मध्यान

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
5 Oct 2008 - 9:53 pm

वय तुझे होता चाळीस पाहून
आठवते मज ते मध्यान
पाहता मागे वळून
डोकावते मन चार दशकातून
पहीले दशक गेले अल्लड्तेतून
दूसरे गेले अध्यापनातून
तिसरे दशक निघून गेले
विश्वाच्या रहस्याला उलगडण्यातून
चवथ्या दशका मधून जाईल
तो समय अनुभवण्यातून
नंतर
येवोत अनेक दशके एकामागून
लिहीली जातील पाने इतिहासाची
भुतकाळाला निश्चीत स्मरून

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

फटू's picture

6 Oct 2008 - 1:48 am | फटू

इंजिनीयरींग तुझे पुर्ण होता पाहून
आठवते मज ते शिक्षण
पाहता मागे वळून
डोकावते मन चार वर्षातून
पहिले वर्ष गेले इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकण्यातून
दुसरे गेले डायोड आणि ट्रांझीस्टर समजण्यातून
तिसरे वर्ष निघून गेले
ही झकमारी आपण का करतोय हा विचार आवरण्यातून
चौथे वर्ष जाईल
(सेमिनार आणि प्रोजेक्ट साठी ) रात्री जागवणं अनुभवण्यातून
नंतर
येवोत अनेक वर्षे एकामागून
लिहिल्या जातील ओळी सी, सी प्लस प्लस च्या
त्या चार वर्षांना निश्चीत स्मरून

(आमची ही पर्तीक्रिया काकांच्या कवितेचा यिडंबन नाय. जवापास्ना आपुन जोडाक्शरा शिकलो तवापास्ना आपुन कविता, चारोल्या "पाडताव". आम्ची ती सोघोशीत जागीरीच हाय म्हना ना. आनी आम्च्या ह्या जागीरीत आमाला कुनी च्यायलेंज दिलेला आजिबात खपत नाय. तवा हा आम्चा काकांच्या वोपन च्यायलेंजला उत्तर हाय.)

काका, ह. घ्या. हे सां. न. ल. :)

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Oct 2008 - 3:23 am | श्रीकृष्ण सामंत

सतीश ,
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल आभार.
मला सुद्धा असंच वाचून वाचून प्रेरणा येतात.आणि नकळत निर्मिती होते.
आपला दोष नाही . हा प्रेरणा देणारा "निसर्ग स्टुपीड"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:08 am | विसोबा खेचर

येवोत अनेक दशके एकामागून
लिहीली जातील पाने इतिहासाची
भुतकाळाला निश्चीत स्मरून

सुंदर कविता....!

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Oct 2008 - 10:37 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com