Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
22 Oct 2017 - 1:09 pm

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.misalpav.com/node/41232

'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!!
माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'
गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

Making of photo and status :
समुद्र! नुसतं नांव काढलं तरी मनात गोड खळबळ न माजणारी व्यक्ती निराळीच. आपण पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समुद्राच्या कित्येक सुखद आठवणी आपल्या मनात कोरल्या गेलेल्या असतात. त्या सर्व उचंबळून वर येऊ लागतात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एकामागोमाग येऊन खळकन फुटणाऱ्या लाटा. तो खाऱ्या पाण्याचा अथांग सागर. मनमोहक वाळू आणि शंखशिंपल्यांचा समुद्रकिनारा. किनाऱ्यावरची ओळीने उभी असणारी उंच उंच झाडे. आपल्या सभोवताली घोंगावणारा खारा वारा. लांब दूरवर समुद्राला स्पर्शणारे विस्तीर्ण निळे आकाश. आणि समुद्रात बुडी मारू पहाणारा सुर्यास्ताचा लालबुंद सूर्य. ही सर्व दृश्ये आपल्या मनात रुंजी घालू लागतात. आणि आपसूकच आपली पावले समुद्राकडे धाव घेऊ पहातात. मग कधी मित्रमंडळींबरोबर, तर कधी आपल्या कुटुंबाबरोबर आपण समुदकिनाऱ्याची सहल काढू पहातो.

गोव्याला सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वरील फोटो मीसुद्धा एकेवेळी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्याला समुद्रकिनारी सहलीकरिता गेलेलो असताना काढलेला आहे. आपण समुद्रकिनारी फिरतो आहोत, आणि आपण आपल्या पायाचा पाण्याला स्पर्श करणार नाही, असे होणे नाही. मी आणि मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा पाहून मोहून गेलो होतो. बदलण्यास कपडे आणले नव्हते, निदान गुढघ्याभर पाण्यात तरी जाऊ म्हणून चपला काढून हातात घेतल्या आणि आम्ही तिघे पाण्यात शिरलो.

लाटांचा थंडगार स्पर्श पायांना झाल्याबरोबर अंगात एक गोड शिरशिरी उठली. पाण्याने आमच्या पायांना वेढा टाकला. लाटा पायांना स्पर्शून परत जाताना आमच्या पावलांखालची वाळू सरसर काढून घेत होत्या. त्याने आमच्या पावलांना गोड गुदगुल्या होत होत्या. मागे गेलेल्या लाटा पुन्हा पुन्हा आमच्याकडे झेपावत होत्या. लाटा आणि पायाखाली सरकणार्या वाळूचा हा खेळ निरंतर चालू होता. मायलेकी भावविभोर होऊ लागल्या. आणि आपसूकच त्यांचे मन गाऊ लागले. 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!! माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

सचिन काळे's picture

23 Oct 2017 - 10:16 am | सचिन काळे

@ आवडाबाई, बाजीप्रभू, आनन्दा, सतीश गावडे, दीपक, सिरूसेरी, संग्राम, अमरेंद्र बाहुबली आणि माय फ्रेंड कपिलमुनी या सर्वांना आणि इतर वाचकांनासुद्धा.... मी कालच हा नवीन भाग टाकलाय. आणि मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पहातोय. :वाट पहाणारी बाहुली:

तरीच म्हटलं उचक्या का लागताहेत सकाळ पासनं.. कोण एव्हढा बोंबा मारून राहिलंय म्हणून बघितलं तर इकडे काळेसाहेब आठवण काढून राहिलेत आमची.
वाचलं वाचलं... आणि आवडलं देखील.
पुढल्या मेकिंगसाठी शुभेच्छा...

सचिन काळे's picture

23 Oct 2017 - 12:49 pm | सचिन काळे

@ बाजीप्रभूजी, तरीच म्हटलं उचक्या का लागताहेत सकाळ पासनं.. >>> हा! हा!! हा!!
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!! आपल्याला मेकिंग आवडल्याचं वाचून बरं वाटलं.

शुभेच्छा दिल्याकरिता आपले आभार!!

दीपक११७७'s picture

23 Oct 2017 - 12:05 pm | दीपक११७७

आधिच्या दोन सारखांच हा सुध्दा आहे

सचिन काळे's picture

23 Oct 2017 - 1:30 pm | सचिन काळे

@ दीपक११७७, आधिच्या दोन सारखांच हा सुध्दा आहे >>> प्रतिक्रियेवरून नेमका अर्थबोध होत नाहीए. तरी मी माझ्या सोयीने अर्थ लावतो, की आधीच्या दोन सारखाच हाही चांगला झालाय. धन्यवाद!! :डोळा मारा:

अरे! ते स्मायली कशा टाकायच्या कोणी सांगेल का?

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Oct 2017 - 8:56 pm | अमरेंद्र बाहुबली

हो हो. छान झालाय. आता पुढचा येऊ द्या की ऊद्याच. उत्सुकता ताणवत नाही जास्त.

सचिन काळे's picture

24 Oct 2017 - 7:20 am | सचिन काळे

@ अमरेंद्र बाहुबलीजी, हो हो. छान झालाय. आता पुढचा येऊ द्या की ऊद्याच. >>> आपले फार फार आभार! इंतजारमें जो मजा है, वह और किसीमें कहाँ? संडे टू संडे! :स्मित:

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Oct 2017 - 1:18 pm | अमरेंद्र बाहुबली

अहो काय संडे टू संडे? याला काय अर्थ? रोज टाकायला काय जातंय तुमचं? फारच उत्सुकता ताणवता बुवा तुम्ही.
ते बाजीप्रभू , दिपक साहेब, आवडाबाई, मी , आम्हाला आतुरता तुमच्या पोस्टची. आणी तुम्ही आपलं संडे टू संडे.

आवडाबाई's picture

24 Oct 2017 - 7:21 am | आवडाबाई

कविता जमलिये ( व्याकरणाकडे जर्रा अजून लक्ष देता येईल )
फोटो पण ठीक ठाक
लेख छान, लिखाण का कोण जाणे थोडे "फोर्स्ड" वाटते आहे. (मी स्वतः काहिच लिहित नाही, आपण निदान प्रयत्न तरी करताय ह्याचे कौतूक आहेच )

#२ पहायचा राहून गेलेला दिसतोय, आता पाहते.

लिहित रहा !! पुलेशु

सचिन काळे's picture

24 Oct 2017 - 8:55 am | सचिन काळे

@ आवडाबाई, प्रतिक्रियेकरिता आभार!! मी गेल्या भागापासून तुमची वाट पहात होतो.

आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता मी आपला शतशः आभारी आहे.

सिरुसेरि's picture

24 Oct 2017 - 5:42 pm | सिरुसेरि

छान . लाटा खरोखरच फेसाळत येत आहेत असा भास होतो .

सचिन काळे's picture

24 Oct 2017 - 7:14 pm | सचिन काळे

@ सिरुसेरि, धन्यवाद!!

पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित: