आता आता कुठं
तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष
एका एका जातीचा एक एक
स्पशेल महापुरूष
मग अपोआपचं वाटले गेली
रंग, तळी, डोंगर नदया ,गाव
नि गल्ल्या बोळी,मोहल्ले
कॅलेडरवरल्या तारखासुध्दा
सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने
जो तो विणत गेला आपल्याच
जातीचं कोष
गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत
माणूसजाती जातीच्या कशाल्याशा
गर्वानं फुगून
फुटू लागली सा-यांचीचं
छाताडं.
ते समतेचं गाणं
कसं काय गायचं बुवा
एक सुरात
एका तालात
परशुराम सोंडगे,पाटोदा
9673400928
प्रतिक्रिया
5 Apr 2017 - 12:05 pm | पैसा
हम्म...
5 Apr 2017 - 12:55 pm | चांदणे संदीप
हम्म...
Sandy
5 Apr 2017 - 3:01 pm | पुंबा
वा.. आवडली..