"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
29 Oct 2008 - 1:12 pm

आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते).
आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे.
आता या अंकाच्या खास गोष्टी. आपल्या मिपा सदस्य अरुण मनोहर, शैलेश कुळकर्णी(पिवळा डांबीस),नाना चेंगट, रामदास याच्या कथा आहेत.या मिपावर आधी प्रकाशीत झाल्या असल्या तरी नेट ते प्रिंट हा नवा दुवा बांधल्याबद्दल श्री. तानपाठक यांचे अभिनंदन.
या अंकाची आणखी एक खासीयत .मुखपृष्ठ श्री राज ठाकरे यांनी दिले आहे.ते सुद्धा या धामधुमीच्या काळात.

अन् म्हणे मी मराठी हा परीसंवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे.

या अंकाच्या काही प्रती श्री. तानपाठक यांनी माझ्याकडे दिल्या आहेत.इच्छुकांनी संपर्क करावा.
श्री उदय तानपाठक यांचे आभार आणि अभिनंदन.

समाजमौजमजाबातमीशिफारस

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

29 Oct 2008 - 1:19 pm | अमोल केळकर

मुखपृष्ठ आवडले .

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आजानुकर्ण's picture

31 Oct 2008 - 1:56 am | आजानुकर्ण

मुखपृष्ठ आवडले .

आपला
(कार्टून) आजानुकर्ण

पिवळा डांबिस's picture

29 Oct 2008 - 11:16 pm | पिवळा डांबिस

मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!!
या महत्वपूर्ण कार्यात लहानश्या खारुटलीचा वाटा उचलण्यास मिळणे हे आमचे भाग्य!

झुंजुमुंजूची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो...

आपला,
पिवळा डांबिस

ऋषिकेश's picture

30 Oct 2008 - 9:12 am | ऋषिकेश

मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!!

+१
(शुभेच्छुक) ऋषिकेश

अवलिया's picture

30 Oct 2008 - 11:03 am | अवलिया

असेच म्हणतो.

नाना

सहज's picture

30 Oct 2008 - 9:24 am | सहज

श्री.उदय तानपाठक यांच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. हार्दीक अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 9:30 am | विसोबा खेचर

उदय तानपाठक यांचे निश्चितच कौतुक आहे...

रामदासराव, काल आपण ह्या अंकाची एक प्रत आमच्या घरपोच केलीत याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत..

अंक चाळला, छान आहे!

मुखपृष्ठावरील राज ठाकरेंचे व्यम्गचित्र क्लासच आहे! :)

तात्या.

अरुण मनोहर's picture

30 Oct 2008 - 9:55 am | अरुण मनोहर

वरील अभिप्राय वाचून अंकाविषयीची उत्सुकता खूप वाढली. उदय तानपाठक यांचे अभिनंदन.

कशिद's picture

30 Oct 2008 - 10:28 am | कशिद

छान!!!

उदय ४२'s picture

30 Oct 2008 - 6:44 pm | उदय ४२

मित्रहो
आपण सर्वांनी केलेले कवतुक खूपच महत्त्वाचे आहे.मिपाच्या सदस्यांचे लेखन सहित्यविश्वात मोठी भर घालणारे आहे.ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोच्ले पाहिजे.मी त्यासाठी निमित्त होत असेन तर मला आनंदच आहे.प्रतिक्रियांबद्दल पुन्हा आभार.
-उदय तानपाठक.
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 7:49 pm | विनायक प्रभू

आवड्ला

दिनेश५७'s picture

30 Oct 2008 - 9:15 pm | दिनेश५७

`झुंजुमुंजु' : प्रिंट आणि वेबमधले अंतर भरून काढणार्‍या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत!
मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!!

प्राजु's picture

30 Oct 2008 - 9:20 pm | प्राजु

उदय तानपाठक यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक वाटते.
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

30 Oct 2008 - 9:41 pm | लिखाळ

वा !
झुंजुमुंजुचा उपक्रम छान !
झुंजुमुंजुची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.
उदय तानपाठक मिपाकर आहेत हे पाहून अजूनच आनंद झाला.
--लिखाळ.

अंक अमेरीकेला पाठवता येइल का? पोस्टेजचा खर्च मी करायला तयार आहे.
उपक्रम छान आहे. धन्यवाद.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

रामदास's picture

1 Nov 2008 - 6:18 pm | रामदास

पाठवणं थोडं कठीण आहे.इथल्या एखाद्या पत्त्यावर पाठवू शकेन.

झकासराव's picture

31 Oct 2008 - 10:53 am | झकासराव

उदय कौतुक आहे तुमच.
रामदास काका हा अंक पुण्यात (पिम्परि चिन्चवड) येथे मिळण्याच्या दृष्टीने काय सोय आहे?
मला एक प्रत हवी आहे. :)

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामदास's picture

1 Nov 2008 - 6:20 pm | रामदास

पुण्यात बागव्यांचं दुकान कुठे आहे ते बघा.तसा इथूनही पाठवता यील.

नीधप's picture

31 Oct 2008 - 12:42 pm | नीधप

मी पण आहे त्यात.. माझी पण कथा आहे त्या अंकात.
मिपा वर मी नवीन असल्याने अजून मिपावाले मला ओळखत नाहीत त्यामुळे वरच्या यादीत नाव नसेल माझे कदचित.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

रामदास's picture

31 Oct 2008 - 2:15 pm | रामदास

निरजा पटवर्धन आहेस का?

नीधप's picture

1 Nov 2008 - 9:21 am | नीधप

मी नीरजा पटवर्धन आहे.
ह्रस्व नि नव्हे दीर्घ नी
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

रामदास's picture

1 Nov 2008 - 10:24 am | रामदास

तू नीरजा पटवर्धन आहेस.

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 10:50 am | विसोबा खेचर

शीर्षकात : ) हा स्माइली बघितला आणि नीरजा पटवर्धन मिश्किलही आहे हे समजलं. मी आजपर्यंत तिला फक्त भांडखोरच समजत होतो...

चूभूद्याघ्या...

असो, विषयांतराबद्दल आणि वैयक्तिक शेर्‍याबद्दल क्षमस्व... :)

तात्या.

नीधप's picture

1 Nov 2008 - 1:05 pm | नीधप

होतं असं..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धम्मकलाडू's picture

11 Nov 2008 - 10:22 pm | धम्मकलाडू

मी पण आहे त्यात.. माझी पण कथा आहे त्या अंकात.

कळले. धन्यवाद. कथा आता वाचायलाच हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विसुनाना's picture

31 Oct 2008 - 5:44 pm | विसुनाना

झुंजूमुंजू दिवाळी अंकाचे प्रकाशक/संपादक श्री. तानपाठक यांचे अभिनंदन.
या अंकात समाविष्ट झालेल्या सर्व मिपाकर लेखकांचे अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2008 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झुंजूमुंजू दिवाळी अंकाचे प्रकाशक/संपादक श्री. तानपाठक यांचे अभिनंदन.
या अंकात समाविष्ट झालेल्या सर्व मिपाकर लेखकांचे अभिनंदन.

चतुरंग's picture

12 Nov 2008 - 1:15 am | चतुरंग

चतुरंग

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Nov 2008 - 8:03 pm | घाशीराम कोतवाल १.२

संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत