फाऊंटन पेन!

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
8 Oct 2008 - 1:54 am

हाता मधलं फाऊंटन पेन!
झरझरणारे थेंब थेंब..
काळी-नीळी
लाल-जांभळी
हिरवी-पिवळी
सळसळती रेघ!!

हाता मधलं फाऊंटन पेन!
झुळझूळणारे थेंब थेंब..
खळखळणारी
खरखरणारी
खदखदणारी
भळभळती रेघ!!

हाता मधलं फाऊंटन पेन!
झिळमीळणारे थेंब थेंब..
वळती
थांबती
वहाती
चिरतीमुरती रेघ

हाता मधलं फाऊंटन पेन!
झगमगणारे थेंब थेंब..
झरझर ताना
झुळझूळ ताना
झिळमीळ ताना
झिरपती रेघ

=======================
स्वाती फडणीस.................. ०८-१०-२००८

कविता

प्रतिक्रिया

फटू's picture

8 Oct 2008 - 8:22 am | फटू

पेन ही एकच वस्तू... पण ते ज्याच्या हातात जातं त्याच्या स्वभावानुसार ते पेन लेखन करतं...

खुप मस्त लिहिलं आहे...

(कधी सळसळती तर कधी भळभळती रेघ ओढणारा)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 7:43 pm | संदीप चित्रे

कविता आवडली... साध्या फाऊंटन पेनवर खूप छान लिहिलं आहे, स्वाती.
(अवांतर -- संदीप खरेची 'अल्कोहोल' कविता आठवली. तुमच्या कवितेचा ओघ असाच वाटला. हे मी सन्मानार्थी म्हणतोय :) )

धनंजय's picture

8 Oct 2008 - 8:29 pm | धनंजय

कवितेची कल्पना आवडली.

चतुरंग's picture

8 Oct 2008 - 8:31 pm | चतुरंग

चतुरंग

स्वाती फडणीस's picture

8 Oct 2008 - 9:45 pm | स्वाती फडणीस

:)

पण मी ही कविता अप्रकाशित ठेवलेली
मला किल्लीचे चिन्ह ही दिसत आहे ... मग?

ऋषिकेश's picture

8 Oct 2008 - 10:34 pm | ऋषिकेश

मस्त! कविता आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती फडणीस's picture

9 Oct 2008 - 3:57 pm | स्वाती फडणीस

:)