चालू घडामोडी - सप्टेंबर 2018

ट्रम्प's picture
ट्रम्प in राजकारण
1 Sep 2018 - 6:36 am

नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .

यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
‌परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
‌नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
‌ नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
‌तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

13 Sep 2018 - 12:12 pm | अथांग आकाश

पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्‍या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्‍यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.

अगदी खरं! आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'स्क्रोल' सारख्या डाव्या विचारसरणीच्या संस्थळावर खालील बातमी आज आहे!

‘We have lost faith in the Vatican’: Kerala nuns vow to protest till rape accused bishop is arrested
The nuns say they were forced to launch their protest last week after both the church elders and the police failed to act against Bishop Franco Mulakkal.

नाखु's picture

13 Sep 2018 - 4:13 pm | नाखु

पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्‍या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्‍यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.

भारता बाहेरुन मिळनार्या मदत मलाई कशि सोडवेल बरे आणि हा धर्म तर मानवत्तावादाची मक्तेदारी असलेला

संमतीने विवाहबाह्य संबंध ठेवल्या नंतर पाच पाच वर्षानंतर बलात्काराच्या केस दाखल करून घेणारे पोलीस आणि त्या केसवर निर्णय घेणार न्यायाधीश फक्त आपल्या भारतात च असतील . लग्नाचे आमिष देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडले असा आरोप बऱ्याच केसेस मध्ये असतो व त्याच केस मध्ये पुरुषावर बलात्काराची केस ठोकली जाते . त्या बाईने संमती ने संबंध ठेवले असतांना बलात्काराची केस न करता , फारतर फसवणुकीची केस होऊ शकते . म्हणून त्या नन ची भूमिका सुद्धा नीट तपासून बघीतली पाहिजे . तिला उचलून पळवून कोणी नेले नव्हते तर कन्फेक्शन बॉक्स मध्ये पूर्वीच्या अफेअर ची कबुली दिल्या नंतर ज्या पहिल्या पादऱ्याने तिचा गैरफायदा घेतला मग त्याच वेळेस तिने का बोंब मारली नाही ? त्या चारही निर्लज्ज पादऱ्यांना मात्र मानले पाहिजे , वेळोवेळी त्या नन ला उपभोगून फाइव्ह स्टार हॉटेल चे बिल सुद्धा तिलाच भरावयास लावत होते .

(संपादित)

झेन's picture

13 Sep 2018 - 9:51 pm | झेन

अलिकडे" स्पेन मधील चर्चमधे गणपती" चा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची खरी ष्टोरी आता सापडली.
https://dailycaller.com/2017/08/29/hindu-god-paraded-through-catholic-ch...

गामा पैलवान's picture

17 Sep 2018 - 12:40 pm | गामा पैलवान

झेन,

लेखाबद्दल धन्यवाद!

पोपच्या अंधश्रद्धा समुद्रात बुडवायच्या लायकीच्या आहेत, हे यातनं समजतं. समजा केलं स्वागत गणपतीचं तर काय मोठा धर्म बुडाला? समजा जरी बुडाला तर मग येशूस सुळी चढवलं त्यामुळे तो तरला कसा काय? येशूनं कधी मूर्तीपूजा निषिद्ध मानली होती? उगीच त्याच्या नावाने काहीही ठोकून द्यायचं.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Sep 2018 - 11:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

China installing QR codes on Uighur Muslim homes in mass security crackdown

आतापर्यंत दाढी ठेवण्यावर बंदी, कचेरीच्या कामकाजाच्या वेळेत नमाज पढायला बंदी, रमजानमध्ये रोजे ठेवायला बंदी, गैरसोईच्या मुस्लीमांना राजकिय कँप्समध्ये गोळा करणे, इत्यादी कृत्यांनंतर आता चीनी सरकार उगीर मुस्लीमांच्या घरांवर QR कोड्स लावून त्यांच्यावरच्या बंधनांचे पाश अजून घट्ट आवळत आहे. चीनच्या सरकारच्या मते या कारवाईच उद्देश आहेत : (अ) लोकसंख्यावाढीवर ताबा ठेवणे आणि (आ) त्या लोकांचे व्यक्तिगत तपशील त्वरीत उपल्ब्ध होऊन सेवा देणे शक्य व्हावे (कम्युनिस्ट विरोधकांना कोणती सेवा देतात, हे जगजाहीर आहेच !).

QR कोड सोडून वरच्या सर्व कारवाया सुरु होऊन अनेक महिने/वर्षे लोटली आहेत. पण जगभरातून कोणत्याही अतिरेकी व्यक्ती अथवा संस्था, मानवी अधिकारसंबंधी कार्य करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था किंवा तथाकथित विचारवंत व्यक्ती/संस्था/माध्यमे; यापैकी कोणाचीही नजरेत येण्यासारखी प्रतिक्रिया/कृती दिसत नाही.

विशेषतः, भारतात जरासे खुट्ट झाले की ज्यांचे काळीज अतीव दु:खाने पिळवटून जाते आणि जे जगभर ढिंढोरा पिटू लागतात, अश्या मानवतावादी आणि/किंवा विचारवंत कैवार्‍यांची झोप आणि दातखीळ अजून काही संपण्याची लक्षणे दिसत नाहीत !!!

ट्रम्प's picture

15 Sep 2018 - 9:23 am | ट्रम्प

म्हात्रे सर ,
भारतातील मुस्लिम पक्षांनी , संस्थांनी चीन मधील मुस्लिम लोकांच्या गळचेपी बद्दल अवाक्षर न काढण्याचे कारण चीन आणि पाकिस्तान चे मित्र संबंध असू शकतात .

म्यानमार , फ्रान्स , अमेरिका व इतर प्रगत राष्ट्रांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत व हे देश पाकिस्तान विरोधक असल्यामुळे या देशांतील मुस्लिमविरोधी कारवाया चे पडसाद पाकिस्तान मध्ये उमटतात , व त्याचे हिंसक परिणाम आपल्या भारतात होतात . सार्वजनिक संपत्ती ची जाळपोळ , दंगलीत इतर जातींच्या लोकांची व्यवसाय लक्ष करणे याचे आवडते छंद .

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2018 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतातील मुस्लिम पक्षांनी , संस्थांनी चीन मधील मुस्लिम लोकांच्या गळचेपी बद्दल अवाक्षर न काढण्याचे कारण चीन आणि पाकिस्तान चे मित्र संबंध असू शकतात .

हे होते याचे कारण मित्रत्वाचे संबंध वगैरे अजिबात नाही. सर्वात पहिले म्हणजे, "धर्माला अफूची गोळी म्हणणारा कम्युनिस्ट चीन" आणि "आपल्या धर्माविरोधी चकार शब्दही काढणार्‍याचा शिरच्छेद करावा असे कर्मठ मत असणारे इस्लामिस्ट" यांची मैत्री हीच फार मोठी विनोदी भोंदूगिरी (हायपोक्रिसी) आहे ! कारण, या दोघांची ही आपापली तत्वे मूलभूत आणि तडजोड (compromise) करण्यास अश्यक्य असलेली आहेत, हे जगजाहीर आहे. आणि अर्थातच, हे सर्व जगापुढचे उघड गुपित आहे (सूड भावनेच्या (रिप्रेजल) भितीने ते उघडपणे म्हणायचे नसते, हे पण उघड गुपित आहेच) !

त्या भोंदूगिरीची खरी कारणे अशी आहेत...

१. कितीही आवाज केला तरी ते देश/संस्था/व्यक्ती चीनचा केसही वाकडा करू शकत नाहीत याची त्यांना आणि इतर जगाला पक्की खात्री आहे

आणि त्याचबरोबर...

२.
(अ) चीन त्यांच्या विरोधाला अजिबात भीक घालत नाही/घालणार नाही व
(आ) विरोध केलाच तर केवळ चपराक नव्हे तर सज्जड मार देण्याची धमक चीनमध्ये आहे हे ते ओळखून आहेत, आणि
(इ) (भारत व अमेरिकाविरोधी कारवाया चालू ठेवण्याच्या व इतर बहाण्यांनी मिळणारी) चीनी पैशांची भीकही बंद होईल ही भिती आहेच !

३. चीनने लाथ मारली तर उरलेल्या जगात पाठीशी घालू शकेल असा दुसरा देश नाही, हे सुद्धा ते ओळखून आहेत... तेव्हा, इतर वेळेस कितीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी याबाबतीत, धर्म/वैचारिकता/उदारमतवाद/इ सर्व बासनात गुंडाळून (बॅकबर्नरवर ठेवून) चीनची मिंधेगिरी करणे, त्यांना अपरिहार्य आहे. गंदा है, पर आखिर ये धंदा है, भाय !

तर मग दातखीळ बसेल नाही तर अजून काय होईल.

NiluMP's picture

17 Sep 2018 - 6:35 pm | NiluMP

+१०००००००००....

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

21 lakh company directors fail to register for eligibility

कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने दिलेली मुदत सपली तरी ३३ लाख कंपनी डिरेक्टर्सपैकी तब्बल १२ लाख डिरेक्टर्सनी know-your customer किंवा KYC रजिस्ट्रेशन केलेले नाही. हे सर्व किंवा त्यातील बहुसंख्य खोका (उर्फ बनावट) कंपन्यांचे तेवढेच बनावट डिरेक्टर्स असल्याचा संशय आहे. आता त्यांची चौकशी सुरू झाली की काळा पैसा तयार करण्याचे कारखाने असलेल्या कंपन्यांचे अनेक धंदे उघड होतील.

ट्रम्प's picture

17 Sep 2018 - 7:08 pm | ट्रम्प

हे मात्र खरं आहे .
मोदींच्या काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी केलेल्या कारवाई मूळे व्यापारी , लघु उद्योजक यांचे धाबे दणाणले आहेत . आणि हा वर्ग बहुसंख्य मारवाडी समाजाचा होता . माझ्या माहितीतील मार्केटयार्ड पुणे मधील एक कंपनी आहे , त्या कंपनीच्या सात आठ सिस्टर कम्पण्या . सगळ्या कंपन्यांचा मिळून टर्न ओव्हर 15 करोडच्या पुढे कधी गेला नाही .दोनच डायरेक्टर त्या सगळ्या कम्पण्यावर होते . गेली 25 / 30 वर्ष त्या प्रत्येक कंपनीमध्ये आलटून पालटून किरकोळ आगी लागायच्या आणि एफ आई आर दाखल करून महत्वाच्या फाइल्स गायब केल्या जायच्या व एक्साइज , इन्कम टॅक्स कडून विशिष्ट उलाढाली साठी सवलत मिळायची . आता फक्त दोन कंपन्या आहेत , त्या मारवाडी डायरेक्टर नीं मोदी इफेक्ट मूळे झक मारून बाकीच्या कम्पण्या बंद केल्या .
अशा जलद फायदा न देणाऱ्या पण दीर्घकालीन फायदेशीर निर्णयांची उपयुक्तता दिसायला थोडा वेळ लागणारच .

टर्मीनेटर's picture

18 Sep 2018 - 2:24 pm | टर्मीनेटर

आज मला CA फर्म कडून आलेल्या नोटिफिकेशन मध्ये म्हंटलय कि,

The government is considering giving another opportunity to 2.1 million company directors who have failed to comply with the ‘know your customer’ (KYC) norms, according to a senior official.

“The website wasn’t functioning properly between September 13 and September 15. Also, there were glitches in uploading the digital signatures,” ICAI president Naveen ND Gupta wrote in a recent letter to the ministry.

KYC अपडेट करण्यासाठी आधी ३१ ऑगस्ट अंतिम तारीख जाहीर केली होती. नंतर १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर केली. मी आणि आमचा दुसरा डायरेक्टर १२ सप्टेंबरला (खरंतर अनिच्छेनेच )आमच्या CA मार्फत हि प्रक्रिया पूर्ण करत असताना, फॉर्म सबमिट केल्यावर MCA कडून ईमेल आणि एसएमएस वर OTP मात्र त्वरित आले , परंतु अजूनही (१८ सप्टेंबर) कन्फर्मेशनच्या ईमेल किंवा एसएमएस चा पत्ता नाहीये.

मुळात डिजिटल सिग्नेचर द्वारे कोणीही डायरेक्टर KYC ची प्रक्रिया सहज घरून किंवा कार्यालयातून स्वतःच पार पाडू शकत असताना उगाच CA व्हेरिफिकेशनची खर्चिक अट ठेवण्यात आल्या बद्दल ह्या प्रकाराबद्दल संचालकांमध्ये नाराजी होतीच. किमान ५०० रुपये x ३३ लाख संचालक गृहीत धरले तरी CA लोकांसाठी असलेली हि १६५ कोटींची रोजगार हमी योजना वाटत होती. आणि आता ICAI president Naveen ND Gupta ह्यांनी मंत्रालयाला पत्र लिहिल्यामुळे ती शक्यता खरी पण वाटत्ये :)

दोन-चार संचालक असतील तर एकवेळ ठीक आहे, पण कित्येक कंपन्यांमध्ये जास्त संख्येने संचालक आहेत त्यांना प्रती संचालक CA ची किमान ५०० ते १५०० रुपये फी भरण्याचा भुर्दंड सोसायला लावणारा हा निर्णय होता.

जे २१ लाख जण बाकी राहिलेत त्यातले सगळेच बनावट असण्याची शक्यता कमी वाटते, काहीजणांनी मुद्दाम खर्च टाळण्यासाठी दोन-चार जणांचे KYC अपडेट केले असू शकतील आणि बाकीचे निवृत्ती स्वीकारतील. किंवा बऱ्याच जणांना आणखीन मुदतवाढ मिळेल ह्याची खात्रीच असावी.

केवळ ५ महिने आधी म्हणजेच ३१ मार्च २०१८ च्या आधी Director Identification Number (DIN) प्राप्त झालेल्यांना सुद्धा अशी खर्चिक सक्ती केली गेल्यामुळे हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह नव्हता.

सरकार कोणाचेही असले तरी बाबूशाही आपल्याच मस्तीत कामे करते, कोणी कितीही झटपट कंपनी रजिस्ट्रेशन च्या जाहिराती केल्या तरी वस्तूस्थिती अगदी उलट आहे. MCA ची कार्यपद्धती जो पर्यंत सुधारत नाही तो पर्यंत कुठल्याही चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकत नाही.(उदा. स्टार्टअप इंडिया).

डिजिटलायझेशन झाले तरी अजूनही कुठल्या कुठल्या फालतू डिक्लरेशन MCA कडे फाईल करण्यासाठी Stamp Papers आणि 'बिफोर मी' नोटरी करण्यासाठी लोकांचा वेळ आणि पैसा खर्च होतोच आहे.

गणामास्तर's picture

25 Sep 2018 - 3:02 pm | गणामास्तर

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
तेच तेचं कागदी घोडे सारखे का नाचवले जातायत काही कळायला मार्ग नाही राव. तुम्ही म्हणताय तसं हि सनदी लेखापालांसाठी रोजगार हमी योजनाच वाटतेय.
दिड वर्ष झालं आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असं चाललंय.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी आपले वर्चस्व कायम ठेवत चारही जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. तर, बाप्सा तिसऱ्या स्थानावर राहिली. शुक्रवारी मतदान पार पडले होते
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या संघटनांनी 'लेफ्ट युनिटी' म्हणून एकत्रित निवडणूक लढवली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन. बालाजी याने अभाविपच्या ललित पांडेचा ११७९ मतांच्या अंतराने पराभव केला. उपाध्यक्षपदी सारिका चौधरी (२५९२), महासचिवपदी एजाज अहमद राथेर (२४२६) आणि संयुक्त सचिवपदी अमुथा राजदीप (२०४७) मते मिळवत विजयी झाले.
देशभरातील विद्यार्थी चळवळ, राजकीय जाणकारांच्या नजरा या निवडणुकीकडे लागले होते. केंद्रात भाजप नेतृत्वातील सरकार आल्यानंतर भाजपप्रणित अभाविपने जेएनयूच्या विद्यार्थी निवडणुकीत विजय मिळवण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अभाविपचा दारुण पराभव झाला.

शुक्रवारी विद्यार्थी संघाच्या विविध पदांसाठी मतदान झाले होते. शुक्रवारी रात्री मतमोजणी सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रतिनिधीशिवाय मतमोजणी करत असल्याचा आक्षेप घेत अभाविप कार्यकर्त्यांनी गोंधळ करत तोडफोड केली होती. अभाविपने मतपेट्या पळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप इतर संघटनांनी केला. तर, अभाविपच्या उमेदवारांनी मतमोजणीसाठी प्रतिनिधी पाठवावा यासाठी तीन वेळा उद्घोषणा करण्यात आली. मात्र, वेळेत हजर न राहिल्यामुळे मतमोजणीस सुरूवात केली असल्याचे निवडणूक समिती सदस्याने सांगितले. या प्रकारामुळे तब्बल १२ ते १६ तास विद्यापीठात गोंधळ सुरू होता. अखेर शनिवारी संध्याकाळी मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली.

पुंबा's picture

18 Sep 2018 - 12:34 pm | पुंबा

https://indianexpress.com/article/india/cbi-put-it-in-writing-inform-us-...

हा नक्की प्रकार काय आहे हे कळत नाही. सबंध तपास सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत व्हायला हवा असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2018 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता "टाईम्स नाऊ" वर चाललेली ब्रेकिंग न्यू़ज :

ऑगस्टा वेस्टलँड कडून व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर्सच्या विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामधिल मुख्य दलाल ख्रिस्चियन मायकेल याला भारतात पाठविण्याचा निर्णय (एक्ट्रॅडिशन) दुबई कोर्टाने दिला आहे. तो भारताच्या ताब्यात आल्यावर या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी अनेक गोष्टी व त्यांचे पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2018 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुषार काळभोर's picture

21 Sep 2018 - 8:33 pm | तुषार काळभोर

मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा ‘विनोद’

राज्यातील पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २४, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी व्हर्चुअल माध्यमातून हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मालकीच्या ‘सह्याद्री’ मराठी वाहिनीला डावलून चक्क ‘वंदे गुजरात’ या गुजराती भाषेतील वाहिनीची निवड केली आहे.

या प्रशिक्षण वर्गांसंदर्भात शिक्षण विभागाने आदेशही जारी केले आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘वंदे गुजरात’ ही वाहिनी दिसत नसल्याने शाळांनी डीश सेटटॉप बॉक्स बसवावा किंवा ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधून ‘वंदे गुजरात’ वाहिनी बघावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या शाळांकडे टीव्ही नाही त्यांनी इतर शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही या आदेशात म्हटले आहे.

नक्की काय अगतिकता आहे या सरकारची हे खरेच कळत नाही. मुख्य्मंत्री पण बर्‍याचदा हिंदीतच ट्वीट करतात.

ट्रम्प's picture

24 Sep 2018 - 10:24 pm | ट्रम्प

अरे बापरे !!!! सर्वात निष्क्रिय अकाऊंट असेल फडणवीसांच् , एखादया विषयावर कितीही तक्रारी करा पण ढिम्म राहणार . कार्यवाही करणे दूर , पोचपावती सुद्धा नाही देणार ,ट्विटर वर सतत स्वतःचे कौतुक!!!!
याच्या अगदी उलट मोदीं , सुषमा स्वराज , अरुण जेटली , क्रीडामंत्री राठोड यांची हँडल करण्याची पद्धत अवर्णनीय आहेत कारण तुमची तक्रार योग्य त्या अधिकाऱ्याकडे फॉरवर्ड करून पाठपुरावा घेतात .
मी पूर्वीच एकदा सांगितले आहे मोदींना तक्रार केल्या नंतर दोन दिवसांत 70 एम्प्लॉईज असलेल्या मारवड्याच्या कंपनी मध्ये pf व इतर सुविधा चालू झाल्या .
दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील हलवदार ला वठणीवर आणले होते .

प्रत्यक्ष वसाहतवाद नसला तरी युरोमेरीकन सातत्याने प्रभाववादात कसे गुंतलेले असतात. लिबीयातील दहशतवाद संपवून लोकशाही बळकट करणे युरोमेरीकेचे ध्येय समजता येते. पण त्या विषयी धोरण नेमके काय असावे या वरुन इटली आणि फ्रान्स मधील वाद उघडपणे खेळला जातोय आणि त्या वादाचे बातमीकरण व्हॉईस ओफ आमेरीका करते. लिबीया धोरण विषयक इटली- फ्रान्स वादाचा आमेरीकन आढावा वृत्त युरोमेरीकन प्रभाववादाचे उत्तम उदाहरण ठरावे

पुंबा's picture

24 Sep 2018 - 6:34 pm | पुंबा

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rs-5000-cr-fraud-sand...

'मद्यसम्राट' विजय मल्ल्या आणि हिरा व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले असतानाच ५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी परदेशात पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे.

पुंबा's picture

24 Sep 2018 - 6:38 pm | पुंबा

https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/petrol-pr...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलच्या दराने ९१.८२ रुपयांचा आकडा पार केला असून लवकरच ते शंभर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. .

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीला मिळते. याचे कारण काय असावे?

तुषार काळभोर's picture

24 Sep 2018 - 6:45 pm | तुषार काळभोर

तिथून सर्वात जवळचा पेट्रोल डेपो सुमारे दोनशे किमी असल्याने पेट्रोलचा वाहतूक खर्च वाढतो.

पुंबा's picture

24 Sep 2018 - 9:30 pm | पुंबा

Oh!
Baryach divasanpasun hi shanka Hoti.
Dhans.

मोदींच्या ‘आयुष्मान भारत’चा २४ तासांत एक हजारहून अधिक जणांनी घेतला लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जाहीर केली. योजना जाहीर करुन २४ तास होत नाहीत तर एक हजारहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक नागरिक छत्तीसगड आणि हरियाणा येथील आहेत. त्यानंतर झारखंड, आसाम आणि मध्यप्रदेशमधील लोकांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी रांचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोदींनी या योजनेची घोषणा केली, त्याचवेळी पाच जणांना योजनेची कार्ड मोदींच्या हस्ते देण्यात आली. जमशेदपूरमधील पूनम माहतो या स्त्रीने जन्म दिलेली मुलगी या योजनेची पहिली लाभार्थी ठरली.

आजच्या लोकसत्ता मधील बातमी.

ट्रम्प's picture

25 Sep 2018 - 2:00 pm | ट्रम्प

राफेल बद्दल फक्त रागा ची आरडाओरडा चालू आहे , पण आक्रस्ताळी ममता / मायावती / मुलायम / केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी च्या गप्प बसण्याचे रहस्य वाढले आहे .
बोफोर्स घोटाळ्या मूळे काँग्रेस ला सत्ता सोडावी लागली होती आशा पार्श्वभूमीवर भाजप ची चार वर्षांत घोटाळा करण्याची हिंम्मत होईल असे वाटत नाही .

राफेल करार वरून रागा ची जी आरडाओरड चालू आहे , त्यावरून तो तोंडावर पडण्याची च शक्यता वाटते .

गामा पैलवान's picture

26 Sep 2018 - 12:38 pm | गामा पैलवान

मोदी गप्प आहेत कारण की राफेल हा अत्यंत फुसका बार आहे. राफेलमुलेच पप्पूला भरमसाट प्रसिद्धी मिळते आहे. हाच तमाशा जर लोकसभेपर्यंत चालू राहिला तर मोदीशहांना हवाच आहे. त्यांची लढाई सोपी होऊन जाते ना!

आक्रस्ताळे विरोधक गप्प आहेत कारण पप्पूच्या सुरात सूर मिळवला तर पप्पूचं नेतृत्व मान्य केल्यासारखं होतं. तो धोका कुणालाही पत्करायचा नाहीये. पप्पू हवाय फक्त पप्पू आणि मोदींनाच. बाकी कोणालाही नकोय.

-गा.पै.

सौजन्य : भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण - https://www.facebook.com/529422053879023/photos/a.531461150341780/117264...

ट्रम्प's picture

27 Sep 2018 - 10:16 pm | ट्रम्प

Homepage
Accessibility links
सामग्रीवर जाउपलब्धतेसाठी सहाय्य
मेन्यू
News मराठी BBC News मराठी नेव्हिगेशन
विभाग
चंगेझ खान : हजारो मुलांचा बाप, पण मृत्यूच्या वेळी एकटाच
जफर सय्यद
बीबीसी उर्दू, इस्लामाबाद
26 सप्टेंबर 2018
हे यासह सामायिक करा Facebook हे यासह सामायिक करा WhatsApp हे यासह सामायिक करा Messenger हे यासह सामायिक करा Twitter शेअर करा
Image copyrightNIVERSAL HISTORY ARCHIEVE/ GETTY IMAGES
प्रतिमा मथळा
चंगेझ खान
तेराव्या शतकाच्या सुरवातीला वायव्य आशियाच्या मैदानी प्रदेशातून एक असा माणूस पुढे आला ज्यानं साऱ्या जगाला हादरवून सोडलं. हा माणूस होता चंगेझ खान.

चंगेझ खानचे मंगोल सैनिक मृत्यू आणि विध्वंसाची दवंडी पिटत येत होते आणि बघता बघता शहरं, भूप्रदेश आणि देश त्यांच्या अधिपत्याखाली येत गेले.

अवघ्या काही दशकांच्या अवधीत भयानक रक्तपात आणि नरसंहार करत, हसत्या-खेळत्या शहरांची राख रांगोळी करत, बीजिंगपासून मास्कोपर्यंतची सत्ता चंगेझ खानच्या मालकीची झाली होती.

मंगोल राजवट तीन कोटी चौरस किलोमीटर इतक्या प्रचंड भूभागावर पसरली होती. आजच्या घडीला त्या भागातल्या एकूण लोकसंख्येपैकी तीन कोटी लोक मंगोल वंशाचे आहेत.

मुघल बादशहा औरंगजेबाच्या अधुऱ्या प्रेमाची कथा
पद्मावत : रजपूत खरंच शूरवीर होते का?
मध्ययुगीन भारतावर ठसा उमटवणाऱ्या मुघल राणीची गोष्ट
चंगेझ खानने केवळ लढाया करूनच यश संपादन केले असं नाही. कारण आणखी एका क्षेत्रात त्यानं मिळवलेला 'विजय' तेवढाच चक्रावून सोडणारा आहे.

काही वर्षांपूर्वी एका जनुकीय संशोधनातून समोर आलं की पूर्वेकडील मंगोल साम्राज्याच्या सीमा भागात राहणाऱ्या ८ टक्के पुरुषांच्या Y क्रोमोझोम्समध्ये एक मार्कर आहे. ही व्यक्ती मंगोल शासकाच्या वंशावळीशी संबंधित आहे, हे या मार्करवरून दिसतं.

जगातील १ कोटी ६० लाख पुरुष - म्हणजे एकूण पुरुष लोकसंख्येच्या 0.5 टक्के लोक, चंगेझ खानच्या वंशावळीतले आहेत, हेही या संशोधनातून पुढं आलं.

पाकिस्तानात असाच मार्कर 'हजारा' जमातीमधील लोकांच्या डीएनएमध्येही सापडतो. हे लोक स्वतःला मंगोलच म्हणवतात. याशिवाय मुघल, चुगताई, मिर्जा नावाचे लोक स्वतःला मंगोल वंशीय म्हणवतात.

एका व्यक्तीची इतकी अपत्ये ?
जनुकीय संशोधनातून जसं हे पुढं आलं आहे, तसचं याबद्दल बरीच ऐतिहासिक माहिती आणि पुरावेही उपलब्ध आहेत.

चंगेझ खानने स्वतः डझनभर लग्नं केली होती आणि त्याला २००च्यावर मुलं होती, असं सांगितलं जातं. नंतर त्यातल्या बऱ्याच मुलांनी अनेक राजवटींद्वारे राज्यकारभार केला. त्याचबरोबर 'हरम'ची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणात वंशवृद्धी केली. हरम म्हणजे असे स्थान जिथं अनेक स्त्रिया राहतात आणि या सर्व स्त्रियांचा शरीरसंबंध फक्त एकाच पुरुषाशी येतो. या संबंधांतून जन्मलेल्या सर्व मुलांचा पालक तो एकच पुरुष असतो.

प्रसिद्ध इतिहासकार अता मलिक जुवायनी यांनी 'तारीख-ए-जहांगुषा' हा ग्रंथ चंगेजखानच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी लिहिला. त्यात ते लिहितात "त्याकाळी त्याच्या खानदानातले 20 हजार लोक विलासी जीवन जगत होते. मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण वाचक, लेखकावर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करतील आणि म्हणतील इतक्या कमी वेळात एका माणसाची इतकी अपत्ये कशी जन्माला येऊ शकतात?"

Image copyrightSAMUEL BERGSTORM
प्रतिमा मथळा
चंगेझ खानचा पुतळा
या दरम्यान एक विचित्र घटना घडली होती. चंगेझ खानने वयाची साठी पार केली होती. त्याने आपल्या तंबूत पहिल्या बायकोपासून जन्माला आलेल्या चार मुलांची म्हणजे जोची, ओगदाई, चुगताई आणि तोली यांची खास बैठक बोलावली. या बैठकीत त्याचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय होणार होता.

चंगेझ खानने या बैठकीच्या सुरवातीलाच सांगितले, "जर माझ्या सर्वंच मुलांना सुलतान बनायचे असेल आणि एकमेकांच्या हाताखाली काम करायचे नसेल तर एक शेपटीवाला बहुमुखी साप आणि एक तोंड असलेला पण खूप शेपट्या असणाऱ्या दोन सापांची दंतकथा लक्षात ठेवली पाहिजे."

भूक लागल्यानंतर जेव्हा बहुमुखी साप शिकार शोधायला बाहेर पडायचा तेव्हा त्याच्या असंख्य तोंडांचे कोणीकडे जायचे यावर एकमत होत नसे. परिणामी बहुमुखी साप उपासमारीने मेला. तर भरपूर शेपट्या आणि एक तोंड असणारा साप मात्र विनासायास आयुष्य जगला, अशी ही दंतकथा आहे.

त्यानंतर चंगेझ खानने आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला म्हणजेच जोचीला बोलायला सांगितले. पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्याचा अर्थ होता की अन्य भावांनी जोची याची सत्ता मान्य करावी.

ही गोष्ट दुसऱ्या मुलाला म्हणजे चुगताईला पटली नाही. त्याने वडिलांना विचारले "याचा अर्थ असा की तुम्ही जोचीला उत्तराधिकारी बनवत आहात. पण आम्ही अशा बेकायदेशीर वारसाला प्रमुख कसे मानू?"

४० वर्षांपूर्वीची एक घटना
चुगताईचा इशारा ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेकडे होता. तेव्हा चंगेजखानच्या पहिल्या बायकोचे म्हणजेच बोरता खातूनचे शत्रूजमातीने अपहरण केलं होतं. बोरताचा जन्म ११६१मध्ये ओलखोंद जमातीत झाला होता. ही चंगेझ खानच्या बोरजिगन जमातीची मित्र जमात होती.

बोरता आणि चंगेझ खान यांचा साखरपुडा त्यांच्या लहानपणीच झाला होता. नंतर बोरता १७ वर्षांची तर चंगेझ १६ वर्षांचा असताना त्यांचे लग्न झाले.

Image copyrightHULTON ARCHIEVE/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा
चंगेज खान यांच्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं दृश्य.
लग्नानंतर थोड्याच दिवसांत शत्रू जमातीने चंगेझ खानच्या तळावर आक्रमण केलं. त्यावेळी तैमुजीन म्हणजेच चंगेझ खान भावंडं आणि आईसह पळून गेला पण त्याची पत्नी मागेच राहिली. ही शत्रूजमात बोरतासाठीच आली होती.

चंगेझ खानची आई मूळची एका शत्रू जमातीतली होती. चंगेझ खानच्या वडिलांनी तिचं अपहरण करून तिच्याशी लग्न केले होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांना बोरताला पळवून न्यायचे होते. बोरता एका बैलगाडीत लपून बसली होती. शत्रू जमातीने तिला शोधून पळवून नेलं.

चंगेझ खान बायकोला शोधण्याचा प्रयत्न करत होता. बोरताला पळवून नेणारी ती भटकी जमात होती. आशियामधल्या हजारो मैल पसरलेल्या पठारांवर ही जमात भटकत असे. चंगेझ खान त्यांच्या मागावर होता. त्याने माणसांची जमवाजमवही सुरू केली होती.

तो म्हणायचा, "त्या जमातीने फक्त माझा तंबूच रिकामा नाही केला, तर माझं हृदयच पळवून नेलं आहे."

Image copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा
चंगेझ खान
सरतेशेवटी ही शत्रूजमात चारशे किलोमीटर दूर सैबेरियाच्या बैकाल झीलजवळ पोहोचली तेव्हा चंगेझ खानने छापा घालून बोरताला सोडवलं.

काही इतिहासकारांच्या मते ही तैमुजीनच्या म्हणजेच चंगेझ खानच्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेने त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. कारण पुढे चंगेजखानने मोठ्या भूभागावर सत्ता स्थापन केली.

बोरताला सोडवून आणण्यात आठ महिने निघून गेले होते आणि त्यानंतर थोड्याच काळात जोची जन्माला आला.

त्यावेळी अनेकदा शंकाकुशंकाचं पेव फुटलं, पण चंगेझ खानने जोचीला स्वतःचा मुलगा मानलं. म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या काळात जोचीला उत्तराधिकारी ठरवण्याचा चंगेझ खानचा मानस होता.

चंगेझ खानला वाटलं नव्हतं की चाळीस वर्षांपूर्वीची ही घटना आपल्यावरच उलटेल आणि आपलीच मुलं आपल्या मोठ्या मुलाच्या पालकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करतील.

भावाभावांमध्ये तंटा
चुगताईने केलेला आरोप ऐकून जोची शांत बसू शकला नाही. दोघेही मुद्द्यावरून गुद्द्यांवर उतरले. बैठकीला आलेल्या लोकांनी दोघांना दूर केलं.

चंगेझ खाननं ओळखलं की त्याच्या पश्चात धाकटे भाऊ जोचीला राजा म्हणून कधीच मान्य करणार नाहीत. उलट आपापसात भांडून त्याची राजवट उलथून लावतील.

आता चुगताईनं जोची ऐवजी तिसरा भाऊ ओगदाईला बादशहा बनवण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धाकट्या भावांनी लगेच पाठिंबा दिला.

Image copyrightNATIONAL PALACE MUSEUM
प्रतिमा मथळा
चंगेज खान
चंगेझ खानन मनातून खूप दुःखी झाला होता, पण काही इलाज नव्हता. अखेर तो मुलांना म्हणाला, "पृथ्वीवर अमर्याद जमीन आणि अमाप पाणी आहे. एकमेकांपासून दूर आपापला तंबू उभारा आणि आपापल्या सल्तनतीवर राज्य करा."

आज ज्या व्यक्तीची अपत्यसंख्या कोटींच्या घरात आहे, त्याच्याच मुलांनी, त्याने उत्तराधिकारी ठरवलेल्या एका मुलाला त्याचा मुलगा मानण्यासही नकार दिला होता. हा इतिहासातला एक मोठा विरोधाभासच आहे.

१८ ऑगस्ट १२२७ रोजी अखेरचा श्वास घेताना चंगेझ खानला सर्वांत जास्त दुःख याच गोष्टीचं झालं असेल.

https://www.bbc.com/marathi/international-45548869

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2018 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

UAE to hike fuel prices for third straight month in October : Prices in the country are linked to international oil rates

http://gulfbusiness.com/uae-hike-fuel-prices-third-straight-month-octobe...

भारतातल्या पेट्रोल दरवाढीबद्दल आरडाओरडा करणार्‍यांनी तेलउत्पादक देशांच्या संघटनेचा (ओपेक) महत्वाचा सभासदजगातील सातव्या क्रमांकाच्या तेलसाठ्याचा मालक असणार्‍या युएईमधली परिस्थिती पाहणे रोचक होईल !

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2018 - 12:19 pm | पिलीयन रायडर

काल व्यभिचारासंबंधी जो कायदा बदलला तो कोणी समजावून सांगेल का? बातम्यांमध्ये जे "पती पत्नीचा मालक नाही" हे वाक्य येत आहे ते का? म्हणजे कायद्याने असं आधी मानत होते का? एक असं वाक्य वाचलं की "पतीच्या परवानगी शिवाय" संबंध ठेवले तर .. पण पती किंवा पत्नी, कुणीही परवानगी शिवाय असे संबंध ठेवणे हीच तर व्याख्या आहे ना व्यभिचाराची? मग इथे स्पेसिफिक पतीच्या परवानगीचा उल्लेख का?

मला वाटत होतं की हा कायदा स्त्रियांना झुकतं माप देणारा होता, तो आता फक्त समान केला आहे. असे संबंध हा आता फौजदारी गुन्हा नाही. ह्यात हे मालकी वाले वाक्य सतत का येतंय हेच मला कळलं नाही. बातम्या पण स्त्रियांची काहीतरी empowerment केल्या सारख्या लिहिल्यात, का पण? स्त्रियांना काय फरक पडला? त्यांच्यासाठी आधीही गुन्हा नव्हता, आताही नाही.

माहितगार's picture

28 Sep 2018 - 12:23 pm | माहितगार

मला वाटते वेगळा धागा लेख करावा लागेल, आपला प्रतिसाद वापरत वेगळा धागा लेख बनवण्याचा प्रयत्न करतो.

तुषार काळभोर's picture

28 Sep 2018 - 6:04 pm | तुषार काळभोर

ऐसीवर एका लेखात हा प्रकार समजावण्याचा प्रयत्न केलाय.

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2018 - 6:40 pm | पिलीयन रायडर

ओह!!! आलं लक्षात!! धन्यवाद ह्या लेखासाठी. मला माहिती नव्हतं की ज्याच्या सोबत संबंध होते पत्नीचे, त्याची बायको गुन्हा दाखल करू शकत नाही ते...

बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली? चालू घडामोडींचा धागा आहे ना हा?

मंथ एन्ड आहे. सप्टेंबरचा लेखांचा कोटा संपवायचा असेल.

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2018 - 7:31 pm | पिलीयन रायडर

:)

या वृत्तानुसार कर्नाटकात गेल्या महिनाभरात दोन स्त्रीयांची शीर संशयावरुन धडा वेगळे केले गेले आणि अक्षरशः ते पोलीसठाण्यात स्वतः रिस्पेक्टीव्ह पती घेऊन गेले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Sep 2018 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

राहूल गांधींना मित्रपक्षाचा आहेर !

http://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-help-narendra-modi-rafael...

राफेल विमानांच्या खरेदीवरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना "चोर' असे म्हटलेले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीसाठी धावून आले आहेत. नरेंद्र मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही, असे वक्‍तव्य करून पवार यांनी मोदीविरोधी वातावरण शांत करण्यास मदत केल्याचे बोलले जाते. पवार यांनी एकप्रकारे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याचे मानले जाते. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नाही, असे मतही त्यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

विशुमित's picture

28 Sep 2018 - 3:43 pm | विशुमित

पण किंमत जाहीर करायला काही हरकत नसावी असे ही ते म्हणाले होते.
...
पवार साहेब विरोधाला विरोध करणार्या पैकी नाहीत. त्यामुळे मोदींची पाठराखण केली ही माध्यमांची सनसनाटी आहे.

....विरोधाला विरोध करणार्या पैकी नाहीत.....

अपवादात्मक म्हणून कौतुकास्पद ;)

राजकारणा मध्ये कायम तोलून मापून बोलणारे , सत्ताधारी आणि त्याच वेळी विरोधकां मध्ये लोकप्रिय असणारे एकमेव राजकीय नेते म्हणजे पवार साहेब .
त्यांनी केलेल्या त्या वक्तव्या मूळे काँग्रेस चे विमान भूई वर नक्कीच आणले आहे , आणि आता काँग्रेस ला पवारांचा विरोध करता येत नाही आणि भाजप चे मित्र म्हणणेही सुद्धा शक्य नाही अशी काँग्रेसची दुहेरी गोची पवारसाहेबांनी केली आहे .
पवार साहेबांना पंतप्रधान होण्याची संधी आणि त्यावेळची योग्य व्यक्ती फक्त पवार साहेब असतांना काँग्रेस च्या चार सल्लागारांनी पवारसाहेबांचे पंख कापले होते , त्या प्रसंगाचे उट्टे पवार साहेब काँग्रेस वर हजारोवेळा काढणार हे नक्की .

पंतप्रधान मोदींची राफेल वादात पाठराखण केली म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक खासदार तारिक अन्वर आणि सरचिटणीस मूनफ हकीम यांनी राजीनामे दिले .

पवारांची मते न पटल्यामुळे राष्ट्रवादी च्या हिंदू नेत्यांनी राजीनामे का नाही दिले ?
फक्त मुस्लिम नेत्यांनीच का बरे राजीनामे दिले असतील ?
मुस्लिम नेते असं कुठल्याही घटनेला जातीय स्वरूप देतात आणि आमचे पुरोगामी हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ओकत बसतात .

विशुमित's picture

29 Sep 2018 - 1:56 pm | विशुमित

या राजीनाम्याला उगाच बिनबुडाचा जातीय रंग देऊ नका.

गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी मधुन प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर व इंदापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा नेता काही कालावधीत बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काल तारिक अन्वर बाहेर पडले आहेत. कारण आज घडले असले तरी त्याची तयारी खूप आधीपासूनच होती. राफेल तो एक बहाना है. पवार
साहेबांची संपुर्ण मुलाखत पाहिली तर लगेच लक्षात येईल. असो
अन्वर यांच्यावर पक्षाची खुप मोठी जबाबदारी होती. पण अपेक्षित परफोम्रस नसल्याने पद रिकामं करावे असा दबाव त्यांच्यावर होता.
त्यांनी राजीनामा देणं इष्ट समजलं.

वरील वाक्य सटर फटर लोकांसाठीच होते जे हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ठोकत बसणार .
तारिक अन्वर यांचा परफॉर्मन्स खराब होता तर सरचिटणीस मूनफ हकीम चा परफॉर्मन्स पण खराब होता का ? मुनाफ हकीम ने का राजीनामा दिला ?.
श्री प्रफुल्ल पटेल , शरदचंद्र पवार यांच्या पेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे का ?

विशुमित's picture

30 Sep 2018 - 1:10 pm | विशुमित

मुनाफ हकीम यांच्या बाबत माझ्याकडे खात्रीलायक आता माहिती नाही. समजेल एक दोन दिवसांत.
अन्वर, प्रफुल्ल भाई बाबतीत मला माहिती होती म्हणून मी त्यांचीच नावे घेतली.
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, विद्यार्थी उपाध्यक्ष घरातील व्यक्तीं आहेत जे सतत पवार साहेब आणि ताई बरोबर सक्रिय आहेत.
पवार साहेबांपेक्षा मला जास्त माहिती आहे का वगैरे असले प्रश्न विचारून बालिशपणा दाखवू नका.

ट्रम्प's picture

30 Sep 2018 - 1:23 pm | ट्रम्प

दोन नाही चार दिवस घ्या पण मुनाफ हनिफ ने का राजीनामा दिला असेल त्या बद्दल एखादी शक्यता सांगून उसना का होईना मनाचा मोठेपणा दाखवा .

विशुमित's picture

30 Sep 2018 - 2:19 pm | विशुमित

आम्हाला उसनं अवसान आणायची अवश्यकता नाही.
जेवढे माहिती आहे तेवढंच बोलतो.

ट्रम्प's picture

30 Sep 2018 - 4:43 pm | ट्रम्प

" राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, विद्यार्थी उपाध्यक्ष घरातील व्यक्तीं आहेत जे सतत पवार साहेब आणि ताई बरोबर सक्रिय आहेत. "
एवढी मोठी राष्ट्रवादी ची राजकीय पार्श्वभूमी असताना त्या मतिमंद लहरीं महंमद साठी तुम्ही मिपावर का विचारांची मिसळपाव करत असता ?
पंतप्रधान न होवुन देण्यासाठी थोरल्या पवार साहेबांच्या पाठीत खुपसलेला खंजीर धर्मनिरपेक्षतेच्या बिल्ल्या साठी तुम्ही विसरला असाल पण तमाम महाराष्ट्रीयन विसरले नाहीत .
भाजप चा उदो उदो करा असे मी मुळीच म्हणणार नाही पण काँग्रेस ने असे काय तुमच्या साठी दिवे लावलेत की तुम्हाला जळी स्थळी काष्ठी भाजप आणि मोदी दिसतात ?

त्यावेळेस लोकांना पंतप्रधान म्हणून पवार साहेब हवे होते पण शाहू फुले आंबेडकर विचारधारा नको होती.
राहीला प्रश्न अन्वर यांचा , तो पक्षामधील मुळता आंतरिक प्रश्न आहे.
बाकी मी क्वचितच कोणत्या पक्षाची भालामण केली आहे.
असो.