विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे
उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे
विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची
उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची
विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते
विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते
विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो
उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो
विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे
उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे
विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सुंदरी
उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे बरा वैमानिकही
प्रतिक्रिया
5 Mar 2017 - 3:55 pm | एस
छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.
5 Mar 2017 - 3:57 pm | एस
छान आहे कवितेतील तत्त्वज्ञान.
5 Mar 2017 - 4:03 pm | संजय क्षीरसागर
विमान असते धावत जेव्हां, वाटे बरा वैमानिकही
उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे हवी हवाई सुंदरी
5 Mar 2017 - 5:47 pm | संदीप-लेले
विनोदाने म्हणत असाल तर ठीक आहे.
वैमानिकाकडे विमानाचा कंट्रोल असतो. या अर्थी तसं लिहिलं आहे.
5 Mar 2017 - 11:02 pm | वेल्लाभट
सुंदर
27 Mar 2017 - 6:22 pm | संदीप-लेले
आज पाहिल्या काही प्रकतीक्रीया. सर्वांचे आभार :)