मन

अमिता राउत's picture
अमिता राउत in जे न देखे रवी...
2 Mar 2017 - 10:16 pm

का कुणास ठाऊक उगाच
मन उदास होत
आतल्या आत कुढत असतं.

अपेक्षांचं ओझ उगाच
खांदयावर पेलत असतं ,
पूर्ण झाल्यातर आनंद नाही
तर रागराग करत बसतं.

मनाचा खेळ सारा ,
घटकेत भविष्यात तर,
घटकेत भूतकाळात तरंगळत असतो.

वेध घेता भविष्याचा
भूतकाळ पायाशी घुटमळत असतो ,
पाऊल टाकता पुढच
चर्र्कन भूतकाळ झोंबून जातो.

असचं जगतो प्रत्येकजण
गटांगळ्या खात, पण वर्तमानाचा
कुणाला पत्ताच नसतो.

कर्णी सगळी मनाची,
पण दोष मात्र चेहऱ्याला
क्षणांत हसरा तर
क्षणांत हिरमुसलेला.

काय हवं असत या मनाला?
एकदा विचारावं त्यांनी त्याच्याच मनाला
मग कळेल घालमेल चेहऱ्याची.

आकाशात ढग दाटावे तसे
विचार येतात भरून , कधी
गर्जना तर कधी सर येते धावून.

रडता रडता हसतांना ,
अलगद डोळे पुसतांना ,
अन हळूच कुशीत शिरतांना
तुलाही बर वाटतन रे मना ……

कविता