प्रणय रात्र

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
1 Feb 2017 - 8:56 pm

अधरावरल्या दंतव्रणावर जिभ ह्ळुवार फिरली
प्रणय रात्र ति आठविता, गात्रे पुन्हा मोहरली
*
धुंद सारे शब्द होते..कामधुंद त्या भावना
बहर प्रीतिचा मनि, अन मदन दाह सोसवेना
प्रणयाची लाट ओसरे,पण सय अजुन राहीलि
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली
*
घेतले मिठीत तु अन कामगंध उधळले
मिसळता श्वासांत श्वास, गंध उन्माद्क परीमळे.
प्राशिता मकरंद अधराचा, खुण मागे ठेवली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली
*
पुनवेच्या चांदण्यात सारी ,ति मधुरात्र डुंबली
प्रणय खेळ खेळता ,रात्र सारी जागवली
उन्मादक तृप्त तनु, काम रसानें माखली
ति प्रणय रात्र आठविता,गात्रे पुन्हा मोहोरेली
*

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2017 - 10:34 pm | टवाळ कार्टा

मस्तय

समाधान राऊत's picture

1 Mar 2017 - 6:26 pm | समाधान राऊत

लावणी टाइप एकदम!!!
आवडली