प्रथितयश दिग्दर्शक रोहित शेट्टी "गोलमाल" सिरीज मधल्या या चौथ्या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत. गोलमाल सिरीज मधील आधीचे तीनही चित्रपट म्हणजे "डोके घरी ठेवा आणि फक्त performances आणि दिग्दर्शन बघा" असा सरळ सरळ हिशेब होता. हा चौथाही त्याला कसा अपवाद राहील ???
गोलमाल सिरीज म्हणजे निर्बुद्ध कथा अन कथानक चांगलं दिग्दर्शन असेल तर तिकीटबारीवर चित्रपट कसा कमाल करू शकतात याचे एक निर्विवाद उदाहरण. कथा हि असते पण जेवताना लोणचं जस असते "तोंडी लावण्यापुरतं" तितक्याच महत्वाची. कथा येथेही आहे, छान भूत वगैरे सुद्धा आहे पण चित्रपट कोठेही भीतीदायक नाही उलट विनोदी आहे. या यशामागे पूर्ण श्रेय हे रोहित शेट्टीचेच.
रोहित शेट्टी आधीच्या तीनही गोलमाल मध्ये शानदार ऍक्शन सिक्वेन्सेस आणि चित्रपट संपतानाच्या श्रेय नामावलीच्या वेळेसचे नवीन प्रयोग यामुळे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडून गेला. शेवटच्या श्रेयनामावलीच्या वेळेस त्याने चित्रपट शूट करताना होणाऱ्या गमतीदार प्रसंगांचे चित्रीकरण करून श्रेयनामावलीच्या काही मिनिटांत प्रेक्षकांना ते दाखवले.चेन्नई एक्स्प्रेस मध्ये त्याने शेवटी बदल करून श्रेयनामावलीच्या वेळेस ते आयटम सॉंग (लुंगी डान्स) वापरलं आणि ते हि हिट झालं. यावेळेस त्याने शेवटी गाणे अन त्याची दृश्यांची पद्धत यांचे मिक्श्चर वापरलं.
अजय देवगण (गोपाल), अर्शद वारसी(माधव), तुषार कपूर (लकी), श्रेयस तळपदे (लक्ष्मण 1), कुणाल खेमू (लक्ष्मण २) मुकेश तिवारी (वसुली भाई), व्रजेश हिरजी (पप्पू) हि सगळी आधीच्याच गोलमालची स्टारकास्ट रोहितने या भागासाठी रिपीट केली आणि या भागात परिणीती चोप्रा (खुषी) निल नितीन मुकेश (निलेश) अन प्रकाश राज (वासू) याना नवीन स्टारकास्ट मध्ये ऍड केलं. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेला कथेच्या लायकीप्रमाणे पुरून उरलेला आहे हे आधीच्या तीनही भागात सिद्ध झालं होतंच. याही वेळेस जुने सगळे जण नवीन ऍडिशन सकट पुरून उरलेत.
गोलमाल सिरीज म्हणजे "सब कुछ रोहित शेट्टी" असा साधा सरळ हिशेब आहे आणि चौथा भागही त्यापासून वेगळा. नाही डोक्याला जास्त शॉट लावून न घेता तीन तास जाऊन मनोरंजन व्हावे इतकी साधी-सरळ अपेक्षा असेल तर गोलमाल अगेन तुमचाच अन कदाचित आवडेलही.
मला रोहित शेट्टी अन त्याचे सगळे प्रयोग आवडतात म्हणून मी गोलमाल अगेन ला साडे तीन (३.5 *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
23 Oct 2017 - 4:37 pm | किसन शिंदे
यात तब्बूचा उल्लेख का नाही केला. आवडत नाही की काय..??
23 Oct 2017 - 4:47 pm | समीर_happy go lucky
राहिली तब्बू !!!!
पण बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद !!!
23 Oct 2017 - 8:52 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्या चौथ्या पार्टल रोहीत शेट्टी "टच" दिसला नाही. आणी सर्व शुटिंग एकाच जागी. मागच्या पार्ट्स ची सर हा भाग पुर्ण करू शकत नाही.
23 Oct 2017 - 11:02 pm | जव्हेरगंज
बकवास वाटला सिनेमा. पहिले तीन त्यामानाने बरे होते.
24 Oct 2017 - 11:46 am | कऊ
३० मिनिटांतच तब्बू आणि परीणितीच्या expression वरून समजून जात सर्व..
24 Oct 2017 - 5:06 pm | मोहनराव
गोलमाल अगेन अजिबात आवडला नाही.
24 Oct 2017 - 7:25 pm | मंदार कात्रे
मला आवडला
मागच्या वेळेपेक्षा यावेळी स्टोरीत जरा तरी जीव आहे
खास "रोशे टच " दिसतोच!