नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .
यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .
प्रतिक्रिया
1 Sep 2018 - 8:37 am | यशोधरा
सप्टेंबर संपू देत की आधी!!
1 Sep 2018 - 9:28 am | तुषार काळभोर
कंट्रोल ट्रम्पतात्या, कंट्रोल!
![a](https://memegenerator.net/img/instances/48364097/control-uday-control.jpg)
1 Sep 2018 - 10:24 am | ट्रम्प
अहो दोन दिवस तयारी करत होतो !!!!!
दुसऱ्या कोणीतरी लेख टाकायच्या आधी मला टाकायचा होता =)
1 Sep 2018 - 10:01 am | चिनार
हाच प्रश्न मलाही पडला आहे. पण विचारायची भीती वाटते. आजकाल मोदी, राहुल, नोटबंदी, हिंदुत्व,आतंकवाद, नक्सलवाद यातल्या कश्यावरही मत मांडले की दोन्हीकडच्या मंडळींकडून घरावर गोटे यायची भीती वाटते.
समस्त मिपाकरांनो..
प्रश्न रुचला नसेल तर लेकराला माफ करा किंवा 'येडंय हे' म्हणून सोडून द्या. पण गरीबाच्या घरावर गोटे हाणू नका बा...
4 Sep 2018 - 2:37 pm | नाखु
तूच जर गोटे मारु नका असे म्हणालास तर आम्ही हाणामारी करावी कुणाशी? असं काल दोन-तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते (सकाळी कचाकचा भांडून) संध्याकाळी श्रमपरिहाराला एकत्र बसले तेंव्हाच आमच्या ह्यांना बोलले.
यांना बा(र)हेरच्या बाहेर भेटले होते.
उगी तूला शंका नको म्हणून!
बाकी पाऊसपाणी कसं आहे
मिसामा
15 Sep 2018 - 1:58 am | टवाळ कार्टा
तुमचे "हे"पण आहेत???
1 Sep 2018 - 11:41 am | डँबिस००७
देशात विचारवंत , उच्चभ्रु म्हणुन मिरवणार्या डाव्या विचारसरणीच्या देश विघातक कार्यात गुंतलेल्या लोकांचा पर्दाफाश रिपब्लिक टीव्हीने प्रथम केला ! काल झी टीव्हीने ती पत्रे वाचुन दाखवली !! ती पत्र खरोखर देशाची वाईट परिस्थितीकडे बोट दाखवत आहे !
असे लोक देशात असतील तर त्या देशाला बाहेरच्या शत्रुची गरजच नाही !! आणी अश्या शत्रुला मदत करायला तत्पर अश्या कॉंग्रेस पक्षाला आताच्या सरकार किती डोळ्यात खुपत आहे हे सुद्धा दिसल !
1 Sep 2018 - 1:52 pm | श्वेता२४
कालच माझ्या सहकारींशी यावर बोलताना एक अनुभव शेअर केला तो इथे देतेय. बॅंकेत कॅश मोजताना खूपसे खातेदार पेट्रोलपंपवाले असल्याने 500 व 1000 च्या नोटा रोजच भरत. ही रक्कम काही लाखांच्या घरात असे. रोजच मला एखादीतरी खोटी नोट सापडायचीच. त्यात 500 च्या नोटा तुलनेने जास्त असायच्या पण 1000 ची एखादीच. सरासरी रोजचे 500 रु धरले तर 24 कार्यालयीन दिवसात माझ्याकडे 24 नोटा सापडायच्या .ही जर एका तालुक्यातल्या बॅंकेची अवस्था तर देशभरात किती खोट्या नोटा चलनात होत्या याचा काही अंदाज करता येईल? हा सगळा खोट्या नोटांच्या स्वरुपातील पैसाही व्यवस्थेबाहेर नाही का गेला? निश्चलनिकरणाच्या निर्णयावर यशस्वी किंवा अयशस्वीपणाचा शिक्का इतक्यात मारणे योग्य होणार नाही. कदाचित याचा परिणाम समजायला काही वर्षे लागतील. व खोट्या नोटांचा अर्थव्यवस्थेतील वाटा निश्चित किती याचा अंदाज नसल्याने याची नेमकी मोजदाद करणे शक्य होणार नाही. तसेच निश्चलनिकरणामुुळे किती नोटा परत आल्या केवळ याच अंगाने चर्चा करुन चालणार नाही. तर खोट्या नोटा किती व्यावस्थेबाहेर गेल्या, कितीजणांनी यानिमित्ताने पहिल्यांदाच स्वताजवळची रोख रक्कम बॅंकेत भरली, किती करदाते वाढले व किती करवसुली वाढली या बाजुही या निमित्ताने तपासल्या गेल्या पाहिजेत असे माझे मत आहे. मी कोणत्याही विशिष्ट पक्षाची समर्थक नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून काय वाटते ते नमुद केले आहे, इतकेच.
1 Sep 2018 - 9:44 pm | माहितगार
2 Sep 2018 - 12:36 am | डँबिस००७
71% surge in ITRs filed till August 31; 8-fold jump in returns under presumptive tax scheme
The number of income tax return (ITR) filings surged 71% to 5.42 crore till August 31 — the last date for submission for financial year 2017-18. This was led by a massive eight-fold jump in returns filed by entities under the presumptive tax scheme and 54 per cent increase in e-filing
by salaried individuals. “The increase in the number of returns reveals a marked improvement in
the level of voluntary compliance of taxpayers which can be attributed to
several factors, including the impact of demonetisation, enhanced persuasion and education of taxpayers as also the impending provision of late fee which would be effective on late filing of returns,” the finance ministry said in a statement. The total number of ITRs e-filed up to August, 2018, was 5.42 crore as against 3.17 crore up to August 31, 2017, marking an increase of 70.86 per cent. Almost 34.95 lakh returns were e-filed on August 31, 2018.
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65638032.cms?utm_source=c...
3 Sep 2018 - 9:32 pm | तुषार काळभोर
Dahi Handi 2018 : धारावीत २७ वर्षीय गोविंदाचा मृत्यू
आता पर्यंत फक्त मुंबईत ८०+ तरुण जखमी झालेत.
4 Sep 2018 - 1:21 pm | माहितगार
मागच्या असहिष्णूता पत्रकार परिषदेमुळे चर्चेत आलेले माजी न्यायमुर्ती जस्ती चेलमेश्वर या छायाचित्रात एन. टि. रामाराव यांच्या मुलाच्या अंत्ययात्रेस खांदा देताना दिसत आहेत.
4 Sep 2018 - 5:39 pm | डँबिस००७
जग प्रसिद्ध मल्याळम स्टार श्री मोहनलाल हा भाजपचा केरळ मधला चेहरा ठरणार आहे !!
श्री मोहनलाल यास केरळी जनता लालेटन या नावाने ओळखते ! मोहनलाल ह्यांना लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल केलेली आहे.
5 Sep 2018 - 5:18 pm | ट्रम्प
रागा ने यात्रे च्या सुरवातीला नेपाळ मध्ये नॉनव्हेज खाल्ले तर त्या विषयांवर मीडियावर गदारोळ चालू झाला , खर म्हणजे खाल्ले तर खाल्ले ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे .
त्या न्यायाने महाराष्ट्रातील सर्व नॉनव्हेज हॉटेल्स, धाबे, चिकन मटण ची दुकाने पंढरपूरवारी च्या काळात स्वयंस्फूर्तीने किंवा सक्तीने बंद असली पाहिजेत .
5 Sep 2018 - 7:27 pm | ट्रम्प
आपलेच दात आणि आपलेच ओठ . भाजप आणि सेना मतांच्या साठमारीत एकमेकांची चड्डी काढत आहेत , या मध्ये उधोजी आणि राऊत जास्त च चेकाळले आहेत . यांच्या वक्तव्या ला सीमाच नाही , प्रत्येक दोन दिवसांनंतर या दोघां पैकी एक जण भाजप वर आगपाखड करत असतो . पाच वर्षे एकत्र राहून मलिदा खाल्यानंतर हात चड्डीला पुसून शिव्या द्यायला मोकळे . भाजप ला शिव्या देताना ते पकडलेले पाच नक्सली , रागा , आक्रस्ताळी ममता , असे कोणाचे ही समर्थन करत असतात .
हळूहळू दोन्ही भावांचें आणि केजरी चे राजकारण एक सारखे वाटत आहे .
भाजपा सरकारच्या काळात हिंदू दहशतवादी का निर्माण होत आहेत?: उद्धव ठाकरे
https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-party-chief-uddhav-t...
Shared via Loksatta Android App
5 Sep 2018 - 8:16 pm | तेजस आठवले
मला तर वाटतं की हे सगळे ठरवलेलेच आहे. म्हणजे शिवसेना एवढी आगपाखड करतेय आणि तिला एवढी प्रसिद्धी दिली जातेय तेव्हा विरोधी पक्षातल्याना काही बोलायची संधीच द्यायची नाही असा हा प्लॅन असावा. तसेही महाराष्ट्रात विरोधी पक्ष एवढ्या संधी मिळून त्याचे काहीच करू शकला नाही.
लोकसत्ता सारखे मुखपत्र शिवसेनेच्या बातम्या सामनाच्या वरताण पणे छापतंय ह्यातच सगळे काही आलं.
5 Sep 2018 - 9:12 pm | ट्रम्प
म्हणजे रागा ला महत्व देऊन बाकीचे त्रासदायक विरोधकनां इग्नोर करणे .
5 Sep 2018 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
Pakistan's military has quietly reached out to India for talks
जागतिक राजकारणात एकटे पडल्याने आणि त्याचबरोबर कोसळत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हे पाकिस्तानी पाऊल आहे. तेव्हा, त्यावरून, 'पाकिस्तान बदलत आहे', 'पाकिस्तान बदलला आहे', वगैरे अटकळी 'बनवणे', एकतर तद्दन मूर्खपणाचे होईल किंवा उदारमतवादाचा मुखवटा घातलेल्या 'पिसनिक विचारवंतांचा' (नेहमीचाच) स्वार्थी चलाखपणा होईल.
आपल्या सुदैवाने आणि पाकिस्तानच्या दुर्दैवाने, सद्याचे लष्करप्रमूख आणि राजकिय नेतृत्व, या रणनीतीला बळी पडतील असे वाटत नाहीत. मात्र, उदारमतवादाचा नकली मुखवटा घातलेल्या 'पिसनिक विचारवंतांना' आपला चिवचिवाट परत जोमाने चालू करण्यासाठी हे भांडवल पुरेसे आहे... तेव्हा, 'परत बोलणी चालू करा' असा त्यांचा धोशा जोमाने सुरू झाला नाही तरच आश्चर्य असेल !
6 Sep 2018 - 8:50 am | महेश हतोळकर
याच्याच साठी ही पुडी सोडली नसेल कशावरून?
6 Sep 2018 - 1:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतिय "पिसनिक" आणि "स्वमग्न स्वार्थी राजकारण्यांना" हाती धरून भारतावर अंतर्गत दडपण आणण्यासाठीच तर हा पाकिस्तानी खटाटोप आहे ! मात्र, सद्याचे सरकार आणि लष्करप्रमूख त्यांना भीक घालत नाहीत, ही गोष्ट वेगळी ! :)
6 Sep 2018 - 1:48 pm | महेश हतोळकर
आगदी बरोबर पण धुराळा उडणार हे नक्की.
6 Sep 2018 - 1:54 pm | प्रसाद_१९८२
राम्याने, दहिहंडीच्या दिवशी उधळलेल्या मुक्ताफळांबद्दल शेवटी माफी मागितलीच. काल पर्यंत हा राम्या, आपण बोललो त्याचा राजकिय शत्रुनी कसा विपर्यास केला हेच पटवून द्यायच्या मागे होता.
---
6 Sep 2018 - 4:07 pm | अभ्या..
होय, होय. आणि लोकांना हा विपर्यास पटून लै न पेटता गप्प राहिले असते तर अशा कुत्र्या बित्र्या शिव्या खायचीही वेळ आली नसती. सगळ्यांचा विरोध पाहता आता नाईलाज होऊन माफी मागीतलीय म्हणून ही आगपाखड. तीही दोन दिवसांनी. ह्या आधी नाही एक शब्दही निघाला.
आता काय कुत्र्या म्हणा, नायतर डुकरा म्हणा, वाचायला कदम येणार नाही, वाचले तरी बोलायला तोंड नाही. इथं दिसायला दिसतं "काय जाज्वल्य पक्षनिरपेक्ष अस्मिता आहे." व्वा.. लै भारी राजकारण तिथेही आणि इथेही....
येनीवे कदमाने काय का करेना, बोलायला असले शिव्याशाप कमी जास्त सगळ्यानाच येतात पण मिपाच्या बोर्डावर ह्या भाषेची संस्कृती नको असे वाटते.
6 Sep 2018 - 7:35 pm | सुबोध खरे
ट्रम्प राव
तुमची भाषा काही पटली नाही. तुमचा संताप अगदी समर्थनीय/ योग्य असला तरी.
श्री राम कदम यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे यात शंकाच नाही. परंतु सार्वजनिक न्यासावर आपली भाषा श्री कोळसे पाटील यांच्या पातळीपर्यंत खाली उतरली हे काही पटले नाही.
6 Sep 2018 - 8:30 pm | ट्रम्प
कंट्रोल च व्हॅयना वो !!!
मी माझ्या वक्तव्या बद्दल माफी मागुन मा. संपादकांना विनंती करतो की ' कृपया ' तो ' प्रतिसाद ' उडविण्यात यावा .
सौदी मध्ये काही दिवस होतो त्यामुळे तेथे गुन्हेगारांवर केली जाऊ शकणारी अघोरी शिक्षा सुचवली . शिवाय आपला भा. दं. वी. कायदा मुलींबद्दल केलेल्या ' सन्मानजनक ' वक्तव्या साठी श्रीमान रामभाऊ चे केस सुद्धा वाकडा करू शकत नाही हे सर्वज्ञात आहे
एक वेळेस त्याच्या वक्तव्याला माफ केले असते ,
पण तो निर्लज्ज माणूस गिरे तो भी टांग उपर च्या थाटात शब्दांचा खेळ करून ' विरोधकांनी विपर्यास केला , कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो ' असे पुळचट शब्द वापरतोय .अन शिवाय माफी मागताना ना खंत ना खेद .
पण खरे साहेब ,
माझ्या कडून कितीही चुकीचे वक्तव्य येऊ द्या पण त्या काळ्या कोळश्याशी बरोबरी करू नका कारण तो दाढीवाल्या बरोबर एकाच व्यासपीठावर बसून डिंग्या मारत असतो .
अभ्या शेठ ,
राजकारणावरील धाग्यावर मिपा सभासद राजकीय नेत्यावर भरपूर कोट्या करत असतातच .उदा - धरणात मुतणारे नेते , अल्पसंख्याक साठी रेड कार्पेट टाकणारे डेव्ह फर्नांडिस (ते नेते वाचणार नाही हे गृहीत धरून ).
असे श्री रामभाऊ सारखे बेताल बोलणारे भाजप मध्ये आतले आणि बाहेरून आलेले शिखंडी भरपूर आहेत , रोज किमान एक तरी मीडियामध्ये कुप्रसिद्ध होत असतो . फक्त मोदी साहेबांचे वलय ह्या 2019 ला भाजप ला वाचवू शकणार आहे .
6 Sep 2018 - 3:49 pm | मार्मिक गोडसे
भाजप असली कुत्री का सांभाळत आहे ?
नाही पाळली तर संख्याबळ कसं वाढेल?
6 Sep 2018 - 8:39 pm | सुबोध खरे
डिग्गी राजा, श्री. मणिशंकर अय्यर,श्री जितेंद्र आव्हाड सारखी माणसे संख्याबळ वाढवण्यासाठीच आहेत का असा एक विचार डोक्याला चाटून गेला.
6 Sep 2018 - 8:50 pm | मार्मिक गोडसे
संबंधित पक्षांनी त्यांना बाहेरून उचलून आपली संख्या वाढवली नाही.
8 Sep 2018 - 8:14 pm | गब्रिएल
आत्ता ! तसल्या मान्सांचं भरघोस पीक फकस्त त्याच पक्शात येऊ र्हायतंय ना ? मंग बाकी लोकांन्नी काय करावं ब्रे ?! =))
6 Sep 2018 - 9:42 pm | ट्रम्प
नाही हो !
ती समर्था घरची श्वा* आहेत ,काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याची गांधीजी ची इच्छा पूर्ण करण्याचे काम गेली चारपाच वर्षे इमानेइतबारे करत आहेत .
त्यांनी तोंड उघडले की कुठल्या ही एका पक्षाला बांधील नसलेले सुशिक्षित पाचपन्नास हजार मतदार भाजप कडे वळत असतील .
8 Sep 2018 - 10:25 am | शब्दबम्बाळ
बहोत हो गयी डॉलर की मार, अब की बार ....
पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया ७२ च्या पुढे गेला!! आणि ही घसरण लगेच थांबायची चिन्ह तरी दिसत नाही.
rupee-breaches-72-mark-against-dollar-for-the-first-time-ever
मोदींचं या विषयावर काय मत होत पाहूया! २०१२ ला एक ठिकाणी "रुपया कमजोर होता जा रहा है, विश्वव्यापार में भारत टीक नही पायेगा" असेही म्हणताना दिसतात! आता मात्र चुप्पी कायम रहे असे धोरण दिसतंय.
पेट्रोल वगैरे तर काय बोलणार!! वाढता वाढता वाढे...
Record High: Fuel prices rise up to Rs 4.5/L in 6 weeks
8 Sep 2018 - 2:47 pm | विशुमित
अरे पर आज दो ईसीसवाले पकडे गये ना...
8 Sep 2018 - 5:19 pm | मार्मिक गोडसे
२०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत शंभरी पार करणार
8 Sep 2018 - 6:56 pm | ट्रम्प
माझ्या नावकरी ने घेतलेल्या एक्सट्रा ड्युटी टॅक्स निर्णयामुळे डॉलर च्या तुलनेत आशियातील सगळ्या देशांची चलने ढेपळली तेथे भारताचा रुपया कसा तग धरू शकेल ?
राहिला प्रश्न पेट्रोलच्या किंमतीचा , पेट्रोल च्या किंमती वाढण्यास इराणवरील ट्रम्प च्या बंदी कारणीभूत आहे .
त्यावर जर मोदी सरकार ने जनप्रिय निर्णय नाही घेतला तर मात्र अवघड आहे .
8 Sep 2018 - 8:11 pm | गब्रिएल
कान्ग्रेसनं प्येट्रोलचे भाव कमी बी क्येले न्हाय आनि वर देशाच्या डोस्क्यावर २ लाख कोटीचं कर्ज क्येलं व्हतं ह्ये इसारायला इकोनोमिक इच्च्च्चारवन्त आसनं जरूरीचे हाये ! =)) =)) =))
11 Sep 2018 - 10:52 am | पुंबा
गब्रिएल, तेव्हाचे क्रुडचे दर पहा आणि गेल्या ४ वर्षात क्रुडचे जे दर होते ते पण पहा ना.
ऑइल कंपन्यांना दिली जाणारी सबसिडी रद्द करणे, पेट्रोल, डिझेलवर टॅक्स लावून अधिक राजस्व गोळा करणे व रिझर्व्ह्स तयार करणे ह्या तीनही गोष्टी क्रुडच्या दरात २०१४ पासून सुरू झालेल्या घसरणीच्या पार्श्वभुमीवर योग्य आणि आवश्यक होत्या. मात्र आता जेव्हा दर ९० कडे चालले आहेत तेव्हा जरा तरी विवेकाने निर्णय घ्यायला हवा आहे. आताच्या गगनभेदी दरांचे समर्थन मागच्या ४ वर्षातल्या कामगिरीवर भायला नको.
11 Sep 2018 - 10:53 am | पुंबा
*'व्हायला नको.' असे वाचावे.
11 Sep 2018 - 2:48 pm | गब्रिएल
आत्ता ! आपली कातडी बचवाय्ला हेsss म्हनून कर्ज काडायचं. त्ये नवीन सर्कारच्या डोस्क्यावर टाकायचं. आनि मंग, त्ये कर्ज फेडायचं म्हनून प्येट्रोलच्ये दर कमी क्येले न्हायी म्हणून रस्त्यावर युऊन त्येच्या नावानं बोंब हानायची. लई जंक्शन राजकारन हाय बगा =))
10 Sep 2018 - 8:42 pm | ट्रम्प
इंधन दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचा निषेध करत आज काँग्रेसने देशव्यापी बंदची हाक दिली. शिवसेनेनेही सामनातून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत सरकारवर टीका केली. तर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या बंदला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. देशात आणि महाराष्ट्रात या बंदला प्रतिसाद मिळत असताना राज्याचे सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आले होते.
भारतीय पोस्ट विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला. या सोहळ्यासाठी हे दोन नेते एकत्र आले होते. भारतीय पोस्ट विभागातर्फे माय स्टॅम्प ही योजना करण्यात आली. या योजने अंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी मिळणार आहे.
सामनातून उद्धव ठाकरेंनी इंधन दरवाढीचा निषेध करत टीकास्त्र सोडलेले असले तरीही सोमवारी हे दोन्ही नेते सिद्धिविनायक मंदिरात एकत्र आलेले बघायला मिळाले. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात विरोधक रस्त्यावर आणि सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी पाहायला मिळाले.
10 Sep 2018 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
Scientists looking for extraterrestrial life find new radio bursts using AI
'Breakthrough Listen' नावाची, $१० कोटी खर्च करून, "विश्वात मानवाव्यतिरिक्त इतर कोणी बुद्धिमंत जीवन आहे का ?", हे शोधण्यासाठी बनवलेली प्रणाली वापरून डॉ विशाल गज्जर यांनी ७२ नवे वेगवान रेडिओलहरींचे उद्रेक (new fast radio bursts, FRBs) शोधून काढले आहेत.
यापैकी, एखादा उद्रेक जरी एखाद्या बुद्धीवान जीवाने निर्माण केलेला असला तर आपण या विश्वात एकटे नाही, हे सिद्ध होईल आणि काय मजा येईल नाही ? मात्र, ते जीव आपल्यापेक्षा जास्त विकसित आणि खलनायक प्रवृत्तीचे निघाले तर मात्र पंचाईत होईल... कदाचित सर्व पृथ्वीवर वैश्विक वसाहतवादाचा कालखंड सुरू होईल ! ;)
पण मग, देवाने अमूक एक दिवसांत जग निर्माण केले, माणूस बनवला आणि "मानव हाच एकुलता एक देवाचा लाडका आहे" असे म्हणणार्या भल्या भल्या धुरंधर धर्ममार्तंडाची खूपच मोठी पंचाईत होईल, नाही का ?! =))
11 Sep 2018 - 12:42 pm | गामा पैलवान
पुंबा,
या विधानाशी तत्त्वत: सहमत.
मात्र सामान्य माणूस या इंधन दरवाढीला महागाई मानंत नाही. त्याच्या लेखी महागाई वेगळीच असते (उदा. : अन्नाचे भाव, वगैरे). हे मोदींना बरोब्बर ठाऊक आहे. पेट्रोल शतकापार गेलं तरी मोदी ढिम्म हलणार नाहीत. एके दिवशी निवडणुकींचा मुहूर्त साधून मोदी दर कमी करवतील. तसाही मोदी पेट्रोलियमचे राखीव साठे निर्माण करताहेत. त्याचा वापर योग्य वेळेस करायची योजना असेलंच.
विरोधी पक्षांना या दरनियमनाचं श्रेय उपटायचं आहे. आमच्या दबावाखाली येऊन मोदींनी दर कमी केले असं भासवायचंय. मोदी पण काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. ते ठंडा करके खाओ च्या धोरणाने चालणार.
आ.न.,
-गा.पै.
11 Sep 2018 - 5:31 pm | पुंबा
असंच वाटतंय..
11 Sep 2018 - 3:32 pm | डँबिस००७
Raghuram Rajan's Sensational Disclosure Over NPA
https://youtu.be/1YvpS1fkxWI
11 Sep 2018 - 8:00 pm | डँबिस००७
एनपीएला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार: रघुराम राजन
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या थकीत कर्जाला (एनपीए) तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात त्यांनी यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. घोटाळे आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे सरकारची निर्णय घेण्याची गती मंदावली होती. त्यामुळे एनपीए वाढत गेला, असे त्यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ खासदार मुरलीमनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. आपल्या उत्तरात राजन म्हणाले की, बँकांकडून मोठ्या कर्जांवर उचित कारवाई करण्यात आली नाही आणि २००६ नंतर विकासाचा वेग कमी झाल्याने बँकांच्या वृद्धीची आकडेवारी ही अवास्तविक झाली.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी एनपीएच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राजन यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. एनपीएला योग्यरितीने ओळखण्याचे श्रेय राजन यांना जाते. देशातील एनपीएची समस्या इतकी गंभीर का झाली हे त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
12 Sep 2018 - 4:33 pm | ट्रम्प
बरं झालं माजी सोनाराने कान टोचले !!!
पण सोनाराच्या वक्त्याव्या कडे लक्ष द्यायला काँग्रेस कडे वेळ आहे का ₹
रागा आणि थरूर सुप्रीम कोर्टाने कलम 377 रद्द केले म्हणून गेले तीन चार दिवस आनंदाने उड्या मारत आहेत =)
12 Sep 2018 - 6:00 pm | डँबिस००७
काय करणार ? असते एकेकाचे ध्येय !
13 Sep 2018 - 8:00 am | ट्रम्प
मद्य व्यपारी विजय मल्ल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच धागा पकडत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले होते. मल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्याच्या विधानानंतर भाजपाला लक्ष केले आहे. मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.
13 Sep 2018 - 10:57 am | धर्मराजमुटके
टेक्नॉलॉजी मास्टर अॅपल ला आतापर्यंत जे जमले नव्हते ते आता जमले. त्यांनी करुन दाखविले. आता आयफोन मधे चक्क २ सिम कार्ड वापरता येणार. आता भारतीय लोकांना दोन दोन आयफोन न वापरता एकाच आयफोन मधे दोन सिम वापरुन आपले डबल स्टँडर्ड ड्युअल स्टँडर्ड लाईफ जगता येईल. :)
13 Sep 2018 - 11:36 am | अथांग आकाश
केरळ : ख्रिस्ती धर्मगुरूवर ननचा बलात्काराचा आरोप; चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांत केरळच्या रस्त्यांवर वेगळं चित्र दिसत आहे. असं चित्र सहसा दिसत नाही. इथं एक आंदोलन सुरू असून दररोज ठराविक वेळ या आंदोलनात इथल्या एका चर्चमधील नन्स भाग घेत आहेत. हे आंदोलन दररोज काही तास सुरू असतो. या नन बलात्काराचे आरोप असलेले जालंधरचे बिशप फ्रॅंको मुलक्कल यांच्या अटकेची मागणी करत आहेत.
6 मे 2014 ते 23 सप्टेंबर 2016 या काळात त्यांनी एका ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मिशनरीज ऑफ जिजस आणि कॅथोलिक लॅटिन चर्चने मात्र आंदोलन करणाऱ्या नन्सना निदर्शनात भाग न घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्य मागण्या
10 ऑगस्टला न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा पोलिसांनी ननच्या आरोपात तथ्य आहे हे दाखवणारे काही पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती कोर्टात दिली. त्यानंतर कोर्टाने हा खटला काळजीपूर्वक हाताळण्याचे आदेश दिले आहेत.
जेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा जोसेफ यांनी कोर्टात एक आणखी याचिका दाखल केली. ती विभागीय खंडपीठाकडे सुनावणीसाठी आली. कोर्टाने सुनावणीसाठी 13 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
सविस्तर वृत्त.
13 Sep 2018 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे
चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह
चर्चने मौन पाळलेले नाही तर त्या पिडीत ननचे चारित्र्यहनन करणे चालू केले आहे. त्याशिवाय, तिला १० एकर जमीन देण्याची ऑफर देऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न होत आहे असाही आरोप आहे. तिच्या बाजूने उभ्या राहिलेल्या इतर नन्सवरही अनेक प्रकारे दबाव येत आहे. त्या ननने आता व्हॅटिकनकडॅ तक्रार केली आहे.
हे कमी झाले की काय म्हणून एका केरळी आमदाराने त्या ननवर घृणास्पद आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमध्ये १८% ख्रिश्चन लोकसंख्या आहे, तेव्हा त्या धर्मगुरूच्या विरुद्ध एकही राजकारणी उभा राहिला नाही... हे अगदी भारतीय राजकारणाला शोभेसेच झाले आहे ! :(
पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.