कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 Jun 2018 - 8:04 am

आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात .

अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास वेंगीनाडू म्हणत. कलिंग ते चोला काळापर्यंतचा या प्रदेशाचा इतिहास उपलब्ध आहे त्यात पूर्व चालुक्यांनी ईस. सातवे वे शतक ते बाराव्या शतकाचा पुर्वार्ध या प्रदेशातून राज्य केले. तर या वेंगीनाडू प्रदेशाच्या गोदावरी मुखाजवळच्याच्या छोट्या भागास कोनसीमा , कोनमंडल अशी नावे होती तसेच कोनदेव म्हणूनही ओळखले जात होते. संदर्भ The History of Andhra Country, 1000 A.D.-1500 A.D. Kondevaram Kondadevupalle अशा प्रकारची नावे असलेली गावे अजूनही आहेत. (संदर्भ पोस्टल पिनकोड डाटाबेस) गंमत म्हणजे Kondevoor नावाचे गाव केरळातही दिसते. महाराष्ट्रात कोंड/कोंडा शब्द असलेली अनेक गावे असली तरी कोंडदेव असे गाव किमान माझ्याकडच्या डाटाबेस मध्ये आढळले नाही. ईतिहासात राहीले असेल तर माहित नाही पण हो न हो कोंडदेव हे नाव आंध्रातल्या कोनदेव वरुन आलेले असू शकेल का असे सहजच वाटून गेले. कोंडदेव हा मराठी लोकांच्या मोठ्या चर्चेचा विषय असल्याने लेख वेगळा असलेला बरा असा विचार केला.

आपल्याला कोंड शब्दाचा सर्व साधारण परिचीत अर्थ जरी कोंडणे असला तरी तेलगूत कोंडा (కొండ) शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो (संदर्भ गूगल ट्रांसलेटर). मोल्सवर्थ शोधल्यास कोंड आणि कोंडा शब्दाचे मराठीतही वेगवेगळे अर्थ मिळतात. त्यातील स्थलनाव संबंधीत 2 A circle described around a person under adjuration. ,4 A circular hamlet; a division of a मौजा or village, composed generally of the huts of one caste. 5 Grounds under one occupancy or tenancy. हे दिसतात.

मोल्सवर्थात कोंडकेचा अर्थ कोंडकें (p. 102) kōṇḍakēṃ n C A shut in spot among hills; ..... असाही दिला आहे , हा उल्लेख अर्थ अडवता येण्या सारख्या खिंडीसारखा किंवा अरुंद प्रदेशा बद्दल आहे का ?

* मोल्सवर्थातील कोंड शब्दावरील शोध

* कृपया चर्चा शक्यतोवर नावे कशी आणि कुठून आली चर्चेपर्यंत मर्यादीत ठेवावी ईतर विवाद या धाग्यात टाळावेत
* स्थलनाम विषयक चर्चेचा मुख्य धागा

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी सर्वांचे आभार .

या निमीत्ताने कोंडा नाव असलेली महाराष्ट्रातील इतर काही गाव नावे

सावनेर 535267 Pipla (Rithi) कोंढे
चिखलदरा 531604 Piplya कोंढे
सेलू 534018 Pipra कोंढूर
उमरेड 536315 Pipara कोंढूर
तुमसर 536759 Pipra (sakhali) कोंढूर
चंद्रपूर 541329 Pipri कोंढी
देवळी 534211 Pipri कोंढी
सडक अर्जुनी 538100 Pipri कोंढासावळी
कुही 536442 Pipri कोंढावळे
हिंगणघाट 534509 Pipri कोंढावळ
समुद्रपूर 534603 Pipri कोंढावले बु
कोरपना 541592 Pipri कोंढावले ख
हिंगणा 536110 Pipri कोंढाळा
वर्धा 534191 Pipri (CT) कोंढाली
तुमसर 536736 Pipriya कोंढारपट्टा
रामटेक   535490 Pipriya कोंढारचिंचोली
रामटेक   535558 Pipriyapeth (r) कोंढारकी
पंढरपूर 562308 Pirachi Kuroli कोंढार
कागल 567685 Pirachiwadi कोंढापूरी
फलटण 563333 Pirachiwadi कोंढाणे
केज 559716 Pirachiwadi कोंढाणा
वाई 563069 Pirachiwadi कोंढाणा
राधानगरी 567627 Piral "कोंढाण "
माळशिरस 562407 Pirale कोंढा
संगमेश्वर 565744 Pirndavane कोंढा
रत्नागिरी 565529 Pirandavane कोंढा
औसा 560643 Pirangaj Wadi कोंढा
मुळशी 556202 Pirangut कोंढवे धावडे
उमरखेड 542995 Piranji कोंढवे
सावली 540927 Piranjimal कोंढवी
हिंगणघाट 534427 Pirapur alias Kukdapur कोंढवी
भिवापूर 536521 Pirawa कोंढवा बुद्रुक
मालवण 566506 Pirawadi कोंढवा खुर्द
उमरेड 536191 Piraya कोंढवळे
फुलंब्री  548716 Pirbawada कोंढवळ
पाथर्डी 557995 Pirewadi कोंढवली बु.
घनसावंगी 547960 Pirgaibwadi कोंढवली खु.
जालना 547567 Pirkalyan कोंढवली
चिखलदरा 531577 Pirkheda कोंढवड
उरण 553339 Pirkon कोंढळे
भद्रावती 541093 Pirli कोंढरे
सिरोंचा 540012 Pirmeda "कोंढरी पाडा "
सिल्लोड 548611 Pirola कोंढरी
जालना 547522 Pirpimpalgaon कोंढरी
बदनापूर 547717 Pirsavangi कोंढराबाद
माजलगाव      559306 Pirubhai Tanda (N.V.) कोंढणपूर
निलंगा 560875 Pirupatelwadi कोंड्ये
निलंगा 560794 Pirwadi कोंडोशी बु
बदनापूर 547723 Pirwadi कोंडोशी खु
सातारा 563790 Pirwadi कोंडोशी
औरंगाबाद 548809 Pirwadi कोंडोली
औरंगाबाद 548785 Pisadevi कोंडेसाखरे
दापोली 564873 Pisai कोंडेगाव मल
खंडाला 563177 Pisalwadi कोंडेगाव तुकूम
पुरंदर 556471 Pisarve कोंडेगव्‍हाण
पनवेल 553362 Pisarve कोंडेखल अलियास घोडेवाही
पन्हाळा 567219 Pisatri कोंडेखल
भोर 556797 Pisavare कोंडेकल
कल्याण 552982 Pisawali कोंडुरे
भिवंडी 552631 Pise कोंडुमल शहर
पुरंदर 556467 Pise कोंडीवाडे एन.एम
कणकवली 566452 Pisekamte कोंडीवाडे ए.एम.
आरमोरी 538560 Pise Wadodha कोंडीवळे
केज 559749 Pisegaon कोंडीवते
आटपाडी 568572 Pisewadi कोंडी चाक
अकोले 557291 Pisewadi कोंडी
माळशिरस 562490 Pisewadi कोंडिवली-खुर्द
मोरेगाव 543776 Pisgaon कोंडिवली
शाहूवाडी   567107 Pishavi कोंडिवरे
वेल्हे 556624 Pishawi कोंडिग्रे
राजापूर 566010 Pishedwadi कोंडासावळी
कन्नड 548293 Pishor कोंडावळ
हवेली 556244 Pisoli कोंडाऴा महाली
श्रीगोंदे 558426 Pisora Bk. कोंडाऴा झामरे
बागलाण 550103 Pisore कोंडापूर
श्रीगोंदे 558450 Pisore Khand कोंडाईवाडी
परांडा 561108 Pistamwadi कोंडाई
पुरंदर 556537 Pisurti कोंडसर बु.
अलिबाग 554117 Pitakiri कोंडसर खु.
कल्याण 552933 Pitambare Nagar कोंडशिवाडी
केळापूर 543541 Pitapungari कोंडवीरा
अक्कलकोट 562852 Pitapur कोंडवी
कोरची 538857 Pitesur कोंडविल
कुरखेडा 538656 Pitesur कोंडवाडी तर्फे पाटपन्हाळे
तुमसर 536737 Pitesur कोंडवाडी
हिंगणा 536079 Pitesur कोंडवाडी
साकोली 537078 Pitezari कोंडवाडा
परांडा 561090 Pithapuri कोंडवली
नागपूर (ग्रामीण ) 535849 Pithesur कोंडवर्धा
इंदापूर 557115 Pithewadi कोंडले
पाटोदा 558976 PITTHI कोंडलापूर 
चांदूर बाजार 532057 Pithoda कोंडल
नरखेड 534825 Pithori कोंडरण
अंबड 547851 Pithori Sirasgaon कोंडये तर्फ सौंदळ
उमरेड 536237 Pitichuvha कोंडये
चिमूर 540389 Pitichua (540389) कोंडये
चिमूर 540347 pitichua कोंडमालुसरे
जिवती 541733 Pitiguda No.1 कोंडमळा
जिवती 541734 Pitiguda No.2 कोंडबावी
इंदापूर 557051 Pitkeshwar कोंडफणसवणे
तळा 554767 Pitsai कोंडप
केज 559707 Pittighat कोंडजीगड
शहापूर 552714 Piwali कोंडजय
तेल्हारा 529681 Piwandal Bk. कोंडगे
तेल्हारा 529694 Piwandal Kh. कोंडगाव खु.
झरी जामडी 543909 Piwardol कोंडगाव
मूर्तिजापूर 530241 Piwashi कोंडगाव
कणकवली 566426 Piyali कोंडगाव
त्र्यंबकेश्वर 550898 Pmpri Trimbak कोंडगाव
पालघर 552363 Pochade कोंडगाव
विक्रमगड 551800 Pochade कोंडगाव
सिरोंचा 540122 Pochampalli Ry कोंडगाव
संगमेश्वर 565758 Pochari कोंडगाव
शहापूर 552839 Pofodi कोंडगाव
सातारा 563882 Pogarwadi कोंडखांडकर
मंगरूळपीर 530740 Poghat कोंडकारुळ
कारंजा 530969 Poha कोंडउमरे
पन्हाळा 567172 Pohale T.Alate कोंड भैरव
पन्हाळा 567200 Pohale T.Borgaon कोंड भुजबळराव
सुरगाणा 549689 Pohali कोंड दसुर
पन्हाळा 567227 Pohalwadi कोंड तिवरे
सावनेर 535236 Pohana कोंड कदमराव
हिंगणघाट 534512 Pohana कोंड ओझरे
वणी 543945 Pohana कोंड आंबेड
मानवत 546852 Pohandul कोंड असूर्डे
महागाव 543125 Pohandul कोंड
सोनपेठ 546962 Pohandul कोंड

भूगोलमाहिती

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

5 Jun 2018 - 5:42 pm | गामा पैलवान

माहितगार,

माझ्या माहितीप्रमाणे कोंड हा प्रत्यय कौडिण्य ऋषीवरून आला आहे. कुडी किंवा कुडिन् हा मूळ शब्दाचं कौडिण्य असं नाम झालेलं दिसतं. कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो. कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य. तर कौडिण्य म्हणजे देहासंबंधी एक उच्च अविष्कार. इथे देह म्हणजे भूभाग असं कल्पिलं तर कौडिण्य हे भूभागविशेष असून टेकडी नामे उठावदार गुणाशी संबंधित आहे हे दिसून येतं.

किंवा मग कोंड हे कुंडचं अपभ्रष्ट रूपही असू शकतं.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

5 Jun 2018 - 8:17 pm | माहितगार

:) हम्म , आधी तुमच्याच थेअरीला पुस्ती जोडण्यात तुम्हाला मदत करतो, तो आंध्रातला कोनदेव चा उल्लेख तुम्ही म्हणत असलेल्या कौंडीण्य ऋषींबद्दल असू शकतोच की !

कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.

यावर भाष्यकरण्याएवढे मला संस्कृताचे व्याकरणीय ज्ञान मला नाही त्यामुळे इतर संस्कृत जाणत्याम्च्या दुजोर्‍याची प्रतिक्षा करेन

कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.

कुडी शब्द कुठून आणि कसा आला असा आपला तर्क आहे ? ( तसे या बद्दल मी या आधी गुढी उभारणी लेखात लिहिले आहे पण आपली मांडणी येऊ द्यात मग मी आपणास जराशी वेगळी बाजू दाखवेन )

गामा पैलवान's picture

5 Jun 2018 - 8:55 pm | गामा पैलवान

माहितगार,

कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही. मात्र तशी गावं आढळून येतात. कुडचढे (गोव्यातलं), कुडतरे, कुडपण (जावळी), कुडगाव, कडप्पा (कुडप्पा?), कुड्डलूर, इत्यादि.

कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते.

आ.न.,
-गा.पै.

कुडचढे किंवा कुडचडे यावरून ती चढावाची जागा वाटते.

मी मागच्याच आठवड्यातील या प्रतिसादात कुडाळ या शब्दाबद्दल अशीच शक्यता वर्तवली .

अर्थात गुढी बद्दलच्या या अभ्यास लेखाच्या निमीत्ताने जो शोध घेतला त्याबद्दलचा माझ्या लेखातील संबंधीत अंश इथे उधृत करतो.

आपण जर तेलगू भाषेचा अभ्यास केला तर गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखीत 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर (सौजन्य: खाप्रे.ऑर्ग) "गुढया घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभेकरून उभारलेली कुटी अथवा झोपडी असाच होतो. ...

त्यामुळे झोपड्या असलेल्या गावांना कुडी (आणि कुटी सुद्धा) असा शब्द वापर सरळ झाला तरीही नवल नसावे.

..कुडी या शब्दाचा उद्भव माहित नाही.

काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी (म्हणजे झोपडी)- गुडी ( हिंदीतील बाहुली म्हण्जे ;गुडीया; कोणे एकेकाळी लाकडी खेळणे असू शकेल) - गुढी

..कुडी हा शब्द म्हणजे देह किंवा काया अशा अर्थाचा वाटतो.

आत्मा राहतो ते घर (कुटी/कुडी) हा देह किंवा काया अर्थी शब्दवापर आपण समजता त्या प्रमाणे प्राचीनच आहे. पण देहावरुन कुडी शब्द तयार होत नाही , काटा (कंटक ) - काठी - काडी - त्यापाऊन बनवली ती कुटी किंवा कुडी असा येतो. आपण म्हणता तसे 'कुडीचा स्वामी तो कुडिन् आणि त्याच्याशी संबंधित ते कौडिण्य.' होऊ शकेला का ते संस्कृत व्याकरण जाणते सांगोत पण शक्यता अगदीच नाकारता येत नाही ; पण कुडी - कोंडणे शब्द कुडिन् एक मेकापासून डायरेक्ट ही येण्यास हरकत नसावी, त्यासाठी कौंडीण्य ऋषींच्या देहा च्या संदर्भाची गरज भासलीच पाहीजे असे नसावे. आणि पुर्वी गड टेकड्यांवर कोंडणे सोपे जात असल्यामुळे त्यानाच कोंडा शब्द प्रचारात येण्याची शक्यता असू शकते. असे वाटते.

खिंड हा शब्द किंड - कोंडी करणे - किंडी - कींड = खिंड असा तयार होण्याची शक्यता असू शकते का .