महामानव!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
9 Oct 2008 - 5:07 pm

http://www.bollywood.ac/wp-content/uploads/2007/10/43200651335pmhimesh.jpg
अवघी सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्‍वराचाही त्या दिवशी गोंधळ उडाला होता. कधी नव्हे एवढ्या पेचात तो सापडला होता. आपल्या हातून हा काय चमत्कार घडला, याचं त्याला राहून राहून आश्‍चर्य वाटत होतं. आतापर्यंत अष्टपैलू, अद्वितीय बुद्धिमत्तेचे, आरस्पानी सौंदर्याचे अनेक पुतळे त्यानं घडवून त्यांत प्राण फुंकले होते; पण हा नमुना काही अजबच होता. अद्वितीय आवाज, अप्रतिम निर्मितीकला, नसानसांत नाद भिनलेला स्वरसम्राट, नवनव्या स्टाईल जगाला देणारा मूर्तिमंत मदन, असे सगळे गुण त्या एका पुतळ्यात एकवटले होते. जगन्नियंत्यालाही प्रश्‍न पडला, या सगळ्या वैशिष्ट्यांसह आपण हा "महामानव' घडवला खरा, पण अल्पमतीच्या यःकश्‍चित मर्त्य मानवांना त्याचे हे गुण झेपणार काय?
बराच वेळ विचार केल्यानंतर विधात्याला एक युक्ती सुचली. त्यानं या "महामानवा'मधला प्रत्येक गुण ठराविक काळातच उजळेल, असं फिटिंग करून टाकलं! मग या महामानवानं मृत्यूलोकात जन्म घेतला...आईवडिलांनी लाडानं नाव ठेवलं - हिमेश रेशमिया! गुणी माणसांच्या कलागुणांना प्रचंड वाव देणाऱ्या बॉलिवूडमध्ये त्यानं योग्य वेळी पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये आपल्या प्रतिभेचं तेज दाखवण्याआधी तो सध्या बॉलिवूडकडेच झुकलेल्या छोट्या पडद्यावरील मालिकांचा निर्माता झाला. ते प्रेक्षकांना झेपतंय न झेपतंय, तोपर्यंत तो संगीतकार झाला. मग विधात्याच्याच नियोजनाप्रमाणे त्याला स्वतःमधल्या "गायकी' या गुणाचा (काही जण त्याला उपद्रवमूल्य म्हणतात) साक्षात्कार झाला. तो संगीतकाराचा गायक झाला.
अचानक कुणीतरी त्याला चिथावलं म्हणे. मग साक्षात परमेश्‍वरालाही अज्ञात आणि अनपेक्षित असलेला त्याच्यातील अभिनयाचा गुण कुणीतरी हेरला...मग तो सुटलाच.
पहिला चित्रपट "आप का सुरूर' आला. त्याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि नायिका, निर्माते-दिग्दर्शकांची फुकट पासातली मंडळी, यांच्याव्यतिरिक्त तो कुणी बघितल्याचं ऐकिवात नाही. आता त्याचा दुसरा चित्रपट येत्या शुक्रवारी येतोय. "कर्ज' नावाचा. प्रोमो आणि जाहिरातीवरून तरी तो जुन्याच "कर्ज'च्या वळणानं जाणारा वाटतो आहे.
"टोपी' ही स्वतंत्र ओळखही हिमेशनं निर्माण केली आहे. आता त्यानं कुणाकुणाला टोप्या घातल्या आहेत, ही गोष्ट वेगळी! या सर्वगुणसंपन्न, अष्ट नव्हे सहस्रपैलू अभिनयसम्राटाचे आणखी चार चित्रपट पुढील वर्षात येणार आहेत. न जाणो, तोपर्यंत त्याच्यातला दिग्दर्शकही कदाचित जागृत झालेला असेल!
-----------

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

9 Oct 2008 - 5:14 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आजचा दिवस सोडायाचा होता. आता मला परसाकड्चा त्रास सुरु झाला तर त्याला तुम्ही जबाबदार.

रामपुरी's picture

10 Oct 2008 - 9:37 am | रामपुरी

हा माणूस खरंच डोक्यात जातो. त्याला गाणं येतं असं ज्याने सांगितलं त्याच्या शोधात आहे सध्या.
(सारेगम लागलं की दूरचित्रवाणी संच बंद करणारा. खरंतर आजकाल दूरचित्रवाणी संच सुरूच न करणारा)

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Oct 2008 - 5:23 pm | ब्रिटिश टिंग्या

आपल्याला हिमेशभाईची गाणी आवडतात बॉ!

त्याची गाणी ऐकण्यापेक्षा बघणेबल असतात ;)

- टिंग्या हाशमी!

अनिल हटेला's picture

10 Oct 2008 - 9:04 am | अनिल हटेला

कितीही नाव ठेवली तरी एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते !!!

साला , हीट होणारी गाणी ह्याचीच का असतात !!!

व्यक्तीशः मला नाय आवडत हा प्राणी !!!

पण ह्याची गाणी मात्र ऐकतो मी अधुन मधुन !!

आणी ह्याचा अभिनय बघायची हिम्मत नाय बॉ आमच्यात !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 12:47 pm | विजुभाऊ

त्याने गायला सुरु केल्यापासुन ट्रेन मध्ये गाणारे भिकारी कमी झालेत. ते सगळे ऑर्केस्ट्रात हिमेश ची गाणी गातात.

अनिल हटेला's picture

10 Oct 2008 - 12:56 pm | अनिल हटेला

हा हा हा !!!!

सही !!!!!

मागे हिमेश कसा घडला ह्या बद्दल तु नळी का कुठे पाह्यलये!(नक्की आठवत नाही )

एल लहान बाळ चुकुन जंगलात भरकटते (मोगली -जंगल बूक्स इष्टाइल)

त्याचा सांभाळ काही लांडगी करतात !!

आणी ते बाळ देखील त्यांच्या सारखेच मान वर करून उ उ उ करायला शिकते .....

मोठे पणी हेच बाळ दाढी वाढवुन ,टोपी घालून मान वर करून उ उ उ करत असते ...

आणी नाव - हिमेश रेशमीया !!!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..