नमस्कार मिपाकर मंडळी,
मी आलमगीर (प्रणव जोशी). खरा सांगायचं तर हा माझा तिसरा मिपा आयडी आहे. आधीचे दोन्ही आयडी ( औरंगजेब आणि प्रणव जोशी) हे पासवर्ड विसरल्यामुळे मला बंद करावे लागले.
म्हणून आता हा तिसरा आयडी. ( हा डू-आयडी नाही ना म्हणता येणार?) पुढचे काही दिवस मी माझे जुनेच लेख ह्या आयडी वर पुनर्लेखन करून लिहिणार आहे. त्यानंतर पुढची कथा मालिका चालू होईल
आशा आहे कि आपण सर्व माझ्या लेखांवर प्रतिक्रिया द्याल. धन्यवाद
आपला ,
प्रणव जोशी
प्रतिक्रिया
20 Feb 2018 - 8:18 pm | Ranapratap
स्वागत आहे
20 Feb 2018 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता, प्रवासवर्णन, पाककृती, व्यक्तीचित्र, काही वेगळे, हटके अगदी आजीबाईचा बटवा, वगैरे असं काही तरी लिहा भो....!
काथ्याकुटांनी आणि त्या मेरे सवासो करोड भाई और बहनोच्या नावाने जयघोष करणार्या समर्थकांनी नुसता वात आणला आहे.
शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
21 Feb 2018 - 10:03 am | आलमगिर
जरा वेगळ्या विषयावर लेख लिहिला आहे नक्की वाचा
प्रणव जोशी
21 Feb 2018 - 1:03 pm | बिटाकाका
वेलकम बॅक!
----------------------------------
तुम्ही नेहमीच वेगळे लिहिता, तुम्ही आधी लिहिले तसेच लिहा! जिथे तिथे राजकारण आणून पिंका टाकणार्यांनी डोके भंजाळून सोडले आहे.
----------------------------------
इथे हि पिंक टाकायची इच्छा नव्हती, पण काय करणार!
21 Feb 2018 - 1:12 pm | चांदणे संदीप
आता कृपया तिसऱ्या आयडीचा पासवर्ड विसरून चौथा आयडी आमच्या पाचवीला पुजू नका! (कृ.ह.घे.)
:)
Sandy
23 Feb 2018 - 5:18 pm | चौथा कोनाडा
फरगॉट पासवर्ड हा पर्याय वापरून जुने खाते कार्यान्वित करता आले नाही का ?
(शंका अस्थानी असल्यास क्षमस्व !)
23 Feb 2018 - 5:21 pm | प्रचेतस
किंवा प्रशांत किंवा नीलकांत ह्यांना व्यनि करूनही नवा पासवर्ड मिळवता आला असता.
23 Feb 2018 - 5:51 pm | प्रचेतस
अर्थात इतर कुणा ओळखीच्या मिपाकराकरवी.
24 Feb 2018 - 5:20 pm | चौथा कोनाडा
बरोबर.
आणि लॉगिन करताना "नविन संकेताक्षर बोलवा " हा पर्याय आहेच ना !
( हा पर्याय काम करत नाहीय/नसावा का ? )
24 Feb 2018 - 12:40 am | अमरेंद्र बाहुबली
आलमगीर, औरंगजेब, ,बरच प्रेम दिसतंय ह्या नावांवर काही विशेष कारण??