विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही.
असाच एक लेख नवे मराठी विकिपीडियन जनार्दन केशव म्हात्रे यांच्या बद्दल लिहिला गेला आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीय पुरेसा मजकुर स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती दुजोरा मिळवण्यासाठी मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.
जनार्दन केशव म्हात्रे हे स्वत: एक गजलकार तथा गजल अभ्यासक आहेत.
स्थित्यंतर हा त्यांचा गजलसंग्रह प्रकाशित आहे.
मराठी गजलच्या प्रसारासाठी त्यांनी [[गजलांकित प्रतिष्ठान]] ही संस्था सुरू केली आहे.
मराठी गझलांचे मुशायरे २०१४ पासून करणारी एक संस्था म्हणजे [[गजलांकित प्रतिष्ठान]]. या संस्थेचे जनार्दन केशव म्हात्रे यांनी या संस्थेमार्फत मराठी गझल मुशायरे सुरू केले. ठाणे येथे १४ मार्च २०१४ ला सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजलांकित या संस्थेचा पहिला गझल मुशायरा सादर झाला. ठाणे व नजीकच्या परिसरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत त्यांनी ठाण्यासह वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात येण्यास मदत झाली आहे.
कवी तथा गजलकार, निवेदक, गजल अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात.
== '''जनार्दन केशव म्हात्रे यांचे प्रकाशित साहित्य''' ==
स्थित्यंतर : गजलसंग्रह २०११
स्पर्शांकुर : प्रातिनिधिक सहभाग - संपादक [[भीमराव पांचाळे]]
मराठी गजल : अर्धशतकाचा प्रवास - प्रातिनिधिक सहभाग - संपादक : डॉ. [[राम पंडित]] - प्रकाशक : साहित्य अकादमी
गजल विषयक विविध लेख प्रकाशित : [[गजल सादरीकरण]]
== '''साहित्य सहभाग''' ==
[[अखिल भारतीय मराठी गझल संमेलन]] नियमित सहभाग
मराठी गझलेचा जागतिक संचार या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात मराठी गझलमधील विश्वात्मकता या परिसंवादात सहभाग
== '''गजल विषयक योगदान''' ==
मराठी गजलच्या प्रसारासाठी त्यांनी [[गजलांकित प्रतिष्ठान]] ही संस्था सुरू केली आहे.
संस्थेच्या माध्यमातून गजल विषयक अनेक उपक्रमांचे आयोजन
प्रतिक्रिया
14 Feb 2017 - 4:01 pm | आनन्दा
माफ करा पण हेतू कळला नाही.
14 Feb 2017 - 4:09 pm | माहितगार
संदर्भासाठी स्वतंत्र स्रोतातून खात्री होऊ न शकलेले, काही लेख मराठी विकिपीडियाच्या परिघात बसण्याच्या साशंकतेमुळे वगळले जाऊ शकतात, पण मिसळपाव सारख्या संस्थळावर अशी माहिती वाचकांना मिळू शकेल हा पहिला उद्देश. व्यक्ति बद्दल अधिक माहिती/ स्वतंत्र दुजोरा मिळाल्यास पहावे असा दुसरा उद्देश असतो.
प्रतिसादासाठी आभार