(मिपा वर माझा पहिला लेख आहे, टाइपिंग मिस्टेक बद्दल क्षमस्व )
महत्वाचा डेटा असलेली हार्ड्ड्राइव बंद पडणे , स्लो रेस्पॉंड करणे किंवा फॉरमॅट होणे एक डोकेदुखी असते.
आंतरजालावर उपलब्ध काही सॉफ्टवेर वापरुन काही डेटा परत आणणे अशक्य नाही ( उदा . R- STUDIO - http://www.r-studio.com )
आणि इतर काही सॉफ्टवेअर्स . हे सर्व सॉफ्टवेअर ड्राइव रेस्पॉंड करत असताना वापरता येतात.
पण हार्ड डिस्क रिस्पोंड करत नसेल तर काही स्पेशल प्रक्रिया वापरुन डेटा पुन्हा प्राप्त करता येतो.
१. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत असेल पण My computer मधे येत नसेल किंवा फॉर्मॅट करा असा संदेश येत असेल तर हार्ड ड्राइव चे फर्मवेयर खराब असण्याची शक्यता आहे.
२. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत नसेल पण कनेक्ट केल्यावर स्पिन होत असेल तर ट्रॅनस्लेटर चा प्रॉब्लेम असु शकतो
३. जर हार्ड्ड्राइव computer -> Manage - > Disk Management मधे दिसत नसेल पण कनेक्ट केल्यावर स्पिनडाउन होत असेल तर, क्लिकिंग चा आवाज होतो का ते बघावे.. जर क्लिकिंग होऊन ड्राइव बंद पडत असेल तर ड्राइव हेड गेले आहेत.
४. जर ड्राइव कनेक्ट केल्यावर PCB गरम होत असेल तर, PCB - IC गेला असण्याची शक्यता असते .
५. जर ड्राइव कनेक्ट केल्यावर PCB गरम होत नाही पण ड्राइव स्पिन पण होत नाहीए तर हेड प्रॉब्लेम किंवा स्पींडल मोटर जाम झाले असु शकते.
आता उपाय, पुढील भागात...
प्रतिक्रिया
4 Feb 2017 - 7:02 am | तुषार काळभोर
मराठीत बहुधा हि माहिती पहिल्यांदा लिहिली गेली असावी. उपायांबद्दल उत्सुकता आहे.
अवांतर: टायपिंग मिस्टेकची काळजी करू नका. होईल हळू हळू सवय. फक्त शुद्धलेखनाकडे मुद्दाम दुर्लक्ष करू नका.
अति अवांतर: मिपामध्ये स्वागत!
4 Feb 2017 - 7:41 am | कंजूस
चांगला लेख होईल. पुर्वी (२०१०) I.C CHIP आणि DIGIT सारखी मॅगझिन हे प्रश्नोत्तर सदर चालवायची. नंतर मोबाइल इंटरनेटचा प्रसार झाल्यावर लॅपटॅाप,इत्यादिंकडे माध्यमांकडे लोक वळले. आताची पिढी कोणते कंम्प्युटर वापरत असेल? असेंबल्डचे प्रमाण कमी झाले असेल. मराठीत तंत्रज्ञान लिहिण्यासाठी पेपर हे माध्यम ठीक नाही.पुस्तकांमध्ये प्रश्नोत्तरे करता येत नाहीत शिवाय माहिती अपडेट करता येत नाही. इंटरनेटवर इंग्रजी फॅरम्स आहेत. उदा० stackoverflow dot com. विकिमराठीत अतिमराठीकरणाने आणि संदर्भ देण्याच्या आग्रहाने दुर्धर होते.ब्लॅाग्जमध्ये एकाच व्यक्तीकडून सातत्य राहात नाही. राहिली ही इनमीनतीन सक्षम मराठी संस्थळं. उत्तरोत्तर सूक्ष्म आणि विस्तृत तांत्रिक माहिती येण्याच्या प्रतिक्षेत
4 Feb 2017 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
उपयोगी माहितीचा लेख. हार्ड ड्राईव्हच्या समस्या १५ वर्षांपूर्वीपर्यंत बर्याचदा यायच्या. गेल्या १६ वर्षांत एकदाच असा प्रसंग आला होता.
उपायांची वाट पाहत आहे.
4 Feb 2017 - 2:30 pm | इरसाल कार्टं
येउद्या येउद्या...
4 Feb 2017 - 5:52 pm | संजय पाटिल
वाचतोय...
4 Feb 2017 - 6:52 pm | जादु
हे सॉफ्टवेअर पन खूप छान आहे," EaseUS Data Recovery Wizard अनलिमिटेड " संपूर्ण १६० जीबी हार्ड डिस्क वरील डाटा परत मिळवला होता.
4 Feb 2017 - 7:23 pm | हतोळकरांचा प्रसाद
छान माहिती!