खाडा -विडंबन

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
10 Dec 2007 - 5:20 am

लोकहो !

आमची प्रेरणा 'बरेच दिवसांनी तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार( म्हणजे आम्ही) आणि इतर मित्र फार मागे लागले होते (!) म्हणून धोंडोपंतांनी केलेली सुंदर गझल अखाडा

धोंडोपंत,
आपण आज्ञा केलीत 'केश्या,आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं. झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो. '
"झ**" हा काफिया मला वापरायला लावण्यात आपला मोठठा वाटा आहे म्हणून आणि हा काफिया मुक्तपणे इथे वापरतात म्हणून मिसळपावचे मालक ह्यांना हे विडंबन अर्पण.

तर विडंबन असे आहे:-

काल ही पडलाय खाडा
बायको करणार राडा

काढुनी कपडे फिरावे
सोसवेना जर उकाडा

बायकोच्या ह्या शिव्या मज
वाटतो माझा पवाडा

पाहिले चोरून सारे
भेटला उघडा कवाडा !

ओढतो इतक्या बिड्या की
नाव मज पडले धुराडा

आयती चालून आली
मी तिचा करतो निवाडा

सारख्या देतो शिव्या ह्या
का बरे तात्या झ**?

पाडतो "केश्या" विडंबन
करुन कवितांचा चुराडा

--- केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Dec 2007 - 7:10 am | विसोबा खेचर

सारख्या देतो शिव्या ह्या
का बरे तात्या झ**?

केशवा, तो धोंड्या लिहिणार आणि तू त्याचं विडंबन करणार! लेको, पण मधल्या मध्ये माझी मारली गेली त्याचं काऽऽऽय?? :))

काढुनी कपडे फिरावे
सोसवेना जर उकाडा

पाडतो "केश्या" विडंबन
करुन कवितांचा चुराडा

मस्त विडंबन! :)

आणि हा काफिया मुक्तपणे इथे वापरतात म्हणून मिसळपावचे मालक ह्यांना हे विडंबन अर्पण.

धन्यवाद शेठ! तुमची साहित्यिक **डेगिरी आवडली! :)

अरे यार अपना मिसलपाव तो जिंदादिल लोगो का अड्डा आहे. इथे कुठलेही पडदे नाहीत, बुरखे नाहीत, सभ्यता आणि संस्कृतीचे कोणतेही गळे नाहीत!

तेव्हा येऊ द्या अजूनही असं साहित्य! मात्र प्रत्येक वेळेस मधल्या मध्ये माझी मारून ठेवू नका म्हणजे झालं!:)))

आपला,
तात्या वेलणकर! :)

केशवसुमार's picture

10 Dec 2007 - 7:25 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
केशवा, तो धोंड्या लिहिणार आणि तू त्याचं विडंबन करणार! लेको, पण मधल्या मध्ये माझी मारली गेली त्याचं काऽऽऽय?? :))
धन्यवाद शेठ! तुमची साहित्यिक **डेगिरी आवडली! :)

आपले नाव विडंबनात घातल्या बद्दल क्षमस्व.. पण 'अरे यार अपना मिसलपाव तो जिंदादिल लोगो का अड्डा आहे. इथे कुठलेही पडदे नाहीत, बुरखे नाहीत, सभ्यता आणि संस्कृतीचे कोणतेही गळे नाहीत! ' हे महिती असल्यामुळे जरा स्वातंत्र घेतल.. बेसनलाडवाच्या पत्राला उत्तर ह्या आपल्या लेखाच्या आणि त्याला आलेल्या विविध प्रतिसांदांचा संदर्भ घेऊन ह्या द्विपदी लिहिल्या आहेत..
आपल्याला आक्षेप असल्यास ( तो असणार नाही हे माहिती आहे.. तरी पण) पंचायतिने त्या द्विपदी वगळाव्यात हि विनंति..
बाकी आभिप्रायाबद्दल धन्यवाद

केशवसुमार.

विसोबा खेचर's picture

11 Dec 2007 - 12:47 am | विसोबा खेचर

हे महिती असल्यामुळे जरा स्वातंत्र घेतल..

उत्तम केलंस रे केशवा!

आपल्याला आक्षेप असल्यास ( तो असणार नाही हे माहिती आहे.. तरी पण) पंचायतिने त्या द्विपदी वगळाव्यात हि विनंति..

पंचायतीचं माहीत नाही, परंतु माझा आक्षेप नाही! आपकी जो मर्जी हो वो लिखो. मिसळपाववर अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे, मालकी मुजोरी दाखवून इथे कुणाची मुस्कटदाबी केली जात नाही! जिथे खुद्द मालकाला, काव्याचा आश्रय घेऊन का होईना, जाहीरपणे झ** म्हणता येते तिथे मालकी मुस्कटदाबी नाही हे सांगण्याचा आणखी काय पुरावा पाहिजे?! :)

तात्या.

अवांतर - नमोगतावर एखादं काव्य करून त्यात 'महेश वेलणकर **डा' असं मालकाला उद्देशून काही शिवराळ लिहून दाखव पाहू! :) उडालंच म्हणून समज तुझं काव्य! तेवढी जिगर लागते, हिंमत लागते, जिंदादिली लागते! 'तिथे चार सोकॉल्ड सुसंस्कृत लोक काय म्हणतील?' अशी गांडूगिरी किंवा चमडीबचावगिरी उपेगाची नाही! :)

आपला,
(एक्स नमोगती!) तात्या.

धोंडोपंत's picture

10 Dec 2007 - 10:14 am | धोंडोपंत

हा हा हा हा हा,

केशवसुमार,

अप्रतिम विडंबन केलेत हो. क्या बात है!

काल ही पडलाय खाडा
बायको करणार राडा

मतला अप्रतिम. हा हा हा हा हा. भाग्यवान आहात.

सारख्या देतो शिव्या ह्या
का बरे तात्या झ**?

हा हा हा हा हा. हे मात्र एकदम खरं.

अप्रतिम विडंबन. मजा आली.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चित्तरंजन भट's picture

10 Dec 2007 - 4:00 pm | चित्तरंजन भट

हा हा हा हा हा,

केशवसुमार,

अप्रतिम विडंबन केलेत हो. क्या बात है!

काल ही पडलाय खाडा
बायको करणार राडा

मतला अप्रतिम. हा हा हा हा हा. भाग्यवान आहात.

सारख्या देतो शिव्या ह्या
का बरे तात्या झ**?

हा हा हा हा हा. हे मात्र एकदम खरं.

अप्रतिम विडंबन. मजा आली.

असेच +

बायकोच्या ह्या शिव्या मज
वाटतो माझा पवाडा
वाचून थेट गालिबच आठवला. 'ग़ालियों में भी बेमजा न हुआ...'

सर्किट's picture

11 Dec 2007 - 2:53 am | सर्किट (not verified)

उच्च गझला उच्च राडा
रोज तू करतो उनाडा !

पेटला तेथे जयन्ता
आज त्याची गझल फाडा

मस्त विडंबन केसु !!

अर्थात तुझ्याकडून ह्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असणार ?

- सर्किट

केशवसुमार's picture

13 Dec 2007 - 1:55 pm | केशवसुमार

संकेतस्थळाचे मालक, ह्या जमिनीचे मूळ मालक,चित्तर आणि सर्किटशेठ,
प्रतिसादां बद्दल सर्वंचे मनापासून आभार..
आपला
(***)केशवसुमार..

गोविंदराव's picture

14 Dec 2007 - 12:44 pm | गोविंदराव

छान छान च्छान छान केशवसुमार,

मस्त विडंबन झाले आहे हो पंतांच्या गझलेचे.