शतशब्द कथा: हडताल

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
21 Aug 2018 - 9:28 am

शर्माजी एका फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी.

फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील.

दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- नेताजी. शर्माजींच्या डोळ्यांसमोर अंधार. पगार नाही, पेन्शन नाही, कोर्ट-कचेरी...जेल. शर्माजीचा संसार उध्वस्त झाला.

४० कंत्राटी कामगार कमी पगारावर, फैक्टरीत रुजू झाले.

(९०च्या दशकात दिल्लीत झालेल्या एक हड़ताल वर आधारित- काही सत्य काही कल्पना)

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

21 Aug 2018 - 10:27 am | योगी९००

छान शब्दात नेमक्या भावना मांडल्यात...सुन्न झालो.

नेत्यांच्या मागे आंधळेपणाने वावरणार्‍या लोकांची काय हालत होते त्याचा एक उत्क्रुष्ठ नमुना..!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2018 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

विवेकपटाईत's picture

25 Aug 2018 - 8:49 am | विवेकपटाईत

प्रतिसादाबाबत धन्यवाद. ज्या व्यक्तीची नौकरी गेईल आणि दारूण परिस्थिती आली, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली आहे.