दिवस आजचा

शुभदा's picture
शुभदा in जनातलं, मनातलं
3 Oct 2008 - 4:18 pm

आज सकाळी अंथरुणात असताना हलकेच सूर्याची तीरीप डोळ्यावर आली, मन आणि शरीर दोघांना खूप छान वाटले. जसे रात्री झोपताना चंद्राचा शीतल प्रकाश आणि वार्‍याची हलकी झुळुक छान झोप देऊन जाते तसेच अशी प्रसन्न सकाळ चांगल्या दिवसाची भेट देऊन जाते.
श्रावणातला उन, पावसाचा खेळ चालू होता. मी उठणार तेवढ्यात आवाज कुठून आवाज आला. चक्क सूर्य देव माझ्याशी बोलत होते. "थांब माझीच दमछाक झाली आहे. रोज सगळ्याना वेगवेगळ्या रूपात भेटताना. पण, मला रोज तेजोमय तळपण्यासाठी कुठून ताकद आणतो मी. माझ्या अस्तित्वासाठी रोजचा रोज तळपतो मी" . सूर्यदेव ईतकेच बोलले पण खूप सांगून गेले.
कशाला उद्या साठी, कोणासाठी आयुष्याचे जगण्याचे यश अपयश ठरवायचे? माझ्यासाठी मी मग काय दिवस, आणि आयुष्य यशाने पूर्ण असेल.
सुखाची बाग दूर वाटेवर दिसत होती. मंद सुखाचा सुगंध पसरला होता. सुखाचा बगेकडे चालताना हलकेच काटा रूतला खूप दु:ख झाले. तरीही पुढे चालत राहीले. मागे वळून बघताना काटा कुठे रूतला आठवत नव्हते कारण सुखमाय सुगंधने सगळी वाट व्यापली होती.
जीवन ईतकेच सोपे असतेन!!!
अशा छान वीचारांनी दिवस सुरू केला .

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

केवळ_विशेष's picture

3 Oct 2008 - 4:25 pm | केवळ_विशेष

अहो थोडं नीट टंकाना...

धमाल मुलगा's picture

3 Oct 2008 - 4:34 pm | धमाल मुलगा

छान लिहिताय की शुभदाताई.

फक्त एक विनंती:
http://www.misalpav.com/node/1312
ह्या दुव्यावर जाऊन कसं टाईप करायचं ते साधारण १०-१५ मिनिटे अभ्यासलं ना तर एकदम सराईतासारखं टाईप करु शकाल तुम्हीही :)

पहा प्रयत्न करुन!

शुभदा's picture

3 Oct 2008 - 4:46 pm | शुभदा

जरुर प्रयत्न करेन.
धन्यवाद

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर

तुमाला काय मनाचय नीत कलले नाई..

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 11:19 am | विसोबा खेचर

छान लिहिले आहे...

अवांतर - बाकी तुमचे सूर्यदेव हे एक नंबरचे चालू आहेत. कुंतीला ते काय समर्थन देतात ते इथे वाचा! :)

तात्या.

केवळ_विशेष's picture

6 Oct 2008 - 3:51 pm | केवळ_विशेष

विनंतीस मान दिल्याबद्दल!

मीनल's picture

6 Oct 2008 - 4:53 pm | मीनल

मस्त पण अगदीच त्रोटक आहे .
मस्त पदार्थ वाटीभर तरी खावा.इथे तर चमचाभरच मिळाला.
तसच अजून लिहा.

मीनल.