श्राद्ध

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
3 Oct 2008 - 11:00 pm

सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित.

श्राद्ध

मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो,
ती जीवंत असताना ,तीला कधी,
प्रेमाने साडी आणली नाही...
पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र,
दरवर्षि घालतो.......
ती जीवंत असताना, तिला कधी,
प्रेमान जेवु घातले नाही,
पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र
दरवर्षि दाखवतो....
ती आजारी होती.. अंथरुणाला खिळुन होती
तिच्या सर्वांगाला दुर्गंधि येत होती,
मी कधी तीला प्रेमाने आंघोळ घातली नाही
पण तिच्या पिंडावर गुलाब पाण्याचे प्रोक्षण मात्र,
दरवर्षि करतो......
ती जीवंत असताना कधी तीला प्रेमाने
वेणी आणली नाही..
पण तिच्या प्रतिमेला भलामोठा हार मात्र
दरवर्षि घालतो.....
लोक म्हणतात, तु हे करतोस
पण आईच्या मरणांति
जीवंतपणी केली असतीस तिची सेवा
तर मिळालि असती
तिच्या आत्म्याला शांती..
खर आहे पण आपल्या सगळ्याच इच्छा
काही पुर्ण होत नाहीत
म्हणुन मी माझ्या मुलाला सांगतो
बाबारे ! मला जे जमल नाही ते तु कर
म्हातारपणि आमचा नीट साभांळ कर ....
पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं
जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं
ते जर जमल असतं तर या प्रुथ्वीवर
आनंदवन फुललं असतं......
असो..! कावळ्याला पिंड ठेवतो
थोड्यावेळ वाट बघतो...
नाही शिवला तर दर्भाचा करतो
आणि आपण आपल जेवुन घेतो
माझ्याही पोटातले कावळे आता
काव काव करीत आहेत.....
काव... काव... काव.....! ! !

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Oct 2008 - 12:59 am | विसोबा खेचर

के व ळ अ प्र ती म कविता....!

गोखलेसाहेब, साला दिलाला हात घातलात...

साली एकेक ओळ अक्षरश: बोचली जिवाला, काळीज चिरून गेली....!

पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत

क्या बात है...!

भविष्यात ही कविता म्हणायची वेळ माझ्यावर कध्धी येऊ नये म्हणून मी खूप खूप ऍलर्ट असतो..!

आपला,
(मातृभक्त) तात्या.

प्राजु's picture

4 Oct 2008 - 1:01 am | प्राजु

वेगळ्या विषयावरची कविता.. एकदम वेगळी
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

4 Oct 2008 - 4:02 am | मदनबाण

एक जबरदस्त कविता..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

राघव's picture

4 Oct 2008 - 10:41 am | राघव

कसलं मारलंय राव!! पण हे झणझणीत अंजन आहे. कुणावर अशी वेळ येऊ नये.
कविता ब्येश्ट आहे. अजुन येऊ द्यात. :)
मुमुक्षु

अनिरुध्द's picture

4 Oct 2008 - 8:26 pm | अनिरुध्द

जीवंत माणसावर पेम करण कठिण असत
ते जर जमल असत तर या प्रुथ्वीवर
आनंदवन फुलल असत......

एकदम सही. परंतु खरी परीस्थिती ही अशी आहे.

जिवंतपणी माणसं वाटतात भुतं
मेल्यावर त्यांचाच होतो माणूस
जिवंतपणीच प्रेम करा माणसावर
राहून गेलं या जन्मी तर...
आई पुन्हा नको म्हणूस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत

काय लिहिलंत, व्वा!

(नि:शब्द) अदिती

सहज's picture

4 Oct 2008 - 9:28 pm | सहज

पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत

मार्मीक काव्य!