माझाच मोबाईल सर्वोत्तम
कुणाला मोबाईलबद्दल विचारले की
आपलाच मोबाईल कसा सर्वोत्तम आहे हे आजकाल ऐकून घ्यावे लागते.
पण
मोबाईल घेण्याबाबत योग्य मार्गदर्शन मात्र मिळत नाही.
आजकाल काही गोष्टी अगदी बेसिक झाल्या आहेत. ड्यूएल सिम,
वाय-फाय, बरा कॅमेरा, व्हॉट्स अप सारखी अॅप्स चालली पाहीजेत आणि वेगवेगळे ब्राउझर पण चालले पाहीजेत. त्यावर मराठी नीट दिसले पाहीजे, लिहीता आले पाहीजे. जीपीएस पण हवे.
काँटॅक्ट्स अगदी नीटपणे साठवता आले पाहीजेत. एखाद्या व्यक्तिचे नंबर, पत्ता, मेल आय डी, आणि त्याचा ग्रुप शाळा कॉलेज कंपनी. एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक ग्रुप मधेही असू शकते. यालाही सपोर्ट हवा.
चांगला क्लाउड सपोर्ट. बर्याच लिहीण्याच्या गोष्टी आपण आधी कंप्यूटरवर करतो नंतर सिन्क करतो.
आकारही छोटा असेल तर उत्तम, वागवायला सोपा. विडियोसारख्या गोष्टी आपण कंप्यूटरवरच पाहतो. खूपदा मोबाईलबद्दलचे लेख पदरी पडलं पवित्र झालं अशा प्रकारचे असतात. आपल्याला हवे असलेले एक एक फीचर तपासून हा फोन कसा आपल्या गरजा भागवणारा आहे हे सांगता आले पाहीजे. अशा प्रकारचे मार्गदर्शन कुणी करेल का !
प्रतिक्रिया
8 May 2017 - 7:28 am | कंजूस
तुम्हाला मोबाइलमध्ये काय अपेक्षित आहे? मोठी बॅट्री, कॅम्रा, सिक्युअरटी, मेमरी - RAM/ROM,NFS, 4GLTE ?
ओक्टोबरपर्यंत android 'O' येत आहे.
android फोनवर RAM/ROM फार लागते.
रिप्लेसबल बॅट्रींचे फोन गायबच झालेत॥ बॅट्री झोपली की मोबाइलही झोपणार कितीही महाग असला तरी.
8 May 2017 - 10:53 am | आशु जोग
लिहिलंय ना
9 May 2017 - 1:04 pm | mayu4u
फ्लिपकार्ट वर योग्य फिल्टर वापरून फोन निवडा:
https://www.flipkart.com/mobiles?otracker=nmenu_sub_Electronics_0_Mobiles
10 May 2017 - 12:05 pm | सुबोध खरे
आय फोन ७ प्लस विकत घ्या.
एकदम बेस्ट.
वर स्नॉब व्हॅल्यू भरपूर.
कोणाची टाप आहे म्हणायची फोन सर्वोत्तम नाही म्हणून.
12 May 2017 - 12:42 pm | आशु जोग
आकार जरा कमी आहे हे उत्तम आहे. पण हेडफोन कनेक्ट करता येतात का
10 May 2017 - 3:39 pm | शाली
आजवर वापरलेल्या फोन मधे सर्वोत्तम. हॅंड्सफ्री सारखे फिचर्स खुपच ऊपयोगी.
14 May 2017 - 6:08 am | कंजूस
तुमच्या मोबाइलची बॅट्री कोण खातो?--
Watch out for these battery draining apps on your smartphone. :http://www.asianage.com/technology/in-other-news/130517/watch-out-for-th...
================================