मला भावलेली कविता

mina's picture
mina in जे न देखे रवी...
8 Oct 2008 - 2:27 pm

अजूनही

निळया जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पित
भेट दुरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणाची
सौदामिनीच्या बाणाची
देवघेव.
गुलबक्षीच्या फुलानी
गजबजले कुपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे।
ओल्या आभाळाच्या खाली
इद्रचापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास.
कधी रेताडीचे रस्ते
कधी मोहरली बाग
कधी प्रासादास आग
कर्पुराच्या।
सप्तसुरातुनी गेले
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारगीची तात
साथ झाली.
बर्फवाट शिशिराची
आता पुढलिया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही.

-कवी कुसुमाग्रज

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 4:23 pm | विसोबा खेचर

कृपया हे वाचा आणि सहकार्य करा...

थोड्याच वेळात कुसुमाग्रजांची मनोमन क्षमा मागून सदर लेखन येथून काढून टाकण्यात येईल असे जाहीर करतो...

तात्या.