मिनिट वेळ दाखवत होता. हे तीस मिनिट एस्कीमोला तीस प्रहरासारखे वाटले. ट्रैफिक सिग्नल वर एस्कीमो भिकारी आणि एस्कीम तृतीयपंथी भिक मागत होते. एस्कीमोने त्यांना खुशीने पैसे काढून दिले. वाटेत एक जण बरफाचे गोळ विकत होता पण एस्कीमोला दातांची ट्रीटमेंट करायची असल्या मुळे त्याने ते नाकारली. लवकरच एस्कीमो भावी सासुरवाडीला पोहोचला. समोरच्या इग्लू तून त्याचा भावी सासरा सरपटत बाहेर आलो मागोमाग जाड़ जुड़ सासुबाई आली. तीनी बरफॉच्या खड्याने त्याला ओवाळले आणि खड़ा त्याच्या कपाळवर आपटला. एस्किमोचय कपाळात टेंगूळ आले. तो जोरात किंचाळणार होता तेवढ्यात त्याची भावी वधू बाहेर आली. एस्कीमो सुखावला. सासर्याने एस्कीमोला वेलकम द्रिक म्हणून सीलच्या कानाचे सुप आणि वोलरसच्या नाकाचे ज्यूस असे मिक्स मॉकटेल दिले. त्याची भावी वधू लाजत होती. सासर्याने झोमेंटोवर हरिण ऑर्डर केले पण एस्कीमोचे पोट बिघडल्याने त्याने केवळ रेंडीयरच्या शिंगाचे सुप मागीतले. पत्रिका डॉट कॉम वर त्यांची पत्रिका जुळली होतीच. मग त्यानी दाते पंचांग पाहून व्यवस्थित विवाह मुहूर्त ठरवला.ईवेंट मेंनेजराला बोलावून प्रोग्राम फिक्स केला. आमंत्रण पत्रिका लेआउट वगैरे फिक्स झाल्यावर ते डी टी पी साठी पुढे ईमेलवर पाठवून दिले. सगळे सोपास्कार पूर्ण करून आपल्या भावी वधुचा निरोप घेऊन एस्कीमोने शेयर ओला बुक केली आणि आपल्या भावी संसाराची स्वप्न रंगवत तो परतीच्या प्रवासाला निघाला
केदार अनंत साखरदांडे
प्रतिक्रिया
29 Oct 2018 - 12:54 pm | शित्रेउमेश
हा हा हा हा
29 Oct 2018 - 2:32 pm | श्वेता२४
मस्त कल्पना आहे. पण त्या एस्कीमोच्या लग्नापर्यंत गोष्टीचा विस्तार करता आला असता. असो. मजा आली वाचून
1 Nov 2018 - 1:15 pm | संजय पाटिल
इग्लू तीन महिन्यात तयार होताच दुसर्या दिवशी लग्न केले! पण आता रात्र व्हायला अजून तीन महिने वाट बघावी लागणार होती....
29 Oct 2018 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
कल्पनेची भरारी मस्तं आहे.
पण एक महत्वाची वस्तूस्थिती गोष्टीतील वर्णनाच्या विपरित आहे. इग्लू फक्त थंडीच्या दिवसांत बांधतात. वसंत ऋतू आला की वाढत जाणार्या हवेतील उष्म्याने इग्लू वितळून जातात. पुढच्या थंडीच्या मोसमात ते परत बांधावे लागतात.
31 Oct 2018 - 11:03 pm | मुक्त विहारि
आमच्या ३-१३-१७६० ग्रहावर तर रोज संध्याकाळी इग्लू बांधतात आणि पहाटे-पहाटे पाडतात.
पृथ्वीपेक्षा आमचा ३-१३-१७६० ग्रह फार उत्तम.
ह्या शनिवारी परत एकदा फेरी मारावी लागणार....(कुणी तरी इंधनाची सोय केल्यास उत्तम....)
31 Oct 2018 - 5:50 pm | सविता००१
मस्त आहे आयडिया
1 Nov 2018 - 12:12 am | जव्हेरगंज
कडक!!
1 Nov 2018 - 3:50 pm | अथांग आकाश
मजा आली वाचायला!