किक भाग २...नुन - कुन चे साम्राज्य...
रंगदुम हे काही नकाशातले ठळक ठिकाण नाही, असायचे कारणही नाही. मग एक जुनाट डाक बंगला, एक लहानसे गेस्ट हाऊस आणि पाच-पन्नास घरटी असलेल्या या आडबाजूच्या ठिकाणी सुखासीन जीव आणायचाच कशाला?
पुण्यातल्या एखाद्या प्रथितयश डायनिंग हॉल (किंवा खाणावळ म्हणा हवं तर)मध्ये जाऊन जेवताना जो फील येतो तसाच एखाद्या नावाजलेल्या पर्यंटनस्थळी येतो. पुढ्यात वीस-पंचवीस पदार्थ मोठ्या निगुतिने मांडून ठेवलेले असतात पण एवढ्या गजबजाटात धड एकाचाही पुरेपूर आस्वाद घेता येत नाही. ताटभर जेवूनही पोटभर जेवल्याचं समाधान काही मिळत नाही आणि शिवाय कुण्याच्यातरी लग्नाच्या पंगतीत (पैसे देऊन) जेऊन आलो असा विचारही डोकावून जातो. याउलट कधी साधी पण चविष्ट भाजी भाकरी जठराग्नीत स्वाहा करताना देखील ते “उदरभरण” न वाटता “यज्ञकर्म” वाटू लागते. पावसाळ्यातल्या एखाद्या दुपारी सिंहगडावर हा यज्ञ चालू असेल तर मग विचारायलाच नको.
रंगदुम-पदुम प्रवास हा असाच आहे. इथे काही नावाजलेली भारंभार ठिकाणं नाहीत, दोन-पाच प्राणी आणि काही पक्षी सोडल्यास फारशी जीवसृष्टी नाही, इतकंच काय तर सामान्य पर्यटकांच्या पसंतीस उतरतील असे खारडुंग-ला किंवा पॅंगॉन्ग त्सो सारखे सेलिब्रिटी स्पॉट्स पण नाहीत. आहे तो अतिशय रांगडा हिमालय. साधेच पण पोट भरून जेऊ घालणारा आणि सरतेशेवटी तृप्त करणारा. इथे याच्या पंगतीला मांडीला मांडी लावून बसायचे म्हणजे मधूनच चवीला "ठेचा" खायची तयारी हवी. क्षणभर नाकातोंडातून धूर येतो खरा पण त्यातूनच तर खरी किक मिळते.
शुभ्र पर्वतांच्या पार्श्वभूमीवर बर्फाची हलकीशी साय धरलेला आणि क्षणभर कष्टांचा विसर पाडणारा लँग-त्सो
संपूर्ण परिसरावर प्रभुत्व सांगणारी ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी आणि तिच्यापुढे मान तुकवून जाणारा चिंचोळा रस्ता
झंस्कार खोरे…. अर्थात झंस्कार नदी पदुम-मध्ये उगम पावते. इथून जी दिसते ती स्टोड नदी.
अशा आडवाटांवर असताना भरवसा ठेवावा अशी एकमेव .... रॉली !!!
झंस्कारचा बालेकिल्ला .... पदुम
स्टोन्गडे गोम्पामधून दिसणारा साराप-स्टोड नद्यांचा संगम. हीच झंस्कार नदी, जी पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते.
थोड्या आडवाटेवरची झोन्गकुल गोम्पा
……………………………………………………
……………………………………………………
…………………………………………………… इति....
प्रतिक्रिया
29 Dec 2017 - 9:17 pm | अभिजीत अवलिया
अप्रतिम. हा भाग आहेच माझ्या फिरायच्या लिस्ट मधे. बघू कधी जमतेय.
30 Dec 2017 - 12:38 am | एस
वॉव...! बकेट लिष्टात ऍडवले गेले आहे! :-)
30 Dec 2017 - 12:53 am | राघव
अ प्र ती म!!!
तू का त्या हिमालयापायी वेडा झाला आहेस, ते हे चित्र आणि लेखन बघून कळतं!! ठार वेडा म्हण हवं तर :)
एक तर मला तुझ्यासारखं मन मानेल तसं भटकता येत नाही.
त्यात ही असली कहर चित्रं पाहून माझी नजर पार खराब झालीये.. बाकी सोड, स्वतःच्या नजरेनं हा निसर्ग बघण्यासाठी खास प्रयत्न करायला लागणार अशानं..!! लेखनही सुंदर!
म्हाराजा, मनस्वी सफरीसाठी एक गळाभेट स्वीकारावी!!! :)
1 Jan 2018 - 8:48 pm | किल्लेदार
स्वीकारली :) :) :)
30 Dec 2017 - 7:22 am | पाटीलभाऊ
निव्वळ अप्रतिम...एक से एक फोटू आहेत
30 Dec 2017 - 7:45 am | पाटीलभाऊ
निव्वळ अप्रतिम...एक से एक फोटू आहेत
30 Dec 2017 - 12:28 pm | सिरुसेरि
अफलातुन फोटो
30 Dec 2017 - 12:40 pm | दुर्गविहारी
जबरदस्त फोटो!!! पण वर्णन त्या मानाने कमी वाटले. थोडे किस्से आले असते तर अजुन मजा आली असती वाचायला. पण कमालीचे दृष्टीसुख दिलेत त्याबध्दल धन्यवाद.
1 Jan 2018 - 8:47 pm | किल्लेदार
शब्दही गोठतात इथे.... मी तरी काय करणार :)
31 Dec 2017 - 1:56 pm | पद्मावति
अप्रतिम!
4 Jan 2018 - 6:41 pm | सोमनाथ खांदवे
खेळण्या च्या दुकानात हरखुन गेलेल्या लहान मुला सारखी अवस्था झाली फ़ोटो बघताना , राव .
5 Jan 2018 - 12:55 am | किल्लेदार
:)
9 Jan 2018 - 6:06 pm | दिपस्वराज
मला वाटतयं कि हिमालयामध्ये फिरताना रॉलीची निवड करताना अप्रतिम फोटो काढता यावे. सगळ्या बाजूने मोकळीक मिळावी, हवं तिथं थांबता यावं हाही त्याच्यामागे हेतू असावा.(सर्व मोहिमांवरून काढलेला अनुमान... ) कारण चार चाकी मध्ये तेव्हढी मोकळीक मिळत नाही. त्यामुळे फोटोचं अर्धे श्रेय रॅलीचे ...... :)
घोड्यावरून रॉलीवरून चाललेला किल्लेदार ......
10 Jan 2018 - 6:49 am | किल्लेदार
हाहाहा...
एकदम मान्य.... पण रॉली ला या अवघड वाटांवरून न्यायचे श्रेय तरी मला द्याच :)
11 Jan 2018 - 4:11 pm | दिपस्वराज
शंभर टक्के श्रेय तुमचेच. लडाख मध्ये रॉली चालवणे हे सोपे काम नाही.
9 Jan 2018 - 10:20 pm | शलभ
वाह.. अप्रतिम.. _/\_