'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात.
'नवरंग'प्रमाणेच 'भोंडला'खेळायला घरी सवड नसली तरी कार्यालयात, लोकलच्या डब्यातही भोंडला रंगतो. खिरापती वाटल्या जातात. मग मी तरी मागे कशी राहू? माझा नवरंग - भोंडला सादर आहे पण 'पेपर क्विलींग'च्या माध्यमातून.......
प्रतिक्रिया
18 Oct 2018 - 7:53 am | जावई
फोटो दिसत नाही.
18 Oct 2018 - 8:01 am | यशोधरा
फोटो दिसत नाहीये, आणि इतकुसच लिहिलंस?
18 Oct 2018 - 8:35 am | नूतन
काही आवश्यक बदल केले आहेत, आता लॉग इन न करताही मला दिसत आहे. आपल्याला दिसतो आहे का?
18 Oct 2018 - 9:48 am | डॉ सुहास म्हात्रे
चित्राला पब्लिक अॅक्सेस देऊन त्याचा दुवा परत लेखात टाकला तर ते दिसेल. किंवा तो नवीन दुवा इथे प्रतिसादात ताकल्यास लेखात हलवता येईल.
18 Oct 2018 - 10:17 am | नूतन
संपादन मुभा न दिसल्याने नव्या दुव्याचे चित्र पुन्हा प्रतिसादात टाकले आहे. आता दिसत आहे का?
18 Oct 2018 - 10:14 am | नूतन
18 Oct 2018 - 1:52 pm | टर्मीनेटर
प्रतिसादातला फोटो दिसतोय. छान आहे.
तुमच्या धाग्यामुळे आमच्या सौभाग्यवतींना भोंडला केवळ ऐकून माहिती आहे, तिने प्रत्यक्षात बघितला नाहीये अजून हि नवीन गोष्ट समजली. :)
18 Oct 2018 - 12:44 pm | यशोधरा
नाही, चित्र दिसत नाही.
18 Oct 2018 - 2:34 pm | नावातकायआहे
चित्र दिसत नाही
18 Oct 2018 - 3:12 pm | सुचिता१
नाही, चित्र दिसत नाही.
18 Oct 2018 - 10:05 pm | मुक्त विहारि
बादवे,
'पेपर क्विलींग' म्हणजे काय?
18 Oct 2018 - 11:38 pm | नूतन
म्हणजे कागदी पट्टया (अगदी बारीक उदा:3मिमी रूंदीच्या) गुंडाळून विविध आकार तयार करणे
19 Oct 2018 - 4:34 pm | विनिता००२
सुरेख भोंडला :)