वर्ष भरा पूर्वी अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० या धाग्यात इन In-Ear Canal Headphone बद्धल लिहले होते. सेनहायजर च्या एचडी २०२ आणि सी एक्स ३.० अनुभव घेउन झाल्यावर काही अनुभवलेल्या गोष्टी शेअर करतो.
१} एचडी २०२ अजुनही उत्तम चालतोय, पण डोक्याला घट्ट बसणार्या स्पंजवर असलेले आवरण अगदी हलक्या दर्जाचे निघाले ! काही काळातच ते निघुन गेले.बाकी काही त्रास नाही.
२} सी एक्स ३.० हा मी वापरलेला सगळ्यात कानात अगदी सुखदायक रित्या आरामात बसणारा In-Ear हेडफोन ठरला, पण काही काळापूर्वी त्याची सिलिकॉन टिप्स निघण्याचा त्रास जाणवु लागला ! शेवटी इकडए-तिकडे कुठेतरी शेवटी ती पडलीच ! तसेच वायर हलक्या दर्जाची निघाली आणि ती आता काही ठिकाणी विरण्यास सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी ती जवळपास तुटल्यात जमा आहे, तरी सुद्धा कानाला न सहन होणारे मोठे सिलिकॉन टिप्स लावुन अधुन मधुन वापर ठेवला आहे.
संगीत माझा श्वास आहे, हेडफोन्स वापरणे कमी झाल्याने अर्थातच संगीताच्या आनंदाला, समाधानाला मुकलो आणि श्वास अपुरा पडु लागला !
सेनहायजर चा हा अनुभव आल्याने साहजिकच मी दुसर्या ब्रांडचा शोध घ्यायचा निर्णय घेतला, तो शोध मला ऑडियो टेक्निका ATH-M20X पर्यंत घेउन गेला.
कायअप्पा वर मिपाकर मित्र मंडळींना विचारणा केल्यावर गोगल्या यांच्याकडुन या ब्रांड बद्धल एक पॉझिटिव्ह फिडबॅक मिळाला, मग तू-नळीवर काही शोधा शोध आणि जालावर थोडीफार माहिती मिळल्यावर ऑरड प्लेस केली.
हा ट्रू फ्लॅट साउंड हेडफोन आहे... त्या बद्धल थोडे फार खालील इडियोत कळेल.
बॉक्स मध्ये हेडफोन १-२ कागदपत्र आणि एक जॅक पीन सोडुन अजुन काही नाही...
आता ATH-M20X चा आत्ता पर्यंतचा अनुभव...
आनंद ! निव्वळ आनंद आणि अजुन काही नाही ! :)
सेनहायजर च्या मी वापरलेल्या हेडफोन्सची तुलना करायची झाल्यास ऑडियो टेक्निका ATH-M20X हा कैक पटीने पुढे असुन सांउंड क्वालिटी अल्टिमेट आहे ! प्रत्येक बिटचा सुखद आनंद हा हेडफोन वापरताना घेता येतो.. खरंतर याची सेनहायजर शी तुलना करणेच चूक ठरेल इतकी साउंड क्वालिटी अप्रतिम आहे !
कुठलाही हेडफोन घेतल्यावर अर्थातच मी एक साउंड ट्रॅक त्यावर ऐकतुन पाहतोच पाहतो... आणि त्याने मला क्वालिटीत किती फरक आहे ते पटकन समजते !
तो ट्रॅक इथे देउन मी हा धागा आवरता घेतो....
तुमच्या फेडफोन्स रिलेटेड अनुभवासाठी हा धागा खुला आहे... :)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
17 Mar 2017 - 1:45 pm | किसन शिंदे
केवढ्याला पडला? =))
बाकी वरच्या फोटोतल्या छोटूच्या चेहर्यावरचे आनंदाचे भाव अवर्णनीय आहेत.
ट्रॅकबद्दल धन्यवाद. मी आता नेहमी हाच ट्रॅक वापरत जाईन हेडफोन्सच्या टेस्टींगसाठी.
17 Mar 2017 - 2:03 pm | मदनबाण
केवढ्याला पडला? =))
उत्तर इकडे सापडेल... =))
बाकी वरच्या फोटोतल्या छोटूच्या चेहर्यावरचे आनंदाचे भाव अवर्णनीय आहेत.
धन्स... माझा गोडांबा, माझी लेक. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]
18 Mar 2017 - 4:08 am | पाषाणभेद
मुलीच्या चेहेर्यावरचे भाव पाहून धागा वाचल्याचे सार्थक झाले!
17 Mar 2017 - 2:04 pm | मोदक
छ्या... हा धागा लिहिलात होय.. सध्याची प्रतिक्रिया - ठीकठाक लिखाण.
आपल्या मुख्य आणि महत्वाच्या विषयावर आधी लेख लिहा.. (मग इथे नीट प्रतिसाद देतो.)
;)
17 Mar 2017 - 2:12 pm | मदनबाण
हा.हा.हा....
आपल्या मुख्य आणि महत्वाच्या विषयावर आधी लेख लिहा.. (मग इथे नीट प्रतिसाद देतो.)
अश्या अटी घालुन कधी पासुन प्रतिसाद ध्यायला लागलास ? बाकी त्या विषयावर जरा माझी तंद्री लागताच लिहीन. हा धागा कसा झटपट कॅटेगरी मधला आहे ! ;)
चल... आता नीट प्रतिसाद दे पाहु ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]
17 Mar 2017 - 2:25 pm | मोदक
हा हा... =))
धागा नेहमीप्रमाणे बेष्ट..!
आम्ही क्रीएटीव्हचे हेडफोन वापरणारी साधी माणसे काय बोलणार याबद्दल.. ;)
17 Mar 2017 - 7:27 pm | खटपट्या
हेच म्हणतोय
17 Mar 2017 - 9:06 pm | सुमीत भातखंडे
नवीन हेडफोन्स बद्दल अभिनंदन. AT म्हणजे प्रश्नच नाही.
(बल्यूटूथ प्रेमी) सुमीत भातखंडे
17 Mar 2017 - 9:22 pm | चौकटराजा
श्री मदन भाउ . संगीत आपला श्वास आहे हे वाचून मनस्वी आनंद . आपल्या सुसज्ज हेडफोन वर तू नळीवरचे रॉन गुडविन यांच्या कलाकृत्ती ऐका. खास करून॑ त्यातील स्ट्रींग सेकशन.मेलडी म्हणजे नक्की काय याचे उत्तर रॉन गुडविन.
18 Mar 2017 - 12:39 am | मदनबाण
धन्यवाद...
आपल्या सुसज्ज हेडफोन वर तू नळीवरचे रॉन गुडविन यांच्या कलाकृत्ती ऐका.
सवड मिळताच नक्की ऐकेन, सुचना केल्या बद्धल आभारी आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees
17 Mar 2017 - 10:03 pm | कंजूस
दिलेला व्हिडिओ रिव्ह्यु डाउनलोड करून पाहिला. मस्त काम केलेत. हा हेडफोन इनइअर नाही त्यामुळे फरक पडतोच. गोडुलीचा फोटो झकास.
मला वाटतं आपला ढोल ताशाचा ओडिओ हेडफोन्सच्या फ्रिक्वन्सी टेस्टसाठी योग्य असावा-( स्टिरिओ, साउंडस्टेजिंगसाठी नाही)
18 Mar 2017 - 12:39 am | मदनबाण
मला वाटतं आपला ढोल ताशाचा ओडिओ हेडफोन्सच्या फ्रिक्वन्सी टेस्टसाठी योग्य असावा
ते हिंदीत म्हणताना काय ते ? हं दिल के पास वगरै ! तसेच Axel F चा हा ट्रॅक माझ्यासाठी आहे. बाकी एनव्हार्यमेंन्टचा सुद्धा फरक पडतोच ! उदा. तुम्ही दिलेला ट्रॅक हा स्ट्रीट एनव्हार्यमेंन्टचा आहे. माझा प्रयास असतो मूळ कंपोझर ने कसे कंपोझ केले आहे ते ऐकणे + वेगवेगळ्या इनस्ट्रूमेंटचा आनंद घेणे, मग ते नविन असोत वा नविन टेक्नोलॉजी. मी कधीच इक्विलायजर वापरत नाही.इं इं इं...
गोडुलीचा फोटो झकास.
थांकु. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees
18 Mar 2017 - 5:45 am | रेवती
मुलीचा फोटू छान आहे रे बाणा.
18 Mar 2017 - 9:56 am | जव्हेरगंज
सही!!!
घ्यावा लागेल. सध्या sony चा मोडकळीस आलाय!
18 Mar 2017 - 9:59 am | मदनबाण
बिनधास्त घ्या. फक्त लक्षात ठेवा, कॉड बरीच लांब आहे. :)
@ दफोराव आणि आज्जे.
धन्यवाद. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees
9 Jul 2017 - 1:22 pm | मराठी_माणूस
हा मोबाइल साठी चालणार नाही का ? कारण Q/A मधे त्यांनी "will not work good in mobiles. " असे म्हटले आहे.
13 Mar 2021 - 6:13 pm | मदनबाण
हा मोबाइल साठी चालणार नाही का ? कारण Q/A मधे त्यांनी "will not work good in mobiles. " असे म्हटले आहे.
मी माझ्या मोबाइलवर इतके वर्ष वापरतोय आणि मला कुठलीही त्रुटी जाणवली नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्यांची इतिहास नोंद ठेवत नाही.
14 Mar 2021 - 12:40 pm | मराठी_माणूस
धन्यवाद.
काही दिवसापुर्वी OneOdio A71 Over Ear Headphones with Mic हा घेतला.
14 Mar 2021 - 1:37 pm | मदनबाण
ओक्के. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )
13 Mar 2021 - 9:10 pm | चौथा कोनाडा
छान लिहिला आहे रिव्हिव्यू !