बोळे क्लब
डिस्क्लेमर : लेखातील नायक पात्रांची नावे खरी आहेत. मित्रांनो , इथे ऑलरेडी बर्याच जणांनी आपल्या मित्रांबद्दल, क्रु बद्दल , परिसराबद्दल लिहीलं असेल. त्यात आमचं पण एक संभाळून घ्या. आणि सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास धाग्यात परवानगी आहे.
आदरणीय यम्मी आज्जींच नाव घेऊन सुरूवात करतो. बोळे क्लब म्हणजे जिथे बोळे पार्टीची सुरूवात झाली.का कसं कुठे, कोणी ,इ.इ. प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच.लेखाचा केंद्र बिंदू आहेत देवेंद्र-नरेंद्र-गणेश (ऍक्चुली बाप्या-आब्या-बिल्डर).आणि हा लेख आमच्या जन्मापलिकडल्या दोस्ती के नाम.
मध्यमवर्गिय मराठी कुटूंबातले तिघे. ११वी-१२वी ला बरोबर होतो, पण आयुष्यभराचे मित्र होउन आहोत, राहू. तसे अनेक मित्र आहेत हो. मित्रांच्या बाबतीत तुटवडा नाही, पण जे हृदयात घर करून बसलेत ना.. ते बोटावर मोजण्या इतकेच. मी १०वी पर्यंत लोणीकंदला होतो, वडीलांच एम.आय.डी.सी. मधे वर्कशॉप असल्याने भोसरीला स्थालांतरित झालो. भैरवनाथ महाविद्यालय, भोसरी , या डॉन, टारगट आणि सप्तगुणी विद्यार्थ्यांचा इतिहास लाभलेल्या महाविद्यालयात आम्ही प्रवेश केला तेव्हा एकदम पाप्याचे पितर होतो.
क्लब मेंबर १: देवेंद्र लोखंडे(एम.बी.बी.एस.)
ऍलियासः 'बापू' .आइ-वडील शिक्षक, वडगाव कांदळीला नोकरी करत.म्हणून भोसरीमधल्या घरी हा एकटा रहात असे. आणि आमच्या सारख्या टवाळांचा अड्डा.बापूराव अत्यंत हुशार, तल्लख, क्विक लर्नर आणि मेडिकल सोडून इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर्स, सॉफ्टवेअर्स,गेम्स्,क्रिकेट्,कॅरम्,आणिक बरेच काही... मधे निपूण बाजिरावकीची (नको तिथे पैसे खर्च करणे, कुण्णालाही उगाच स्वता:चा वेळ खर्ची करून मदत करणे) हौस असल्याने नेहमी आमचे टोमणे खाणारे. बाप्याला एम.बी.बी.एस. ला पहिल्यांदा मुंबैच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात. पण मार्कांचे घोळ झालेले असल्याने,पुन्हा चेकिंग झालं, आणि मार्क्स वाढून याला पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजात ऍडमिशन मिळाली. पोरींबाबद आणि अवांतर वाचनाबाबद अति अरसिक. मेडिकलचे विद्यार्थी शक्यतो ९०%च्या वर अटेंडंस ठेवतात्/ठेवावी लागते.अपवाद बापू.पुर्णवेळ कॉलेज बाद करून , केवळ पी.एल्स मधे अभ्यास करून ५८-६०% मार्क्स घेऊन येइ.नाशिक युनिव्हर्सिटीमधे हे मार्क्स कमी नाहीत. बाकीचे पोरं वर्ष भर कुंथून कुंथून पण एवढे मार्क्स मिळवत नसत. सगळ्यांना हा पास कसा होतो याचं आश्चर्य. २०-२० तास झोपण्याची क्षमता, ४ दिवस केवळ कंटाळा म्हणून पाण्यावर रहायचा पंटर. आम्हाला उशीरा झोपण्या-उठण्याची लागण इथूनच लागली. उत्तम बल्लवाचार्य. बापूमेड मॅगी म्हणजे अजुनही लाळ गळते हो.
क्लब मेंबर २ :नरेंद्र वाघ (बी.ई. कॉम्प)
ऍलियास: अबु . खवाट प्रतिक्रियेसाठी जाणला जातो. याला आम्ही की-मास्टर म्हणतो, संगणक,कॅल्सी,फोन असो वा अजुन काही.. याच्या कीज वरचं कौशल्य अप्रतिम.११वी मधे असताना, पहिल्यांदा
याच्या घरी गेलो, भाऊ सेकंड फ्लोर वर रहात असे.खाली खेळणार्या मुलांना विचारलं की अबु कुठे रहातो, उत्तर द्यायच्या ऐवजी पोरं पळून गेली. कारण कळलं नंतर...याचे आई-बाबा म्हणजे एकदम डेंजर, तुम्ही कोणीही असा, किमान तोंडावर गोड बोलण्याचा मवाळपणा किंवा औपचारिकता पाळने जरूरी नाही. उत्तम अहिरानी शिव्या ऐकण्याची -खाण्याची तयारी करूनच एरियात प्रवेश करावा. बारावीला उत्तम मार्क मिळून केवळ अज्ञानामुळे प्रायॉरिटी लिस्ट मधे टाकल्याने जी.एस.मोझे कॉलेजात इच्छा नसताना ऍडमिशन घेतली.आत्ता के.पी.आय.टी कमिन्स मधे जावा डेव्हलपर.
क्लब मेंबर ३ : गणेश(प्रशांत) निंबाळकर (बी.ई. माहीती तंत्रज्ञान)
आम्हाला एरियात "बिल्डर" म्हणतात. मिपा वर टारझन , खविस म्हणून कुप्रसिद्ध. सगळ्यात खादाड, जहाल मत वादी.अमृतवाहीनी->पी.व्ही.जी->आणि शेवटच्या राउंडला डी.वाय पाटलांच्या कालिजात आलो. बाकी आमची महती सर्वज्ञुत आहेचे. असो ..
दिल चाहता है: या तो ये फोटो थ्री डी है या फिर ये दोस्ती गहेरी है या (अब्या-बाप्या-बिल्डर)
बाप्याची रूम म्हणजे आमचा अड्डा. रात्रंदिवस एकत्र रहात असू. इतके की त्यावेळी आलेल्या "कल हो ना हो" मुळे आमच्या पालकांचा "कांताबेन" ऍटीट्युड झाला होता. रात्रभर हशा पिकत असे. झोपायला ४-५ वाजने नविन नव्हतं. आम्ही त्यावेळी कंप्युटर असेंबलीचा एक पार्ट टाइम काम करत असू. मस्त कंप्युटर आला की त्याच लोड टेस्टींगच्या नावाखाली आम्ही रूमवर तो कंप्युटर २४ तास पळवत असू. आम्ही तिघे टॉप गेमर्स होतो. मॉर्टल काँबॅट ही त्यावेळची सगळ्यात पॉप्युलर गेम. एका रात्रीत २००-३०० काँबॅट्स होत असत.लॅन गेम नसल्याने एकाच कंप्युटर वर एकच किबोर्ड शेयर करत असू. रात्रभर गेमखेळून पाठ आणि बोटं दुखत असत पण किडा .. तो जात नसे. वन मोर गेम म्हणत सकाळ होत असे.. मग तसेच उठून कॉलेजला पळत असू (अर्थात इच्छा असेल तर). मॉर्टल काँबॅट ही द्विखेळाडू मारामारीची गेम आहे. त्यात एक जण मेला की त्याला फॅटिलीटी वापरून खास स्पेशल इफेक्ट्ने मारता येत असे.उदा. १०-१२ वेळा जमीनीवर आपटणे,ड्रॅगन होउन जाळणे इइ. तर हा एक मानाचा मुद्दा होता.. आणि फॅटिलीटीने शेवट होणे हे अपमानास्पद असे म्हणून अजुन एक गेम खेळला जात असे. २००२ ते २००६ हा आयुष्यातील सुकाळ मानला जावा. कसलंही काडीमात्र टेंशन नाही.
'बोळे' याचा संदर्भ मिपावर प्रसिद्ध शब्द 'बोळा' याच्याशी काहीही संबंध नाही. बोळे म्हणजे कागदांचे बोळे. रुमवरच्या दिवसांत बाहेरचं चटक-मटक खाणे हा प्रकार सोकावला होता. एरियात ऑलरेडी प्रसिद्ध असल्याने आणि नियमीत गिर्हाईक असल्याने भेळवाला, स्विटसवाला सगळेच आपल्याला सलाम ठोकत दोन मापं जास्त टाकत. खाउन झालं की गपचुन बोळे शेजारच्यांच्या घरांवर टाकणे यामुळे याला 'बोळे पार्टी' असं नाव पडलं. आणि सभासदांचा 'बोळे क्लब' झाला. ३ मेंबर १००% ठरलेले असत पण कोणी मित्र बर्याच वेळेस पार्टीमधे उपस्थिती लावत. बाप्या बोळ्यांच्या बरोबर मॅगी बनवायचा तो त्याच्या स्पेशल ष्टाइल ने. मॅगी आणि त्याबरोबर येणार्या मसाल्याबरोबर फोडणी दिलेले ओले वटाणे, टोमॅटो आणि गरम मसाला,जिरं यांच अफलातुन मिश्रण करून बापुमेड मॅगी तयार होत असे. हे बाप्या इकडे तयार करत असताना एक जण त्याला मदत करी, एक जण आणि पाहुणा बोळे क्लब मेंबर हे जाउन थम्स अप्/मिरींडा,गुलाबजाम, समोसे,भेळ,ढोकळा,चिप्स इत्यादी पदार्थ भरपुर प्रमाणात (कोणी मन मारायला नको हा नेक हेतु) खरेदी करून आणत.
एकदा न्यु इयर ला सेलेब्रेशन साठी मेगा 'बोळे पार्टी' करायचं ठरलं. १ किलो चिप्स,१किलो केक,१२ समोसे,मोठ्या थम्स अप आणि मिरींडाच्या बाटल्या, गाजर हलवा करायचा म्हणून गाजरं,खवा,ड्रायफ्रुट्स टोमॅटो,आणि अन्य भाजीपाला आणला. बाकीचं कमी पडेल म्हणून भोजनात ,गाजर का हलवा आणि वरण-भात करणे असं ठरलं ... बाप्याने मस्त फोडणीचं वरण भात,गाजरका हलवा बनवला.मी इकडे आयतोबा प्रमाणे कंप्युटरवर झकास जुनी गाणी लाउन डिजेचं सर्वांत मेहेनतीचं काम करत होतो.ऑर्कुटींग पण करत होतो त्यामुळे मला जास्त मेहेनत घ्यावी लागत होती.तर शेवटी १० पर्यंत सगळं उरकलं .. वरण भात आणि खवा टाकलेला गाजर का हलवा होता. एक फेरी मधेच आर्ध पोट भरलं.. दुसर्याफेरीला हलवा घ्यायची हिंमत झाली नाही. वरणभाताच्या २ राउंड मधेच तिघं फुल.मग मात्र आपण हे एवढंस आणलेलं .. याचं काय होणार ? याची चिंता ... बळच जेवण संपवून थोड फिरून आलो. तरीही खव्याच्या हलव्यानं पोट पॅक केलं होतं..पण हलवा फार फार भारी झाला होता. पार्टी साठी आणलेला सर्व खाउ अक्षरश: तसाच राहिला. सकाळी उठून कॉलेजला जाण्यासाठी निघालो. हलवा व्यवस्थित फ्रिजमधे ठेवला.आब्या आणि मी घरी निघालो. वाटेत आब्याला म्हंटलं दिड-दोन वाजे पर्यंत ये.हलावा बाकी आहे. आपण चापूया. कॉलेजातून आल्यावर बाप्याच्या घरी गेलो.नेहमी प्रमाणे बेनं कॉलेजला गेलच नव्हतं.अब्या अन् मी एकाच वेळी रूम वर पोचलो.बाप्या ऍज युज्वल सॅड ओल्ड सॉंग्स ऐकत होता. कॅरमचे ४-५ डाव झाल्यावर हलव्याची आठवण झाली. मी फ्रिज उघडला, हलवा तिथे नव्हता. इकडे तिकडे शोधलं पण हलवा नही मिळ्या.तेवढ्यात अब्याला वॉशबेसिन मधे हलव्याचं पॅन दिसलं.मी न अब्या एकाच वेळेस बाप्यावर केकाटलो.भरपूर झापल्यावर बाप्या कबुलला. रेखा आली होती 'सर्जरी'चं पुस्तक घ्यायला (रेखा.... ही पण आमची १२वीची मैत्रिण,आणि टॉपर,आमच्या बॅचच्या केवळ २ मुले आणि २ मुली ज्यांचा एम.बी.बी.एस.ला नंबर लागलेला त्यांपैकी एक.आमची ११-१२वी मधे कधी साधी एकदाही बोलणीही नव्हती झाली.पण दोघे एम.बी.बी.एस.ला गेल्यामुळे आणि मीही डिवाय लाच असल्याने ओळख वाढलेली. त्यात ही बाप्याकडे त्यावेळी(२००३) मोबाइल होता.आणि भाऊ २ रु ने हिला एसेमेस पाठवी.आम्हाला नेहमी डाउट .. यांच काहीतरी आहे. ती बाप्याला अगदी 'माझा मोबाइल बिघडला आहे रे, तुझ्या कॉलेजपाशी सर्विस सेंटर मधे देना",'मला बोन सेट हवा आहे रे',"आमुक फॉर्मस,पुस्तके बाफना मधून आणशील का ?' अरे सगळी कामं बाप्यालाच का? आमच्याकडे नाही का बोन सेट ? असो .. तर या गुटूरगुची आम्हाला दाट शंका.गेली ४ वर्षे टॉर्चर करून अजुनही मान्य केलेलं नाही.) तर रेखा आली होती हे सांगताना बाप्या हलव्यासारखा गुलाबी पडला होता.. आम्हाला हलवा फस्त करणारी माउ कळाली होती. आमच्या तोंडचा हलवा खाते काय ? अब्याने तिच्या नावाने शंख करायला सुरूवात केली.आणि मी बॅकपला लग्गेच हजर. बाप्या प्रतिवादाचा निष्फळ प्रयत्न करत होता.पण आमच्यापुढे काही निभाव लागला नाही. शेवटी पोरीमुळे आमच्याशी गद्दारी केली अन् आमच्या तोडचा घास एका परक्या पोरीच्या(तो मान्य करत नसे मग आम्ही असेच तिरकस बोलत असू) घशात घातला हे त्याला आम्ही अजुनही ऐकवतो. हा बोळे क्लबच्या सुवर्णकाळातला एकच किस्सा आहे. किस्से भरपूर आहेत.
जमल्यास क्रमशः नाही तर संपुर्ण :)
--------------------------------------------------------------------------------------टारझन (५ ऑक्टोंबर २००८)
प्रतिक्रिया
5 Oct 2008 - 4:38 am | बिपिन कार्यकर्ते
सद्गुरू टारानंद महाराज की जै.....
अजून काय लिहिणे.... मस्तच लिहिलंय. :)
बिपिन.
अवांतर - सर्वांना माझ्या कडूनही जेव्हा जेव्हा असतिल तेव्हा तेव्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)
5 Oct 2008 - 5:03 am | मदनबाण
च्या मारी टार, यार हे सर्व वाचुन मला पण आता भुक लागली आहे..
आम्हाला हलवा फस्त करणारी माउ कळाली होती. आमच्या तोंडचा हलवा खाते काय ?
अरे मांजरं लबाडच असतात...
(गाजर हलवा प्रेमी)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
5 Oct 2008 - 6:34 am | शितल
टारोबा.
बोळे पार्टीची सुरूवात दमदार केली आहेस.
लवकर लिही अगाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात वेळ वाया घालवु नको. ;)
5 Oct 2008 - 7:38 am | रेवती
तेवढे कचर्याच्या टोपलीतच जाऊ देत, बाकी जी मजा मजा चाललीये ती वाचत आहे. ही मजा क्रमशः असल्यास आवडेल वाचायला.
रेवती
7 Oct 2008 - 12:37 am | प्राजु
आपण बोळे फेकण्या बरोबरच चांगले रसभरीत वर्णन करून लिहिण्यातही पटाईत आहात हे आता जाणवते आहे.
तेव्हा... आपले फेकलेले बोळे आणि त्यामागचे प्रसंग वाचायला आवडतील पण जास्ती क्रमशः नको.
लगे रहो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Oct 2008 - 9:18 am | मुक्तसुनीत
मिष्टर टारझन ,
तुमच्या वेड्या दिवसांबद्दल वाचले. मजा आली. तुमच्या उमेदवारीच्या दिवसांच्या धबधब्यामधे वाहून गेलो. :-) मागे केव्हा तरी कुठल्यातरी कथा-कादंबरी का नाटकाचे नाव अंधुकसे वाचले होते ते आठवले : "जगायचंय् , प्रत्येक क्षण !"
बाळपणीची वर्षे कुणाची असोत - मग तो लंपन असो की टारझन - तुम्ही खर्या अर्थाने जगला असाल तर तुमचे किस्से सुद्धा एकदम रंजक बनतात, इतरांनाही आपापल्या स्वतःच्या नॉस्टाल्जियाकडे पहायला लावतात याचे प्रत्यंतर आले.
आगे बढो.
5 Oct 2008 - 3:05 pm | रामदास
ही मंगला केवळे या विधवा बाईच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अडचणी आणि त्यानंतर मिळालेली सफलता याची कहाणी आहे.ग्रंथालीचं पुस्तक आहे. या वर्षी अकरावी आवृत्ती निघाली. असो.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
6 Oct 2008 - 2:25 am | टारझन
आम्ही एवढ्या मोठ्या स्तुतीने वायुयोनीत गेलो आहोत (वायुयोनी: हा शब्द नाना चेंगटांकडून साभार)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
5 Oct 2008 - 9:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कुबड्या, झकास चालू आहे, तू लिहीच अजून भाग.
तुमच्या बोळ्यांवरून मला आम्ही जॉड्रलला असताना सडकी अंडी, टोमॅटो फेकायचो गोठा आणि सायकल स्टँडवर ते आठवलं. एकदातर जुनं वांगंपण कौलांवर मारलं होतं!
तुझी (आदरणीय?) आज्जी
5 Oct 2008 - 7:18 pm | टारझन
एकदातर जुनं वांगंपण कौलांवर मारलं होतं!
वांगं :O =)) =)) डेंजर .. नो वंडर आमच्यात हे गुण उपजत आहेत
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
6 Oct 2008 - 11:32 am | आनंदयात्री
चायला कुणी बोळे मारतय कुणी वांगे मारतय !! आम्ही तिचामारी बाटल्या सोडुन काही मारलेच नाय फेकुन !!
आपलाच
( फुल्ल टु फटाक्क) आंद्या
5 Oct 2008 - 1:05 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
टार्झ्टा,
आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
5 Oct 2008 - 1:35 pm | ऋषिकेश
झक्कास!!
खतरनाक!!!!!
लई भारी!!!!!!!!!!
प्रत्येकाच्या मनात "ते सोनेरी दिवस" इतके भरलेले असतात की बस्स!! मजा आली तुझेही "ते सोनेरी दिवस" वाचायला.. अजून लिहि नक्की!
-(सोनेरी) ऋषिकेश
5 Oct 2008 - 1:59 pm | प्रमोद देव
टारुशेठ मस्त लिहीलेत अनुभव.
अजून येऊ देत की!
5 Oct 2008 - 5:46 pm | इनोबा म्हणे
झकास रे! मजा आली.
बाकी 'बोळे क्लब' हे शिर्षक वाचून काहीतरी वेगळीच ;) कल्पना केली होती.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
5 Oct 2008 - 6:35 pm | टारझन
इनुभौ.. बोळा आणि बोळे हे थोडे वेगळेच असले तरी कल्पना येणं सहाजिक आहे... म्हणूनच खुलासा करणं अस्मादिकांनी जाणलं आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
5 Oct 2008 - 7:47 pm | संजय अभ्यंकर
=)) =)) =))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
5 Oct 2008 - 8:45 pm | धनंजय
हे बरे झाले - शेवटच्या बाप्याच्या कांगाव्याने पुन्हा शंका व्हायला लागली होती.
कोण्या पोरीसाठी जानीजिगरी दोस्तांच्या तोंडचा घास कमी करणे म्हणजे काय? सोडले नाही ते बरेच केले :-)
5 Oct 2008 - 8:53 pm | टारझन
शेवटच्या बाप्याच्या कांगाव्याने पुन्हा शंका व्हायला लागली होती.
बाबो !!! वाचलो ते टाकलं ते .... :)
सोडले नाही ते बरेच केले
बाप्या आजही शिव्या खातो .. त्याने आम्हाला पुन्हा १०० वेळा हलवा करून खाउ घातला तरी १ जानेवारी रोजी त्याने आमच्याशी केलेली दगाबाजी .. याला प्रायश्चित्त नाही :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
6 Oct 2008 - 9:38 am | अनिल हटेला
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
सही रे भो !!!!
शिर्षक वाचुन मी पण चक्रावलो होतो !!!!
असो !!!!
एकदम वंटास !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Oct 2008 - 11:09 am | टारझन
ज्यांनी ज्यांनी परतीसाद दिली आन् नाय दिले समद्यांचे आबार ....
आन् पुन्यांदा .. बोळे आणि बोळा यांचं का कनेक्सन नाय लकानु ... :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
सदस्य, बोळे क्लब
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
6 Oct 2008 - 11:20 am | आनंदयात्री
लै भारी लिवलय रे "टारझन बोळे" !!
आन दो और भी !!
6 Oct 2008 - 12:13 pm | धमाल मुलगा
वा रे टार्या..
झक्कास :)
ही होय ती सुप्रसिध्द बोळे पार्टी? लै भारी!
आयला एकदम "दिल चाहता है" गँग? चालुद्या..चालुद्या!!!
पण लेका, मला एक सांग, त्या बाप्यानं खिलवला हलवा त्या पोरीला, त्यात काय झालं रे?
असं नसतं बाबा, करावं लागतं असं. हां त्यानं थोडा हलवा तुमच्यासाठी बाजुला ठेवायला हवा होता हे मात्र खरं.
पण तुला सांगतो, हे असं करावं लागतं नायतर 'बोळा-पार्टी'चा आजीवन सभासद होऊन रहावं लागेल ना ;)
ते असो,
पण...येड्या, सगळ्या सगळ्या कॉलेजातल्या आठवणी जाग्या केल्यास रे!!!!
घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही?
मजा आली रे बोळेपार्टी वाचुन. अजुन काय उद्योग (सांगण्यासारखे) असले तर (म्हणजे असणारच हे १०००१% खरंच, पण तरीही असं म्हणायचं असतं चारचौघात म्हणुन..) येऊदेत ना ते ही!
- (आमच्या 'डी.सी.एच.'मधला समीर) ध मा ल.
6 Oct 2008 - 2:20 pm | टारझन
ही होय ती सुप्रसिध्द बोळे पार्टी? लै भारी!
अर्रे तु हवा होतास .. निर्लज्ज शिरोमणी काय असतात ते कळालं असतं .. आमची रात्र सकाळी ५-६ ला होत असे .. आब्या मात्र पाव-वाल्याच्या हॉर्नने उठायचा ( पाववाला - :) हा पुढच्या भागात टाकतोच .. ) आणि सिंन्सियर्ली कॉलेजला जायचा .. बाप्या अन् मी मात्र दुपारी १२-१ पर्यंत तानुन द्यायचो .. घरून मिसकॉल यायचे पण ठिंम्म .. :)
पण लेका, मला एक सांग, त्या बाप्यानं खिलवला हलवा त्या पोरीला, त्यात काय झालं रे?
तो एक भारत-पाकिस्तान शांतता करारारारखा प्रश्न आहे. आम्हाला अजुन पुख्ता सबुत मिळालेले नाहीत. पण बरेच असे सबुत आहेत ज्यवर बचाव पक्षाला दर वेळी संशयाचा फाय्दा मिळून बेल मिळते आहे.
असं नसतं बाबा, करावं लागतं असं. हां त्यानं थोडा हलवा तुमच्यासाठी बाजुला ठेवायला हवा होता हे मात्र खरं.
ए चल रे ... साला .. करावं लागतं म्हणे ... आमच्या पेक्षा ती मोठी काय बे ? मग येगळा हलवा करून द्यायचा ना .. साला कष्ट आम्ही केला .. अन् आयता हलवा खपवला ...
पण तुला सांगतो, हे असं करावं लागतं नायतर 'बोळा-पार्टी'चा आजीवन सभासद होऊन रहावं लागेल ना
त्यावरही हेल्दी महाचर्चा झाल्या आहेत. पण ते अडल्ट कंटेन्ट खाली टाकावं लागेल ... पाहूया...
पण...येड्या, सगळ्या सगळ्या कॉलेजातल्या आठवणी जाग्या केल्यास रे!!!!घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही?
आंक्षी बराबर हे .,,,, आणि तुमच्या आठवणी जाग्या झाल्या यातच लेखकाचं यश आहे....
मजा आली रे बोळेपार्टी वाचुन. अजुन काय उद्योग (सांगण्यासारखे) असले तर (म्हणजे असणारच हे १०००१% खरंच, पण तरीही असं म्हणायचं असतं चारचौघात म्हणुन..) येऊदेत ना ते ही!
अब तो सोचना पडेंगा .. मला वाटलेलं पब्लिक बोर होईल ... :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
24 Feb 2011 - 8:24 pm | मनराव
>>घरी ऊत, कॉलेजात ऊत, क्लासला ऊत, ट्रेनमध्ये ऊत, बसमध्ये ऊत...काय साला लाईफ होतं रे ते....एकदम गोल्डन डेज रे गोल्डन डेज.. खिशात दमडी नसेना का, पण जीव कसा सुखी असायचा, नाही?<<
हे वाक्य एकदम पु. लं. च्या पेस्तनजी स्टाईल मधलं आहे........ :)
6 Oct 2008 - 12:14 pm | मनस्वी
सहीच रे टरटर.. बोळे क्लबचे किस्से वाचायला आवडतील.
मनस्वी
6 Oct 2008 - 12:52 pm | स्वाती दिनेश
अर्रे.. मस्तच लिहिल आहेस ..
स्वाती
6 Oct 2008 - 9:38 pm | झकासराव
हा हा हा हा हा हा
बोळे क्लब वाचुन आधी वाटल अविवाहीत वाल्यांसाठीच हा धागा सुरु केलाय की काय?? ;)
येवु देत बाकीचे किस्से.
अवंतर :तु भारतात आल्यावर काय काय खौ घालणार आहेस रे भो??
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
7 Oct 2008 - 1:20 am | बिपिन कार्यकर्ते
अहो तो टारु ओरडून ओरडून सांगतो आहे की बोळे क्लब, बोळा क्लब नाही... ;)
28 Apr 2010 - 4:09 am | इंटरनेटस्नेही
वाचुन मनोरंजन झाले... किप इट अप..!
28 Apr 2010 - 6:30 am | सन्जोप राव
दुनियादारी, कोसला अशी अनेक पुस्तकं आठवली. अप्रतिम...
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
28 Apr 2010 - 8:05 am | राजेश घासकडवी
धमाल स्वच्छंद दिवस डोळ्यासमोर उभे राहातात. आणखीन येऊ द्यात टारझनभाऊ...
(फुरसतके) रातदिन
20 May 2010 - 2:05 pm | Pain
अहिरानी म्हणजे काय ?
24 Feb 2011 - 5:45 pm | पर्नल नेने मराठे
खान्देशात अहीराणी नावाची भाशा आहे.
20 May 2010 - 2:37 pm | गुंडोपंत
मजा आली... झकास मजा!
अजून बोळे येउ द्या...
आपला
टारोपंत
20 May 2010 - 5:17 pm | पिंगू
जाम भारी टार्या..
21 Feb 2011 - 5:21 pm | नरेशकुमार
येउदे कि अजुन.....कशाला उगा ते संपुर्न ?
24 Feb 2011 - 4:16 pm | गणेशा
बोळे क्लब आवडला ... मस्त एकदम ..
जुण्या दिवसांच्या आठवणीमध्ये मन रमुन गेले...
"जस जसे दिवस सरत जातात तस तसे त्या आठवणींची फुले होत जातात" ..
मस्त एकदम
24 Feb 2011 - 4:49 pm | विजुभाऊ
"जस जसे दिवस सरत जातात तस तसे त्या आठवणींची फुले होत जातात" ..
किंवा मग मुले तरी होतात
24 Feb 2011 - 7:10 pm | गणेशा
चुकीचा रिप्लाय ..
30 Apr 2011 - 1:56 pm | विकाल
टारो... यारो की कहानी पूर्ण करो बरं.... आधा नै रखनेका....!!!!!!!!
11 May 2011 - 10:28 pm | कौशी
लवकर लिही . क्रमश चालेल ...
14 May 2011 - 9:54 am | आत्मशून्य
वीशेषतः रात्र रात्र एकाच कॉम वरती मो.कॉ./एन.एफ.एस/स्ट्री. फा. सारखे मल्टीप्लेयर गेम्स खेळणं म्हणजे (होय तेव्हां लॅन करायची ऐपत न्हवती ना तेव्हडी मशीन्स होती) तर फूल्टू राडाच..... काय जोश असायचा अणी मग अचानक केव्हांतरी पोहे वा कोल्ड कॉफीची तलफ आली म्हणून तसच बाहेर सूटायच.... मोव्ही प्लेअर म्हणून फक्त विंडोज मेडीया प्लेअर असायचा आणी सीडी कीतीही चांगली असो तो एकदा तरी गंडायचाच... मग काय अख्खा कॉम्प्यूटर रीस्टार्ट....... तर एकदा एका आडगावातील धनाड्य एकाकी गरजवंताला वीनँम्प प्लेअर चक्क ६०० रूपयांना वीकला होता, डीजीट (त्यावेळचं 'चीप' नावाच मॅगझीन) च्या फ्री सीडीमधून ऊचलून..... खरच काय दीवस होते.
असो लेखन मस्तच.. पूढील भागांच्या प्रतीक्षेत.
14 May 2011 - 2:05 pm | अविनाशकुलकर्णी
मिष्टर टारझन ,
एकदम मस्त लिहिले आहे..
एकदम हलके ..............पचायला अजिबात जड नाहि..
लगे रहो..
14 May 2011 - 2:06 pm | अविनाशकुलकर्णी
मिष्टर टारझन ,
एकदम मस्त लिहिले आहे..
एकदम हलके ..............पचायला अजिबात जड नाहि..
लगे रहो..
11 Dec 2016 - 8:37 pm | Rahul D
संपादक मंडळाला एक नम्र विनंती. हा id पुन्हा एकदा सुरू करावा. धन्यवाद