(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
3 Apr 2017 - 8:55 pm

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला आराम " या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत !! आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

हां तर तसेही नवीन फायनान्शीयल ईयर सुरु झाल्यावर आम्हाला कामाचा लोड नसतो . ऑफीसात येऊन मस्टर क्लिक करणे अन जुने पुराणे काही उरले सुरले बग क्लीयर करणे इतकेच काय ते काम ! त्यातही ह्या वेळी आमाच्या राशीला ट्रंप वक्री आल्याने सर्व कामे लांबणीवर पडलेली आहेत त्यामुळे आराम करायला बख्खळ वेळ आहे !

हां तर या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली ' आरामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात आरामाचा अनुभव सांगत आहे
" मार्कस ऑरेलियस"

एकुणच सध्या दुर्गम काळ आलेला आहे , ट्रंप ह्या पापग्रहाची शांती कशी करावी हे कोठेही लिहिलेले नसल्याने वाट पहाणे इतकेच आपल्या हातात आहे . मागल्या महिन्यात मोबाईल हरवल्यावर जरा जास्तच आराम झाला , नंतर मग मिपाकरांनी सुचवल्या प्रमाणे सत्यनारायण घातला ( मनातल्या मनात हो , ते केळीची पानं अन ब्लाह ब्लाह कोण शोधत बसणार ? मानस पुजा हीच सर्वोत्तम पुजा !! ) आणि नवीन मोबाईल घेवुन सोशल नेटवर्कस वरील टवाळक्या परत सुरु झाला कामाचीही डीलीव्हरी गेल्याच महिन्यात झाली आहे ! आराम जिंदाबाद !!
आज ऑफीसात ३ वाजता आलो . पुल टेबल वर ४ गेम खेळलो , आता बर्‍या पैकी अंदाज जमायला लागला आहे म्हणजे तसे जिंकलो एकच गेम पण आराम मस्त झाला . आज शुक्रवार नसुनही सुबक ठेंगणी लाल रंगाचा आकर्षक ड्रेस घालुन आली होती अन त्यामुळे इच्छा नसतानाही डोळ्यांना फार व्यायाम झाला !
नंतर वडापाव अन चहा अन असले काहीतरी आरबट चरबट खात तासभर कलीग्सशी गफ्फा झाडल्या . ग्राऊंड फ्लोअर ला जाऊन सिगारेट पीत पीत कंपनीच्या पॉलीसीबद्दल क्रिबिंग केले.
रात्री ऊशीरा मिंटिंग असल्याने मोकळ्या वेळात मिपावर किसनरावांच्या जिलेब्या वाचल्या , टर्बोचार्जड लेखांवर पिंका टाकल्या ... स्कोअर सेटलिंग चा अभ्यास केला कोण कोणत्या टीम मध्ये आहे कोणाची कोणाशी ब्यॅटिंग चालु आहे हे समजुन घेण्याचा प्रयत्न केला .... शेवटी फारच कंटाळा आल्याने हा लेख पाडलहा :)

तुमच्याकडेही सांगण्यासारखे कांही असले तर आंम्हाला जरूर प्रतिसाद द्या. नाहीतर आराम चालु दे मस्त !

टीम #मिपालेझीनेस - ( नावे सुचवा रे आळशी कार्ट्यांन्नो )

जीवनमानस्थिरचित्रप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

3 Apr 2017 - 9:04 pm | इरसाल कार्टं

एवढे खरडता खरडता तुमचा बोटांचा व्यायाम तेवढा झाला असेल. कि तेही कोणाकडून करवून घेतले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

हँ, आराम तर आम्ही नेहमीच करतो... मधून मधून वेळ मिळाला तर इतर काही काम (कामावर उपकार केल्यासारखे) करतो. चला, खूप काम केले, आता परत लोळायला जातो :) ;)

आदूबाळ's picture

3 Apr 2017 - 9:46 pm | आदूबाळ

हांगाश्शी ये बात! याच धाग्याची वाट पहात होतो. (मी काढला नाही कारण ...)

आजचा आळशीपणा:

- मोज्यांच्या कप्प्यात हात घातला तर एक काळा आणी एक डार्क निळा मोजा हाताशी आला. "माझ्या मोज्यांकडे पहात बसण्यापेक्षा बरी कामं आमच्या हापिसात लोकांना आहेत" हा सुज्ञ विचार करून तसेच हाणले.

- क्यांटीनवाल्याने सगळ्यांच्या बशीत चार फलाफलं घातली, पण माझ्या बशीत मेल्याने तीनच घातली. आता एका फलाफलासाठी सगळ्यांना ओलांडून कशाला जायचं म्हणून तीनच खाल्ली.

- मिटींगमध्ये नोट्स काढताना शंभरदा 'विथ' 'विथ' लिहायचा कंटाळा आला, म्हणून "C̅" हे चिह्न विथच्या जागी काढलं.

कवितानागेश's picture

4 Apr 2017 - 1:03 am | कवितानागेश

पण लिहायचं कशाला?
मानसपूजेसारखा मानस प्रतिसादही पोचत असेल ना?

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2017 - 2:26 pm | प्रसाद गोडबोले

ते कसं असतं की आपण व्यायाम करताना शरीराला जरा आराम हवा म्हणुन प्रत्येक सेट नंतर काही क्षण आराम करतो तसे काहीसे आम्ही आराम करत असत्ताना शरीराला बदल म्हणुन काही क्षण लेखन करतो =))))

माझा आराम चारचौघात सांगता यावा असा नाही, त्यामुळे पास. =))

नीलमोहर's picture

4 Apr 2017 - 12:44 pm | नीलमोहर

……....................………

वरुण मोहिते's picture

4 Apr 2017 - 1:10 pm | वरुण मोहिते

आम्ही बाँबे जिमखान्यात रम्मी खेळतो . एक मेम्बर आहे त्याच्या जीवावर :)))
अवांतर _स्कोरसेटलिंग एक अभ्यास ह्या लेखाच्या प्रतीक्षेत .

अभ्या..'s picture

4 Apr 2017 - 2:43 pm | अभ्या..

अहाहाहा,
रैवारी मस्त हपिसात येऊन बसलो एकटाच. फोन फ्लाईट मोडला टाकला अन हेराफेरी बघला. माइंड एकदम फ्रेश झाला.
मग आरामाचा जरा कंटाळा आला म्हणून मिप्पा मिप्पा खेळले. गायकवाड साहेबांचे काय हालहवाल चाललेत ते पाहिले. अजुनही मेहनत घेतात काही आयडी अशा विषयावर हे बघून माइंड जास्तच फ्रेश झाले. चार पाच भान्ने वाचली लक्षपूर्वक. "वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा" असा धागा लिहून काढला पण कंटाळा येऊ लागल्याने डिलिट मारला व एक पत्रिका डिझाईन केली. टीशर्टाची चार डिझाईन पेंडिंग होती ती सोमवारी येऊन मारावीत असा विचार करुन हपिस बंद केले. सगळे बार बिर बंद असल्याने व ठिय्ये हुडकायचा कंटाळा आल्याने गप घरी जाऊन जेवण हाणले. रात्री अजून कंटाळा येण्याआधी गार गार फरशीवर गुडुप्पे झालो.

संजय क्षीरसागर's picture

4 Apr 2017 - 6:41 pm | संजय क्षीरसागर

बहुदा रविवार असल्यावरच वार कळतो कारण त्यादिवशी इतरांना सुट्टी असते. अदरवाईज तारीख, वार आणि वेळ यांचा फारसा संबंध येत नाही.

यमन आणि भैरवी हे दोन राग जमवले तर बाराही सूर पक्के होतील असा भल्या पहाटे साक्षात्कार झाला. यमन (सर्व सुद्ध स्वर प्लस तीव्र मध्यम) आणि भैरवी (सर्व कोमल स्वर) ! आपल्याला फक्त फिल्मी संगीतात स्वर बरोबर लागण्याशी मतलब ! लगेच सिंथ काढून `दिल अपना और प्रित पराई' ही भैरवी छेडली. सॉलीड मजा येतेयं म्हटल्यावर `माना जनाबने पुकारा नही' वर बेछूटपणा केला. तेवढ्यात प्रकाशाचा वॉल्यूम वाढल्याचं जाणवलं आणि नेमका मोबाईल वाजला ! `किसकी हिंम्मत?' म्हणून फोन घेतला तर `भाडखाऊ, दोन्ही लँडलाईन काढून ठेवलेत का?' अशी टेबलटेनीसच्या मित्रांनी प्रेमळ पृच्छा केली. मग खेळायला गेलो.

खेळून आलो , आईश्री रामनवमीच्या कार्यक्रमाला गेल्यात म्हटल्यावर आज बहुदा सर्वत्र सुट्टी असावी हे कळलं. आज जेवायचे कष्ट सुद्धा नकोत हा सुखद विचार मनात आल्याआल्या जाहीर केला ! तेवढ्यात किशोरीबाईंची डॉक्युमेंटरी टिवीवर सुरु झाली. एकेका दिग्गजाच्या सांगितिक आकलनाची झलक मिळाली. किशोरीबाई शब्दांच्या ज्याम विरोधात आहेत हे पुन्हा सांगायला लागल्या तशी झोप यायला लागली. मध्यंतरीच्या काळात इथे `मनातल्या मनात' आणि `लॉजिक' वर हात साफ केला. मग माठातलं भरपूर थंड पाणी पिऊन पंखा दोनवर केला आणि झोपून गेलो.

जाग आल्यावर पतंजली दिव्य पेय प्राशन करुन खारी की गोड या द्वंद्वात, युनिबिकची कॅश्यु अँड अलमंडस रिचवली. पुन्हा भूक लागायला नको म्हटल्यावर काल डायरेक्ट दाण्याचे वीस लाडू आणलेत याची आठवण झाली ! मग सध्या दोन पुरेत म्हणून हात आवरता घेतला.

आता शेजारचा डॉक्टर मित्र फिरायला जायची हाक मारतोयं. कालपासून त्याला बुद्धाच्या शून्यबद्दल अपार कुतुहल जागृत झालंय. आता त्याच्याशी बुद्धावर बेफाम संवाद होईल. शून्यात बुडून जायची लहर आल्यावर तो `आज उदात्त विचार मनात येतायंत' म्हणतो. त्याचा सरळ अर्थ दोन-तीन पेग लावू असा असतो. आपल्या उपासाला कसलंच वावडं नाही. सो, सी यू देन !

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2017 - 6:58 pm | प्रसाद गोडबोले

यमन आणि भैरवी

ह्या विषयावर लिहा काही तरी आरामात !

मी गेले काही दिवस पं. गणपती भटांच्या आवाजातील आज आयें श्याम मोहना ऐकतोय , खुप मस्त वाटते ! ( म्हणजे मला तसं संगीतातलं फारसं काही कळत नाही पण उगाच जास्त चिकित्सा करायची सवय सोडली की साध्या साध्या गोष्टींच्या आनंद घेता येतो तसं काहीसं ! )

आता आज घरी जाऊन भैरवी शोधतो युट्युब वर !

:)

आदूबाळ's picture

4 Apr 2017 - 9:17 pm | आदूबाळ

नेमका मोबाईल वाजला !

अरे! तुम्ही मागे कधीतरी लिहिलं होतंत की तुमच्याकडे मोबाईल नाही म्हणून?

वॉटस अप उपयोगी आहे म्हणून घेतला. माझा सेल लँडलाईनजवळ असतो. बाहेर नेत नाही. सध्या इथे किरकोळ प्रतिसादाला सेलच वापरतो.

सूड's picture

5 Apr 2017 - 12:13 pm | सूड

१) तुम्ही टेटे खेळता
२) तुम्हाला सिसा वाजवता येतो
३) तुम्ही नवा मोबल्या घेतलाय
४) आणि तुम्हाला बरेच मित्र आहेत (इथे आश्चर्य, विस्मय, कौतुक वैगरे स्मायली कल्पावे)

गणामास्तर's picture

5 Apr 2017 - 2:50 pm | गणामास्तर

काल जंगी खरेदीचा दिवस होता. अर्धी खरेदी उरकल्यावर आपटे रोडवरच्या श्रेयस मध्ये आमरस पुरीचे जेवण हादडल्यावर पुनमचे पान लावले.
बाकी मंडळींना उरलेली खरेदी करायला लक्ष्मी रोडवर सोडले आणि गाडी पार्किंगला लावून एसी फ़ुल्ल्ल करून मनसोक्त झोपलो.

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 3:14 pm | संजय क्षीरसागर

रात्री पत्नीचे मामा-मामी जेवायला होते. उपवास होता म्हणून मी सगळ्यातून बाद होतो. पण पाहुण्यांना आइस्क्रीम ऑफर करणं आगत्याचं होतं म्हणून आमूलचं `फ्रूट अँड नट फँटसी' हे दिव्य आइस्क्रीम (केशराच्या दुधात ड्रायफ्रूटस आणि स्पेशल जेली!) आणलं. रात्रीतनं भूक लागायला नको म्हणून मनसोक्त रिचवलं.

प्रसाद गोडबोले's picture

6 Apr 2017 - 5:47 pm | प्रसाद गोडबोले

एक महत्वाची मीटींग कालच उरकल्याने आज आणि उद्या काडी मात्र काम नाहीये , आज पुल चा एक गेम खेळलो , काही मजा आली नाही , नंतर मग रेक रुम मध्ये १०-२० मिनिट पावर नॅप घेतली ! मिपावर काही नवीन दिसेना म्हणुन आता परत जाऊन एखादी पावर नॅप घ्यावी असा विचार करतोय.

इंटरेनेट वर टाईम्पास करायला संकेतस्थळे सुचवा ... ते मागे आयायेम इन्दोर ची क्लुलेस नावाची भारी गेम होती पण ती ऑफीसात बॅन आहे :(

स्थितप्रज्ञ's picture

7 Apr 2017 - 9:45 am | स्थितप्रज्ञ

अरेरे...त्या सुबकठेंगणीमुळे तुमच्या डोळ्यांना नाईलाजाने व्यायाम करावा लागले हे म्हणजे अगदीच वाईट झाले. कुठे फेडणार ती हे पाप कोणास ठाऊक. असो, शुक्रवारी तुमच्या डोळ्यांची दमछाक व्हायला नको म्हणून डोळ्याला काली पट्टी बांधून हापिसात जा.

संजय क्षीरसागर's picture

9 Apr 2017 - 2:05 am | संजय क्षीरसागर

आरबीआयनं सलग थर्ड अन्युअल कूल ऑफ देऊन थर्ड लावल्यामुळे बँक ऑडिटस आलेली नाहीत. साधारण पावणेदोन लाखांचा रेवेन्यू बुडाला आहे पण एप्रिल फुल मोकळा मिळालायं त्याचा सगळा फायदा उठवणं चालू आहे.

मधे संगीतसभेत एका डॉक्टरशी ओळख झाली. त्याला टेबलटेनीस खेळायला बोलावलं. दीड तास खेळल्यावर प्रत्येकी तीन-तीन चहा आणि चॉईस ऑफ बिस्किटस हा कार्यक्रम केला. डॉकनं दीड वर्षापूर्वी पत्नी गेल्यावर एकमेव अभिनव काम केलं ते म्हणजे मॅट्रीमनी रजिस्ट्रेशन ! हल्ली ग्लोबल टेंडर फ्लोट करता येतं अशी माहिती मिळाली. मग त्याला आलेल्या एका सिंगापोरियन प्रपोजलवर `फोटोवरुन सर्वांगसुंदर कुंडली' अशी रसभरीत चर्चा झाली. साधारण एक वाजता, आज पत्नी मैत्रिणीकडे जेवायला जाणार होती हे आठवलं. डॉकला म्हटलं, भाजी दोघात शेअर करावी लागेल, पोळ्या संध्याकाळसाठी पण करुन ठेवल्या असणारेत सो देअर वोंट बी एनी बोंब टिल इवनींग. डॉकला पहिल्याच भेटीत इतक्या घटना घडतील अशी कल्पना नव्हती. अ‍ॅपल + थाऊजंड आयलँडस स्प्रेड + रेझीन्स असं सॅलड बनवलं. आईश्रींनी झोपण्यापूर्वी दोघांसाठी दीड लिटर ताक करुन दिलं. चॉईस ऑफ पिकल्स असायलाच हवेत ते होतेच. नकोनको त्या विषयावर गप्पा मारत एक तास जेवण केलं.

त्यात बॉडी मेटबोलिझम आणि त्या अनुषंगानं अस्तित्वातलं रुपांतरण यावर आयुर्वेदिक ज्ञानोपलब्धी झाली. तेवढ्यात डॉकला त्याच्या क्लासिकल संगीत क्लासची वही स्वतःच्या बॅगेतच असल्याचा साक्षात्कार झाला. मग अनेकानेक रागांची चलनं, स्वरांची पकड, बंदिशी आणि अर्थात संबंधित हिंदी गाणी यांची मैफिल झाली. इन द मीन टाइम डॉकला चार वाजता चहा लागतो अशी माहिती त्यानंच पुरवल्यामुळे त्याचा चहा आणि माझं पतंजली दिव्य-पेय अगेन विथ चॉइस ऑफ बिस्किटस असा कार्यक्रम झाला.

डॉकला लेन एंडपर्यंत पोहोचवायला गेलो तर एक रिक्षा पास झाली आणि प्रवासिनी पैसे चुकते करुन अपार्टमेंटमधे गेली. डॉकला उत्तम कॉफी कशी असते याची झलक दाखवण्याची संधी दवडण्यासारखी नव्हती. कॉफी समोर आल्यावर डॉकला सदर प्रवासिनी ही घरची सुवासिनी असल्याचं लक्षात आलं. मग तीघांच्या गप्पा रंगल्या. हॉलमधे टिवी नाही यावर डॉक खुष झाला तेव्हा हॉलमधे घड्याळपण नाही हे त्याच्या निदर्शनाला आणून दिलं.

निघतांना डॉक म्हणाला, आयचा घो, तुझ्याबरोबर सहा तास होतो ! म्हटलं वेळेचं केळ करायचाच आवकाशे, जिंदगी का मजा ही कुछ और हो जाता है |

अभ्या..'s picture

9 Apr 2017 - 1:00 pm | अभ्या..

डॉकला लेन एंडपर्यंत पोहोचवायला गेलो तर एक रिक्षा पास झाली आणि प्रवासिनी पैसे चुकते करुन अपार्टमेंटमधे गेली. डॉकला उत्तम कॉफी कशी असते याची झलक दाखवण्याची संधी दवडण्यासारखी नव्हती. कॉफी समोर आल्यावर डॉकला सदर प्रवासिनी ही घरची सुवासिनी असल्याचं लक्षात आलं. मग तीघांच्या गप्पा रंगल्या.

प्रवासिनी, सुवासिनी म्हणजे आपल्या सौ. ना?

संजय क्षीरसागर's picture

9 Apr 2017 - 7:01 pm | संजय क्षीरसागर

.

वरुण मोहिते's picture

9 Apr 2017 - 12:42 pm | वरुण मोहिते

डोळ्यांचा व्यायाम होतोय म्हणा मीटिंग ला गेल्यावर फक्त :))