अचानक भेट एका अजब व्यक्तिमत्वाशी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
25 Aug 2017 - 6:44 pm

२३ ऑगस्ट , दुपारची नेहमिची गाडी ,जागा ही नेहमीचीच डब्यात फक्त तीन चार माणसे ..
जागा निवडीला भरपूर वाव .
पूर्ण हवेशीर खिडकिशी बसुन मोबाईल शी खेळणं सुरु ..
इतक्यात " ही गाडी घाटकोपर ला थांबत्ये का" असा लोकल च्या नेहमीच्या प्रवाशाला कधीच न पडणारा प्रश्न कानावर पडला , म्हणून वर पाहीले .
एक वृद्ध पण तंदुरुस्त व्यक्ती मलाच विचारत होती हा प्रश्न.
हो , ही गाडी सर्व स्थानकांवर थांबेल ..
आराम करा, असे हसत हसत सांगुन ,पुन्हा मोबाईल मध्ये डोकं घालायच्या विचारात असतानाच , मी इथे बसु का तुमच्या शेजारी ? असा दुसरा प्रश्न आला , बसा ना
याना काहितरी बोलायचे असावे, बघू काय म्हणताहेत ते .
माणूस तर व्यवस्थित दिसतोय ..
अनुभवाला सामोरं जायला तयार हो ..
अशी स्वयंसुचना ही मिळाली ..
सावध , सतर्क , संयमी बनून ऐकू लागलो ..
सुरवातीचे परिचयाचे संभाषण झाले , व फक्त श्रोत्याच्या भूमिकेत शिरलो ..
काका सांगु लागले ...
मी रामचंद्र कुलकर्णी.
ॲटोमिका सोसायटी चेंबूर येथे राहतो . वय वर्षे ८४ , आधी एअरफोर्स मध्ये होतो , मग बीएआरसी तुन १९९४ ला सेवानिवृत्त झालो .
माझा मुलगा व सुन डॉक्टर आहेत .
पत्नी २०११ मध्ये निर्वतली .
इथे अंबरनाथ ला माझ्या एका मानसकन्येचे निधन झाले नुकतेच , कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो .
लोकल ने फारसा प्रवास करत नाही , पण माझा सारथी माझीच गाडी घेउन त्याच्या गावी अचानक जावे लागल्याने गेलाय , म्हणून आज लोकल ने आलो .
आता मला खुलासा झाला .. घाटकोपर ला गाडी थांबत्ये का ? या प्रश्नाचा ..
काकानी पुढे सुरवात केली ..
मी पौराहित्य ही करतो पण दक्षिणा न घेता किंवा मिळालेली दान करतो ..
बॅगेतुन त्यांच्या नुकत्याच प्रकाशित होउ घातलेल्या एका पुस्तकाची काही पाने काढून माझ्या हातात दिली .
गणपती अथर्वशीर्ष चे श्लोक , त्यांचे अर्थ , मराठी व इंग्रजीतून, असे पुस्तकाचे स्वरुप आहे .
माझी अजुनही काही पुस्तके प्रकाशित होताहेत ..
काकांची कॉमेटरी सुरुच ..
कोण करतय प्रकाशित ?
ह्या प्रश्न विचारायचे कारण , मी अजूनही मनातल्यामनात
प्रकाशक कोण आहे त्यावरुन ठरवूया किती जवळ जायचं यांच्या ,अशा विचारात ..
माझ्या मनातले संभ्रम दूर करणारे उत्तर आले
*" ग्रंथाली"*
आता मात्र काकांच्या गप्पान्मध्ये मला जास्त रस निर्माण झाला .. सावधपणा ही गळून पडला ..
जेव्हा पुस्तकांचे विषय ऐकले तेव्हा तर उडालोच .
१)डॉ . होमी भाभा चरित्र.. इंग्रजी / मराठी
२) डॉ . विक्रम साराभाई इंग्रजी / मराठी
३) भारतीय अणुगाथेची सहा सोनेरी पाने
४) युरोपा - भटकंती देशदेशांची
काका पूढे सांगु लागले ..
"वाहतो ही दुर्वांची जुडी" पाहीलय का ?
हो ..
त्यात मी आशा काळे नंतर आलेल्या अनेक नायिंकाच्या बापाची भुमिका केल्ये ..
आता तर मी नतमस्तक व्हायचाच बाकि राहिलो ..
जवळ जवळ साडे चारशे प्रयोगातुन भुमिका केल्यात ..
बरं हे सर्व सांगताना कूठे ही आत्मगौरवाचा अभिनिवेश नाही ..
मग पौराहित्याकडे कसे वळलात ?
अजुन जाणून घेण्यासाठी मी विचारले ..
त्यातले अर्थ काय आहेत हे समजावे म्हणून..
काकानी एक किस्सा सांगितला ..
एक भारतिय तरुण व युरोपियन तरुणी यांचे लग्न काकानी लावले ..
अट अशी होती कि सर्व श्लोक / विधी करायचेच पण त्याचा अर्थ इंग्रजीतही समजाउन सांगायचा ..
हे सर्व काकानी केले .. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या ५/६ जोडप्यानी पुन्हा असे लग्न करायची इच्छा व्यक्त केली.
काका द ग्रेट .. पूढे सांगु लागले ..
मी सुरुवात अशी केली , वैदिक धर्म सांगतो कि लग्न हे दोन आत्म्यांचे मिलन आहे तर इतर धर्म सांगतात हा एक करार आहे ..
काळे बुरखे दिसले खिडकितुन तेव्हा भानावर आलो कि मुंब्रा गेलं .. पूढिल स्थानकात उतरायच आपल्याला ..
तेव्हढ्यात काकानी त्यांच्या सौ ने लिहिलेल एक पुस्तक काढलं पिशवितुन , हे बघ ,आवडलं तर घे ..
कितीही पैसे दिलेस तरी चालेल ..
२२० होती किम्मत , काकानी वरचे वीस परत केले .वाचून अभिप्राय नक्की द्या असे सांगुन
छापील पत्ता दिला ,११/ १२ सप्टेंबर ला होणाऱ्या प्रकाशन समारंभाला उपस्थित रहायचे निमंत्रण दिले ..
व नाहीच जमलं तरी एकदा फोन करुन वेळ काढून गप्पा मारायला मात्र नक्की या ..
असे सांगितले ..
आता जायला तर हवच ..
बघू केव्हा येतोय योग .. आला तर ठिक नाहीतर आणावा लागेल .
भटक्याखेडवाला
२४/०८/२०१७

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2017 - 7:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी व्यक्तिमत्व !

मदनबाण's picture

25 Aug 2017 - 7:29 pm | मदनबाण

वाह... या अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddy

रोचक. अशा अनपेक्षित पण सुखद गाठीभेटी नंत मनात बराच काळ आठवणींच्या रूपाने दरवळत राहतात.

पैसा's picture

25 Aug 2017 - 8:29 pm | पैसा

ग्रेट भेट!

अनपेक्षित अवलियासोबत गाठ पडायला सुद्धा भाग्य लागते.. भाग्यवान हो तुम्ही.

केडी's picture

28 Aug 2017 - 2:54 pm | केडी

+1

रमेश आठवले's picture

26 Aug 2017 - 1:44 am | रमेश आठवले

विलक्षण व्यक्तिमत्व . ही माहिती मिसळपाव वर टाकल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद.

कानडाऊ योगेशु's picture

26 Aug 2017 - 8:52 am | कानडाऊ योगेशु

विलक्षण व्यक्तिमत्व भेटले तुम्हाला.
असे वाटते आहे कि ती व्यक्ती स्वतःचे अनुभव वगैरे सांगायला उत्सुक आहे.
मिपा वर आणा त्यांना.

कंजूस's picture

26 Aug 2017 - 9:28 am | कंजूस

भेटू त्यांना.

खाबुडकांदा's picture

26 Aug 2017 - 3:55 pm | खाबुडकांदा

या वयात एवढा उत्साह असणे हे ही कौतुकास्पद आहे.

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2017 - 6:43 pm | स्वाती दिनेश

ओळख आवडली.
अचानक सापडलेले हे क्षण शब्दातून इथे पोहोचवल्याबदद्ल धन्यवाद.
स्वाती

ज्योति अळवणी's picture

27 Aug 2017 - 2:37 pm | ज्योति अळवणी

अस अचानक भेटलेलं वेगळं व्यक्तिमत्व आवडलं

शित्रेउमेश's picture

29 Aug 2017 - 9:43 am | शित्रेउमेश

भाग्यवान आहात...

मस्त ओळख एका ग्रेट व्यक्तीमत्वाची....