तर झालेले असे आहे की, एलिजाबेथ व्होगलर ही एक नाटकात काम करणारी अभिनेत्री आहे. एका प्रयोगादरम्यान ती अचानकच संवाद थांबवुन गप्प झालेली आहे. काही मिनिटात पुन्हा भानावर येते, नाटक पुर्ण करते. त्या दिवसानंतर मात्र तीने पुर्णपणे मौन धरलेले आहे. तिच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांतुन याचे काहीही निदान झालेले नाही, ती पुर्णपणे नॉर्मल आहे पण एकदम गप्प ती गप्पच.( चाफ़ा बोलेना चाफ़ा चालेना सारखी अवस्था ) तिची डॉक्टर सल्ला देते की चेंज म्हणून तु काही दिवस माझ्या समुद्रकिनारी असलेल्या कॉटेज वर जाऊन राहुन ये. तिला सोबत म्हणून एका तरुण नर्स सिस्टर "अल्मा" ला तिच्या बरोबर पाठवते. आता उत्साही बडबडी सिस्टर अल्मा एलिजाबेथ ने किमान एक शब्द तरी बोलावा म्हणून जीव तोडुन प्रयत्न करतेय, दोन्ही बरोबर छान राहत आहेत, सततच्या बोलण्यातुन अल्मा आपले अंतरंग एलिजाबेथ समोर अक्षरश: उघड करत आहे... तिच्या आयुष्याची एक एक गुपिते ती उघड करतेय संवाद साधण्य़ाचा आटोकाट प्रयत्न चालु आहे. पण दुसर्याष बाजुने एलिजाबेथ गप्प ती गप्पच ती फ़क्त ऐकतेय, बघतेय, मुक प्रतिसाद, स्मित देतेय बस्स.... सिस्टर अल्मा चा धीर सुटतोय.... एक दिवस सिस्टर अल्मा ला एलिजाबेथ ने लिहीलेले एक पत्र सापडते... यात तिचा उल्लेख.... दोघांमधला तणाव वाढतच चाललाय... सिस्टर अल्मा आणि एलिजाबेथ दोघींमधील नातं फ़ुलतयं धुमसतयं, विचित्र वळणे घेत चाललयं "Persona " या इंगमार बर्गमान च्या एका चित्रपटाचं हे अतीच त्रोटक वर्णन आहे. गेले काही दिवस मी सलग बर्गमानचे काही मोजके्च चित्रपट ( त्याच्या जवळपास ६० पैकी ) बघितलेत. त्यातील हा एक. सहसा एखादा दिग्दर्शक आवडतो त्याचा एखादा दुसरा फ़ार तर तिसरा चौथा चित्रपट आवडतो नंतर तो त्याची शैली परीचीत झाल्यावर म्हणा वा प्रेडिक्टेबल होतो म्हणा नंतर काही फ़ारसा प्रभावी वाटत नाही. बर्गमान च्या बाबतीत मात्र मला तरी प्रत्येक चित्रपट "हलवुन" टाकणारा असा अनुभव आला. बर्गमान चे मी पाहीलेले सर्व चित्रपट मुळ स्वीडीश भाषेतले इंग्रजी सबटायटल्स असलेले आहेत. एकीकदे सबटायटल्स वाचत वाचत चित्रपट बघतांना नाही म्हटलं तरी काहीना काही सुटतेच आणि अनुवादकर्त्याच्या क्षमतेवर विसंबुन राहणेही आलेच तरीही. म्हणजे हे अडथळे सहज बाजुला सारुनही बर्गमानचे चित्रपट सरळ ह्रदयाला भिडले.
तस पाहीलं तर ( मी बघितलेल्या बर्गमानच्या मोजक्याच चित्रपटांच्या आधारावर मर्यादीत अनुभवावर इन जनरल बोलतोय याची कृपया नोंद असु घ्यावी ) त्याचे चित्रपट बरेचसे ब्लॅक अॅतन्ड व्हाइट आहेत. (पॅशन ऑफ़ अॅडना , इ. रंगीत ही आहेत) त्यात संगीताचा वापर एकंदरीत तुलनेने तसा कमीच पण जिथे केला तिथे ही सुंदरच. तसेच बर्गमान साउंड्स चा प्रभावी वापर मात्र भरपुर आणि अत्यंत सुक्ष्मतेने , तरलतेने करतो.. सध्याच्या चित्रपटांच्या तुलनेने कथानकाचा स्पीड ही कमीच म्हणावा असा. चित्रपटात क्लोज-अप्स सातत्याने आणि लांबीचे, असे असुनही प्रत्येक चित्रपट बघतांना मी नकळत गुंग होत गेलो, एखाद्या संमोहित अवस्थेत बघतच गेलो. याच एक महत्वाच कारण म्हणजे बर्गमान हा एक उत्तम स्टोरीटेलर आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये एक मनाची पकड घेणारी, उत्सुकता वाढवणारी "स्टोरी" असतेच. त्यामुळे चित्रपट बघायाला "जड" जात नाही. ती काळजी बर्गमान व्यवस्थित घेतो. दुसरे एक म्हणजे त्याचे चित्रपट मानवी मनाचा, भावनांचा, तळ शोधतात, अत्यंत मुलभुत अशा अस्तित्व विषयक प्रश्नांना सरळ भिडतात. त्यात असलेले मानवी मुलभुतपण, व्याकुळता, भाव भावना इ. चे संवेदनशील चित्रण आपल्याला फ़ार आतवर हलवुन सोडते कथेशी जोडुन ठेवते.. त्याच्या चित्रपटात कलाकार कमी, फ़ाफ़ट पसारा टाळलेला, लो बजेट चे चित्रपट सर्व मिनीमलीझम चा मामला असतो . मात्र कलात्मकतेची कमाल उंची मात्र प्रत्येक चित्रपटात गाठलेली. बर्गमानच्या चित्रपटातले संवाद तर अनेकदा मार्मिक पातळी गाठतात. उदा. वरील पर्सोना चित्रपटातीलच हा एक संवाद नमुना म्हणून बघावा. यात त्या जीवनाचा प्रगल्भ अनुभव गाठीशी असलेल्या डॉक्टरने एलिजाबेथ व्होल्गर ची केस स्टडी केलेली आहे. ती व्होल्गर ला म्हणतेय...
Elisabeth, I dont think there is any point in your staying at hospital. It,s just hurting you to be here.
Since you dont want to go home, I suggest you and Sister Alma stay at my summer house by the sea.
Dont you think I understand ? The hopeless dream of being. Not seeming, but being.
In every waking moment aware, alert. The tug of war..... what you are with others and who you really are. A feeling of vertigo and a constant hunger to be finally exposed.
To be seen through...cut down.... even obliterated. Every tone of voice a lie, every gesture false, every smile a grimace.
Commit suicide ? You dont do things like that. But you can refuse to move and be silent. Then atleast you are not lying.
You can shut yourself in, shut out the world. Then you dont have to play any roles. show any faces, make false gestures. You,d think so.....
..... But reality is diabolical. Your hiding -place is not water tight.......... life trickles in every where. You are forced to react.
Nobody asks if it is real or not, if you are honest or liar. That,s only important at theater, perhaps not even there....
Elisabeth , I understnad why you, re silent, why you dont move. Your lifelessness has become a fantastic part..
I understand and admire you. I think you should play this part until it is done....... until it is no longer interesting....
then you can leave it , as you leave all your roles...
मी चित्रपटांचा वा तंत्राचा जाणकार नाही. पण बर्गमान प्रत्येक चित्रपटात काहीतरी प्रयोगशील करु बघतोय असे जाणवत राहते. उदा. याच पर्सोना चित्रपटाची ओपनींग अनोखीच आहे. अनेक वेगवेगळे ध्वनी व प्रतिमांची सरमिसळ करुन एक वेगळाच परीणाम बर्गमान प्रेक्षकाच्या मनावर घडवुन आणतो ते स्पष्ट शब्दात मांडता येत नाही आपण चित्रपट स्वत: बघितल्यावरच ते जाणवु शकेल. त्याच्या पॅशन ऑफ़ अॅाना या चित्रपटात कथा सुरु असतांना मध्येच एकेक पात्र थांबुन सरळ प्रेक्षकांशीच चित्रपटाविषयीच बोलत थेट संवाद साधतो. जणु बर्गमान हे सर्व काल्पनीक विश्व आहे याची वारंवार जाणीव प्रेक्षकाला करुन देतोय असे वाटते. याच चित्रपटात मुख्य कथानकाच्या पार्श्वभुमीत (मुख्य कथानक एका बेटावर घडत आहे) आणि पार्श्वभुमीत एक विकृत व्यक्ती सातत्त्याने बेटाच्या परीसरातील पाळीव जनावरांची अत्यंत क्रुरतेने हत्या करतोय. ( तो कोण? का करतोय ? हे शेवटपर्यंत दाखवत नाही ) पण मुळ कथानकाच्या पार्श्वभुमीत हे घडत असल्याचा परीणाम प्रभावी रीतीने मुळ कथानकावर पडत जातो. त्याच्या एका सुंदर चित्रपटात The virgin spring मध्ये ( बेस्ट फ़ॉरेन फ़िल्म चा ऑस्कर मिळालेला.) तर या चित्रपटाच्या एका सीनमध्ये एक विलक्षण सुंदर प्रतिकात्मक प्रसंग दाखवलेला आहे. ज्यात नायक एक झाड तोडु पाहतोय... व ते तुटता तुटत नाहीये.. जी एक ईश्वरीय श्रद्धा मानवी मनाच्या अंतरंगात खोलवर रुजलेली आहे तिला उखडुन फ़ेकणे तिचा त्या मुलभुत श्रद्धेचा त्याग माणसाला किती अवघड आहे. असे काहीसे सुचवणारा तो प्रसंग. याच चित्रपटातील एका प्रसंगात अगदी एका सेकंदापुरते दर्शन देणारा भेसुर कावळा, इ. प्रतिमा मनात रुतुन बसतात. या चित्रपटाच्या कथानकाची पकड जबरदस्त आहे. तेराव्या शतकातील एका स्वीडीश संगितीके वर आधारीत हा चित्रपट आहे. यात एक सनातनी धार्मिक ख्रिश्चन कुंटुंब आहे. जे एका कुठल्याशा दुर्गम थंड प्रदेशात राहत आहेत. यांच्या तरुण कोवळ्या निरागस मुलीला "करीन" ला ते शेजारच्या गावातील चर्च मध्ये कॅन्डल्स पोहोचवण्यासाठी पाठवतात. सोबत इंगेरी या गर्भवती नोकराणी ची सोबत आहे. इंगेरी बलात्कार पिडीता किंवा व्याभिचारातुन बहुधा गर्भवती झालेली आहे. एक तिरस्कार सहानुभुती मिश्रीत वागणुन तिला कुटुंबीय देतांना दिसतात. तर या दोघींना घोड्यावर बसुन जातांना त्यांना वाटेत जंगल लागते. तिथे त्यांना तीन गुराखी भेटतात त्यातला एक कोवळा मुलगा आहे. निरागस करीन त्यांच्या शी गप्पा मारत त्यांना जेवण्याचा आग्रह करते. आईने आज करीन ला नविन सुंदर महागडा झगा दिलेला आहे. तो घालुन अत्यंत आनंदात ती आहे, ते सर्व सोबत जेवतात.. त्यानंतर पुढे त्यातले दोन्ही पुरुष करीनवर बलात्कार करतात. तिच्या निरागसतेला क्रुरतेने कुस्करुन तिचा खुन करतात. तिचे महागडे कपडे काढुन घेतात. सोबतचा लहान मुलगा भांबावुन भेदरुन हे सर्व बघत आहे.... त्याला दोन्ही भाऊ धमकावतात...इंगेरी हा सर्व प्रसंग होतांना लपुन बघते एक क्षण ती गुराख्यांना मारण्यास दगडही उचलते. पण तिच्या मनातला करीनविषयीचा द्वेष उफ़ाळुन आल्याने तो दगड पुन्हा टाकुन देते व घटना घडु देते. आता तिन्ही गुराखी योगायोगाने रात्री आसरा शोधत करीनच्या च घरी आलेले आहेत. कुटुंबियांना अर्थातच त्यांच्या विषयी काहीच माहीत नाही..... पुढे कथा सुरु राहते..... या चित्रपटात आलेली कथा, त्यात दाखवलेली करीन ची निरागसता, इंगेरीचा द्वेष हताशा तिच्या द्वेषामागुन फ़रफ़टत जाणारा तिचा विवेक.. या चित्रपटाभर पार्श्वभुमीत एक पात्र बनुन वावरणारा तटस्थ क्रुर निसर्ग, आणि सर्वात कळस म्हणजे करीन च्या बापाची श्रद्धेच्या मुळांना घट्ट धरुन ठेवण्याची तगमग, त्यातुन त्याने घेतलेले प्रायश्चित्त तसेच झालेल्या घटनेचा अन्यायाचा अर्थ न लावता आल्याने निर्माण होणारी अस्वस्थता व त्या व्याकुळतेतुन त्याने केलेली प्रार्थना. उपस्थित केलेले प्रश्न प्रेक्षकाच्य मनावर मोठा परीणाम घडवुन आणतात. प्रेक्षक एकाचवेळी विचारप्रवृत्त आणि सुन्न होत जातो. विख्यात दिग्दर्शक अॅंाग ली ( पाय चा ) त्यांच्या एका मुलाखतीत बर्गमान च्या १९६० च्या चित्रपटाचा त्यांच्यावर झालेला परीणाम सांगताना एका सीन कडे लक्ष वेधतात. ते त्यातील करीन चा बाप जेव्हा क्लायमॅक्स च्या सीनमध्ये प्रार्थना करतो तेव्हा तो प्रेक्षकांकडे पाठ करुन दाखवलेला आहे जो जनरली असे सहसा चित्रपटांत सर्व सीन प्रार्थनेचे जे असतात त्याहुन सर्वस्वी भिन्न असा आहे. ज्यात प्रेक्षक एका अंतराहुन एका तटस्थ अंतराहुन त्या नायकाशी स्वत:ला रीलेट करु शकतात. वुडी अॅेलन, स्टीव्हन कुलब्रीक, सारखे अनेक महान दिग्दर्शक बर्गमानच्या सिनेमा विषयी भरभरुन बोलतात त्यांच्यावरील बर्गमानचा प्रभाव दिसुन येतो. बर्गमानचा कल बहुधा नास्तिकतेकडे झुकलेला असावा असे त्यांच्या मुलाखतीवरुन प्रथमदर्शनी वाटते . पण हा सर्वस्वी वेगळा भाग झाला. ते आपल्या चित्रपटांतुन जे मुलभुत अस्तित्व विषयक श्रद्धे विषयक प्रश्न उपस्थित करतात ते व ते ज्या कलात्मकतेने म्हणजे तत्वशरण न होता कलाशरण होऊन जे प्रश्न उभे करतात ते सुंदर अप्रतिम आहे अनुभवण्यासारखं आहे.
उदा. त्याच्या फ़ेथ ट्रियॉलॉजी मध्ये ज्यात एक through a glass darkly व Winter Light आणि The Silence हे तीन चित्रपट येतात. यातील मला विशेष आवडलेला विंटर लाइट हा चित्रपट यात एक प्रीस्ट दाखवलेला आहे..ज्याच्या चर्चमध्ये आता येणार्याl भाविकांची संख्या फ़ारच कमी झालेली आहे. एक दिवस चायना आपल्या देशावर अणुहल्ला करणार अशी नुसती अफ़वा बातमी कळल्यानेच प्रचंड धास्तावलेला व डिप्रेशनमध्ये गेलेला एक गावातला साधा्सुधा माणुस आपल्या पत्नी बरोबर चर्च मध्ये आलेला आहे. त्याची पत्नी प्रीस्ट ला विनंती करते की तु याला काहीतरी समजव. ही घटना अगोदरच अंतरंगातील श्रद्धा विझुन गेलेल्या प्रीस्ट साठी एक निमीत्त मात्र होते. तो समजवण्याऐवजी उलट याच माणसाकडे स्वत:च्या मनात असलेली ईश्वरविषयीची अश्रद्धा Doubt शेअर करतो. त्याला जाणवत असलेला ईश्वराचा तटस्थपणा , चर्चच्या रटाळ रीच्युअल्स चे आलेले बोअरडम इ.इ. तो शेअर करु पाहतो. हा माणुस प्रीस्ट ला काही न बोलता बहाणा करुन चर्च मधुन निघुन जातो. व काही वेळाने बातमी येऊन धडकते की त्याने गावाबाहेरच्या नदी शेजारी आत्महत्या केलेली आहे.... यातीलच एक संवाद कमालीचा उत्कट असा आहे जो थेट जीझसच्या च्या वेदनेला एकाकीपणाला व्यक्त करतो. यातील एक पात्र अनपेक्षीतपणे जो प्रीस्टच्च्या चर्च चा बहुधा नेहमीचा मेंबर असतो. तो प्रीस्ट शी चर्चा करतो त्यात तो म्हणतो की जीझस ला शारीरीक वेदना झाल्या त्या काही फ़ारशा महत्वाच्या वाटत नाहीत. फ़ार तर काय चार एक तास त्याने ते सर्व फ़िजीकल टॉर्चर सहन केले असेल त्यापेक्षा तर जास्त मी माझ्या जीवनात शारीरीक वेदना सहन केली असेल ते ही अधिक दिर्घ काळा पर्यंत ( हा माणुस कुबडा कुठल्याशा जुनाट व्याधीने ग्रस्त आहे) तो म्हणतो त्याच्या मते जीझस ची वेदना ही त्यापेक्षा बरीच खोलवर अशी मानसिक वेदना होती ज्यातुन तो गेला. ती अशी तो प्रीस्ट ला म्हणतो.
I feel he ( jesus) was tormented far worse on another level. May be I've got it all wrong, but just think of Getthsemane, Pastor, Christ's disciples fell asleep.
They hadn't understood the meaning of the last supper or anything. And when the servants of the law appeared they ran away. and Peter denied him. Christ had known his disciples for three years. They'd lived together day in and day out, but they never grasped what he meant. They abandoned him to the last man,.He was left all alone. That
must have been painful. To realize that no one understands. To be abandoned when you need someone to rely on. That must be excruciatingly painful. But the worst was yet to come. when jesus was nailed to the cross, and hung there in torment he cried out, "God, my God why hast thou forsaken me ? " He cried out as loud as he could. He thought that his heavenly father had abandoned him. He believed everything he'd ever preached was a lie. In the moments before he died, Christ was seized by doubt,
Surely that must have been his greatest hardship? God;s Silence
प्रीस्ट स्वत: याच गॉड्स सायलेंस ला प्रश्नांच्या प्रतिसादात मिळत असलेल्या मौनाच्या भयाण निरर्थक पोकळीला अनुभवतोय तो हे ऐकुन केवळ येस असे म्हणतो. या साखळीतील पुढील तिसर्या् चित्रपटाचे नाव द सायलेंस असे आहे. बर्गमानची ही faith triology श्रद्धेचा फ़ार मुलगामी असा वेध अत्यंत कलात्मकतेने निखळ मानवीय पातळीवरच राहुन घेते. म्हणून यातील पात्रे फ़ार जवळची जिवंत वाटतात कोरडी फ़िलॉसॉफ़ीकल वाटत नाहीत.
Hour of wolf हा बर्गमानचा आणखी एक वेगळाच चित्रपट. हा अतिशय अंगावर येणारा असा डार्क व बराचसा गुढ आहे. यात एक चित्रकार जोहान बोर्ग आपल्या पत्नी बरोबर एका छोट्या बेटावर राहत आहे. याला बरेच दिवसांपासुन निद्रानाशाचा विकार जडलेला आहे. वेगवेगळे विचित्र लोक त्याला भेटतात ज्यात लेडी वुइथ हॅट आहे एक शाळामास्तर आहे, कोणी बर्ड मॅन आहे. अल्मा ला त्याच्या पत्नीला त्याची काळजी वाटतेय, ती ही त्याच्याबरोबर रात्रीची जागुन त्याला सोबत देत आहे धीर देत आहे. एक दिवस एक अनोळखी म्हातारी अल्मा ला भेटते व तिला जोहान ची डायरी वाचायला सांगते. जोहान ची डायरी अनेक गुपिते अल्मासमोर उघड करते. एक दिवस जोहान पेंटींग करत असतांना त्याला त्याच बेटावरील "कॅसल" मध्ये राहत असलेल्या श्रीमंत कुटुंबातील बॅरॉन कडुन जेवणाचे आमंत्रण मिळते. तो जोहानला सांगतो की त्याला व त्याच्या बायकोला जोहान च्या पेंटींग्ज फ़ार आवडतात. जोहान व अल्मा त्या कॅसल मध्ये डिनर साठी जातात...... पुढे चित्रपट अधिकाधिक इंटेन्स होत जातो...... यातही बर्गमानच्या काही नाविन्यपुर्ण क्रिएटीव्ह ट्रीक्स येतात. जसे चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा नावं झळकत असतात तेव्हा पार्श्वभुमीत बर्गमान आपल्या सेट वरील लोकांना सुचना देतोय, स्टाफ़ बरोबर चर्चा करतोय शॉट च्या तयारीचे आवाज इ. विविध आवाज जे रीअॅ लीटी दर्शवतायेत ते येतात. त्यानंतर अल्मा ( लिव्ह उलमन) ही सरळ बहुधा प्रेक्षकांकडे पाहुन स्टोरीची सुरुवात करते. तिचा नवरा काही वर्षांपुर्वी बेटावरुन हरवलाय त्याविषयी बोलतेय अशी सुरुवात होते.फ़्लॅशबॅक सुरु होतो. चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ जोहान च्या एका संवादातुन उलगडतो ज्यात तो अल्मा ला जेव्हा दोन्ही असेच रात्रीचे जागे असतात तेव्हा सांगतो.तो म्हणतोय
There was a time when nights were for sleep...deep dreamless sleep I can not sleep I wake out of fear. .............I have held vigil each night until daylight. but this is the worst hour. The old people used to call it the " the hour of the wolf" Its, the hour at which most people die.and most children are born. It;s now that the nightmares come to us.. and if we are awake... we are afraid........ रात्री ३ ते ४ ची वेळ ही अशी असते अशी एक लोक मान्यता स्वीडनमध्ये आहे.
हा चित्रपट हॉरर तर आहेच मात्र अर्थातच टीपीकल हॉरर चित्रपटांसारखा वा त्या दिशेने जाणारा नसुन भयाचे वेडेपणाचे पाताळ धुंडाळणारा दाखवणारा आहे. चित्रकाराच्या अल्माच्या नेणीवेतील उलथापालथ फ़ार प्रत्ययकारकरीत्या यात समोर येते. यातल्या अनेक प्रतिमा अंगावर येतात. या चित्रपटातले बेटावरील वातावरण, कॅसल मधली फ़ॅमिली त्यातले स्त्री पुरुष, त्यांच्या sexual फ़ॅन्टसीज, तिथले काही सीन्स विशेषत: climax चा मनावर कमाल परीणाम करणारा असा आहे. भंजाळुन सोडणारा सिनेमा असे म्हटले तर कदाचित योग्य होइल. यातील Max von Sydow आणी LIv ullmann या दोघांचा अभिनय निव्वळ अद्वितीय असा आहे. हे दोन्ही कलाकार बर्गमानच्या अनेक चित्रपटांतुन पुन्हा पुन्हा येतात. बर्गमान थिएटर ही करत असे ( त्याच्या नाटकांची संख्या चित्रपटांपेक्षा जास्त होती ) आणि चित्रपट ही बनवत असे. Max आणि Liv दोन्ही त्याचे थिएटरमध्ये ही काम करत बर्गमानचे एक नाटक sade वरील सापडलेय ते अजुन बघायचेय.. हा चित्रपट केवळ Max von Sydow चा अफ़ाट अभिनय या एकमेव कारणासाठीही बघता येऊ शकतो. अजुन एक जर तुम्ही बर्गमान चे चित्रपट बघितले नसतील तर या सिनेमा ने सुरुवात करु नये असे सुचवावेसे वाटते हा शेवटी ठेवावा. म्हणजे जी.ए. ची निळासावळा ने किंवा मार्क्वेझ ची ऑटम ऑफ़ पॅट्रीआर्क ने सुरुवात केली तर पुढचे दुसरे सुंदर टाळले जाण्याची शक्यता वाढते तसे काहीसे तर सुरुवात कोणत्या चित्रपटाने करता येईल ?
मला आपलं एक वाटतं की Wild Strawberries हा एक अप्रतिम चित्रपट बर्गमानचा याने सुरुवात केली तर बरे. यात एक वृद्ध डॉक्टर च्या जीवनातील एक महत्वाचा दिवस उजाडलाय... त्याला एक लाइफ़ टाइम अॅेचीव्हमेंट सारखा एक पुरस्कार विद्यापीठाकडुन मिळणार आहे. त्यासाठी त्याला शहरात जायचे आहे. त्याच्या सोबत त्याची सुन येते,, मुलगा नंतर त्यांना जॉइन करणार आहे. सुनेबरोबर म्हातार्याेचे संबंध तणावाचे आहेत. ती सिगरेट पेटवते तो तिला थांबवतो, म्हातारा सुनेला विचारतो की तुला माझ्याविषयी काय तक्रार आहे ? त्यावर सुन म्हणते की You are selfish old man, Uncle Isak ! you are utterly ruthless and never listen to anyone but yourself. But you hide it all behind your old-world manners and charm. म्हातारा आता रागवत नाही. तो ऐकुन घेतोय. तो तिला त्याला पडलेल्या एका स्वप्नाविषयी सांगतो. यातील दोन ड्रीम सीक्वेन्स अत्यंत सुंदर असे आहेत एकात त्याच्या मृत्युचे सुचन असलेले व दुसर्याण एका ड्रीम सीक्वेन्स मध्ये त्याची परीक्षा घेतली जात आहे असा सीन आहे. ज्यात समोर क्लास मध्ये निस्तब्ध विद्द्यार्थी बसलेले आहेत व परीक्षक एक एक करुन त्याला प्रत्येक चाचणीत फ़ेल करतोय. ( तो अवॉर्ड स्वीकारायला जातोय या पार्श्वभुमीवर हा ड्रीम सीक्वेन्स फ़ार मार्मिक विरोधाभासात दाखवलेला आहे हे दोन्ही अप्रतिम ड्रीम सीक्वेन्स मुळातुनच बघण्यासारखे आहेत. ) मध्येच एके ठिकाणी कार थांबवुन सुनेला तो ज्या एका समर हाऊस मध्ये लहानपणी दर उन्हाळ्यात 8-10 भावंडांसोबत राहायला येत असे ते घर दाखवतो. तिथे म्हातार्या्चे निवेदन ऐकु येते the place where wild strawberries grow. Perhaps I got a little sentimental. म्हातार्याथला बालपणीच्या घरातील भावंडासोबत व्यतीत केलेले सुखाचे दिवस आठवतायेत. त्याला त्याच्या बालपणीच्या पहीले प्रेम असलेल्या सारा च्या आठवणी येताहेत. दोघांनी सोबत वेचलेल्या वाइल्ड स्ट्रॉबेरीज आठवतायेत. बहीरा अंकल आरोन त्यासाठी त्याच्या फ़ॅमिलीतील जुळ्या बहीणींनी गायलेली गाणी या सर्व सरुन गेलेल्या दिवसाची चित्रे म्हातार्याgच्या डोळ्यासमोरुन तरळत आहेत. या तंद्रीत असतांनाच एका गोड तरुण मुलीच्या प्रश्नाने त्याची तंद्री तुटते. ती विचारतेय हे घर तुझे आहे का ? बोलण्यात पुढे असे कळते की तिचेही नाव साराच आहे ती त्याला लिफ़्ट मागते. सोबत तिचे दोन मित्र ही असतात. म्हातारा आनंदाने साराला व तिच्या दोन मित्रांना लिफ़्ट देतो आता हे चारही जण पुढे प्रवासाला निघालेत. अवखळ अल्लड इनोसंट सारा मागे दोन्ही मित्रांच्या मध्ये बसते एक व्हिक्टर आहे एक अॅघन्ड्रेस. दोन्ही माझ्या वर मरतात मी कोणाची निवड करु अशी बडबड सारा करत राहते. दोन्हीत एक आस्तिक एक नास्तिक आहे. मध्येच प्रवासात एके ठिकाणे ते दोन्ही एकमेकांबरोबर वाद घालत मारामारी करु लागतात.त्यांना समजवुन परत गाडीत बसवले जाते. साराची गोड बडबड सुरुच असते. हा मजेदार सुंदर नॉस्टॅल्जीक प्रवास सुरु राहतो. पुढे इसाक त्याच्या आईला वाटेवरील गावात थांबुन भेटतो. सारा हे त्याचे कोवळे असफ़ल पहीले प्रेम प्रकरण आहे. आणि त्याचा विवाह जिच्याशी झालेला आहे तो ही अपयशी होता असे समजत जाते. एक संपुर्ण आयुष्य एका प्रवासात फ़्लॅशबॅक मध्ये इसाक जगतो जे बर्गमान हळुवारपणे उलगडत जातो. यातुन सिनेमा पुढे सरकत राहतो. याचा अनुभव शब्दात मांडणे अवघड आहे असे मला हा प्रयत्न आता इथे या चित्रपटाविषयी लिहीतांना जाणवतोय. हा अनुभव तुम्ही स्वत: घ्या इतकेच मी म्हणतो जर तुम्हाला बर्गमानचा एखादाच सिनेमा बघायचा असेल तर हा बघा असे सुचवतो.
सध्या इथेच थांबतो.
इंगमार बर्गमान च्या एका दुर्मिळ इंटरव्ह्यु साठी ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=85NzBOjVe6c
बर्गमानच्या चित्रपटावरील सुंदर चर्चेच्या व्हीडियोज ची ही लिंक जी तुम्हाला एकेक सिनेमाविषयी सुरेख परीचय देईल.
https://www.youtube.com/user/breakingdownfilms
वुडी अॅीलन ची बर्गमानवरील लिंक
https://www.youtube.com/watch?v=npHqAO3hj54
अॅंग ली ची बर्गमानवरील लिंक
https://www.youtube.com/watch?v=vfUzWn_R7jE
प्रतिक्रिया
19 Mar 2017 - 6:47 pm | जयंत कुलकर्णी
श्री. मारवा,
सुंदर लेख. चित्रपट कळायला अवघड. (मी जवळजवळ सगळेच पाहिलेत) पण बर्याच जणांना आवडत नाहीत. जरी आवडले नाहीत तरी त्यांना ते चित्रपट अनेक महिने आठवत राहतात... मग एक दिचस त्यांना साक्षात्कार होतो की काहीतरी वेगळे आपण अनुभवले आहे व त्यांची पावले परत त्याच्या दुसर्या चित्रपटाकडे वळतात. :-)
धन्यवाद !
19 Mar 2017 - 7:51 pm | मारवा
मला ही सर्वच चित्रपटां चा पुर्ण अर्थ कळला नेहमीच असे काही झाले नाही. पण एक एक नवा पैलू कधी तरी गवसतो अचानक मग आनंद होतो. नसेलही कळला कधी तरी बर्गमानच्या चित्रपटांची एक तीव्र तहान लागते. मन ओढले जाते नकळत हे मात्र खरे.
19 Mar 2017 - 9:09 pm | मि अँडरसन
लेखाचं शीर्षक वाचूनच प्रतिक्रिया देत आहे
Ingmar Bergman आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक..
Wild starwberries बदद्ल एकदा वाचनात आलं
त्यानंतर शोधून तो मिळवला आणि तो पाहून हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढंच कळलं
त्यानंतर The Seventh Seal पाहिला
पण Persona म्हणजे कहर होता.
त्यामागची कल्पना, दिग्दर्शन सगळंच अफाट..
बाकी नंतर लिहीनच.
तूर्तास Ingmar बर्गमन ह्यांच्या आडनाव भगिनी असलेल्या सुंदरी (Ingrid Bergman ) वर पण कधीतरी लिहावं असं सुचवतो :P
23 Mar 2017 - 3:53 am | एमी
छान लेख आहे.