इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जे न देखे रवी...
25 Feb 2017 - 8:49 pm

प्रेर्ना - पिरा तैं चा धागा
मूळ कविता - गदिमा

चला जाउ द्या पुढे हि चर्चा
अजुनी नाही धागा संपला
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !

आणखी थोडा व्हिजा वाढवू
काही वर्षं अजून थांबू
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !

नाही गर्दी नाही प्रदूषण
जीवन इथले असे विलक्षण
उतरा ओझी, विसरा नाती
डॉलर पळभर चुंबू
इथेच टाका तंबू !

घट्ट धरूया आपली संस्कृती
सण वार अन रितिभाती
ढोल ताशे जोरात वाजवू
हिरव्या नोटा छापू
इथेच टाका तंबू !

नॉस्टलजीक कधी होऊ
आंजा वरती धागे काढू
हिअर ऑर टू गो असे संभ्रमु
भारत प्रेमाची नशा झिंगु
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !

मिस यू मिस यू
मम् मातृ भू
मिस यू मिस यू
मम् मातृ भू
अधे मध्ये गळे काढू
इथेच जमवा कंपू
इथेच टाका तंबू !

जय मराठी जय आम्रविका

जिलबीविडंबन

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 9:13 pm | पैसा

:) तुम्ही कुठे रहाता म्हनायचं?

सतिश गावडे's picture

25 Feb 2017 - 9:37 pm | सतिश गावडे

राहता अहमदनगर जिल्ह्यात आहे. :)

लीना कनाटा's picture

27 Feb 2017 - 5:18 am | लीना कनाटा

मी परावलंबी पारपरग्रहखतावर मंगळावर मुक्कामाला आहे.

- इति सागा ऑफ सगा

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2017 - 9:16 pm | पिलीयन रायडर

वा! ३० सेकंद टाईमपास झाला!

छान जमलीये हां कविता.. लिहीत रहा. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2017 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता अजून हे राहीलंच होतं की ! आता कसं गार गार वाटलं !! =)) =)) =))

रुपी's picture

26 Feb 2017 - 7:08 am | रुपी

:)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

26 Feb 2017 - 1:55 pm | अॅस्ट्रोनाट विनय

ख्या ख्या भारी. मिपाला केंद्रस्थानी ठेऊन अजून कडवे वाढवा.