कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी . केवळ एवढेच की या परिघाचा संघाने आग्रहाने ह्याचा विस्तार समस्त भारत भरातील पुरोहीत वर्ग ते शंकराचार्य आणि इतर धर्माचार्यांपर्यंत केला पाहीजे. प्रसिद्ध मंदिरातील नैवेद्याचे आचारी वाढपी ते शंकराचार्य पदा पर्यंत दलित आणि स्त्रीयांना समान संधी हिंदू धर्म देतो आहे हे पाहिले पाहीजे . तसेच जन्माधारीत विषमता वगळलेल्या धार्मिक साहित्याची निर्मिती केली पाहिजे.
ते राजकीय दबावामुळे करत आहेत या तक्रारीत खूप अर्थ नाही . महात्मा गांधी आणि इतर अनेकांनी राजकीय उपरती झाल्यावरच दलित प्रश्नांकडे लक्ष दिले. संघाच्या या प्रयत्नांचा पुर्ण विस्तार होऊन समाजातील दरी संपत नाही तो पर्यंत विरोधकांनी त्रुटी काढण्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. पण भाजपा अथवा संघाला असे प्रयत्नच करु देणार नाही असा अॅटीट्यूड मात्र बाजूस ठेवला पाहीजे . उदारमतवाद्यां नी किती उदारता दाखवली तरी ते उदार होते तेवढ्यावर सामाजिक उत्क्रांती होत नाही. कर्मठ लोक कर्मठता बाजूला ठेवतात तेव्हा समाज बदलतोय असे खर्या अर्थाने म्हणता येत असावे. अर्थात हे सर्व तात्कालिक अथवा दिखाऊ राहू नये हे तेवढेच खरे.
*** या विषयावरील माझे धागा लेख ***
* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
प्रतिक्रिया
4 May 2018 - 8:08 pm | manguu@mail.com
समरसतेसाठी शुभेच्छा व अभिनंदन
4 May 2018 - 8:30 pm | प्रसाद गोडबोले
नकोच !
दलितांनी संघाच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या कुटील कारस्थानाला बळी पडु नये, एकवेळ जेवायला सोबत पंकतीला बसवले म्हणुन शे हजारो वर्षांचा अन्याय अन डू होणार नाहीये ! जाती निर्मुलनाविषयी गांधीचे विचार जेवढे भोंगळ आहेत तेवढेच सावरकरांचेही आहेत !
जातीनिर्मुलनाच्यासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलाच मार्ग प्रॅक्टीकल आहे ! दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवुन समानतेची शिकवण देणार्या बौध्द धर्माचा स्विकार करावा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या बाबासाहेबांच्या शिकवणुकीचे पालन करावे ! दलितांच्या सोबत ओ.बी.सी समाजनेही तो मार्ग स्विकारणे हेच त्यांच्यासाठी उत्तम आहे ! ओ.बी.सी होण्यास इच्छुक असलेल्या समाजंनीही बौध्द धर्माचा स्विकार करावा , हां अर्थात जातीय अहंकार त्यागता येत नसेल तर स्वतंत्र धर्म स्थापन करावा . काहीही हरकत नाही !!
जात हि धर्मापेक्षा जास्त डीप रुटन्ड आयडेन्टीटी आहे ! एकत्र जेवण केले म्हणुन जाती नष्ट होणार नाहीत , अगदी आंतरजातीय विवाह केले तरीही जाती शिल्लक रहातातच , दलित मुलीने ब्राह्मण मुलाशी लग्न केले तर सरकारच्या लेखी त्यांची अपत्ये ब्राह्मणच असतात अन ब्राह्मण मुलीने दलिताशी लग्न केले तर सरकारच्यालेखी त्यांची मुले दलितच असतात ! तस्मात जात जाणार नाहीये कारण ती कोणाला घालवायचीच नाहीय ! आणि मग जात जर रहाणारच असेल तर एकत्र हार्मनी मध्ये रहायचे असेल तर धर्मांतर चळवळीला पर्याय नाही !
बहुसंख्य लोकांनी धर्मांतर केले तर हिंदु हा अपोआपच अल्पसंख्य धर्म होईल अन अल्पसंख्यांना त्यांच्या धर्माचे आचरण करायचे संविधानानेच स्वातंत्र दिले असल्याने ते ही खुश रहातील !
ज्यांना मटणभाकरी खायची आहे त्यांना तांबडा पांढरा ओरपु द्या , ज्यांना वरणभात खायचे आहे त्यांना वरणभात अन अळुची भाजी ओरपु द्या !
दोघांनी एकत्र एका पंक्तीला बसावे असा हट्ट का ? ह्याने नळी ओरपली की त्याला उलटी येणार अन त्याने चित्राय स्वाहा चित्रगुप्ताय स्वाहा म्हणले की ह्याचे पित्त खवळणार ! त्या पेक्षा नकोच ना !
धर्मांतर इज द बेस्ट !!
4 May 2018 - 8:48 pm | manguu@mail.com
प्रस्थापिताना युद्धात मरायला , पालख्या उचलायला , अब्दागिर्या हलवायला अन पायखाने धुवायला माणसं कमी पडायला लागली की हरवलेल्यांचा शोध , घरवापसी , जेनेटिक्सची भाषा , सामाजिक रस समता आंदोलन वगैरे प्रकार सुरु होतात.
4 May 2018 - 9:15 pm | प्रसाद गोडबोले
युध्द , अब्दागिर्या , पायखाने आता राहिले नाहीत . सामाजिक रस समता आंदोलन हे सरळ सरळ राजकारण आहे , २०१९ च्या निवडणुकांची तयारी आहे ! आणि राजकीय हेतुने सुरु झालेली कोणतीही चळवळ समाजाचे भले करतान दिसत नाही !
मला राजकारणाशी घेणेदेणे नाही ! दलितांना , ओ.बी.सी.ना , ओ.बी.सी. होण्यास इछुक असलेल्यांना स्वाभिमाननं जगता यावं , त्यांना समान संधी मिळाव्यात , अन ब्राह्मणांना त्यांच्या परंपरा पाळत आनंदानं जगता यावं इतकीच माझी मनापासुन इच्छा आहे !
जात जाणार नाहीये , पण एकमेकांना त्रास न देता एकत्र सुखासमाधानं जगता येणं तर शक्य आहे ना !
अवांतर :
बाकी ते घरवापसीशी सरमिसळ करु नका , घरवापसी व्हायलाच पाहिजे , खुद्द थोरल्या महाराजांनी घालुन दिलेला आदर्श आहे !
हिंदु बौध्द शीख जैन हार्मनी ने एकत्र नांदु शकतात कारण " मी म्हणतो तेच एकमेव सत्य, इतर सारे असत्य , ते सारे मानणारे काफीर इन्फडेल्स" असे कुठेच नाहीये ह्या धर्मात . दुसर्याला मारा किंव्वा सक्तीने धर्मांतरीत करा असा हट्ट नाहीये , ज्यांचा तसा हट्ट आहे त्यांच्यासोबत बुदधाने सांगितला तसा स्वातंत्र्य समता आणि बंधुता मानणारा शांततापुर्ण समाज स्थापन करणे अशक्य आहे ! जोवर कमकुवत आहेत तोवर गपगुमान रहातील पण चान्स मिळताच ते तुम्हाला त्यांच्या क्लब मध्ये सामील केल्याशिवाय रहाणार किंवा मारल्याशिवाय नाहीत .
4 May 2018 - 10:00 pm | माहितगार
मार्कस तुम्हाला नसेल हो ! राजकारण्यांना राजकारणाशी देणे घेणे असते. आणि पुढचे इलेक्शन झाले की -मग जिंकोत की हरोत- संघ भाजपाच्या नेतृत्वास ह्या शिवाय मार्ग नसल्याचा डोक्यात प्रकाश पडेल . आणि त्या स्टेज ला त्यांना नेण्यास त्यांचे विरोधी पक्ष त्याम्च्याही नकळत व्यवस्थीत मदत करतील आणि काँग्रेस संपवता संपवता भाजपाची कॉम्ग्रेस ( आणि काँग्रेसची भाजपा ) झालेली असेल.
4 May 2018 - 10:48 pm | manguu@mail.com
जातीय वाद नष्ट करू असे बोलता बोलता 'धर्मयुद्धा' वर बोलु लागतात.
म्हणजे लबाड लोकांचा कावा यशस्वी झाला !!!
लढायचे तर लढा , पण लढायला @@@न आणि हादडायला @@ण असे होऊ देऊ नका म्हणजे झाले,
( मी पूर्वीचा ब्राह्मण , मुसलमान झालो , घरवापसी करायची आहे , पण दुसरी जात हवी आहे , तर मला कोणती जात मिळेल ?
ही फक्त एक शंका आहे . )
4 May 2018 - 11:11 pm | कपिलमुनी
मंगू , नुसत्या शंका काढू नको रे ! त्या प्रत्येक धर्मात असतात . अगदी बौध्द असो की मुस्लिम !
असल्या थियरीवाल्या शंका फक्त चर्चेपुरत्या असतात . खुद्द मुसलमान लोकांत शिया सूननी भांडतात आणि बौद्ध लोक मूर्तीपूजा करतात . त्यामुळे तुझ्या वकुबा नुसार काड्या घाल त्यापुढे शंका वगैरे नको . कारण माणसाने स्वधर्म चिकित्सा आधी करावी . तुझ्या लाडक्या इस्लामची चिकित्सा संपालिबाकी याचेही उत्तर देईन
4 May 2018 - 11:26 pm | प्रसाद गोडबोले
जातीवाद आणि धार्मिक असहिष्णुता ह्यांची सरमिसळ करणे हा बहुतांश तथाकथित पुरोगाम्यांच्या दुर्गुण आहे !
एक सनातनी हिंदु म्हणुन मी मान्य करतो की हिंदुधर्मात जातींची उतरंड होती , दलितांवर अत्याचार झालेत रादर आजही होत आहेत :( .
दुर्दैवाने हिंदु धर्मात धर्मापेक्षा जात जास्त खोलवर गेलेली असल्याने जाती नष्ट होणार नाहेत , धर्मांतर करणे हाच एकमेव आणि अतिषय उत्तम उपाय आहे दलितबांधवांकडे ! बुध्दाचा धर्म अप्रतिम आहे , आजकाल कोणाल आत्मा परमात्मा ज्ञान अज्ञान वगैरेंची पडलेली नाहीये त्यामुळे त्या बाबतीत काही सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन असली तरीही त्याने आजच्या काळात काहीही फरक पडत नाही !
बुध्दाचा धर्म दुसर्यांची मंदिरे पाडुन स्थापन झालेला नाही , अन निष्पाप माणसाला मारुन स्थापन झालेला नाही ! बुध्दाला तुम्ही "त्यांच्या" लाईनीत उभे करुन बुध्दाचा अपमान करत आहात , अथात त्यावरही कोणता बौध्द तुमच्यावर फतवा काढणार नाही की इन्क्विसिशन करणार नाही , तो बुध्दा सारखा गालातल्या गालत हसुन जाऊ दे म्हणेल !
हिंदु धर्मातच यायचे असा हट्ट का ? हिंदुधर्मत असमानता जातीवाद आहे आणि ह्या जाती नष्ट होणार नाहीत म्हणुन तर मी धर्मांतर हा उपाय आहे असे म्हणलो ना ! कित्येक बौध्द बिक्खु तुम्हाला बौध्द धर्मात आनंदाने घेतील , महायान की हीनयान की नवयान काय आवडेल ते स्विकारा !
बौध्द लोक हिंदुंची , शिखांची , जैनांची मंदिरे तोडुन तिथे स्तुप बांधणार नाहीत अशी मला ९९.९९% खात्री आहे :) बौध्दांसोबत हिंदु शीख जैन अत्यंत सुखासमाधानाने नांदु शकतात , नांदले आहेत !
4 May 2018 - 11:29 pm | कपिलमुनी
बौद्ध धर्म आदर्शवत आहे याबद्दल शंका नाही. एकदा बौध्द धर्माच्या ऱ्हासाची कारणे अभ्यासावीत एवढे सांगतो .
(तुम्ही वाचली असल्यास त्यावर चर्चा नक्की करूया )
4 May 2018 - 11:31 pm | manguu@mail.com
घरवापसी व्हायलाच पाहिजे , खुद्द थोरल्या महाराजांनी घालुन दिलेला आदर्श आहे !
हे तुम्हीच लिहिले म्हणुन शंका विचारली.
4 May 2018 - 11:38 pm | प्रसाद गोडबोले
थोरल्या महाराज साहेबांनी जेव्हा घरवापसी केली होती तेव्हा लोकांना त्यांची सक्तीने धर्मांतर होण्या पुर्वीची जात लक्षात होते तस्मात त्यांना त्या त्या जातीत परत घेणे शक्य झाले , आज बहुतांश लोकांना त्यांची धर्मांतरापुर्वीची जात लक्षात नाही , संस्कार लक्षात नाहीत , प्रथा परंपरा लक्षात नाहीत त्यामुळे त्यांना कोणत्याच जातीत मिक्स होता येणार नाहीये .
म्हणुन मी म्हणतोय की परत नव्याने सुरुवात करायची आहे तर ही जाती पातीची भानगडच नको , घरवापसी करुन सर्वांनाच बौध्द धर्मात स्विकारुन घ्यावे ! सनातनी हिंदु बुध्दाला विष्णुचा अवतार मानत असल्याने त्यांच्या लेखी ही घरवापसीच आहे !
4 May 2018 - 11:52 pm | कपिलमुनी
>>>हिंदु बुध्दाला विष्णुचा अवतार
असे नको व्हायला ! नाहीतर हिंदू पुन्हा बौद्ध ही एक जात मानतील
5 May 2018 - 3:05 pm | manguu@mail.com
आमचे मोर्चे किती शांत व स्वछ होते. त्यांचे बघा किती दंगळखोर .
भारतात अधोगती होते आहे .. कारण पहा आरक्षण
हे असे व्हाट्सअप फेसबुक मेसेजेस गेले काही महिने कोण पाठवत आहे ? दलितांचे हिंदू भाऊ की इतर धर्मिय ?
5 May 2018 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले
तुम्हला नीट वाचता येतें का हो ? वर किमान ३-४ वेळा म्हणालोय कि दलितांनी हिंदु राहुच नये बौध्द व्हाव म्हणजे हिंदु भाऊ बिऊ असला सानेगुर्जी टाईट्प भोंगळ पणा होणार नाही !
तुम्हाला शांततेच्या धर्माचे लोक दलितांचे मित्र वाटत असतील तर बाबासाहेबांनी शांततेचा धर्म का स्विकारला नाही ह्याचा जरा शोध घेवुन पहा !
बुतशिकन मुर्ती तोडायला येतो तेव्हा तो मुर्ती विष्णुची आहे की महावीराची की बुध्दाची हा विचार करत नाही !
त्यांच्या लेखी बौध्द आणि हिंदु समानच आहेत .... काफिर ... इन्फिडेल्स !
तेव्हा एकदा आपलं कोण आणि परकं कोण ह्याची एकदा मुळापासुन चिकित्सा करा जमले तर !
अवांतर : तुम्ही व्हॉटअबाऊटीझम करायचे बंद करा आधी . इथे संघ आणि दलित असा मुदा चर्चेला असताना त्यात मोर्चा , आरक्शण असले मुद्दे सरमिसळ का करता ?
मुक मोर्चाबाबत फॅक्ट आहे की मराठा समाजाचे व्याकरण चुकले असले तरीही मोर्चे हे अत्यंत शांततापुर्ण झाले आहेत , एकही तोडफोड झाल्याचे दिसले नाहीये ! म्हणुन मला त्यांच्याविषयी आदर आहे , त्यांच्या अदृष्य नेतृत्वाविषयी आदर आहे , त्यांच्या मागण्यांविषयी आदर आहे , सहानुभुती आहे . मोर्चेकरी स्पष्ट बोलुन दाखवत नसले तरीही त्यांच्यात सुप्त ब्राह्मणद्वेष होताच आणि आहेच पण तरीही त्यांनी कोणतीही हिंसा केल्याचे दिसले नाही ! त्यांनी बसेस फोडल्या नाहीत की लोकांना वेठीस धरले नाही ! ही फॅक्ट आहे !
5 May 2018 - 9:36 pm | manguu@mail.com
तुम्हाला शांततेच्या धर्माचे लोक दलितांचे मित्र वाटत असतील तर बाबासाहेबांनी शांततेचा धर्म का स्विकारला नाही ह्याचा जरा शोध घेवुन पहा !
हेच लॉजिक बाबासाहेबानी हिंदु धर्म सोडला यालाही लावता येईल का?
6 May 2018 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले
हेच लॉजिक बाबासाहेबानी हिंदु धर्म सोडला यालाही लावता येईल का?
>>>
काय बरळयात ? हिंदुंनी कोणती जैनांची बौध्दांची मंदिरे तोडलीत ? कधी सक्तीने कोणा बौध्दाला हिंदु करवुन घेतलय ?
तुम्हाला असं वाटतय का कि दलित आहेत म्हणुन धर्मांतर करताना शांततेच्या धर्माच्या लोकांनी त्यांना दया दाखवली ? गोवा इन्क्विसिशन विषयी जरा वाचा , जितके टॉर्चर ब्राह्मणांचे झालेय तितकेच किंबहुना जास्त दलितांचे झाले आहे !
बामियानचा बुध्द तोडायला हिंदु नव्हते गेले , म्यानमारमध्ये शांततेचा धर्म कोणत्या धर्माच्या लोकांवर अत्याचार करतोय ते वाचा जरा !
तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही , कारण तुम्हाला इतिहासाशी घेणे देणे नाहीये , तुम्हाला फक्त वाद हवाय , दलित समाजाचे हित नको आहे !
5 May 2018 - 7:34 am | आनन्दा
दलितानी धर्मांतर करून त्यांची जात गेली? कोणत्या जगात राहता तुम्ही?
जातय्जी काही गेलेय ती शिक्षणाने गेली.. दलित लोक खांद्याला खांद्या लावून काम करायला लगले शहरात तेव्हा जात गेली.
गावात आज बौद्धवाडी हा शब्द म्हारवाडा या शब्दाला समांतर आणि बुद्ध हा शब्द म्हार या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो.
नाइलाजाने सांगवे लगतेय की हे लॉजिक गंडलय (धर्म बदलण्यापुरते).
8 May 2018 - 7:54 am | एमी
दलित मुलीने ब्राह्मण मुलाशी लग्न केले तर सरकारच्या लेखी त्यांची अपत्ये ब्राह्मणच असतात अन ब्राह्मण मुलीने दलिताशी लग्न केले तर सरकारच्यालेखी त्यांची मुले दलितच असतात ! >> चुकीची माहिती. आंतरजातीय विवाहात आता मुलांना आईची जात लावायची का वडलांची याची निवड करता येते आणि त्यानुसार फायदे मिळवता येतात.
===
बाकी प्रतिसादाशी अतिशय सहमत!
4 May 2018 - 8:36 pm | अभ्या..
हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे शक्य आहे?
4 May 2018 - 9:50 pm | माहितगार
शक्य नसण्यासारखे काय आहे ? मनावर घेण्याचा प्रश्न आहे. अभ्यासकांना लागणार्या प्रतींव्यतरीक्त सर्व प्रति मग कोणत्याही धर्माच्या असोत साहित्यात जन्माधारीत विषमतेचे समर्थन असू नये असा कायदाच हवा. शिक्षा खूप कडक नको वेगाने द्यावी पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कसे सहा महिन्याची शिक्षा असूनही प्रभावी होते तसे असावे. अभ्यासकांसाठीच्या जुन्या अनएडीटेद प्रतिंना प्रतिप्क्षी समिक्षण जोडणे आवश्यक असावे.
4 May 2018 - 9:54 pm | माहितगार
संघ आणि भाजपाला यास आज ना उद्या सामोरे जावे लागणारा, राजकीय दृष्ट्या फारसा दुसरा मार्ग नाही. आज नाही तर पुढचे इलेक्षन होई पर्यंत त्यांच्या अनुयायांना हे आपोआप उलगडायला लागेल.
4 May 2018 - 10:02 pm | रमेश आठवले
संघ गेली काही दशके वनवासी कल्याण आश्रम , एकल विद्यालय अशा संस्था चालवत आहे आणि त्या मुख्यत्वे दलित व पीडित समाजामध्ये कार्यरत आहेत . हे काम कोणत्याही राजकीय दबावा पोटी सुरु करण्यात आले असे म्हणायला काही पुरावा दिसत नाही.
उदधृत ----कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते---
4 May 2018 - 10:46 pm | माहितगार
संघाचे आणि आदीवासींचे वितुष्ट असण्याचे तसे काहीच कारण नाही, एकमेव एकलव्यवाली कथा सोडली तर वैदीकांकडून आदीवासीं बाबत अन्यायाची प्रत्यक्ष उदाहरणे फार सापडणार नाहीत. आदीवासी संघ भाजपा पासून दूर जात असेल तर नक्षली आणि डाव्या प्रचाराला संघाला इफेक्टीव्ह उत्तर न देता येणे आणि भाजपा सरकारांनी आदीवासींसाठी सब्स्टँशिअल काही न करणे . विद्यालये आणि कल्याण आश्रमे हवीतच पण ती पॉलीटीकली सबस्टेंशीअल कृती म्हणता येत नाही.
संघ आणि संघ समर्थक ज्या समरसतेची परंपरागत भाषा करतात ती हाफहर्टेड आहे ज्यात पाच बोट कशी सारखी नसतात वाले तत्वज्ञान आहे , हे तत्वज्ञान समान संधी आणि विषमता निर्मूलनाचे नि:संदिग्ध आश्वासन देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या विरोधकांकडे बोटे दाखवता तेव्हा हि तीन बोटे अशी तुमच्या दिशेला असतात. हां सध्याच्या सरसंघचालकांना परंपरागत भूमिकेकडून विषमता निर्मुलनाच्या भूमिकेकडे यायचे आहे असे त्यांच्या गेल्या दोनवर्षातील भाष्यांवरुन वाटते पण ते त्यांच्या अनुयायांना अद्याप समजलेले नाही. ते अनुयायांच्या सहज गळी उतरणार नाही पण अजून एक इलेक्शन झाले आणि अजूनही आपण २/३ बहुमतापासून दूर आहोत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा भाजपा नेतृत्व मी म्हणतोय त्या पेक्षा अधिक कसेशन्स देताना दिसेल कारण त्यांना घरी बसायचे नाही त्यांना आता सत्तेची एकदा नव्हे दोनदा सत्तेची चव आलेली आहे . आवश्यक ती काँप्रमायझेस करताना ते आवश्य दिसतील. (अलरेडी केलेली कॉम्प्रमायझेस मोजा तीही बरीच असावीत )
१) धार्मीक बाबीत तूम्ही समान संधी किती दिल्या किती प्रतिष्टीत मंदिरात आणि किती शंकराचार्य आणि भारत भरात किती पुरोहीत आदिवासीतून झाले ?
२) आर्थीक आघाडीवर त्यांना किती उपजाऊ जमिनींवर अधिकार प्राप्त करून दिले , त्यांच्या प्रदेशातील मिनरल आणि रिसोर्सेस वापरणार्या किती कंपन्यांच्या शेअरह्ल्डर्शीपमध्ये स्थानिक आदीवासींना सामावून घेतले ?
३) राष्ट्रीय स्तरावर आदिवासींना किती कॉर्पोरेट शेअर होल्डर्शीप मिळवून दिली , शहरातील किती कमर्शीअल स्पेस आदीवासींच्या नावावर केला ?
४) दिल्ली गोल्फ क्लब मध्ये पोषाखावरुन झालेल्या अपमानासारख्या घटनांबद्दल प्रकरणे दाबण्या एवजी न्याय देण्यासाठी भाजपा सरकारने काय केले ?
काय आहे उपरोक्त प्रश्न उडवून लावता येतील आणि बहुतकरुन मिपावरील १०० % भाजपा संघ समर्थक हे प्रश्न उडवून लावतील आणि फक्त वनवासी कल्याण आश्रमातील आदीवासी तुम्हाला वेळ पाहून मते देईल तुमचा कायमचा मतदार होणार नाही . पण तुमचे राजकारणी कदाचित हि नव्हे पण या प्रमाणे इतर कंसेशन्स देताना दिसतील . दलितांबद्दल पुढच्या प्रतिसादात लिहितो.
5 May 2018 - 8:07 am | आनन्दा
हा एक टिपिकल दिशाभूल करणारा प्रश्न अहे. धार्मिक बाबतीत समान संधीची गरज काय आहे? शंकराचार्य होणे आणि पुजारी होणे म्हणजे समान संधी नव्हे. उद्या एखादाअदिवसी वारकरी म्हणून माझ्यासमोर आला तर मी त्यच्या पायावर डोके ठेवीन का हा प्रश्न माझ्यादृष्टीने जास्त महत्वाचा आहे. तुमचा हा प्रश्न म्हणजे गोलपोस्ट बदलायचा प्रयत्न अहे.
याबाबत माहीत नाही, पण विश्व हिंदु परिषद हे काम करत नाही. ते फक्त शिक्षण देणे, आधुनिक दृष्टीकोन देणे आणि आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी प्रयत्न करतात. या राजकीय किंवा तुम्ही म्हणता तश्या संघटना नाहीत. त्यातून शिक्षण घेऊन कोणी आंदोलन करत असेल तर त्याना नैतिक पठिंबा हे नक्की देत असतील, पण विवादास्पद होऊन कार्य थांबण्यापेक्षा शिक्षण आनि जागृती हे कार्य अंडरकरंट राहून अधिक चांगले करता येत असावे. (हे मी का सांगतो? माझा भाऊ आजपर्यंत तलासरीला कार्यवाह आहे, आणि आजपर्यंत मी त्याला कोणत्याही प्रकारे राजकीय कार्य करताना पाहिले नाही. (त्याच्या कार्याचे राजकीय परिणाम होतच असतात, जे त्यांच्या मातृसंस्थेला हवे आहेत. असो ही वर्षानुवर्षे चालणारी गोष्ट आहे)
यावर आपला पास. हे प्रश्न राजकीय आहेत, आणि माझा भाजपाशी संबंध मत मोदींना देण्यापुरताच आहे.
5 May 2018 - 8:17 am | आनन्दा
अवांतर, मी स्वतः शाखेत कही काळ गेलेलो आहे, आणि शाखेत जमीनी स्तरावर तरी जातिभेद पाळत नाहीत हे स्वतः अनुभवले आहे.
5 May 2018 - 8:33 am | manguu@mail.com
शाखा १ तासाच असते . कधीतरी एखादे शिबीर ३ दिवस...
माणूस घरी जात पाळतो का , ते तिथे कसे समजणार ?
शाखाच का , बेंक , बस , थिएटर इथेही जातपात होत नाही , म्हणजे जातपात आस्तित्वात नाही ?
5 May 2018 - 10:44 am | उगा काहितरीच
मंगु सर ,
तुम्हाला काय अपेक्षित आहे , जातपात पाळणे कमी / नष्ट करण्यासाठी ?
आज (२०१८ साली ) जातपात पाळल्यामुळे कुणाला व नेमका कसा फायदा होतो ?
मी मागच्या 2-3 वर्षांपासुन MNC मधे काम करतो . जॉब लागला तेव्हा १-२ दिवस १७६० कागदपत्रे दिली असतील कोणत्याही कागदपत्रावर माझ्या जातीचा साधा उल्लेख पण नाही. २-३ वर्षात माझ्या एकाही सह कर्मचाऱ्यांना माझी व मला त्यांची जात माहीत नाही. MNC त लागणे , काम करणे , बढती मिळविणे यात जात हा फॕक्टर कधीच नव्हता . मग असं सगळीकडे करायचं तर नाहीका जमणार ?
5 May 2018 - 1:26 pm | अनन्त अवधुत
शाखेत जाणारे एक तासच सोबत असतात असे नाही. बऱ्याचदा ते शाखेच्या एक तासाच्या आधी आणि नंतर पण तेवढेच चांगले मित्र असतात जितके ते शाखेत एकत्र असतात.
5 May 2018 - 8:19 am | आनन्दा
हे वाक्य जरा नीत समजावून सांगा. हा थोडा कॅज्युअली केलेला गंभीर आरोप वाटतो.
5 May 2018 - 9:00 am | माहितगार
ते वास्ताव ईथून प्रकट होत असावे ! परंपरागत समरसता अशा पद्धतीने समान संधींना आणि म्हणून विषमतेच्या निर्मुलनास वळसा घालते. सावरकर मुख्वटा म्हणून चालतात त्यांनी सांगितलेले सात बेड्या तोडण्याची कृती प्रत्यक्षात आणली असती तर आज ईसवी २०१८ मध्ये संघ आणि भाजपाला समरसता भोजने घालावी लागली नसती .
मिपा सनातनींना आवडले नाही तरीही राजकारणच्या धारेत भाजपा आणि संघ बदलल्या शिवाय राहणार नाही किंवा नाही बदलले तर ज्या काही राजकीय संधी आहेत त्या राजकीय संधी गमावून बसतील . असो.
5 May 2018 - 9:15 am | आनन्दा
मुळात तुम्ही परत गोलपोस्ट बदलताय.
तुम्हाला आजही सांगतो, मला वाटते पंढरपुर तुळजापूर यासारख्या मोठया देवस्थानांमध्ये सर्व जातींचे पुजारी आहेत. परंतु परंपरागत काही प्रकारचे ज्ञान ब्राह्मणांकडेच आलेले आहे त्याला नैलाज आहे. तो ब्लॉकर उठून ते ज्ञान इतरांकडे जायला वेळ लागेल. देवळात पूजा करायला कही किमान पात्रता नकोच असे आपले मत असेल तर चर्च करण्यात अर्थ नाही.
आजच्या घडीला शंकराचार्य इत्यादींना कोण मानतो? आणि बहुसंख्य समाज ज्याना मानतो त्यात किती तथाकथित उच्चवर्णीय अहेत? आणि मुळात सामाजिक ऐवजी धार्मिक आधारावर समाजाची उन्नती मोजणे कालबाह्य आहे असे आपले मत नाही का? नसेल तर का नाही?
5 May 2018 - 9:24 am | माहितगार
सनातनी दबावा पुढे बदलतच असतात - मागे बदललेत , आतही बदलताहेत, पुढेही बदलतील -तसे पंढरपूरसारख्या संधी मिळाल्या आहेत त्या विस्तारीत होतील हा लेखाचा आशय आहे . माझी या विषयावरील भूमिका सातत्याची आहे आणि सातत्य असलेल्या भूमिकेला गोलपोस्ट शिफ्टींग कसे म्हणता येईल ?
5 May 2018 - 1:29 pm | आनन्दा
गोलपोस्ट शिफ्टिंग मी म्हणतो कारण दलितांची समरसता आता देऊळ प्रवेशावर अवलंबुन नाही.
ही सगळी 100 वर्षांपूर्वीची प्रतीके आहेत. आज सगळी देवळे सरकारच्या ताब्यात आहेत, ते एक फटकार्यात सगळं बदलू शकतात.
मुख्य प्रश्न आज दलितांमधील आशिक्षितांना सुशिक्षित करणे, शिक्षितांना अधिक शिकण्यास भाग प्रोत्साहन देणे, आणि सर्वांना सन्मानकारक रोजगार देणे हा आहे.
ते सोडून तुम्ही जरा काही झालं ही शंकराचार्य आणि पुजारी वगैरे विषय काढता, म्हणून त्याला मी गोलपोस्ट बदलणे म्हणतो.
5 May 2018 - 2:11 pm | माहितगार
पंडितजी, एक उदाहरण देतो , आ.ह. साळुंखे त्यांची मते पटोत ना पटोत संस्कृत भाषेचा व्यासंग दांडगा असावा, त्यांनी एका शकाराचार्यांना शास्त्रार्थ करण्याचे आवाहन केले तर ते 'ब्र समाजाचे नाहीत म्हणून त्या शंकराचार्यांनी फेटाळले म्हणे' आता साळुंखे तर दलितही नव्हते तरीही त्यांना समान संधी नाकारली गेली. असा कुणाही विद्वानाचे ज्ञान जन्माधारीत बाबींवर नाकारणे सयुक्तीक ठरते का ?
समरसता अभियाना बद्दल भाजपा दलित नेत्यांच्याच मुलाखती पहा , आम्हाला नुसते समरसता डोस नकोत सन्मान आणि समान संधी पाहीजे अशी वक्तव्ये आहेत. स्वतः सरसंघचालक विषमता निर्मुलनाची भाषा करताहेत, तुमच्याच नेत्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करावयाचे असेल तर जरुर करा , तो तुमचा अधिकार आहे .
5 May 2018 - 2:25 pm | आनन्दा
तिथेच तर घोडं पेंड खातंय..
तुम्ही धार्मिक समरसता म्हणताय, आणि मी सामाजिक समरसता म्हणतोय..
धर्म ही वैयक्तिक बाब आहे.
माझ्या घरी एखादा सो कोल्ड दलित आला तर मी त्याला माझ्या कपातून चहा देईन की नाही, त्याला माझ्या पंगतीला घेऊन जेवण करीन की नाही हा मुख्य प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नावर काम करणे आवश्यक आहे.
माझ्या नोकरीच्या जागी मी एखाद्याला केवळ दलित आहे म्हणून संधी नाकारेन का?
मुळात आर्थिक सबलीकरण झाले की सामाजिक आणि धार्मिक आपोआप होते हे यामागचे तत्व आहे.
5 May 2018 - 2:38 pm | माहितगार
वास्तवास धरुन नसलेली कम्युनीस्ट थेअरी आहे. हि थेअरी मान्य असती तर आता पर्यंत सर्व आंबेडकरवादी कम्युनीस्ट आनंदाने झाले असते. असंख्य ज्यांना आर्थीक सबलता आहे त्यांना सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात समान संधी नाकारल्या जातात , आणि आपले इथल्या इतर काही मिपा करांचा विरोधच इथे तुम्ही धार्मीक गोष्टीत समान संधी देण्यासाठी तयार नाही तर स्मरसतेचा देखावा ढोंगी ठरावयास लागतो. बिचारे मोहन भागवत सध्यातरी आपल्याच कळपात एकटे पडलेले दिसताहेत
8 May 2018 - 3:18 pm | आनन्दा
आर्थिक सबलीकरण आणि कम्युनिझम चा एकमेकांशी संबंध आहे?
आणि तुम्ही ज्याला धार्मिक सबलीकरण म्हणता त्याला अनेक कंगोरे आहेत.. मुळात हिंदू धर्माने ईश्वर जाणण्यासाठी कोणतीही जातीची अट घातलेली नाही.
राहता राहिला प्रश्न देवळात पुजारी म्हणून जाण्याचा.
त्यासाठी काहीतरी क्वालिफिकेशन लागते, आणि आजच्या जमान्यात तसे क्वालिफिकेशन असलेले ब्राह्मण मिळणे देखील कठीण झालंय तर इतरांची काय कथा? तसे क्वालिफिकेशन असलेले कोणी मला दाखवा, मी त्याला नमस्कार करायला तयार आहे. अनेक तथाकथित निम्न जातीचे संत ब्राह्मणांनी डोक्यावर घेतले आहेतच की.
<हे फक्त देवळात पूजा करण्याशी संबंधित आहे.. यामध्ये शाकाहारी असणे, काही विशिष्ट स्तोत्र पाठ असणे अश्या अपेक्षा आहेत. मुंज वगैरे आपण तूर्तास सोडून देऊ> दलितांना देखील यात रस नाही, आणि त्यांना असावा असे मलाही वाटत नाही कारण यातले बरेच कालबाह्य आहे.
त्यामुळे तशाही कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून आर्थिक प्रगती, जी मुख्य असे ती साधणे आवश्यक, असे माझे मत आहे.
8 May 2018 - 3:23 pm | माहितगार
जी गोष्ट काल बाह्य होत चालली आहे म्हणता त्यावरचा अगदी कालबाह्य होतानाही आधीकार सोडवत नाही ?
8 May 2018 - 3:24 pm | माहितगार
* एकाधिकार सोडवत नाही ? असे वाचावे
8 May 2018 - 3:37 pm | आनन्दा
हम्म..
यामध्ये मोठी मेख अशी आहे की आमच्यासारख्या अनेकांना पंचसूक्त वगैरे येत नाही. पण सामान्यपणे पुजाऱ्याला ते येत असावे अशी अपेक्षा असते.
जे लोक हे शिकवतात त्यांना ते अब्राह्मणांना शिकवायची इच्छा नाही. त्यांनी शिकवावे असे आम्ही म्हणून ते तयार होणार नाहीत.. ते काही मिपा वाचत नाहीत.
त्यामुळे काझ्यासारखे लोक हे मध्यममार्गी विचार काढतात, यामध्ये काय झाले पाहिजे यापेक्षा आत्ता काय करता येऊ शकेल हा विचार जास्त प्राधान्य ठेवतो.
असो.. मला काय म्हणायचं आहे हे मला अजून देखील नीटसे मांडता आलेले नाही, त्यामुळे गैरसमज वाढत आहेत. म्हणूनच मी थांवलो होतो, पण तुम्ही शरियाच्या धाग्यावर मला मुद्दाम उचकवलत म्हणून परत आलो होतो.
असो, आता मात्र थांबतो.
5 May 2018 - 2:29 pm | आनन्दा
साळुंखे ना शास्त्रार्थ नाकारण्यामागे त्यांचे एकांगी विचार आणि तसा त्यांचा लेखनाचा इतिहास कारणीभूत असावा.
5 May 2018 - 2:39 pm | माहितगार
=)) = )) यातून समजायचे ते समजतील __/|__
5 May 2018 - 2:43 pm | माहितगार
शंकराचार्यांना एका व्यक्तीचे एकांगी विचार खोडण्याची संधी मिळाली असती ना ! पण आपल्याला असे वाचण्यास नक्कीच आवडणार नाही.
8 May 2018 - 3:08 pm | आनन्दा
आ ह साळुंखे यांचे नेमके कोणते विचार खोडण्यासारखे आहेत?
मी तरी साळुंखे, खेडेकर वगैरे एकाच आहेत असे मानतो.
ज्यांना शब्दच्छल करून केवळ भ्रम निर्माण करण्यात रस असरो त्यांना मी वाद घालण्याच्या योग्यतेचे मनात नाही
8 May 2018 - 4:00 pm | माहितगार
हे बघा आनंदा , ( मी अशात एका धाग्यावर मार्कस शी आणि दुसर्या धाग्यावर दासबोध डॉटकॉमशी केलेली चर्चा आपणास अवगत नसावी सम्जून त्यातला बर्या पैकी भाग इकडे पुन्हा उधृत करणार आहे )
१) शंकराचार्यांची आणि ईतर धर्मगुरुंची मुख्य जबाबदारी धर्म प्रसाराची आणि मार्गदर्शनाची आहे , आपल्या प्रमाणेच मते असलेल्यांशी तुम्ही करता ती चर्चा असते तो खर्या अर्थाने दुसर्यांना आपले मत पटवून देण्यासाठी केलेला वाद नसतो. खरी मजा तेव्हा असते जेव्हा तुम्ही वेगळ्या मताच्या लोकांना आपलेसे करता. - आणि यात हिंदू धर्मगुरुंना यश आले असते तर हिंदू धर्मीयांना जी संकटे झेलावी लागली ती कमी झेलावी लागली असती, पण ब्राह्मणांव्यतरीक्त इतरांशी शास्त्रार्थ करणारच नाही या दृष्टीकोणाने हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले आहे. हे पद जन्माधारे एका 'ब्र' समाजासाठी राखीव नसते तर कदाचित इतरही समाजातून अधिक योग्य व्यक्ती त्या पदावर येऊन हिंदू संस्कृतीस अधिकचांगल्या पद्धतीने डिफेंड करु शकल्या असत्या - शिवाय हिंदूमधील जातीयवाद आणि जन्माधारीत विषमता आहे हे हा मुख्य आक्षेप हे पद जन्माधारीत जातीतून भरले नसते तर आपोआपच बाजूला पडला असता - पण ती संधी या पदावरील संकुचित आणि शेखचिल्ली निती बाळगणार्या व्यक्तींनी आणि कर्मठांनी सातत्याने गमावली याची मोठी किंमत हिंदू समाज मोजतो आहे .
२) धर्मगुरु पदावरील व्यक्ती विरक्त हवी
मी स्वतः शब्द पूजक नाही त्यामुळे अमुक शब्दांची आज्ञा पाळाच असे म्हणणार नाही पण “... भद्राः क्रतवः नः विश्वतः आयन्तु … “ (अर्थ लेखात दिला आहेच) हे ज्यांना वेद वचन म्हणून पाळावे वाटते . त्यांनी वेद वचन म्हणून पाळावे माझ्यासारख्या इतरांनी विवेक बुद्धीला पटत असल्यास पाळावे असो .
३) मला मनुस्मृतीचा दाखला देणे अथवा कुणाला शुद्र म्हणणे आवडत नाही - अनेक जण मागच्या दाराने ते वापरण्याचा अद्यापही अट्टाहास करतात आणि जन्माधारीत एकाधीकार बाळगून असलेली शंकराचार्यादी मंडळी अद्याप अट्टाहास करत असणार म्हणून तेवढे क्वोट करतोय - पण त्यात सुद्धा ज्ञान शुद्रां कडूनही घ्यावे असे लिहिले आहे .
४) आ. ह. साळूंख्यांना शास्त्रार्थाचा आधिकार नाकारणार्या शंकराचार्यांनी त्यांना इतर कारणांनी नव्हे तर स्पष्टपणे ब्राह्मण नाहीत म्हणून शास्त्रार्थ नाकारला आहे . हे नाकारण्या मागचे तत्वज्ञान सहसा परशुरामानंतर दोनच वर्ण शिल्लक राहीले ब्राह्मण आणि शुद्र असा असतो , म्हणजे आपण जे साळूंख्यांना शास्त्रार्थ नाकारण्याचे इतर तर्क देता आहात ते तसे लागू पडत नाहीत .
8 May 2018 - 4:54 pm | माहितगार
त्यांनी शब्दच्छल केल्याचे आणि भ्रम निर्माण केल्याचे आपल्याकडे आधार असते तर ते आपल्याला शंकराचार्यांपुढे मांडता आले असते किंवा आजही साळुंख्यांची तब्येत चांगली असेल तर त्यांच्याकडे मांडता येऊ शकतील , त्यांना शास्त्रार्थ करण्यासाठी शंकराचार्यच लागतात असेही नसावे आणि आपल्याशी चर्चा करण्यापुर्वीच पुर्वग्रहाने आपल्याला ते शब्दच्छल आणि भ्रम करणारे हि विशेषणेही लावतील हि शक्यताही विरळ असावी .
जिथे हिंदू धर्मग्रंथात काही अयोग्य लिहिले ते अग्राह्य ठरवण्याची, आणि कोणत्या समुदायास मानसिक क्लेष होईल -जन्माधारीत विषमतेचे समर्थक असे लेखन भूतकाळात लिहिले गेले असेल धर्मगुरु म्हणून नैतीक जबाबदारी स्विकारुन माफी मागण्याची जबाबदारी बनते , (हा नियम / अपेक्षा मी केवळ हिंदू नव्हे ज्यात्या धर्माच्या धर्मगुरुंकडून भूतकाळातील त्यांच्या पुर्वाश्रमींनी केलेल्या चुकांबद्दल ठेवतो - इथे हिंदू धर्मगुरुलाच का म्हणताय असा नारा घेऊन येऊ नये)
आणि ब्राह्मण ग्रंथ (ब्राह्मणांनी लिहिलेले म्हणून नव्हे ब्राह्मण नावाचे स्वतंत्र ग्रंथ असतात ) स्मृती महाभारत, रामायणादी महाकाव्यातील अधिकृत अथवा प्रक्षिप्त साहित्यातून जे काही अन्याय कारक आहे त्या बद्दल आ.ह. साळूंखे असू द्यात अथवा अजून कुणी त्यांना क्लेष असतील तर दूर करण्याची धर्मगुरुंची जबाबदारी नाही का ? - एक लक्षात घ्या आ.ह. साळूंख्यांचे दोन मुख्य आक्षेप अपेक्षा होत्या १) जन्माधारीत विषमता निषेधार्ह ठरवावी २) महाभारत रामायणातील काव्यात जे चुकीचे क्लेषकारक लेखन घुसडले गेले त्यास अग्राह्य ठरावावे यात गैर शब्दच्छल अथवा भ्रम निर्माण करणारे असे काय आहे ? ३) सोपे या उद्देश्या साठी शास्त्रार्थ करावा बरे परधर्मीयांवरील अन्यायाचे क्लेषही नाही स्वधर्मीयांवरील मानसिक क्लेष दूर करताना लाज कसली वाटते ? आपल्यांना आपलेसे करुन ठेवावे हा साधा कॉमन सेन्स नको ?
आ.ह. साळूंखे यांच्याकडून टिका वाढली दुसर्या धर्माचा विचार झाला , खेडेकर बरळले हे सर्व नंतर झाले , आधी शंकराचार्यांनी एका पिएच डीच नव्हे हिंदू संस्कृतीबद्दल विसृत लेखन करणार्या विद्वानाला केवळ आणि केवळ जन्माच्या आधारावरुन शास्त्रर्थ नाकारला हा त्यांचा सर्वात मोठा राग आहे , जर शंकराचार्यांसारख्यांना आपले जन्माधारीत अंहकार दूर ठेवून - आणि षडरिऊंपासून दूर रहाणे हा हिंदू धर्माचा आदर्ष धर्मगुरूंनी पाळावयास नको - शंकराचार्यांना इगो असू शकतो, साळूंखेंनी साधा रिस्पेक्ट केले जाण्या एवढा स्वाभिमान बाळगला तर बोचावे असे काय आहे ?
8 May 2018 - 10:08 pm | आनन्दा
यावर जास्त चर्चा करायची इच्छा नाही, कारण माझा तेव्हढा अधिकार नाही. पण
सळुन्ख्यांपेक्षा अधिक बोचरी टीका कदाचित आम्बेडकरांनीआकेली आहे, पण त्यांना चूक ठरवण्याचा, किंवा कद्दचित ते शास्त्रार्थ करावयास आले तर शंकराचार्य नाही, पण मी तरी नक्कीच केला असता.
तुम्ही कोणत्या हेतूने बोलताय यावर बर्यच गोष्ती अवलंबून असतात. मी एका मुस्लिम मुलाशी पण शास्त्रार्थ केला आहे पूर्वी. पण त्याचे खरे स्वरूप कळल्यावर या नादाला लागायचे नाही असे ठरवून टाकले.
असो.
8 May 2018 - 5:11 pm | माहितगार
मी खाली मार्कस यांना प्रतिसादात लिहिले आहेत्यास जरासे वाढवून
सनातनता असो अथवा इंटरप्रीटेशन असो आपला किंवा इतर कुणाचा त्यावर एकाधिकार निश्चित नसावा.
बेसिकली हिंदू धर्म म्हणजे विषमतावादी साणि समान संधी नाकारणारे दाखवतील तो आणी तसाच आहे हि भूमिका पोकळ आणि भंपक आहे.
तसे पहाता फक्त ईश्वर चिरंतन आहे तर तोच तेवढा सनातन असू शकतो बाकी कुणी नाही ,-त्यामुळे कुणाही शंकराचार्य अथवा धर्ममार्तंडांची सनातनतेवर ईस्वरापेक्षा अधिक अधिकार असू शकत नाही- आणि ईश्वर हि न्याय्य आणि आदर्श एंटीटी असेल तर विषमतेचे समर्थन करणार नाही आणि समान संधीही नाकारणार नाही . त्यामुळे समान संधी देणारा आणि विषमतेचे समर्थन न करणारा हिंदू धर्म आणि असा हिंदू धर्मीय केवळ सनातनतेच्या जवळ जाउ शकतो , आणि तुमचे धर्मगुरु (मग त्यात सर्वधर्म आले) सर्वांना समदृष्टीने लेखणारा आणि समान संधी देणारा ईश्वर नाकारु इच्छित असतील तर त्यांना सम दृष्टी ईस्वराच्या नावाने प्रतिनिधीत्व करण्याचे कॉनतेही नैतिक अधिष्ठान शिल्लक रहात नाही त्यामूळे त्यांनी आपापली आसने लवकरात लवकर खाली करुन समान संधीसाठी उपलब्ध ठेवणे श्रेयस असावे .
4 May 2018 - 10:02 pm | रमेश आठवले
संघ गेली काही दशके वनवासी कल्याण आश्रम , एकल विद्यालय अशा संस्था चालवत आहे आणि त्या मुख्यत्वे दलित व पीडित समाजामध्ये कार्यरत आहेत . हे काम कोणत्याही राजकीय दबावा पोटी सुरु करण्यात आले असे म्हणायला काही पुरावा दिसत नाही.
उदधृत ----कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते---
5 May 2018 - 4:08 am | साहना
जातीय तेढ कमी करण्यात संघाचा आधीपासून सिंहाचा वाटा आहे. पण संघाचे दिवस आता भरले आहेत आणि त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणे रास्त नाही.
5 May 2018 - 8:10 am | आनन्दा
खरे आहे. भाजपा सत्तेत आल्यापसून जे अनेक राजकीय लोक आपला अजेंडा घेऊन संघात घुसले आहेत त्यामुळे संघ पण लवकरच विसर्जित होइल की काय अशी भीती वाटू लागली आहे. पण अजून २० वर्षे काळजी नाही, जोपर्यंत आत्ताची पिढी कार्यरत आहे.
5 May 2018 - 2:00 pm | माहितगार
लोकसत्ताने उपरोक्त शीर्षकासहीत एक व्हिडीओ दिला आहे . मी व्हिडीओ बघीतला नाही. तो इतरांनी पाहून खात्री करावी. पण इथे स्वतः मोहन भागवत सरसंघचालक पदावर समान संधी बाबत बोलताहेत. मिपा सनातनी अर्थात समान संधीचे तत्व त्यांना अद्याप मान्य नसावे, रुचणे दुरची गोष्ट असावी.
मोहन भागवत जीं मधला समाज सुधारक त्यांच्या अनुयायांनी स्विकारण्यास अध्याप बराच अवकाश असावा .
5 May 2018 - 2:01 pm | माहितगार
अरे दुवा राहीलाच की
5 May 2018 - 7:53 pm | पुष्कर जोशी
जात
10 सप्टेंबर 2016 · सार्वजनिक
36 वाचने
आज पोस्त वर उत्तर देता देता एक सुंदर पोस्ट तयार झाली ..
Main target must be convert VS into AND
जात = Group = गट = संघ = महासंघ हे समाजात राहणारच ते कधीच संपणार नाहीत आणि ते व्यावहारिक पण नाही... फक्त त्यांचे स्वरूप बदलत जाणार...
जसे जसे छोट्या गावाकडून तुम्ही मोठ्या शहराकडे जाल तसे तसे बदललेले स्वरूप तुम्हाला जाणवेल ...
गावात तुम्हाला ब्राह्मण गल्ली दिसेल तर मुंबई मध्ये तुम्हाला दिसणार नाही
मुंबई मध्ये तुम्हाला नेवी नगर दिसेल किवा आरे / LIC कॉलोनी दिसेल ...
जसा जसा काळ पुढे पुढे सरकत जाईल तसा तसा हा बदल होत जाणार
गावात तुम्हाला
ब्राह्मण VS मराठा
तालुक्याला
हिंदू VS मुस्लीम
शहरात तुम्हाला
मुंबईकर VS घाटी, Engineer VS B.com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
असा जातीयवाद = Groupism
नक्की दिसेल ..
आपण groupism संपवू शकत नाही तो कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच !!
आपण फक्त VS ला AND मध्ये बदलू शकतो
ब्राह्मण VS मराठा, हिंदू VS मुस्लीम, मुंबईकर VS घाटी, Engineer VS B.com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
ला ब्राह्मण AND मराठा, हिंदू AND मुस्लीम, मुंबईकर AND घाटी, Engineer AND B.com, मराठी AND गुजराथी , शाकाहारी AND मांसाहारी
असे बदलू शकतो ..
विचार करा .. Indian Medical Association किंवा Institute of Engineer's किंवा कालां घोडा students association याना आपण group वादी (जातीय वादी) म्हणालो तर कसे होईल ..
जात / group / संघटना नष्ट करा म्हणालो तर कसे होईल ?
समाजात Indian medical association हे राहणारच त्याचे महत्व आहेच .. पण तुम्ही त्यास Institute of Engineer's मध्ये merge करा असे म्हटले तर चालेल का ?
प्रत्येक संस्था प्रत्येक जात प्रत्येक संघटना प्रत्येक गट (group) याचे समाजात काही न काही तरी योदादन असतेच ते आपण नाकारू शकत नाही ..
गरज आहे तर फक्त VS ला AND मध्ये बदलण्याची !!
- पुष्कर हेमंत जोशी
5 May 2018 - 10:17 pm | अभ्या..
अरे वा, परफेकट व्हाटसप पोस्ट.
फिरू द्या जोमाने.
6 May 2018 - 11:02 am | माहितगार
इथे प्रत्यक्ष अथवा आडून समान संधी आणि विषमता निर्मूलनास विविध प्रकारच्या युक्तिवादातून विरोध नोंदवणार्या विविध प्रतिसादकांच्या नजरेतून काही गोष्टी निसटताहेत
अजूनही काही क्षेत्रात जन्माधारित विषमता आहेत आणि काही क्षेत्रात समान संधी नाकारल्या जाताहेत आणि / किंवा काही समूहांना भूतकाळात जन्माधारित विषमता आणि शोषणा मुळे समस्यांना सामोरे जाऊन जे मानसिक वेदनाकोष आहेत त्यांच्याकडे प्रतिसादकांचे दुर्लक्ष होत असावे .
दुसऱ्या धर्माने आमच्या धर्मावर केलेल्या अन्यायाच्या वेदनांचे कोष जपायचे, पण धर्मान्तर्गत तयार झालेल्या वेदनाकोषांचे अस्तित्व नाकारायचे असा दुटप्पी पणा स्वतः:चा स्वतः; ला दिसणे जरासे कठीण असते.
वेदनाकोष असलेल्यांचे शत्रूचा शत्रू आपला मित्र या धर्तीवर जे राजकारण होते , त्याच्याही आपल्याला वेदना होतात - हा आपला हुच्च वेदनाकोष असतो ; कारण तुमच्या धर्मान्तर्गत जे लोक तुम्हाला शत्रुवत वाटतं नाहीत ते जाऊन तुमच्या शत्रूशी राजकीय गणितात हातमिळवणी करतात. आता या वेदनांपासून सोडवणूक करण्यासाठी तुम्ही एका नेतृत्व पुढे करता / निवडून देता . कोणत्याही शहाण्या नेतृत्वाला किमान सत्तेत पोहोचताना अथवा सत्तेत गेल्या नंतर सत्ता हस्तगत करणे आणि टिकवणे आणि परधर्मीय शत्रूस राजकीय खिंडीत गाठण्यासाठी आपल्या आतल्यांना आधी आपल्याकडे वळवणे गरजेचे आहे . त्यासाठी आपल्यालातल्याच दुखावल्या गेलेल्यांच्या वेदनाकोषाचे विश्वासार्ह शमन करणे गरजेचे आहे . आणि यासाठी आपल्याच कार्यकर्त्या आणि अनुयायांच्या वर्तनात बदलाची गरज लक्षात येते.
पण त्रांगडे असे आहे कि यांना नेतृत्वात पाठवणाऱ्यांच्या अनुयायांना आपल्या अंतर्गत लोकांचे काही वेदनाकोष आहेत त्याचे विश्वासार्हपणे शमन होणे गरजेचे आहे हे लक्षातच येत नाही; आणि ते आपल्या नेतृत्वाची साथ देतच नाहीत उलट त्यांनाच दूषणे देतात आणि वेगळे पाडतात , यातून शेखचिल्ली गिरीपलीकडे आपल्याच नेतृत्वास कमकुवत करण्यापलिकडे हाती काही लागत नसावे :) . पण त्यांचे जे समजदार नेतृत्व आहे तेच त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असमंजसपणा आणि आडमुठेपणाने हतबल होताना दिसते अशी हि गमंत आहे .
6 May 2018 - 11:11 am | माहितगार
आमचे, आपले , तुम्ही , तुमचे हि विशेषणे व्यक्तिग्त रित्या घेऊ नयेत हि विनंती
6 May 2018 - 11:17 am | माहितगार
येथील काही प्रतिसादकांच्या हिशेबी आदिवासी आणि दलित एकच असावेत , त्यांच्या समस्या आणि वेदनाकोष एकसारखे असावेत कि काय अशी शंका वाटते . त्यातील एका घटकासाठी काम केले कि आपण आपोआप दुसऱ्या घटका पर्यंत पोहोचतो असा समज आहे का काय अशीही शंका वाटते . आणि वेदनाकोष असलेल्या नाराजांच्या वेदनांशी सोयरसुतक दिसत नाही.
6 May 2018 - 11:40 am | माहितगार
आता एका प्रतिसादक आहेत , ज्यांना अंतर्गत लोकांचा वेदनाकोष मान्य आहे पण त्याची सोडवणूक एकत्र कुटुंबात करत बसण्या पेक्षा वेगळ्या कुटुंबात जा असे सुचवताहेत , पण वेगळ्या कुटुंबात गेल्याने मनावर नवे ओरखडे नव्या जखमा कदाचित लगेच होणार नाहीत ,-पण आधीच्या जुन्या वेदनाकोषाचे काय आणि ज्यांना एकत्र कुटुंब सोडायचे नाही त्यांचे काय ?
शेवटी तुमचा तुमच्या एकत्र कुटुंबावरही काही भावनिक अधिकार भावनिक नाते असते कि नाही ?
अगदी पाकिस्तानातील शिल्लक हिंदूंचे -एखादा दोन टक्के जे काही आहे -उदाहरण घेतले तर , उच्चवर्णीय हिंदूंनी तो देश जवळपास केव्हाच सोडलाय , शिल्लक असलेले दलित असूनही आणि हिंदू धर्म सोडण्यासाठी प्रलोभने दबाव कारणे सर्वकाही असूनही त्यांनी धर्म त्यागलेला नाही कारण त्यांनी परंपरेने अंगिकारलेली जीवन पद्धती आहे . आमच्या धर्मात राहायचे तर जन्माधारित विषमता सहन करा अन्यथा एका अमुक धर्मात जा , या भूमिकेस काय म्हणावे ? हिंदू धर्म उत्क्रान्त झालेला धर्म आहे तो काही केवळ विषमता पाळणाऱ्यानी तयार केलेला नाही , उलटपक्षी विषमता घुसवणारे उपरे आहेत आणि उपऱयांच्या सांगण्याखातर आपली परंपरेने विकसित जीवन पद्धती कुणी का सोडावी उलट समान संधी नाकारणार्यांना विषमता पाळणाऱयांना त्यांचे वर्तन बदला नाही तर तुम्ही वेगळ्या धर्मात जा -आपली स्वतः:ची चुक नसताना घराच्या बाहेर पडून एबीसीडी पासून नवी सुरवात का म्हणून करावी - आम्ही आमचा हिंदू धर्म समान संधी आणि विषमता निर्मूलन करून पुढे जातो असे का म्हणू नये ?
6 May 2018 - 8:11 pm | प्रसाद गोडबोले
हा हा , माहीतगार , आयेम अ प्रॉब्लेम सॉल्वहर , नॉट प्रॉब्लेम एक्सप्लेनर !
ब्राह्मणेतरांनी धर्मांतर करुन अन्य धर्मात जाणे , किंवा नवीन धर्म स्थापन करणे हे साधे सोप्पे सोलुशन आहे !
एकत्र राहुन वाद घालत बसण्या पेक्क्षा स्वतंत्र सुखासमाधाने जगण्यात काय हरकत आहे !
एक सनातनी हिंदु म्हणुन मला माझ्या संमृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे , आता ज्यांना मुळापासुन सारेच हिंदु संस्कार, परंपरा शोषक वाटतात त्यांना हिंदु धर्मात रहाण्याची सक्ती नकोच . रादर दुसर्या धर्मात जावा , त्या परंपरांचा अभिमान बाळगा , त्यांचे पाईक व्हा हाच आग्रह आहे !
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पहा उदा. I shall not perform Shraddha nor shall I give pind. किंव्वा I shall not allow any ceremonies to be performed by Brahmins. किंवा I shall not take intoxicants like liquor, drugs, etc. ,
कोणत्याही हिंदुला ह्या प्रतिज्ञा पटत असतील तर त्याने बौध धर्मात जावे हे उत्तम ! त्याच्या साठी आणि उर्वरीत हिंदु समाजासाठी देखील !
एकत्र राहुन वादावादी करत बसायला काय अर्थ आहे ?
6 May 2018 - 8:37 pm | माहितगार
सनातना असो अथवा इंटरप्रीटेशन असो आपला किंवा इतर कुणाचा त्यावर एकाधिकार निश्चित नसावा.
बेसिकली हिंदू धर्म म्हणजे विषमतावादी साणि समान संधी नाकारणारे दाखवतील तो आणी तसाच आहे हि भूमिका पोकळ आणि भंपक आहे.
तसे पहाता फक्त ईश्वर चिरंतन आहे तर तोच तेवढा सनातन असू शकतो बाकी कुणी नाही , आणि ईश्वर हि न्याय्य आणि आदर्श एंटीटी असेल तर विषमतेचे समर्थन करणार नाही आणि समान संधीही नाकारणार नाही . त्यामुळे समान संधी देणारा आणि विषमतेचे समर्थन न करणारा हिंदू धर्म आणि असा हिंदू धर्मीय केवळ सनातनतेच्या जवळ जाउ शकतो
हे आपल्या मनातले वाक्य दुसर्यांच्या तोंडात टाकणे असू शकते . आणि तेही जन्माधारीत विषमतेचे आणि समान संधी नाकारण्याचा हा एक नविन बहाणा किंवा पवित्रा नाही किंवा कसे ? म्हणजे जे अयोग्य प्रथांबद्दल आवाज करतात त्यांना आपण बाहेर चा रस्ता दाखवला की आवाज न करणार्यांच्या बाहेर न पडणार्यांच्या समान संधी नाकारण्यास आपण मोक्ळे .
मी वर सनातनतेची नवी व्याख्या उपलब्ध केली आहे त्या नुसार समान संधी नाकारणार्यांनी आणि विषमतेचे समर्थन करणार्यांनी आनंदाने हिंदू धर्माचा त्याग करावा . समान संधी आणि विषमता नाकारणार्यांनी हिंदू धर्मात फूकाचा वाद घालत बसण्या पेक्षा हिंदू धर्म सोडून हवे तेथे आनंदाने जावे. अशा कोणत्याही प्रवासास लाख लाख शुभेच्छा ;)
6 May 2018 - 9:23 pm | प्रसाद गोडबोले
खुद्द बाबासाहेबांनीच दिलेल्या २२ प्रतिज्ञात म्हणले आहे
I renounce Hinduism which is harmful for humanity and impedes the advancement and development of humanity because it is based on inequality, and adopt Buddhism as my religion.
आता ह्या उपर हिंदु धर्मात सुधारणा घडवुन आणणे आणि हिंदुधर्म समानतावादी आहे असे लोकांना कन्विन्स करणे तुम्हाला शक्य वाटत असेल तर तुमच्या आशावादाला आमचा सलाम !
=))))
6 May 2018 - 10:19 pm | माहितगार
सावरकर म्हणाले म्हणून मी शब्द पूजक नाही आणि आंबेडकर म्हणाले म्हणून मी व्यक्ती पूजक नाही आणि त्या विषयावरच्या निसटत्या बाजू डिटेल मध्ये केव्हातरी; बाकी बाबासाहेबांचा सहभाग असलेल्या घटनेने प्रत्येक सेकंदाला वेगवेगळ्या धर्मात प्रवास करण्याचा आधीकार दिला आहे आणि समानतेचे तत्व राज्यघटनेत ओव्हर आर्कींग आहे त्यामुळे आहे त्या धर्मात किंवा दर सेकंदाला धर्म बदलून त्या त्या धर्मात समता आणि विषमता निर्मूलनाची मागणी करणे आमचा आणि तुमचाही घटनादत्त आधीकार असताना आणि प्रत्येक धर्मीयाला या किंवा त्या निसटत्या बाजू नजरेत आणण्याचे सामर्थ्य असताना, धर्म बदलण्याचे सल्ले देण्या पेक्षा जे आहे त्यातील खळांची व्यंकटी सांडवून प्रत्येक पदरी पसायदान पोहोचवण्याचा आशावाद आत्मविश्वासा सोबत असल्याने आपल्या शुभेच्छांचे सहर्ष स्वागत आणि अनेक आभार.
2 Oct 2018 - 1:40 pm | माहितगार
केरळातील पौरोहीत्य व्यवसायातून जन्माने ब्राह्मण कमी होत आहेत तर ब्राह्मणेतरांचा सहभाग वाढत असल्याची, या व्यवसायातील जन्माधारीत विषमता दूर होत असल्याची १ , २ हि दोन वृत्ते आश्वासक वाटतात. ( सामाजिक बदल आहे, यात राजकारणाचा संबंध नसावा )