BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल (११ जुन २०१७ - पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
12 Jun 2017 - 1:14 am

.

नमस्कार मंडळी..

"BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या.
आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो.
तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो. (पण सगळे व्हिडीओज नक्की बघा हा आग्रह)

BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवलचा ट्रेलर.

.

१) Doing it Scared -
१९९८ साली, टास्मानियातील टोटेम पोल हा अत्यंत अवघड सुळका चढताना ब्रिटीश क्लाईंबर पॉल प्रिचर्डला अपघात झाला आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या शरिराच्या उजव्या बाजूचे नियंत्रण गेले. १८ वर्षांनी; २०१६ साली अशा अवस्थेमध्ये त्याने तो सुळका चढून १९९८ साली अर्धवट सोडलेली मोहीम पूर्ण केली.

टोटेम पोलचा एक फोटो - अंदाज येण्यासाठी..

.
.
२) Locked in -

चार कयाकर्सनी मिळून पापुआ न्यू गिनी मधील एका निर्मनुष्य भागातील नदी आणि धबधब्यांचा अत्यंत कठीण भाग तेरा दिवसात पूर्ण केला.

.
३) Ruin and Rose -

फ्री स्किईंग करणार्‍यांनी पर्वतशिखरावर हेलिकॉप्टरने उतरून खाली येताना केलेले स्किईंग..

.
४) The Rocky Mountain Treverse - (मला सर्वाधिक आवडलेली फिल्म)

इथे त्याची तासाभराची फिल्म आहे.
ग्लाईडरच्या सहाय्याने सुमारे ७०० किमी अंतर पार करायचे लक्ष्य समोर ठेऊन दोन पॅराग्लाईडर भन्नाट सफरीला बाहेर पडले. दिवसभरात हवा शांत असताना ग्लाईडिंग करून प्रवास करायचा आणि संध्याकाळी कुठेतरी तंबू टाकून मुक्काम करायचा. दुसर्‍या दिवशी जवळपास असलेली टेकडी चढून पुन्हा ग्लाईडर उलगडायचे आणि उड्डाण करायचे असा अविश्रांत प्रवास या दोघांनी पार केला.

.
५) Metronomic -
तालासुरावर नाच करणारे नर्तक किंवा ताल निर्माण करणारे वादक आकाशात लटकून गिटार, सेक्सोफोन आणि ड्रम वाजवत आहेत असे दृष्य डोळ्यासमोर आणा..!

.
६) Ace and tte Dessert Dog -
वयाच्या ६०व्या वर्षी एस या अ‍ॅडव्हेंचर फोटोग्राफरने आपल्या भू भू सोबत ६० किमीचा एक ट्रेक कसा कसा पूर्ण केला याची माहिती आहे. सुदैवाने ही फिल्म यूट्यूबवर उपलब्ध आहे. यातील भुभुला काय वाटत असेल ते कल्पून टाकलेले वन लाईनर्स एकदम धमाल आहेत.

.
७) Poumaka -

चिखल, पाऊस आणि अंधार झेलत Mike Libecki आणि Angie Payne या दोन दिग्गजांनी पूर्ण केलेला Poumaka टॉवरचा क्लाईंब आणि त्या दरम्यान आलेल्या अडचणी, कसोटीचे प्रसंग आणि शेवटी केलेले समीट असा प्रवास या फिल्ममध्ये टिपला आहे.

Poumaka टॉवर

.
.
समिटनंतरचा आनंद.
.
.
८) The Trail To Kazbegi -
चार माऊंटन बाईकर्सनी कॉकेशिअन पर्वतरांगेमध्ये १० दिवसात "काझ्बेगि" या ठिकाणी पोहोचण्याची कामगिरी केली तो प्रवास येथे टिपला आहे.

ही फिल्म यूट्यूबवर उपलब्ध आहे.

.

९) Young Guns -
Ashima Shiraishi आणि Kai Lightner या दोन्ही आघाडीच्या क्लाईंबर्सनी शाळकरी वयातच हे यश कसे मिळवले हा प्रवास या फिल्ममध्ये टिपला आहे.
या दोघांचे रॉक क्लाईंबिंगमधील कौशल्य पुढील व्हिडीओ मध्ये कळेलच.

.
१०) Danny MacAskill’s Wee Day Out -

डॅनी (तोच तो... "द रिज" वाला) याने सायकलवर केलेले अचाट कसरतीचे प्रयोग या फिल्ममध्ये दाखवले आहेत.

(समाप्त)

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Jun 2017 - 7:49 am | कंजूस
अभिजीत अवलिया's picture

12 Jun 2017 - 9:22 am | अभिजीत अवलिया

वा.खु. साठवली आहे. सगळे व्हिडिओ बघितले जातील.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 10:10 am | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद....

मोदकाचा धागा उघडला की सहसा निराशा होत नाही, हे धाग्याला पण लागू पडले....

वाखूसा....

कंजूस ह्यांनी लिंक्स बद्दल त्यांचे पण आभार...

दुर्गविहारी's picture

12 Jun 2017 - 6:28 pm | दुर्गविहारी

व्हिडीओ तर सगळे डाउनलोड करुच. पण एका बाबतीत मदत हवी होती. व्हिडीओ मि.पा. वर कसा अपलोड करायचा ? माझ्या धाग्यात मी केला होता, पण जमल नाही.

१) व्हिडीओ वर राईट क्लिक करा..
२) कॉपी एम्बेड कोड ऑप्शनवर क्लिक करा (तो कोड कॉपी होईल)
३) मिपावर सरळ पेस्ट करा (हवे असेल तर विड्थ आणी लेंथ अ‍ॅडजस्ट करा)

शिंपल हाये...

दुर्गविहारी's picture

13 Jun 2017 - 6:58 pm | दुर्गविहारी

धन्यवाद !

राघवेंद्र's picture

12 Jun 2017 - 9:30 pm | राघवेंद्र

या मेजवानीसाठी खूप धन्यवाद मोदक !!!

पद्मावति's picture

12 Jun 2017 - 9:49 pm | पद्मावति

मन:पूर्वक धन्यवाद सगळ्या वीडियोजसाठी.

वाखुसाआ. खूप धन्यवाद!