हनी अँड ब्लॅक पेपर चिकन

केडी's picture
केडी in पाककृती
13 Apr 2017 - 10:51 am

HPC1

साहित्य
१/२ किलो चिकन च्या तंगड्या (स्किन काढून)
६ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक चिरून
२ मोठे चमचे डार्क सोया साँस
३ मोठे चमचे मध
१५ ते २० काळेमिरी, जाडसर कुटून
१ चमचा ब्लॅक पेपर साँस (मी हा वापरतो, चिंग'स)
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
१ मोठा चमचा तेल

कृती
चिकन च्या तंगड्या ब्राइन करून घ्या. [हॉट ब्राईन करत असाल तर काळीमिरी सुद्धा घालू शकता] ब्रायनिंग बद्दल इथे वाचा. तंगड्या स्वछ धुवून, त्यांना चिरा मारून घ्या. बाकीचे जिन्नस मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. चिकनच्या तंगड्या ह्या मिश्रणात साधारण १ ते २ तास मॅरीनेट करत ठेवा.

ओव्हन १८० डिग्री ला प्री-हिट करून ठेवा. एका पॅन मध्ये चिकनच्या तंगड्या ३ ते ४ मिनिटे मोठ्या आचेवर भाजून घ्या. [ह्याला searing म्हणतात. ह्याने चिकन वरून छान कुरकुरीत होईल, आणि नंतर ओव्हन मध्ये छान आतून मऊसूद शिजेल]. भाजताना तंगड्या सगळ्या बाजूने भाजून घ्या. हे करताना आपला मसाला घट्ट व्हायला लागेल, तो तंगड्यांना सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या.

आता गॅस बंद करून, तंगड्या बेकिंग ट्रे वर (फॉईल लावून) ठेवा आणि ओव्हन मध्ये १० ते १२ मिनिटे शिजेस्तोवर भाजून घ्या (तंगडीच्या सर्वात जास्ती जाड मासल भागात सूरी किंवा टूथपिक घालून तपासा). गरम गरम खायला घ्या!

HPC2

चिकनमांसाहारीसुकेओव्हन पाककृती

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

13 Apr 2017 - 1:23 pm | संजय पाटिल

तोंपासू...
पण काय करनार? आज गुरूवार...
अता उद्या पर्यंत थांबावे लागनार!

आषाढ_दर्द_गाणे's picture

14 Apr 2017 - 7:53 am | आषाढ_दर्द_गाणे

काय दिसतायत चित्रे!
अतिशय सुंदर!
भूक लागली वाचून!
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं?
म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं?
म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

सोया सौंस घातल्यामुळे एवढा चिकट नाही होत, तरीही वाटत असेल तर मध शेवटी घाला, इतर गोष्टी आधी मिक्सर मधून फिरवून घ्या

नूतन सावंत's picture

17 Apr 2017 - 3:49 pm | नूतन सावंत

काय दिसताहेत त्या तंगड्या.कोंबड्या मरूनसुद्धा भरून पावल्या असतील.

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 3:44 am | आषाढ_दर्द_गाणे

+१

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 2:27 am | पिलीयन रायडर

ओ.. काही तरी शाकाहारी पर्याय देत जावा की...

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 3:47 am | आषाढ_दर्द_गाणे

सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का?
भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...

तुषार काळभोर's picture

18 Apr 2017 - 7:47 am | तुषार काळभोर

हनी अँड ब्लॅक पेपर बटाटा
हनी अँड ब्लॅक पेपर फ्लॉवर
हनी अँड ब्लॅक पेपर रताळे
:D

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Apr 2017 - 8:25 am | आषाढ_दर्द_गाणे

अहो पैलवान, पनीर विसरलातसे?

शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!

तुषार काळभोर's picture

18 Apr 2017 - 7:42 am | तुषार काळभोर

खुदा उस मुर्गीको जन्नत बक्षे ...