,,,, ,,,
संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.
कवि: राजू पवार
विद्यार्थी, कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्यार्थी नवकवि राजू पवार यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली
मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)
प्रतिक्रिया
24 Feb 2017 - 11:34 am | अभ्या..
.
आं तिज्यायला.
डंपिंग ग्राउंड हाय काय हे?
कार्यशाळा घेणार एकजण, लिहिणार दुसराच, तिसराच काढून फेकणार चौथ्याच्या अंगणात.
भारीय राव कारभार.
.
मिपाला साहित्याची कमी नाही.
24 Feb 2017 - 3:54 pm | माहितगार
मराठी भाषा दिना निमीत्त आंतरजालावर प्रथमच झालेले नवागताचे लेखनास कोणत्या न कोणत्या मंचावर टिकवून प्रोत्साहन द्यावयाचे की इथल्या किंवा तिथल्या केवळ नियमांच्या साठमारीत घालवून द्यावयाचे. न्यायालयात किंवा पोलीसठाण्याच्या हद्दीत प्रथमच पाऊल ठेवणार्याला कुठे जावयाचे तिथे नेऊन न सोडता आमच्या हद्दीत येत नाही हो चालते व्हा इथून से तुसडे पणाने घालवून द्यावयाचे ?
संत कबिरांची माफी मागून
कंहा घुम फिरकर आए कवि न पूछो , पूछ लीजिये ज्ञान, मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।... ।।
24 Feb 2017 - 4:05 pm | जव्हेरगंज
कविता मस्तच आहे!
पण कवींनी स्वत: इथे का प्रकाशित केली नाही. ते करु शकत होते. तरीही?
24 Feb 2017 - 10:15 pm | माहितगार
अनावश्यक निष्कर्षघाई होते आहे का, एखादी गोष्ट तत्कालीक परिस्थितीतून घडलेली असते, जे घडले त्याला सांभाळून घेण्याच्या प्रयत्नांना, नकारात्मक भिंगातून छिद्रान्वेषणण खरेच कितपत गरजेचे असते या बद्दल साशंक आहे. असो.
25 Feb 2017 - 12:42 am | अभ्या..
२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
Ha mipachya dhyeydhoranamadhil niyam. Jasa tithe parigh asto tasa ethehi asnaarch na?
25 Feb 2017 - 8:50 am | माहितगार
साहेब हा मुद्दा प्रताधिकार संबंधाने असावा असे माझे मत आहे, जिथ पर्यंत प्रताधिकाराचा संबंध आहे साहित्य विकिपीडियावर प्रकाशित झाले की प्रताधिकार स्थिती पातळ होते केवळ संदर्भ किंवा लेखकाला क्रेडीट दिले कि बाब संपते. त्यात बदल करुन अथवा बदला शिवाय इतर कोणतीही व्यक्ती ते इतरत्र प्रकाशित करण्यास मुक्त असते.
24 Feb 2017 - 4:12 pm | सतिश गावडे
शब्द मराठी आहेत. मात्र अर्थ कळला नाही. :)
24 Feb 2017 - 4:41 pm | संदीप डांगे
=)) पूर्वी मराठीचा प्रभाव असलेले इंग्रजी असायचे आता इंग्रजीचा प्रभाव असलेले मराठी असते... पूर्वी सांगाडा मराठी कातडी इंग्रजी आता उलटे झाले आहे.
24 Feb 2017 - 10:53 pm | एस
असल्या लेखनाला कशाला वाचवताय?
24 Feb 2017 - 11:41 pm | माहितगार
'असल्या'ची व्याख्या काय ? भाषा अथवा शैली प्रामाण्य नसेल पण एका मराठी माणसाची अभिव्यक्ती आहे, त्या माणसाचे मराठी असणे आणि मराठीतून अभिव्यक्त होणे मला महत्वपूर्ण वाटते, त्याची जी काही अभिव्यक्ती असेल ती तराजू न लावता वाचवावी नंतर समिक्षकांना जी समिक्षा आणि टिका करावयाची त्यांनी करावी पण कुणी अभिव्यक्तच का झाले आणि कुणी एखादी अभिव्य्क्ती का वाचवली हे प्रश्न अन्याय्य नाहीत किंवा कसे.
25 Feb 2017 - 1:32 am | संदीप डांगे
'असल्या' म्हणजे तद्दन फेसबुकीय छापाची.. असल्या कविता कॉलेजियन पोरांच्या फेसबुक ग्रुपांवर, वॉट्सअप वर ढिगाने असतात. त्यांची शैली साधारण अशीच असते. त्यांना किती महत्त्व द्यावे व त्याला कवीची अभिव्यक्ती वगैरे मानावे ह्याबद्दल ज्याचेत्याचे मत वेगवेगळे असू शकते...
25 Feb 2017 - 1:35 am | वाल्मिकी
सहमत
प्रेम कवितांचे अजीर्ण झालेय
25 Feb 2017 - 8:59 am | माहितगार
साहित्याच्या बाबतीत अजीर्ण झालेतर वाचन टाळावे हा सर्वोत्तम मार नाही का ? मिसळपाववर सरळ येऊन टाकणार्यांच्चे अथवा प्रस्थापितांचे सर्व साहित्य नोबेल अथवा साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवण्या एवढे, अथवा सरस असतेच असा दावा कुणि करु शकेल का ? केवळ अभिव्यक्ति इतर संस्थळावरून स्थानांतरीत झाली म्हणून अभिव्यक्ती चा दर्जा लहान किंवा मोठा होत नाही.
एकुण विरोधी तर्क मला तार्कीक उणीवेचे वाटतात केवळ नवागतास हतोत्साह वाटेल असे काही करण्याची माझी इच्छा नाही. म्हणून मिपा मालकांनी कालचे दोन्ही काव्य धागे उडवावेत अशी मिपा मालकांना विनंती आहे.
प्रतिसादांसाठी आभार
25 Feb 2017 - 12:01 pm | वाल्मिकी
जो उठतो प्रेमकविता छापतोय
नवोदित कविता बाकी गद्य प्रकार जमत नाही तर काय बोलावे ?
अभंग / फटका असे नवोदित कवींना नाव तरी माहित असेल ?
25 Feb 2017 - 12:16 pm | माहितगार
:)) प्रेम करावयाच्या वयात प्रेमकाव्य प्रसवेल की अभंग आणि फटका प्रसवतील ? म्हणजे काहींना इतरही साहित्यिक प्रकार त्याही वयात जमत नसतील असे नाही, पाण्यात राजहंस आहेत म्हणून बदकांनी असूच नये हा मिपाकरांचा दृष्टीकोण असेल तर.. मिपा अस्तित्वाचे स्वरुप हा माझा नव्हे मिपा मालकांचा प्रश्न आहे. मी त्यांना सदर दुवा वगळण्यास सांगत आहे कारण व्यक्ती कुणीही असली तरी त्यावर हिनत्व दर्शक टिकेस पहिल्याच भेटीत समोर नेणे मला व्यक्तीशः प्रशस्त वाटत नाही.
प्रतिसादांसाठी आभार
25 Feb 2017 - 2:12 pm | शब्दबम्बाळ
अजीर्ण ज्याला झाले आहे तो त्यावर औषध घेतो.
हॉटेल मालकाला आजपासून फक्त ज्यूस बनवा सांगत नाही...
तसेच इथे आहे! स्पष्ट बोलल्याने राग आला तर माफी...
25 Feb 2017 - 3:08 pm | वाल्मिकी
का सांगू नये ?
जाऊ द्या
25 Feb 2017 - 6:31 am | प्रचेतस
हा धागा काही पटला नाही.
25 Feb 2017 - 9:07 am | संजय क्षीरसागर
म्हणून त्यांनी या धाग्यावर आधारित नवा धागा काढला आहे !
25 Feb 2017 - 3:07 pm | वाल्मिकी
नवीन धागा पण पटला नाही
25 Feb 2017 - 9:33 am | सतिश गावडे
चित्र आंतरजालावरुन साभार.
25 Feb 2017 - 1:30 pm | निष्पक्ष सदस्य
@संदीप डांगे
एकतर तुम्हाला प्रेमकविता/विरहकथा यामध्ये स्वारस्य नाही,किंवा तुम्ही ह्रदयशुन्य मनुष्य आहात.
वरील काव्य(?) मला तरी प्रचंड आवडले आहे.
@प्रचेतस
तुम्हीसुद्धा ह्रदयशुन्य मनुष्य आहात,तुम्ही प्रेम करून पाहिलय का?(आता अशक्य असेल कदाचित)
बादवे,तमाम युवक-युवतींना मला असे सांगायचे आहे कि,लव इज इमोशनल बट लाईफ इज प्रॅक्टिकल.
जर प्रॅक्टिकल विचार केला तरच सुख आहे.मी सुद्धा काही काळी माझी तीन शैक्षणिक वर्षे बरबाद करून घेतली.
(अरेंज मॅरेज जिंदाबाद)
25 Feb 2017 - 3:22 pm | वाल्मिकी
प्रेम कविता आवडत नाही असे नाही ,पण मंगेश पाडगांकर किंवा निदान प्रेमाचा गुलकंद अश्या प्रेम कविता ठीक आहे
ती आली
ती हसली
ती रुसली
ती फसली
असल्या कविता वैताग देतात
25 Feb 2017 - 2:08 pm | शब्दबम्बाळ
मिपा तरुण आहे तरुण आहे असे म्हणायचे प्रेमकविता या जणू हीन पातळीचे साहित्य आहे असे वावरायचे हे काही पटले नाही!
तरुणांनी कसा विचार करावा किंवा काय लिहावे हे ठरवणारे आपण कोण? किती लेखक तरुणपणापासूनच गंभीर अथवा राजकीय इत्यादी लेखन करू लागले?
असे म्हणतात कि लिखाणाची आवड असणाऱ्याने रोज थोडेफार लिहीत जावे हळूहळू सरावाने त्याचा दर्जा आपोआप वाढत जातो.
आता काही लोक म्हणतील कि म्हणून "मिपा"वर असले दर्जाहीन साहित्य वगैरे सहन करायचे कि काय??! सोप्प उत्तर "हो" असेच असेल! जोपर्यंत लिखाण मिपाच्या धोरणात बसत आहे तोपर्यंत होच! ते वाचणे किंवा टाळणे वाचकाच्या हातात आहे.
आपण जर पहिले तर काही ६०-70 लोकच मिपावर ऍक्टिव्ह असतात. म्हणायला आपण म्हणतो कि हजारो लोकांपर्यंत लिखाण जाते पण मग ते लोक इथे येत का नाहीत??
पुणे-मुंबई च्या बाहेरची तरुणाई हि मराठी संस्थळांपासून कोसो दूर आहे! हेच तरुण कोरा, फेसबुक इत्यादी ठिकाणी काहीबाही लिहीत असतात पण मराठी संस्थळांवर त्यांच्या लिखाणाला एखादा कोपरा मिळाला तर काय हरकत आहे?
कदाचित मिपा चा हा उद्देश नसलेही, पण माहितगार यांनी चांगल्या भावनेने हि कविता इथे टाकली आहे असे वाटले. जर ते धोरणात बसत नसेल तर काढण्यात येईलही पण केवळ "आम्ही आता मोठे झालो आहोत, आम्ही दर्जेदार वाचतो म्हणून असले कमी प्रतीचे साहित्य इथे टिकवण्याची गरज नाही" अशा विचाराने ते हटवण्यात येऊ नये असे वाटते...
25 Feb 2017 - 3:36 pm | संदीप डांगे
कोणाचे सहित्य इथे असावे-काढावे ह्याबद्दलच्या मिपाच्या धोरणाशी मला तरी काय घेणे-देणे नाही, ते मालक-संपादक जाणे....
इथे प्रकाशित होणार्या साहित्यावर ते भिकारडे आहे की स्वर्गाहून सुंदर आहे हे माझे मत इथे मांडायचा अधिकार मला प्रशासनाने दिला आहे असे वाटते.. "मी इथे येणार्या साहित्याला भिकार म्हणलो काय किंवा डोक्यावर घेतले काय" यावर आक्षेप घेणारे इतर कोण?
ज्याला आवडते त्याने ते आवडते सांगावे, सिम्पल! पण ज्याला नाही आवडलं त्याच्यावर टोमणे मारुन शरसंधान कशाला...?
लेखक स्त्री आहे की पुरुष, लहान आहे की वृद्ध, तरुण, मध्यमवयीन, श्रीमंत गरिब, शिक्षित, अशिक्षित, शहरी, गावठी, मुंबैचा, बाभुळ्गावचा, पहिलंच लेखन, दुसरंच लेखन, शंभरावं लेखन असले लेबलं लावून कोणी साहित्य टाकत असेल तर मला व्यक्तिशः ते पटत नाही. साहित्य निखालस साहित्य असावं, त्याला मार्केटींगची कापडं चढवायची काही-एक गरज नाही. त्यात कॅलिबर असेल तर टिकेल.. नसेल तर नाही.
प्रतिकूल प्रतिसादाचे भय वाटत असेल तर शिर्षकातच कंसात तसे नमूद करावे, म्हणजे धागे उघडूनच बघणार नाहीत माझ्यासारखे वाचक.
प्रसिद्धीची भाकरी तर हवी पण वाचकांच्या प्रतिकूल मतांचा तवा नको असे असेल तर जिथे प्रतिक्रिया येतात अशा संस्थळावर संवेदनशील बालकांनी फिरकूच नये.. आपल्या ब्लॉगवर लिहावे.. कौतुकच करणार्यांत पसरवावे...
25 Feb 2017 - 3:55 pm | शब्दबम्बाळ
तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाखाली का आहे हेच कळलं नाही! लिखाण आवडणे नावडणे याबद्दल मी काहीच लिहिलं नाहीये.
ते लिखाण "मिपावर" असावे कि नसावे या (मिपावरून हटवणे) संदर्भात वरचा प्रतिसाद होता.. शांतपणे वाचलात तर कळू शकेल...
बाकी, "मी इथे येणार्या साहित्याला भिकार म्हणलो काय किंवा डोक्यावर घेतले काय" यावर आक्षेप घेणारे इतर कोण?" आणि " पण ज्याला नाही आवडलं त्याच्यावर टोमणे मारुन शरसंधान कशाला...?" हि वाक्य एकाखाली एक पाहून गम्मत वाटली!
माझी प्रतिक्रिया मी हक्काने देणार (चांगली/वाईट) पण माझ्या प्रतिक्रियेवरून मला कोणी का बोलावं? हा विचार जरा कॉन्ट्रडीक्टरी वाटतोय.
तसेही वरचा प्रतिसाद फक्त तुमच्यासाठी वगैरे नव्हताच, त्यामुळे टोमणे वगैरे कुठून आले काय माहित! या लिखाणाला दर्जा नाही याच प्रकारच्या प्रतिक्रिया वरती आल्यात आणि तेच मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय मग त्यात वावगं काय झालं?
तुम्ही इतक्या आवेशात येऊन प्रतिसाद का लिहिलंय हे मुळात कळत नाहीये! कोण कोणावर जबरदस्ती करत नाहीये वाचा/आवडून घ्या/प्रतिक्रिया द्या इत्यादी
का उगीचच संवेदनशील बालके आणि इतर शब्द वापरून वातावरण गरम करताय? शांतपणे चर्चा होऊ शकत नाही का कुठल्या विषयावर?
25 Feb 2017 - 4:09 pm | संदीप डांगे
जसा आपण प्रतिसाद लिहिलाय त्याच भाषेत मी उत्तर दिलंय.. आपली वाक्ये वाचून आपणच बघावीत... इथे ही कविता न आवडलेल्या प्रतिसादांवर आपणच शेलक्या भाषेत शरसंधान केलंय.
राहिला प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्न. त्यात विसंगती नाही. मला वाटलंच होतं तुम्ही हा क्षुद्र संबंध उलगडणार. माझे मत हे साहित्यावर येणार्या प्रतिक्रियांसाठी आहे.. कथ्याकूट किंवा इतर चर्चांचा, प्रतिसादांचा इथे संबंध जोडू नये..
परत स्पष्ट करतो. अ व्यक्तीला साहित्य आवडले, ब व्यक्तिला नाही आवडले. तर अ किंवा ब ह्या व्यक्ती दुसर्यांच्या आवडीनिवडीवर टिका करु शकत नाहीत. ह्याला दुसर्याच्या मताचा, आवडीचा आदर ठेवणे म्हणतात. जरी हजार लोकांना एखादी कलाकृती आवडली आणि एकालाच फार टाकाऊ वाटली तरी त्या एकाच्या मताचा आदर ठेवणे महत्त्वाचे. 'असल्या' कवितांचे चाहते असू शकतात, टिकाकार असू शकतात, त्याबद्दल माझे कोणतेच मत नाही हे वरच नमूद केले आहे हे आपण वाचले असेलच...
तर आपल्या प्रतिसादातली काही वाक्ये खटकलीत, त्यास्तव प्रतिसाद दिला. काही उपमर्द झाला असल्यास क्षमस्व!
25 Feb 2017 - 4:29 pm | शब्दबम्बाळ
शेलकी भाषा? अरे बापरे! आता जास्त काही मुद्दे काढत बसत नाही उगीच वेळ जातो निष्कारण त्यात!
पुन्हा एकदा लिहितो, माझा प्रतिसाद असे साहित्य मिपावर असावे कि नसावे याबाबत होता.
"जर ते धोरणात बसत नसेल तर काढण्यात येईलही पण केवळ "आम्ही आता मोठे झालो आहोत, आम्ही दर्जेदार वाचतो म्हणून असले कमी प्रतीचे साहित्य इथे टिकवण्याची गरज नाही" अशा विचाराने ते हटवण्यात येऊ नये असे वाटते..." हे वाक्य होत शेवटचं.
अजून मीच हि कविता वाचलेली नाही पूर्ण! :D
त्यामुळे साहित्य आवडणे/नावाडने/टीका/स्तुती याच्याशी मला काहीही देणंघेणं नाहीये.
मुद्दा हा होता कि केवळ कमी दर्जाचे वाटते म्हणून ते साहित्य मिपावर असावे कि नसावे! आणि माझ्या मते जोपर्यंत मिपाधोरणात ते बसत असेल तोपर्यंत असायला हवे.
25 Feb 2017 - 5:09 pm | संदीप डांगे
साहेब!
इथे दोन मुद्दे वेगवेगळे आहेत.
१. इतर कोणाचे साहित्य इथे प्रकाशित करण्याला काही नियम आहेत. ते नियम, धोरण डावलून प्रकाशित झालेले साहित्य इथून हटवले जाते. त्याचा साहित्याच्या दर्जाशी संबंध नसतो. तर प्रशासनाच्या मर्जीवर सर्व काही अवलंबून आहे. काही सदस्यांनी इथे तो नियम उपस्थित केला आहे.
२. प्रस्तुत कविता काही लोकांना आवडली नाही त्याविरूद्ध धागा लेखकाने अशा नकारात्मक प्रतिक्रिया देणार्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
तर आपल्या मूळ प्रतिसादात पहिल्या मुद्द्याचा दुसर्या मुद्द्याशी घोळ घातलाय आपण, तेवढा निस्तरुन घ्या... नंतर सावकाश कविता वाचून घ्या..
25 Feb 2017 - 8:52 pm | शब्दबम्बाळ
चला, निदान माझा मुद्दा तरी आला शेवटी!
माझा मुद्दा धोरण विषयक आणि साहित्य मिपावर असण्या संदर्भातला होता.
जर मूळ लेखकाची हरकत नसेल तर साहित्य प्रकशित करण्यास काही हरकत नसावी, धोरणानुसारही!(इथे आता वाल्मिकी यांनी मांडलेला सत्यतेचा मुद्दा मात्र महत्वाचा आहे)
धागालेखकाने कोणाला काय प्रश्न विचारले आहेत त्यावर माझ्या प्रतिक्रियेचा संबंध कुठून आला? आपण जरा फक्त मी लिहिलेल्या प्रतिक्रियेवर बोललात तर संबंधित राहील...कोण कुठला घोळ घालताय ते बघा आपलं, ते जमलं कि बघूच मग!
25 Feb 2017 - 3:55 pm | सतिश गावडे
सध्या मिपावर न येणारे एक जुने मिपाकर अगदी रोखठोक बोलायचे या बाबतीत. ते म्हणत, संस्थळांवर लिखाण टाकणे हे खिडकीत बसण्यासारखे आहे. एकदा खिडकीत बसलात की रस्त्यावरील लोक येता जाता इशारे करतात असे म्हणण्यात काही अर्थ नाही.
इथे जरा उलट झाले आहे. म्हणजे मराठी संस्थळ प्रसिद्धीसाठी हवे आहे. मात्र त्याचवेळी तिथे होणारी संभाव्य टीका नकोय.
25 Feb 2017 - 6:27 pm | माहितगार
दोन्ही कविता धागे वगळण्यासाठी सरपंच आणि नीलकांत यांच्या आयडीवर आधीच कळवले आहे. संपादकांनी ते वगळावेत
25 Feb 2017 - 6:49 pm | वाल्मिकी
वकिपेडिया कार्यशाळेत चोरीच्या कविताच असतात असे दिसतेय
https://www.facebook.com/143pa/posts/373001079425411:1
25 Feb 2017 - 9:59 pm | माहितगार
आपल्या उपरोक्त सरसकटीकरण आहे ह्या बद्दल खेद वाटतो.
बाकी तसदी बद्दल क्षमा असावी, विकिपीडियातून स्थानांतरीत करण्याची घाई करण्या पुर्वी मीही कदाचित आंतरजालाचा धांडोळा घेऊन विद्यार्थ्यांकडून कन्फर्म करुन घ्यावयास हवे होते. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी इमेलने आधीच कळवले आहे, मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम संपल्या नंतर दुरध्वनी वरुन संपर्क करुन नक्की काय झाले ते तपासता येईल. तुर्तास लेखन / धागे वगळत आहे महाविद्यालयाकडून कन्फर्मेशन आल्यास कविता पुनःप्रकाशितही करता येईल.
अर्थात विकिपीडियाच्या निकषात न बसणारे लेखन स्थानांतरीत करण्याची वेळोवेळी गरज भासते हेही तेवढेच खरे. या बाबत परस्पर चर्चेने काही धोरण येत्या काळात आखता आल्यास बरे पडेल असे वाटते. प्रतिसादांसाठी आभार
25 Feb 2017 - 10:14 pm | वाल्मिकी
सरसकटीकरण
तुम्ही दोन कविता इकडे लिहिल्या
दोन्ही आधी छापलेल्या होत्या
१००% =सरसकटीकरण