सध्या कुठले पुस्तक वाचत आहात?

बार्नी's picture
बार्नी in जनातलं, मनातलं
26 Mar 2018 - 12:32 am

मी सध्या वाचत असलेली पुस्तके
1)Why Nations Fail: The Origins of Power, Prosperity and Poverty

जगात आर्थिक विषमता का आहे? काही राष्ट्रे अत्यंत सुखी तर कांही राष्ट्रे गरीब का राहिली? इ. प्रश्नांचा मागोवा घेणारे हे भन्नाट व सखोल पुस्तक .

2) Fooled by Randomness: The Hidden Role of Chance in Life and in the Markets

नसीम तालेब चे जीवनात Luck आणि randomness चे महत्त्व पटवून सांगणारे अफलातून पुस्तक. जरूर वाचा.

३) A Fine Balance

वेगवेगळ्या स्तरातील चार लोकांची आणीबाणी दरम्यानची ही कथा . शेवटी शेवटी तर वाचवेना पण पुस्तक हातातून सोडू पण वाटेना असली ह्रिदय पिळवटून टाकणारी कहाणी.
कमजोर दिल्वाल्यानी ह्या पुस्तकापासुन दूर राहावे.

तुम्ही वाचत असलेली पुस्तके सुचवा . चांगली लांबलचक लिस्ट बनू दे.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

मागे अशा एका धाग्यावर भरपूर चर्चा झाली होती. कुणाला आठवत असल्यास येथे लिंक द्यावी.

दीपक११७७'s picture

26 Mar 2018 - 1:59 pm | दीपक११७७
बार्नी's picture

26 Mar 2018 - 6:44 pm | बार्नी

जबराट धागा . धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2018 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली

सध्या नर्मदे हर हर वाचतोय.

मारवा's picture

26 Mar 2018 - 5:44 pm | मारवा

युवाल हरारी यांचे Sapiens: A Brief History of Humankind हे विलक्षण पुस्तक वाचत आहे.
अत्यंत थरारक रोचक रीत्या मानवाचा इतिहास उलगडुन दाखवणारं पुस्तक आहे. पुस्तकाची भाषा फारच सहज व प्रवाही अशी आहे.
पुर्ण वाचुन झाल्यानंतर याच लेखकाचं
Homo Deus: A Brief History of Tomorrow हे पुस्तक वाचण्याचा मनोदय आहे.

सतिश गावडे's picture

26 Mar 2018 - 9:27 pm | सतिश गावडे

Sapiens: A Brief History of Humankind हे पुस्तक संपेपर्यंत खाली ठेवावेसे वाटत नव्हते.

पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आहे.

Gary Taubes या लेखकाचे Good Calories, Bad Calories: Fats, Carbs, and the Controversial Science of Diet and Health हे पुस्तक आहार फॅट वजन इं विषयी चे आजपर्यंतचे अनेक संपुर्ण पारंपारीक दृष्टीकोण विचार यांना मुळापासुन हादरवणारे, कमालीच्या सखोल संशोधनाने परीश्रमाने मांडलेला यातील आहार विचार फारच वाचनीय आहे. अर्थातच हे नॉर्मल डाएट पुस्तकांसारख सोप वा वाचनीय त्या अर्थाने नाहीच. म्हणजे तसे काही हवे असल्यास याच्या वाटेला जाऊ नये.
याच लेखकाचे दुसरी दोन पुस्तके तुलनेने सोपी आहेत म्हणुन माझे व्यक्तीगत मत सुरुवात अगोदर खालील दोन पुस्तकांनी करुन मग वरील पुस्तक घ्यावे
१- Why We Get Fat: And What to Do About It
२-The Case Against Sugar Paperback
या लेखकाचा हा गाजलेला लेख इथे वाचता येइल
https://www.nytimes.com/2002/07/07/magazine/what-if-it-s-all-been-a-big-...

पगला गजोधर's picture

26 Mar 2018 - 7:20 pm | पगला गजोधर

वोल्गा ते गंगा

लेखक: राहुल सांकृत्यायन

राहुल सांकृत्यायन मानव समाजाचा इतिहास व तो ही कलात्मक फिक्शन च्या प्रभावी वापर करुन मांडतात तेव्हा त्यांच्यातल्या संशोधक व साहित्यीक या संगमाचं अप्रुप वाटत. त्यातली भाषा पात्रांची नावे देखील त्यांनी मोठ्या कल्पकतेने वापरलेली आहेत.
पण एक आहे की आज जे अद्य्यावत नविन माहीती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे राहुल यांचे पुस्तक मागे पडते.

ते वाचले नसल्यास जरुर वाचा फार सुंदर आहे आणि त्यात अपडेट चा प्रॉब्लेम पण नाही.
नेटवर ते पीडीएफ उपलब्ध आहे.

पगला गजोधर's picture

26 Mar 2018 - 9:33 pm | पगला गजोधर

नक्कीच, धन्यवाद !

सतिश गावडे's picture

26 Mar 2018 - 9:33 pm | सतिश गावडे

2) Fooled by Randomness: The Hidden Role of Chance in Life and in the Markets

नसीम तालेब चे जीवनात Luck आणि randomness चे महत्त्व पटवून सांगणारे अफलातून पुस्तक. जरूर वाचा.

भारी पुस्तक आहे हे.

याच विषयावरील अजून उत्तम पुस्तकं:
The Drunkard's Walk: How Randomness Rules Our Lives
Freakonomics
Predictably Irrational

शेवटचे पुस्तक Predictably Irrational आवर्जून वाचण्यासारखे आहे.

दीपक११७७'s picture

27 Mar 2018 - 1:06 pm | दीपक११७७

याचे मराठी अनुवाद आहेत का?
Fooled by Randomness: The Hidden Role of Chance in Life and in the Markets हे पुस्तक वाचतांना संदर्भाचे लवकर आकलन होत नव्हते.

इरसाल's picture

27 Mar 2018 - 2:19 pm | इरसाल

"राजकीय हत्या" म्हणुन पुस्तक वाचतोय, आवाका मोठा आहे म्हणजे भारत तसेच भारताबाहेरील महत्वाच्या व्यक्तींच्या हत्या कशा आणी का झाल्यात त्यामागचा धांडोळा विषद करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सर्वसामान्य माणुस विचार करु शकत नाही अश्या काही बाबी त्यातुन माहित पडत आहेत. :))

जेम्स वांड's picture

27 Mar 2018 - 3:51 pm | जेम्स वांड

जॉर्ज ओरवेलचे ऍनिमल फार्म वाचतोय, तुफान आहे.

ह्या नंतर, लोकमान्यांवरचे दुर्दम्य हाती घेईन बहुदा.

मी सध्या आसाराम लोमटे यांचा २०१६ सालचा साहित्य अकादमी विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचत आहे. लोमटे यांचे लोकसत्तेत धुळपेर हे ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे, शेतकरी-कामकरी यांचे जीवनविश्व रेखाटणारे सुंदर सदर २०१२-१३ मध्ये येत असे. तेव्हापासून त्यांच्या शैलीचा मी फॅन होतो, साहित्य अकादमी मिळाल्याने मुस्तकाविषयी उत्कंठा वाटली आणी वाचायला सुरूवात केली.
लोमटे यांची कथा ग्रामीण पार्श्वभुमीवरची आहे, मात्र ग्रामिण कथांचा जो ढाचा ठरून गेला आहे त्याला पुर्णत: छेद देऊन जाणारी त्यांची कथा आहे. मुलतः ग्रामीण भागातील लोक, त्यांच्यातील ताणेबाणे, कुटुंबव्यवस्था, समाज, जातवास्तव, शेतीचे प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, ग्रामीण भागात उगवलेली नवीन भ्रष्ट राजकिय व्यवस्था, अर्धवट आधुनिकिकरणाने निर्माण केलेल्या समस्या, श्रमीकांच्या शोषणाचे निरनिराळे पदर अशा अनेक विषयांवर समग्रपणे भिडणारी त्यांची कथा आहे. काळीज पिळवटून टाकणारे वास्तव मांडताना सुद्धा वास्तवाशी दोन हात करणार्‍यांचा दुर्दम्य आशावाद लखलखीतपणे 'आलोक' मधून सामोरा येतो. ग्रामीण कथांच्या नावाखाली इरसालपणाच्या किश्श्यांचा फड जमवणारी लोमटेंची कथा नाही तर सतत कात टाकणार्‍या गावगाड्याच्या पुढे असणार्‍या सनातन प्रश्नांचा वेध घेणारी आहे. शोषीतांविषयी असणार्‍या करूणेची ओल कुठेच आटू न देता वास्तवाचे भान वाचकाला देण्यात लेखक पूर्ण यशस्वी झाला आहे.

कुमार१'s picture

27 Mar 2018 - 6:38 pm | कुमार१

चांगला पुस्तक परिचय.

तेजस आठवले's picture

2 Apr 2018 - 7:11 pm | तेजस आठवले

ह. मो. मराठ्यांची कुठली पुस्तके सुचवाल ? बालकांड, पोहरा /निष्पर्ण वृक्षाखाली ? एखादे विकत घ्यायचा विचार करतोय वाढदिवसानिमित्त.
कोणी थोडक्यात माहिती देऊ शकेल का...

'निष्पर्ण वृक्षाखाली', युद्ध आणि काळेशार पाणी ही मस्त आहेत