Indian Idol

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
5 Oct 2008 - 9:40 am

कालच परवाच टि.व्ही वर Indian Idol हा कार्यक्रम पाहिला.त्यावर लिहावस वाटलं.
म्हणजे मी कार्यक्रमावर लिहिणार नाही.तर त्यातील माणसांबद्दल लिहिणार आहे.

सध्या या कार्यक्रमात ऑडिशन चालू असलेली दाखवली आहे.म्हणजे सुरवातीची निवड फेरी.
भारतातल्या विविध रंग ढंग असलेल्या देशात विविध ठिकाणी ही Indian Idol ची बस जाऊन निवड फेरी घेताना दखवली आहे.
यातील काही निरीक्षण ---
खूप मोठाल्या रांगा दिसल्या. तिथे किती वेळ जात असेल याचा सहज अंदाज बांधता येतो.मागे एकदा रात्री २ वाजता गवतावर गोलाकार बसून डब्बा उघडून खाताना काही तरूणांना पाहिले.शर्थ वाटली चिकाटीची.
`बस! आज तो ऑडिशन देके ही जाएंगे` हा हट्ट जाणवला.कमाल वाटली .मी तर एवढी रांग पाहून मागच्या मागेच पळ काढला असता.
दुसरे जाणवले ते त्यांचा उत्साह.खूपदा तरूणांत स्पर्धांमधे भाग घ्यायला उत्साह दिसत नाही. काही वेळा अपयशाची तर कधी मित्रांकडून टिंगल होईल याची भिती वाटते.इथे तर ओतू जाताना दिसला उत्साह.
तिसरे म्हणजे स्वतःच्या क्षमतेबद्दल अजाणतेपण. संगिताची आवड सर्वांना असते.गाण आवडत नसणारा माणूस शोधून काढणे कठिणच.
परंतु सुरात गाता येण सर्वांनाच जमत नाही. मान्य आहे.पण आपल्या गाण्याच्या क्षमतेबाबत तरे पुरेपुर जाणिव असावी.
Indian Idol च्या निवड फेरीत तर गाता येत नसून ही Indian Idol बनण्याची स्वप्न पहाणा-या लोकांचे कौतुक करावी की कीव करावी ते कळ्त नाही.
कौतुक वाटत कारण की आपल काम धाम सोडून तासनतास रांगेत तात्कळत उभे राहण्याची जिद्द यांच्यात दिसली .आपली निवड होईल अशी आशा डोळ्यात जाणवली.त्या आशावादी पणाच कौतुक.
कीव अश्यासाठी की आपल नशिब अजमावण्याला यांना हीच जागा मिळाली का? आणि असेल तर निदान आपल्या बद्दल किती ते गैरसमज? गाता येत नसून ही आपली निवड होण्याची जराही शक्यता नाही हे या स्पर्धंकांना कळतच नाही का?बाथरूम सिंगर असूनही तिथे ऑडिशन देणे हे किती धारीष्ट्य?
हिम्मतवान
दिसले तिथे बरेच जण.
नुसत डेरिंगच नाही तर स्वतःबद्दल आत्मविश्वास ही दिसला.
अणि त्या आत्मविश्वासाला पार तडा गेला ,म्हणजे निवड झाल्याचे दाखवणारा पिवळा कागद मिळाला नाही तरीही बरेच जण खंबीर दिसले.
ठिक आहे.काही हरकत नाही.``Better Luck Next Time` असा दृष्टिकोन ठेवून पुन्हा उमेदीने परतणारे पाहिले.त्यांच्या त्या उमेदीचे आश्चर्य वाटले.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे मानून हसत हसत बाहेर पडणा-यांना सलाम!
याच बरोबर स्वतःच्या स्वत:बद्दलच्या अपेक्षा अपु-या राहिल्यामुळे नाराज होऊन रडत रडत बाहेर येणारे कमकुवत स्पर्धकही पहायला मिळाले.एक शिवी हासडून बोलावेसे वाटले ,`` अरे गाढवा ,तूला तूझी कुवत कळत नाही का? नसेल तर विचार कुणाला तरी .बिन्धास्त कसा काय गेलास तिथे टिव्हीवर?``
असो ,त्याच्या जाण्याचही कौतुकच .
अहो कारण की आपल नशिब अजमावयाचा सर्वांना सारखाच अधिकार असायला हवा.नाही का ?
निवड होण न होण हे थोडस तरी निशिबावर अवलंबून आहे.
आता असं पहा की -इतके शेकड्याने स्पर्धक.त्यांना ऐकायच आणि `हो `की `नाही `ते ठरवायच हे किती वेळखाऊ काम असेल? ते ३किंवा फार तर ४ परिक्षक कंटाळत तर असतीलच.
सुरावली ऐकायला मिळाली तर कंटाळा कमी .पण इथे तर अर्ध्याहून अधिक बेसुरेच!
त्यातल्यात्यात समान सुरात गाणारे कमित कमी २ तरी सहज मिळती ल त्या महासागरात.!एखाद्याची होईल पण दुस-याची कदाचिते नाही होणार .अगदे सारखा असला तरीही.
त्यामुळे निवड होणे न होणे हे मला नशिबावर अवलंबून वाटते.म्हणजे पूर्णपणे नसले तरी थोडेफार तरी असावे.
तर by chance निवड झाली तर झाली अस मनात जाणून गाजराची पुंगी वाजवून पहाणा-याची काय चूक?
गाजराची का होईना, निदान पूंगी वाजवण्याची कॄतीशीलता तरी दाखवली .अगदीच निष्क्रिय राहून दुस-यांना नाव ठेवण्यापेक्षा बरे !

तर -
असे हे उत्साही, धाडसी , चिकाटी असलेले , जिद्दी ,आशावादी ,खंबीर,आत्मविश्वासू ,कृतीशील उमेदवार जरी गायक म्हणून निवडले गेले नसले तरी ह्या सर्व गुणांमुळे ते `मॉडेल` किंवा `आदर्श ` (Idol) असेच आहेत. त्यांच अभिनंदन.

समाजमत

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

5 Oct 2008 - 9:46 am | कलंत्री

अश्या अनेक गोष्टीतुन समाज एकजिनसी होत असतो. मला अश्या उत्साहाचे कौतुकच वाटते.

आपल्या सारख्या लोकांनी निरीक्षण आणि लेखनाच्या चौकटीतुन बाहेर येऊन अश्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक चौकटीत काही कार्यक्रम केला तर ते हे प्रयत्न जास्त सुत्रबद्ध दिसतील.

बाकी लेख / निरीक्षण आवडले

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेत तुम्ही, बघितलंतर साध्याच विषयावर. पण मला एक शिवी हासडून बोलावेसे वाटले ,`` अरे गाढवा ,तूला तूझी कुवत कळत नाही का? नसेल तर विचार कुणाला तरी .बिन्धास्त कसा काय गेलास तिथे टिव्हीवर?`` हे आवडलं. अपयशाची तयारीतर स्पर्धेत उतरतानाच असावी; तुमचं म्हणणं पटलं.

अदिती

घासू's picture

5 Oct 2008 - 4:16 pm | घासू

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

सहज's picture

5 Oct 2008 - 6:12 pm | सहज

सकारात्मक लेख आवडला.

नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून? :-) म्हणजे अमेरिकन आयडॉल बघताना तसे जाणवते म्हणून

देवदत्त's picture

5 Oct 2008 - 11:18 pm | देवदत्त

नक्की सगळे जण स्वताचे "टॅलेंट दाखवायला" येतात की काहीजण टीव्हीवर झळकणे, जाउन विदुषकी चाळे करतात, थ्रील म्हणून?
मी ही तेच लिहिणार होतो. काही जणांना माहित असेल की आपण काही निवडले जाणार नाही, पण टीव्हीवर झळकणे, कलाकारांना भेटणे ह्याकरिता ही जात असतील. काही जण तर म्हणालेही होते की मी तर तुम्हाला भेटायलाच आलो/आले आहे.

बाकी, लेख आवडला.

--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:17 am | विसोबा खेचर

हौशीला मोल नसतं हेच खरं!

बाकी, यासारख्या स्पर्धांबद्दल आमचं मत येथे वाचता येईल...

तात्या.