नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
25 Jul 2017 - 1:35 pm

प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मूचे विमान किती भारी... भारी
फिरतंय तेही दुनिया सारी... सारी
दुनियेचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा
आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा
गोट्याचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी
पण भलत्याच महाग झाल्या डाळी... डाळी
डाळीचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मू हैराण झाला कैसा... कैसा
परत येईना काळा पैसा... पैसा
पैशाचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

gholआता मला वाटते भितीनृत्यनाट्यसंगीतबालगीतविडंबनडाळीचे पदार्थडावी बाजूदेशांतरअर्थकारण

प्रतिक्रिया

sagarpdy's picture

25 Jul 2017 - 4:04 pm | sagarpdy

:D

प्रसाद_१९८२'s picture

25 Jul 2017 - 5:22 pm | प्रसाद_१९८२

किशोरी पेडणेकर बाईंनी बनविलेल्या गाण्याशी, बरेचशे साधर्म्य वाटले वरिल कवितेचे.
मलिष्काने गायलेल्या गाण्याची सर नाही याला.

शब्दबम्बाळ's picture

25 Jul 2017 - 8:38 pm | शब्दबम्बाळ

तुम्ही त्या पेडणेकर बाईंसारखे म्हणू नका, त्यांना यमक आणि चाल काय जमलेली नाय...
इथं ओरिजिनल गाणं आहे ते बघा!

एमी's picture

25 Jul 2017 - 5:35 pm | एमी

:D

थॉर माणूस's picture

25 Jul 2017 - 10:08 pm | थॉर माणूस

अगागा... जमलंय जमलंय भावा. :D

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2017 - 7:26 am | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या!

वा!वा! जमल्ये भट्टी.१० जनपथला पाठवा हुपयोग होईल त्यांना
:-)
-सेक्युलर(?) औरंगजेब

शब्दबम्बाळ's picture

26 Jul 2017 - 10:34 am | शब्दबम्बाळ

तिकडे पाठवताना
विषय : सोनूSSS तुला नम्मूवर भरवसा नाय काय
असा ठेवता येईल! ;)

शब्दबम्बाळ's picture

1 Aug 2017 - 3:54 pm | शब्दबम्बाळ

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार! :)