ओ "स्त्री" रक्षा करना..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जनातलं, मनातलं
8 Sep 2018 - 12:04 pm

.

टिपिकल पुरुषी अहंकारातुन स्त्री वर होणारे अत्याचार दर्शविणार्या निघालेल्या चित्रपटांची सूची भरमसाठ निघेल. पण हीच पार्श्वभूमी वापरुन एक हॉरर कॉमेडीशैलीतला चित्रपट बनवणे हे एखाद्याच्या डोक्यात येणे हीच मुळात एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे. परवाच सौसमवेत "स्त्री" पाहीला.
प्रेक्षकांना गृहीत धरुन बनवलेल्या चित्रपटांच्या पठडीतुन स्त्री चित्रपट वेगळा ठरतो.
संपूर्ण कथा चार दिवसात घडते. चंदेरी नामक गाव आहे तिथे दरवर्षी चार दिवस ग्रामदेवतेची जत्रा भरत असते पण त्याच चार दिवसात रात्री अपरात्री एकट्याने फिरणार्या पुरुषांना एक हडळ केवळ त्यांचे कपडे मागे ठेवुन पळवुन नेत असते. पण तिच्यापासुन संरक्षण करण्याची क्लृप्ती पण गावकर्यांनी शोधली आहे. घराबाहेर एका विशिष्ठ प्रकाराने बनवलेल्या लाल अक्षरातील शाईने " ओ स्त्री कल आना" असे लिहुन ठेवले कि तो आत्मा त्या रात्री त्या घरी येत नाही. (साधारण पण ९० च्या दशकात उठलेल्या हाकामारीचा संदर्भ आहे.)
मुळात चित्रपट पाहावा तो कसलेल्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहण्यासाठी.
उदाहरणार्थ.
स्त्रीला पकडायचे असेल तर पुरुषात चार पाच गुण असणे आवश्यक आहे. त्यातील एक म्हणजे तो तवायफजादा असणे. राजकुमार राव बाकीमध्ये बाकी सगळे गुण आहे पण त्याला स्वतःला ते काम करायचे नाही म्हणुन तो म्हणतो कि सगळे ठिक आहे पण शेवटचा गुण जो तवायफजादा असणे तो कसा काय पुर्ण करु तेव्हा पंकज त्रिपाठीने त्याला तुझी आई अमुक तमुक होती हे पटवुन दिल्याचा केलेल्या प्रसंगात जो अभिनय केला आहे तेव्हा बर्याच दिवसांनंतर खोकल्याची उबळ येऊ पर्यंत हसलो.
दुसर्यात "स्त्री" समोर उभी आहे तिला कसेतरी सापळ्यापर्यंत आणले आहे आणि आता सारे काही राजकुमार राव वर आहे. पुन्हा इथे पंकज त्रिपाठी सूचना देतो " तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहा" आणि त्यावर राजकुमार रावने केलेला शाहरुखची नक्कल दाद देण्याजोगी.

बरेच चित्रपट डोके बाजुला बघण्याच्या लायकीतले असतात पण हा चित्रपट डोके वापरुन बघण्याच्या कॅटेगिरितला आहे.
उदा. स्त्रीला पकडणारी युक्ती सांगणारे एक पुस्तका लायब्ररीत आहे पण त्यातील महत्वाची पाने फाडली आहेत. मग आता काय करायचे? तर त्याच्या मूळ लेखकालाच भेटावे असे कन्क्लुजन निघते. आता ह्या लेखकाने हे पुस्तक कधी लिहिले आहे तर आणीबाणीच्या काळात. (पुन्हा एका स्त्रीचा संदर्भ वेगळ्य अर्थाने.)

आवडत्या "स्त्री" सोबत चित्रपट हा चित्रपट पाहाणे हा एक चांगला अनुभव ठरु शकतो. ;)

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

माहितगार's picture

8 Sep 2018 - 12:18 pm | माहितगार

(साधारण पण ९० च्या दशकात उठलेल्या हाकामारीचा संदर्भ आहे.)

हाकामारीचे दशक ९० चे की ६० चे ?

बाकी लेखाने चित्रपटाबद्दल जराशी उत्सुकता जागवली आहे. योग आल्यास नक्कीच बघू .

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2018 - 12:26 pm | कानडाऊ योगेशु

सध्या चाळीशीत असणार्या प्रत्येकाने त्याच्या बालपणीच्या काळात हाकामारीबद्दल ऐकले आहे व ऐकुन स्वतःची टरकावली आहे. पण हा प्रकार नंतरचा पिढीत संक्रमित झाला नाही असे वाटते.

प्रचेतस's picture

8 Sep 2018 - 12:38 pm | प्रचेतस

हाकामारीच्या तीन फुल्या होत्याच, शिवाय साप येऊ नये म्हणून आस्तिक पण लिहिल्या जात असे.

माहितगार's picture

8 Sep 2018 - 1:16 pm | माहितगार

शिवाय साप येऊ नये म्हणून आस्तिक पण लिहिल्या जात असे.

हा काय प्रकार होता, कोणत्या प्रदेशात कोणत्या कालावधीतील

प्रचेतस's picture

8 Sep 2018 - 1:56 pm | प्रचेतस

महाराष्ट्रातीलच प्रकार.
साधारण ८० ते ९० च्या दशकातला. अस्तिकाने जनमेजयाच्या सर्पसत्रातून सापांना वाचवले म्हणून जो त्याला वर असा वर मिळाला की जो कोणी आस्तिकाचे नामस्मरण करेल त्याला सापांची भिंती नाही. त्या काळात घरोघरी दरवाजावर आस्तिक लिहिलं जात असे.

चित्रगुप्त's picture

10 Sep 2018 - 6:02 am | चित्रगुप्त

माझ्या लहानपणी १९५० च्या दशकात कोणी सहज बोलताना 'साप' म्हणाले, तरी लगेच आपण "आस्तिक आस्तिक" असे म्हणायचे (म्हणजे सापाची भिती रहात नाही) असे मुलांना शिकवले जायचे, ती सवय मलाही होती. तसेच कशाचीही भिती वाटली तर रामरक्षा म्हणत.
.

माहितगार's picture

8 Sep 2018 - 1:15 pm | माहितगार

मनोगतातील एका लेखात आपण म्हणता तसे ९० च्या दशकातला संदर्भ दिसतो पण मनोगतावरचा एक प्रतिसाद ६० च्या दशकातली आठवण देतो. अर्थात ६० च्या दशकातली आठवण माझ्या वयाने ज्येष्ठ नातेवाईक स्त्रीकडूनही ऐकलेली होती म्हणून दशक ६० चे की ९० चे विचारले. बाकी मला स्वतःला ही गमतीशीर अंधश्रद्ध-अफवा गेल्या काही वर्षापुर्वी पर्यंत गमतीशीर किस्सा ऐकला नाही तो पर्यंत माहित नव्हती. नव्या पिढ्यांना कल्पना नसणे म्हणजे काळाच्या ओघात विस्मरणात गेली असणार. आता विनोदी किस्से म्हणून ऐकावयास चालते.

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2018 - 1:27 pm | कानडाऊ योगेशु

"९० च्या दशकानंतर लुप्त झालेल्या ह्या दंतकथेविषयी" असे मला म्हणायचे होते. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा प्रकार त्याआधीचाही असावा. एका व्हर्जननुसार (त्याकाळातल्या बालबुध्दीनुसार..उगाच बालकीखाल काढु नये) हाकामारी ही सरकारमान्य होती. म्हणजे कुठलेतरी धरण बांधले जात नव्हते व काही ना काही दोष रहात होता. त्यावर नरबळी हाच एक उपाय होता. हा प्रकार कायदेशीर रित्या होऊच शकत नव्हता म्हणुन हाकामारी ची वावडी उठवण्यात आली. त्यानुसार रात्री अपरात्री तुमच्या नावाने एक स्त्री हाक मारेल तुम्ही तिला ओ दिली तर तुम्ही संमोहीत होऊन तिच्यामागे चालु लागाल व ती तुम्हाला विवक्षित ठिकाणी नेऊन तुमचा बळी घेईल. ह्यापासुन स्वतःला वाचवायचा उपाय म्हणजे वर प्रचेतस ह्यांनी उल्लेखिलेल्याप्रमाणे घरावर तीन फुल्या मारणे. ह्या एकुण प्रकाराने बालवयोगाटातील सर्वांची जाम टरकत असे.

हाकामारीला तर मोठ्यांची देखील टरकत असे.

आमची मावसआजी तर एक कहाणी नेहमीच सांगत असे. हाकामारीच्या अफवांच्या ऐन भरात साधारण ६०/७० च्या दशकात तिच्या घरी मध्यरात्री तिच्या घराच्या दरवाजावर तिच्या मुलाच्या नावाने थाप पडली. मुलगा ओ द्यायला जाणार तर म्हातारीने त्याचे तोंड दाबून धरले तीन हाका मारल्यानंतर हाकामारी गेली.
मावसआजी तिच्या खास शैलीत ही कहाणी नेहमीच रंगवून सांगत असे.

ज्योति अळवणी's picture

8 Sep 2018 - 10:52 pm | ज्योति अळवणी

हाकामारीबद्दल खूप ऐकले आहे माझ्या आईच्या आईकडून. तिला असल्या गोष्टी सांगायला खूप आवडायचे. त्यामुळे आम्हा मुलांची मात्र पूर्ण टरकुन जायची. ती रात्री खिडकीत बसू द्यायची नाही. आणि आम्ही एरवी वाद घातला तरी तेवढं मात्र करायचो.

बाकी लेख मस्त. पटला विषय. आणि सिनेमा देखील बघितला आणि हसता हसता दचकण्यात मजा आली

आनन्दा's picture

9 Sep 2018 - 10:49 am | आनन्दा

स्केरी मूव्ही आहे का?

कानडाऊ योगेशु's picture

9 Sep 2018 - 12:00 pm | कानडाऊ योगेशु

नाही. कॉमेडी हॉररपट आहे. व दचकवण्याचे जे प्रसंग आहेत ते ही विनोदनिर्मीतीच करतात.

सतिश गावडे's picture

9 Sep 2018 - 12:13 pm | सतिश गावडे

कॉमेडी आणि हॉरर याचं अफलातून मिश्रण आहे. विनोदी प्रसंग तर जबरदस्त जमलेत.
एकंदरीत न चुकवावा असा चित्रपट आहे.

मंदार कात्रे's picture

9 Sep 2018 - 6:22 pm | मंदार कात्रे

आवडला

एक निराळा चित्रपट आहे

बघायचा आहे हा पिक्चर!

आत्ताच थेट्रात जाऊन बघून आलो. ट्रेलरात वाटला तितका काही खास वाटला नाही. अधूनमधून कंटाळवाणा पण वाटला. यातली भयानक दृश्ये रामसे बंधु टाईप आहेत. सावकाशीने पुढे कधीतरी तूनळीवर येईल तेंव्हा बघण्यासारखा आहे.

चांदणे संदीप's picture

10 Sep 2018 - 9:59 am | चांदणे संदीप

डोके जाग्यावर ठेऊन बघायचा तर मला बऱ्याच गोष्टी खटकल्या. उदा., ज्या गाववाल्यांच्या रक्षणासाठी नायक जीवावरचे काम करायला निघालेला असतो त्यात गाववाल्यांचा सहभाग शून्य! नंतर ते सत्कार वैग्रे ठीक आहे.
Spoiler Alert!:
'स्त्री' ला सन्मान देण्याची गोष्ट कथानक करते पण शेवटी एक 'स्त्री'च कपटाने अमुक सिद्धी/शक्ती मिळवते.

Sandy

चित्रपटाचा शेवट आजिबात समजला नाही
हिरविन च ती स्त्री असते की कसे?

mrcoolguynice's picture

2 Dec 2018 - 5:51 pm | mrcoolguynice

स्त्री ची रूपे अनेक ...

'देवीच्या' उत्साव काळातच स्त्रीचा वावर ? योगायोग ?
.
एक डायलॉग आहे पंकज त्रिपाठीच्या तोंडी ...

" येस मीन्स येस ", त्याचधर्तीवरच्या कुठल्या हॅशटॅग ची आठवण होतेय ?

कानडाऊ योगेशु's picture

2 Dec 2018 - 7:57 pm | कानडाऊ योगेशु

शेवट ओपन एन्डेड आहे. बहुदा ह्या चित्रप्टाचा सेक्वेल येऊ शकतो.
श्रध्दा कपूर एक चेटकीण आहे. (इतकी सुंदर चेटकिण !!) व ती ह्या "स्त्री"च्या मागावर आहे तिची शक्ती मिळविण्यासाठी. पुढचा भाग आला तर श्रध्दा कपूर विलन असावी त्यात.

राघव's picture

5 Dec 2018 - 3:58 pm | राघव

आवडलाय!
खूप दिवसांनी चांगला विनोदी भयपट आलाय. राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी अप्रतीम. बाकी सगळ्यांनी देखील चांगली कामे केलीत. विजयराज ५ मिनिटांच्या कामात देखील लक्षात [आणिबाणीत] राहतो! :-)