मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 3:22 pm

.

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.

******************

सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते.

नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..!

देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;)
सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले.

मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले.

१) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी.

२) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल.

३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे
उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल.

४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल.

५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन.
तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो.

६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक.

********************

हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या.

टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस

यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले.

त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे.

चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत.

****************************

पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत.

मासिक आव्हाने

१. एक सलग फेरी ५० किमी (<१०० किमी)
२. एक सलग फेरी १०० किमी (कितीही)
३. एकूण अंतर ५०० किमी
४. एकूण अंतर १,००० किमी (*)
५. एकूण चढण ३,००० मी
६. एकूण चढण ७,००० मी (*)

वार्षिक आव्हाने
१. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे
२. १०० किमी दररोज असा १ आठवडा
३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना)
४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠
५. किमान ५ घाट (*)

****************************

सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे.

****************************

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे.

१) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी.
२) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी.
३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी.
४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी.
५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

क्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

इथे सध्या रोज पाऊस पडतोय त्यामुळे धावणे जमत नाही. भर पावसात पळणारे गोरे आणि चीनी पाहिले की स्वतःची लाज वाटते पण मागे एकदा उत्साहाने पळणे सुरू केल्यानंतर गुडघेदुखी सुरू झाली होती. त्यामुळे पुन्हा पळणे सुरू करायचे तर 'कोअर स्ट्रेंग्थ' वाढवा असा मोलाचा सल्ला एका जाणकार मित्राने दिला. त्यानुसार ६० दंड व ४० बैठका गेले १५ दिवस नियमीतपणे सुरू आहे.

आरंभशूरपणा नको म्हणून 'रनींग' शूज घेणे टाळतो आहे. पण पाऊस जरा थांबला की घेईन म्हणतो.

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2017 - 7:30 pm | पिलीयन रायडर

मलाही कुणी ह्याबाबतीत थोडं सांगेल का? काल कंटाळा आला ट्रेडमिलचा म्हणुन सायकलिंग केलं जिम मध्ये. पण गुडघे फार दुखतात. सोबत काही पुरक व्यायाम करायला हवेत का? मुळात "कोअर स्ट्रेन्थ" म्हणजे काय?

बिगिनर लेव्हलला सायकलिंगमध्ये रेझिस्टन्स किती ठेवावा हे ही कुणी सांगितलं तर बरं होईल.

शिवोऽहम्'s picture

8 Feb 2017 - 11:19 pm | शिवोऽहम्

पाठ, पोट आणि कंबरेचे स्नायु म्हणजे साधारणपणे 'कोअर' म्हणता येईल. ते बळकट असतील तर धावताना योग्य पोश्चर राहील आणि मांड्या, गुडघे आणि पोटरीचे स्नायु यांवर अनावश्यक ताण पडणार नाही.

सायकलींग करताना आधी (व नंतरही) स्ट्रेचेस नक्की करा, आणि हळूहळू रेझिस्टन्स वाढवा.

दाते प्रसाद's picture

8 Feb 2017 - 11:01 am | दाते प्रसाद

डॉक ची आयडिया कॉपी करून आम्ही आमच्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये सूर्य नमस्कार चॅलेंज सुरु केलं आहे .

प्रत्येकाने किमान ५ नमस्कार घालणं अपेक्षित आहे . ह्याला छान प्रतिसाद मिळाला आणि आमचा ग्रुप, फॉर्वर्डसऐवजी चॅलेंजची चर्चा करू लागला.

रोज सकाळी अपडेट्स यायला लागल्यात , सगळं ग्रुप चार्ज्ड झाला आहे . येत्या १० तारखेला चॅलेंज पूर्ण व्हायला होईल .

मोदक's picture

8 Feb 2017 - 5:33 pm | मोदक

व्वाह...!! टाळ्या..

स्थितप्रज्ञ's picture

8 Feb 2017 - 7:00 pm | स्थितप्रज्ञ

मस्त आयडिया....प्रत्येक ग्रुपने आदर्श घ्यावा अशी संकल्पना.

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2017 - 7:28 pm | पिलीयन रायडर

भारी आयडीया आहे! कॉपी करण्यात येईल!

मोदक's picture

8 Feb 2017 - 9:01 pm | मोदक

आज पण ४२ किमी होतील.

घर-हाफिस-घर

टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर पाध्ये, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक यांनी ५० किमी ७ दिवसाचे चॅलेंज यशस्वीरीत्या पूर्ण करून ६४८ किमी सायकलिंग केले..!!

टाळ्या...!!!

अरिंजय's picture

11 Feb 2017 - 8:01 pm | अरिंजय

टीम सायक्लोमॅनियाक्सचे दणकुन अभिनंदन. पाच घाट पालथे करणार्या सागर यांना दंडवत.

अजित पाटील's picture

9 Feb 2017 - 11:48 am | अजित पाटील

खुपच छान उपक्रम आहे !!

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2017 - 8:48 am | पिलीयन रायडर

आमच्या ग्रुपनेही चांगली कामगिरी केली आहे. सर्वांना नाही जमलं चॅलेंज पुर्ण करायला. पण हरकत नाही.

सविता००१ - ५० किमी ५० सुन (ही फेब महिन्यात एकटी १५० किमी आरामात करेल!)
सामान्य वाचक - ४० किमी २४ सुन (शिवाय स्ट्रेन्थ ट्रेनिंग वेगळं)
पिरा - ३५ किमी (हा खरा लिंबुटिंबु मेंबर!)
इशा - किमान १५०-२०० सुन तरी नक्की असतील. ती नक्की आकडा कळवतेय. (ही ४-५ जणींच्या वतीने सुन घालते!)

बाकी मेंबर काही ना काही कारणाने पुर्ण नाही करु शकले. स्रुजाला पायाला लागलं पण पहिले चार दिवस तिनेही २० किमी केलेत. पण सध्या धरत नाही आहोत,
त्यामुळे किमी मध्ये आमच्या ग्रुपने - १२५ किमी केले आहेत! आणि सोबत शेकड्याने सुर्यनमस्कार! (फायनल आकडा येतोचे..)

पण आता हे थांबणार नाही इथेच. एक मी सोडले तर ग्रुपचे सर्व मेंबर इतका व्यायाम रोजच करत असतात. त्यामुळे त्याचे महिन्याचे आकडे फार भारी असतील. हे चॅलेंज माझ्या सारख्यांसाठी फार आवश्यक होतं. व्यायामाला टांग मारण्याची हुक्की रोज येत होती पण ग्रुपमुळे केलं. संपुर्ण महिनाभर हे कंटिन्यु करण्याचा पुर्ण प्रयत्न सगळ्याच करु. :)

पिलीयन रायडर's picture

11 Feb 2017 - 9:01 am | पिलीयन रायडर

इशा - २३७ सुर्यनमस्कार!!!!

पिराताई & ग्रुप - जोरदार चालु आहे. हे असेच चालू राहू द्या.

मोदक's picture

11 Feb 2017 - 8:42 pm | मोदक

झक्क्कास हो... अभिनंदन.

आणखी मोठी टीम बनवा.. नवीन नवीन चॅलेंज ठरवून पार करा..!!

बाबा योगिराज's picture

14 Feb 2017 - 2:52 pm | बाबा योगिराज

अभिनंदन पिरा तै,
उपक्रम अगदी व्यवस्थित चालू आहे. मला वाटत कि तुम्ही लिंबुटिंबु हे नाव बदलायला हरकत नाही.
तुमच्या उपक्रमास भंरपूर शुभेच्छा.

बाबा योगीराज.

माझीही शॅम्पेन's picture

13 Feb 2017 - 12:26 pm | माझीही शॅम्पेन

माझा छोटा अपडेट
ह्या मौसमातील माझी शेवटची हाफ मॅरेथॉन , चढ उतरांनी भरलेली ठाणे हिरानंदानी हाफ मॅरेथॉन 2 तास आणि 35 मिनिटात पूर्ण केली , मज्जा आली अस सहज अजुन 4/5 किमी पळू शकलो असतो

तुम्ही फुल्ल मॅरेथॉन पण आरामात कराल हो. __/\__

हाभिणंदण..!!

अरिंजय's picture

13 Feb 2017 - 6:26 pm | अरिंजय

अभिनंदन हो दादा

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 9:40 am | डॉ श्रीहास

अभिनंदन ...

इरसाल कार्टं's picture

22 Feb 2017 - 10:24 am | इरसाल कार्टं

आता मलाही हाफ मॅरेथॉन ची तयारी करावीशी वाटायला लागलीय.

अनिल मोरे's picture

13 Feb 2017 - 12:50 pm | अनिल मोरे

काल मी हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन १ तास आणि ४७ मिनिटात पूर्ण केली

मोदक's picture

13 Feb 2017 - 1:32 pm | मोदक

झक्कास..!! अभिनंदन हो..!!

माझीही शॅम्पेन's picture

13 Feb 2017 - 3:46 pm | माझीही शॅम्पेन

जबरदस्त मोरे साहेब __/\__ त्रिवार अभिनंदनं

बाळ सप्रे's picture

13 Feb 2017 - 4:39 pm | बाळ सप्रे

वॉव टायमिंग आहे.. टाळ्या..

sagarpdy's picture

13 Feb 2017 - 5:23 pm | sagarpdy

+१११

अभिनंदन. टायमिंग तर एकदम खतरनाक.

अरिंजय's picture

13 Feb 2017 - 6:27 pm | अरिंजय

मस्त, जबरदस्त मोरे साहेब

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 9:39 am | डॉ श्रीहास

अभिनंदन.... जोरदार टायमिंग आहे.

अनिल मोरे's picture

15 Feb 2017 - 11:23 pm | अनिल मोरे

धन्यवाद!!!

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2017 - 7:54 pm | पिलीयन रायडर

पुन्हा एकदा कुणी चॅलेंज घ्यायला तयार आहे का? ७ दिवस - झेपेल तो व्यायाम - ओपन ग्रुप.
ओपन ग्रुप - दिनांक १५ फेब पासुन सुरुवात करु. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथेच सांगा आणि टारगेट्स सुद्धा धाग्यावरच जाहिर करायचे प्रत्येकाने. लोक एकदा फायनल झाले की हवं असल्यास १५ ला रात्री एक व्यनि साखळी सुरु करु. ज्यात रोजचे अपडेट्स देता येतील.

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2017 - 11:39 pm | पिलीयन रायडर

स्रुजा, सविता, सामान्य वाचक, विशाखा, सुचेता १५ फेब पासुन सुरु करत आहेत. अजुन कुणाला यायचंय का ह्या ग्रुप मध्ये?

सप्तरंगी's picture

15 Feb 2017 - 6:16 pm | सप्तरंगी

हो मी पण आहे तुमच्या या ओपन ग्रुप...थँक्स. आजच्या व्यायामाबद्दल बद्दल काही वेळात सांगेनच.

डॉक्टरांनी कल्पना मांडली ७ दिवस चॅलेंजची आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आपापले ग्रुप बनवून, काही जण एकेकट्याने असे चॅलेंज चालू झाले. मलाही सुरुवात करायची होती पण नुकतीच SCMM फुल मॅरेथॉन झाली असल्याने मी रेस्ट मोड वर होतो. शेवटी ६-१२ फेब असा आठवडा ठरवून चॅलेंज ला सुरुवात केली. यात थोडा बदल म्हणून मी रनिंग आणि सायकलिंग दोन्ही केले. पहिले दोन दिवस १० किमी रनिंग करूनच हालत खराब झाली म्हणून तिसरा दिवस ५० किमी सायकलिंग केले. तीन दिवसातच एवढा थकलो कि चवथ्या दिवशी सकाळी उठलोच नाही. मग रात्री कामावरून आल्यावर सायकलिंग ला सुरुवात केली. ११.४५ पर्यंत ४० किमी होत आले. म्हटलं 12 च्या आत काही ५० किमी होत नाहीत म्हणून मग सायकल थांबवून उरलेल्या १५ मिनिटात २ किमी रनिंग केले आणि त्या दिवसाचं टारगेट संपवलं.

पाचवा दिवस थोडा गडबडीचा गेला. शनिवार-रविवार कुटुंबासोबत पिकनिक ला जायचे ठरलेलेे. सहाव्या दिवशी थोडी सायकलिंग करायची म्हणून मित्राकडून सायकल स्टँड बसवून घेतला गाडीला. त्याची तयारी, थोडी कामं, एकदोन मित्रांना भेटायचे होते म्हणून गॅप घेत घेत १० किमी रनिंग पूर्ण केले.

सहावा दिवस पूर्ण पिकनिक मूड मधेच होता. सायकलिंग करायला जमलंच नाही. मग रात्री १०.१५ ला रूमवर जेऊन आल्यावर ठरवलं बीच वर रनिंग ला जाऊ. बीच वर पळायला सुरुवात केल्यावर समजलं की सुक्या वाळूत ग्रिप मिळत नाहीय मग ओल्या वाळूत पळायला सुरुवात केली. बीच वरील वातावरण एकदम भारित करणारं होतं. आदल्या दिवशीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळे चंद्रप्रकाश मस्त पडला होता. भरतीला सुरुवात झाल्यामुळे लाटांचा आवाज हळूहळू मोठा होत होता. पूर्ण बीचवर कोणीच नव्हतं. मी मनाशी बोलतच होतो की कुत्रं पण नाही किनाऱ्यावर तेव्हाच एक कुत्रं कुठुनशी धावत आलं आणि मला पळताना बघून परत लांब गेलं. मी माझे राऊंड चालू केले एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. दुसऱ्या टोकाकडे जाताना लांब एक लाईट दिसत होता. तिथपर्यंत जायचं ठरवलं. तिथून परत येत असताना बाजूला एक शेड दिसलं. नीट निरखून पाहिल्यावर समजलं कि ते स्मशान होतं. तसा माझा भुताखेतांवर विश्वास नाही पण भुतांचा माझ्यावर असला तर काय घ्या म्हणून उगाच रिस्क नको म्हणून परत तिथपर्यंत गेलो नाही. ओहोटीच्या लाटांनी परत जाताना किनाऱ्यावर बरीच नक्षी तयार केली होती. एक नक्षी तर मला खूप मोठ्या कोंबडीच्या पायासारखे वाटत होती. मनात विचार आला जर आता ती कोंबडी आली आणि तिने मला किड्यासारखं टिपलं तर. काही ठिकाणी पाण्यातल्या मिठामुळे काळ्या पांढऱ्या लाटा तयार झाल्या होत्या किनाऱ्यावर आणि त्या काळ्या भागात खड्डा आहे असं वाटत होतं सारखं. काही ठिकाणी तीच नक्षी उभी तयार झालेली. कशी झाली काय माहीत. पण तिकडून धावताना मागून हेडलाईट मारल्यासारखं वाटत होतं. मी दोनदा मागे वळून पण बघितलं कोणती गाडी आली की काय. ६ किमी नंतर पाय खूप दुखायला लागले. परत जावंसं वाटू लागलं. पण चॅलेंज परत पहिल्यापासून सुरु करायच्या विचारानेच टेन्शन आलं आणि परत पहिल्या जोमाने पाय टाकायला सुरुवात केली. साधारण ११.५० ला १० किमी पूर्ण झाले आणि मी बीच वरून परत निघालो. खूप अविस्मरणीय १० किमी रनिंग होतं माझ्या आयुष्यातलं. पण मला असं रात्री पळताना बघून स्थानिक लोकांमधे कुणा भुताचा जन्म झाला नाही म्हंजे मिळविली.

सातवा दिवस म्हंजे आमचा पिकनिक वरून परत यायचा दिवस होता. रात्री ८.३० ला परत आलो आणि थोडं खाऊन अन आवरून निघालो १०.३० ला. ४ किमी झाल्यावर पाय खूप दुखायला लागले. थोडा आराम अन स्ट्रेचिंग करून परत चालू केलं पळायला. मागील ६ दिवसातले टार्गेट्स आठवून हळू हळू उरलेले किमी पूर्ण केले. खूप भारी फिलिंग होतं चॅलेंज पूर्ण केल्याचं. काहीतरी ग्रेट अचिव्ह झाल्यासारखं.

आणि हे सर्व शक्य झालं माझ्या ग्रुप वरच्या मित्रांच्या प्रोत्साहनामुळे..__/\__

माझे स्टॅट्स :
पहिला दिवस १०.१ किमी रनिंग
दुसरा दिवस १०.२ किमी रनिंग
तिसरा दिवस ५३ किमी सायकलिंग
चवथा दिवस ३९.७ किमी सायकलिंग आणि २.१ किमी रनिंग
पाचवा दिवस १०.१ किमी रनिंग
सहावा दिवस १०.१ किमी रनिंग
सातवा दिवस १०.४ किमी रनिंग
एकूण - ५३ किमी रनिंग आणि ९२.७ किमी सायकलिंग.

सलग 2-3 दिवस १० किमी पळणे खरंच टफ होतं. इंजुरीचे चान्सेस वाढतात अशाने. सुदैवाने मला असा त्रास झाला नाही. थोडीतरी शंका आली असती तर लगेच चॅलेंज थांबवलं असतं. पैर सलामत तो चॅलेंज/मॅरेथॉन पचास. आता भेटूया पुढच्या चॅलेंज ला 2 महिन्यांनी.

मोदक's picture

14 Feb 2017 - 2:58 am | मोदक

दंडवत घ्या राव... __/\__

डॉ श्रीहास's picture

14 Feb 2017 - 9:38 am | डॉ श्रीहास

मस्तंच ना... फाऽऽऽऽर इच्छा झालीये राव बीचवर पळायची !!

इरसाल कार्टं's picture

14 Feb 2017 - 10:14 am | इरसाल कार्टं

या मग तुम्हीपण पालघर ला..!

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2017 - 6:43 am | डॉ श्रीहास

तुम्ही पालघरचे का हो ?

वजने उचलणाऱ्यांना इथे सहभाग घेता येईल का?
आठवड्याचे लक्ष्य 'एकूण हलवलेले वजन' ह्या प्रमाणात मोजता येईल.
अजून कोणी असेल तर टीम बनवता येईल...

पिलीयन रायडर's picture

14 Feb 2017 - 10:10 pm | पिलीयन रायडर

ह्याचा विचार करायला हवा. मलाही निव्वळ कार्डीओ करायचा नाहीये. वजन उचलणे किंवा योगासनं प्रकारचे व्यायाम कसे अंतर्भुत करता येतील ह्यावर विचार करुया.

एका वेळी उचललेले वजन गुणिले जितक्या वेळा उचलले = एकूण हलवलेले वजन
असे सोपे गणित करता येईल
बाकी व्यायाम प्रकारांची नावे मराठीत लिहिताना दमछाक होणार एवढे नक्की
तेव्हा सरळ Squats, बेंच प्रेस असे असे लिहावे लागेल

पिलीयन रायडर's picture

14 Feb 2017 - 11:08 pm | पिलीयन रायडर

चालु शकेल ना? बादवे, मी ह्यातलं काहीच करत नाही =)) मला फक्त वेगवेगळे व्यायाम चॅलेंजमध्ये घेता येतील इतकंच हवंय. मला स्वत:ला निव्वळ जिमचा कंटाळा येतो म्हणुन..

अवांतरः- एक प्रश्न आहे सर्वांनाच. ट्रेडमिलवर पळताना पायात गोळा येत असेल तर तसं का होतं असावं? जिममम्ध्ये मी सतत पाणी पित असते. पण माझं एकंदरित दिवसभरात पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे. पाण्यात साखर मीठ वगैरे काही टाकावं का?

मोदक's picture

14 Feb 2017 - 11:50 pm | मोदक

नीट वॉर्मअप करतेस का..?

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 12:54 am | पिलीयन रायडर

ट्रेडमिलला काय वॉर्म अप करायचा?

असे नसते म्याडम.. उद्यापासून हातपाय ताणून आणि थोडे स्ट्रेचिंग करून वॉर्म अप कर आणि मग पळायला सुरूवात कर. आपला हार्टरेट वाढला पाहिजे, स्नायूंचा रक्तपुरवठा वाढला पाहिजे मग व्यायाम सुरू केला की स्नायूंवर लोड येत नाही..

(मी एकदा कुंडलिका ट्रेक दरम्यान वॉर्मअप वगैरे कांहीही न करता तिथल्या धरणात उडी मारून पोहायला सुरूवात केली, लगेचच दोन्ही पिंडर्‍यांमध्ये क्रँप आले आणि पाय हलवता येईना... इमॅजिन कर काय अवस्था झाली असेल. )

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 2:14 am | पिलीयन रायडर

ओह! मी आपली जाते आणि फुल्ल स्पीडने ट्रेडमिल सुरु करते की रे!! आता उद्यापासुन नीट करेन वॉर्मप. आणि बराच स्वच्छंद झालास की रे.. रात्री बेरात्री मिपावर प्रतिसाद देतोस! (व्हॅलेंटाईन डे आहे ना आज.. बोलले असते.. पण जाऊ दे...!)

ह्या ह्या ह्या.. "फेब्रुवारी आणि मार्च" या दोन महिन्यांमधील प्रत्येक दिवस (आणि रात्र) आमचा ३१ जुलै असतो. नंतर १० महिने कुठेही कितीही उंडरायला कंपनीची परवानगी असते. ;)

माझीही शॅम्पेन's picture

15 Feb 2017 - 12:26 pm | माझीही शॅम्पेन

इमॅजिन कर काय अवस्था झाली असेल

मिसळपावच बुडता बुडता वाचल म्हणायाच , परमेश्वराची कृपा :)

कृपया ह. घ्या !

स्थितप्रज्ञ's picture

15 Feb 2017 - 8:49 pm | स्थितप्रज्ञ

असाच अनुभव मला साधारण ८ वर्षांनी पाण्यात उडी मारल्यावर आला होता. सुदैवाने तो स्विमिंग पूल होता आणि किनाऱ्याचा बार (बुडू नये म्हणून धरायचा, गोव्याच्या किनाऱ्यावर असतो तो नाही) जवळच होता.
रच्याकने, ट्रेडमिलवर पाळायला सुरुवात करायच्या आधी ४.५ किमी प्रती तास पेक्षा कमी वेगाने चाला (ते सुद्धा gradually वाढवत). बोअरिंग वाटलं तरी चालेल पण हे खूप आवश्यक आहे. साधारण २-२.५ किमी असे चालले कि मिनिटाला अर्धा किमी असा वेग वाढवत न्या. Cramps येणार नाहीत. झेपेल इतकाच (पाळताना एक पूर्ण वाक्य हाफ-हुफ न करता स्पष्ट बोलता यायला पाहिजे) वेग वाढवा, जमेल तितका वेळ पळत रहा आणि श्वास नाकानेच घ्या (उच्छवास तोंडाने सोडला तरी चालेल). हल्ली तोंडाने श्वास घ्यायचे सर्रास सल्ले दिले जातात ते तद्दम खोटे आहेत. त्याने डी-हायड्रेट आणि दमायला लौकर होते.

आषाढ_दर्द_गाणे's picture

16 Feb 2017 - 3:41 am | आषाढ_दर्द_गाणे

हाहा..

बुडू नये म्हणून धरायचा, गोव्याच्या किनाऱ्यावर असतो तो नाही

'फिस्स!' करून हसलो हापिसात

स्थितप्रज्ञ's picture

15 Feb 2017 - 8:33 pm | स्थितप्रज्ञ

मध्यंतरी बाहेरगावी असल्यामुळे ओपन एअर सायकलिंग बंद असल्याकारणाने अधून मधून जिममधील सायकलवर थोडे सायकलिंग केले. पण तुम्ही म्हणता तसे माझेही गुडघे दुखले म्हणून सायकलिंग सोडून ट्रेडमिलवर धावणे सुरु केले.
जिममधल्या सायकल्स एकाच फ्रेम साईझच्या असतात. आपल्या उंचीला (तो फ्रेम साईझ) फिट होईलच याची शाश्वती नसते. त्यातून त्याचे बाईक-फिट पराकोटीचे गंडलेले असते. त्यामुळे पायडल पुढे असताना गुडघा आणि चवड्याचा पुढचा भाग एका रेषेत येत नाहीत. तसेच हॅन्डल adjustable नसल्यामुळे जिथे आहे तिथे धरून चालवावी लागते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सांधेदुखी. त्यामुळे जिम मधल्या सायकलवर दीर्घकाळ सायकल चालवू नका. त्यापेक्षा थोडी वॉर्मअप म्हणून सायकल चालवून उरलेला वेळ ट्रेडमिल वर धावणे उत्तम.
सर्वात उत्तम मोकळ्या हवेत धावणे/सायकलिंग.

स्थितप्रज्ञ's picture

15 Feb 2017 - 8:34 pm | स्थितप्रज्ञ

सादर उत्तर पिलियन रायडर यांच्या एका प्राशनाला द्यायचे होते पण चुकून नवीन कमेंट पोस्ट झाली :(

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 8:43 pm | पिलीयन रायडर

माहितीसाठी धन्यवाद! जिममध्ये सायकल चालवताना मलाही हाच त्रास झाला. एलिप्टिकल मात्र आवडली.

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Feb 2017 - 10:59 pm | आषाढ_दर्द_गाणे

धन्यवाद!
मला जिममध्ये ट्रेडमिलवर पळायला अजिबात आवडत नाही.
ते खूप अनैसर्गिक आणि गुडघे खराब करणारे वाटते.
म्हणून मी सायकलिंग करणार होतो.
पण आता हि माहिती मिळाल्यावर त्या वाटेला नाही जाणार.

मला वाटते एलिप्टीकल सर्वात उत्तम!
पण ते करून धावण्या किंवा सायकलिंगपेक्षा कमी उष्मांक (कॅलरीस) जळतात असे वाटते....

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:08 pm | पिलीयन रायडर

असं मला काही आर्टीकल्स मध्येही लिहीलेलं सापडलं. पण मी पाहतेय तर मला तेवढ्याच कॅलरीज जळलेलय दिसतात. अर्थात ते क्रॉसरॅम्प आणि रेझिस्टन्सवरही अवलंबुन आहे. तो वाढवला की १३-१५ मिन मध्ये १ माईल होतो आणि १०० कॅलरीज जळतात. मी काल क्रॉसरॅम्प २० आणि रेझिस्टन्स १५ करुन पाहिला. म्हणजे वाढवत नेला. तर १३ मिनिटं कसं तरी करु शकले. हेच १० क्रॉसरॅम्प आणि ४ रेझिस्टन्सवर कॅलरी खूप कमी जळाल्या, पण मी कितीही वेळ मग एलिप्टीकलवर बागडु शकते.

आषाढ_दर्द_गाणे's picture

16 Feb 2017 - 3:38 am | आषाढ_दर्द_गाणे

त्या मशीनवर लिहून येणाऱ्या कॅलरीजवर फार विश्वास ठेवू नका.
विशेषतः एलिप्टीकल तर जवळपास ४२% पर्यंत आकडा फुगवून सांगू शकतो असे सापडले आहे.

धाप लागेपर्यंत, म्हणजे एक अख्खे वाक्य बोलता येणार नाही इतक्या तीव्रतेने (इंटेन्सिटी) व्यायाम करावा असे म्हणतात.
तेव्हा नुस्तेच बागडण्यापेक्षा श्वासाकडे असू द्या

आषाढ_दर्द_गाणे's picture

16 Feb 2017 - 3:43 am | आषाढ_दर्द_गाणे

वर स्थितप्रज्ञ ह्यांनी आधीच धाप लागण्याविषयी लिहिले आहे, ते विसरलो
चूभूद्याघ्या

स्थितप्रज्ञ's picture

16 Feb 2017 - 1:29 pm | स्थितप्रज्ञ

धाप लागोस्तोवर सुद्धा व्यायाम करू शकता पण ते HIIT प्रकारात मोडते. त्यात जास्तवेळ न घालवता जास्त उष्मांक जाळले जातात. हे थोडं अघोरी प्रकरण आहे (कारण इंज्युरी व्हायची शक्यता जास्तप्रमाणात असते) पण याचे इफेक्टस लौकर दिसून येतात. लांबपर्यंत पल्ला गाठायचा असेल आणि विशेषतः चरबी जाळायची असेल तर धाप लागून उपयोग नाही म्हणून तसे लिहिले.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 4:41 am | पिलीयन रायडर

काय???? अरे देवा!!! मी १०० कॅलरीज जळाल्या म्हणुन खुष होते.. पण मग तसं तर कुठलीच मशीन १००% बरोबर दाखवत नसेल.

कुठल्याही मशीनवर आधी वजन एंटर करावे लागते ते बरोबर असेल तर दाखवलेल्या कॅलरीजच्या आकड्यावर विश्वास ठेवु शकतो.
जर वजन माहीत नसेल तर कुठल्या आधारावर कॅलरीज मो़जणार.
कॅलरी मोजणे म्हणजे साध्या भाषेत.. किती वजनाची वस्तू किती वेगाने किती वेळ ढकलली यासाठी लागणारी उर्जा.. त्यातला वेग आणि वेळ आपण पहात असतो मशीनवर.. राहीले वजन ते माहीत असायला हवे.. बर्‍याच वेळा डीफॉल्ट ६० किंवा ७० किलोसाठी कॅलरीजचा आकडा दाखवला जातो.. तुमचे वजन याच्या जवळपास नसेल तर तो आकडा तुमच्यासाठी नव्हता असे समजा.. :-)

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर

मी टाकते ना म्हणूनच.. वजन आणि वय.

मग हे आकडे रेफरन्स म्हणुन वापरायला हरकत नाही ना?

वेल्लाभट's picture

16 Feb 2017 - 10:49 am | वेल्लाभट

फूल न फुलाची पाकळी
वॉर्म अप
१५+१५ जोर
१५+१५ बैठका

अमर विश्वास's picture

16 Feb 2017 - 2:39 pm | अमर विश्वास

HIIT मध्ये दोन महत्वाचे भाग आहेत
१. High Intensity
२. Interval
त्यामुळे यात alternate रिकव्हरी Cycles असतात. (आणि थोडीशी धाप लागली तरी या रिकव्हरी सेशन मध्ये श्वास पुन्हा जाग्यावर येतो)

त्यामुळे HIIT चा स्टॅमिना वाढवायला उत्तम उपयोग होतो
अर्थात यौग्य पद्धतीने केले तर इन्जुरीची शक्यता नाही.

आठवड्यातून एकदा HIIT जरूर करा

गवि's picture

17 Feb 2017 - 10:51 am | गवि

एक प्रश्न:

काही काळ नियमित व्यायाम, चालणं इ. केल्यावर अचानक खंड पडणं आणि मग परत सुरु करायला महाप्रचंड कंटाळा येणं अशी फेज कोणालाच येत नाही का?

अशावेळी पुन्हा पूर्वीसारखं सुरु करायला कोणत्या प्रकारे विचार करता? स्वतःला धक्के मारुन कसं उभं करता? आत्मताडन टाळून सहजतेने परत सुरुवात करताच येत नाही का? आपण परत एकदा फेल झालो ही भावना निराशाजनक वाटत नाही का? ते कसं झटकता?

..निदान परत सुरुवातीचा गियर पडेपर्यंत.
?

चतुरंग's picture

17 Feb 2017 - 8:12 pm | चतुरंग

अशावेळी एक काम करा. पहिले म्हणजे गिल्टी वाटून घ्यायचं नाही. गिल्टमुळे मनाची ताकद कमी होते. तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा. शरीराला नावे ठेवू नका (जर तसे करत असाल तर). तुम्ही प्रामाणिकपणे शरीराला मदत करणार आहात. आता मी रोज व्यायाम करेन, यापेक्षा मी आजचा एकच दिवस चालणार आहे, उद्याचं उद्या बघू (व्यसनमुक्ती करताना जे टेक्नीक वापरतात तेच, मी आजचा एक दिवस सिग्रेट ओढणार नाही) त्यामुळे टास्क अचीवेबल वाटायला लागतं!
शुभेच्छा! :)

वेल्लाभट's picture

17 Feb 2017 - 12:48 pm | वेल्लाभट

वॉर्म अप
१५ डिप्स
२५ जोर
२५ बैठका
एक सूर्यनमस्कार
इतकंच

चतुरंग's picture

17 Feb 2017 - 8:17 pm | चतुरंग

लेकाबरोबर १५ + १० पुशप्स
१५ सिट्प्स
४५ सेकंद प्लँक
१० सेकंद आणि २१ सेकंद असे दोन वॉल सिट्स

आज सकाळी २४ सूर्यनमस्कार.

मला पण ह्या स्पर्धेत सहभागी व्हयवयचे आहे

आशिष काळे's picture

20 Feb 2017 - 10:31 am | आशिष काळे

मी १९ मार्च ला २०० km brm करणार आहे तेच माझे वयक्तिक चाललेन्जे आहे कोणी १९ मार्च ची brm करणार आहे का ?

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 11:05 am | स्थितप्रज्ञ

BRM साठी शुभेच्छा.....रच्याकने कुठे आहे ब्रह्म?

आशिष काळे's picture

20 Feb 2017 - 2:11 pm | आशिष काळे

मार्ग अजून निश्चित नाही झालाय

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 3:16 pm | स्थितप्रज्ञ

माझे दोन मित्र आणि मी या BRM चा विचार करतोय (पुण्यात असल्यास). तुमचा दूरध्वनी क्रमांक व्यनि करा. पुढील संभाषण कायप्पावर करू.

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 12:20 pm | स्थितप्रज्ञ

चॅलेंजचा धुमाकूळ चालू झाल्यापासून न चुकता रोज सायकलिंग होत आहे. त्याचा परिणाम कि काय आज हापिसात येताना बऱ्याच महिन्यांनी २५.८ किमी प्रति तास वेग गाठू शकलो. तसा २१-२२ मध्ये रेंगाळणारा मी.

डॉ श्रीहास's picture

21 Feb 2017 - 6:31 am | डॉ श्रीहास

हभीणंदन .....

अल्पिनिस्ते's picture

20 Feb 2017 - 6:29 pm | अल्पिनिस्ते

शनिवारी सायकल कट्टा राइड ३३ किमी आणि रविवारी तिकोना किल्ला सर :)

sagarpdy's picture

22 Feb 2017 - 11:28 am | sagarpdy

मागील आठवड्यात स्थितप्रज्ञ, मी आणि नकुल मिळून 100x7 चे आव्हान उचलले होते. डॉ श्रीहास यांनी 50x7 केल्यापासून माझ्या मनात देखील विचार होता कि आपणही 50x7 करावे. त्याप्रमाणे १६ ते २२ फेब दरम्यान रोज ५० किमी सायकल हाणून झाली.

५० किमी रोज चालवणे आपल्याला शक्य आहे हे माहित होते, पण सकाळी ऑफिस ला जायला ८ ला तयार व्हावे लागते, ती वेळ सांभाळून हे आव्हान खरंच कठीण होते. त्यामुळे मागचा आठवडा (वीकांताच्या सुट्ट्या वगळता) रोज सकाळी ४:३० ला उठून ५ ला सायकलिंग सुरु केली. आणि काही करून ७-७:१५ ला परत यायचे म्हणून जोरदार दामटली. परिणामतः बहुतेक दिवशी २५ किमी/तास चा वेग मिळाला. विकांताला मात्र थोडा आळस/विश्रांती घेत ६:३० पर्यंत तरी झोपलोच. शिवाय आरामात सायकल चालवली. आणि दुपारी पण किमान तासभर झोप काढली.

टीम च्या 100x7 च्या आव्हानाचा सविस्तर वृत्तांत स्थितप्रज्ञ देतीलच.

डॉ श्रीहास's picture

23 Feb 2017 - 1:03 pm | डॉ श्रीहास

मी रोड बाईक वर केल्यामुळे थोडं सोप गेलं म्हणेन... पण तुमची हायब्रीड आणि त्याहून सगळं सांभाळून (सकाळी ४:३० ला उठणं हे ५० किमी चालवण्यापेक्षा अवघड आहे) २५ किमी/तास ही स्वप्नवत स्पीड काढणं... हॅट्स आॅफ आणि प्राउड आॅफ यू !!

किप रायडींग ....

तेच..सगळं सांभाळून सकाळी ४:३० ला उठणं, ५० किमी चालवणं, २५ किमी/तास ही स्पीड काढणं..सगळच खतरनाक..___/\___

स्थितप्रज्ञ's picture

27 Feb 2017 - 3:04 pm | स्थितप्रज्ञ

सर्वप्रथम ५०x७ चे आव्हान पूर्ण केल्याबद्दल sagarpdy चे जाहीर अभिनंदन!!!

The Cyclomaniacs टीम ने उचललेल्या १००x७ आव्हानांचा सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे.

The Cyclomaniacs - Challenge 2 - 100x7

Day 1 stats
sagarpdy: 53 km
Nakul: 15.6 km
स्थितप्रज्ञ: 32.4 km
Total: 101 km

Day 2 stats
sagarpdy: 52.6 km
Nakul: 16.7 km
स्थितप्रज्ञ: 34.1 km
Total: 103.4 km

Day 3 stats
sagarpdy: 55.1 km
Nakul: 18.9 km
स्थितप्रज्ञ: 36.1 km
Total: 110.1 km

Day 4 stats
sagarpdy: 50.0 km
Nakul: 20.5 km
स्थितप्रज्ञ: 31.9 km
Total: 102.4 km

Day 5 stats
sagarpdy: 51.8 km
Nakul: 16 km
स्थितप्रज्ञ: 34.1 km
Total: 101.9 km

Day 6 stats
sagarpdy: 51.8 km
Nakul: 16.7 km
स्थितप्रज्ञ: 34.9 km
Total: 103.4 km

Day 7 stats
sagarpdy: 53.8 km
Nakul: 18 km
स्थितप्रज्ञ: 36 km
Total: 107.8 km

Grand Total: 730 km

Personal totals
sagarpdy: 368.1
Nakul: 122.4
स्थितप्रज्ञ: 239.5

Personal challenges
sagarpdy: 5 ghats + 50x7 both complete
स्थितप्रज्ञ: 2 ghats ओंगोईंग (सध्या गुडघा किर किर करत असल्यामुळे हा चॅलेंज पुढच्या महिन्यात नव्याने सुरु करणार आहे)

स्वीट टॉकर's picture

22 Feb 2017 - 2:07 pm | स्वीट टॉकर

खूप दिवसांनी सवडीनी मिपावर आलो आणि धाग्यावरचा उत्साह बघून खरोखर धन्य वाटलं! मोदकभाऊंची कल्पना, त्याला डॉक्टरांनी चॅलेंजचा रायडर काय लावला, धाग्याचं लग्नघरंच झालं!

सही रे सही!

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।

डॉ श्रीहास's picture

23 Feb 2017 - 1:05 pm | डॉ श्रीहास

:-))

चष्मेबद्दूर's picture

22 Feb 2017 - 8:24 pm | चष्मेबद्दूर

भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?
.......हो. टेकडी चढताना हा अनुभव आला आहे. एका क्षणी सगळं शरीर हलकं होउन जातं.

डॉ श्रीहास's picture

23 Feb 2017 - 1:04 pm | डॉ श्रीहास

Endorphins!!

अमर विश्वास's picture

26 Feb 2017 - 5:32 pm | अमर विश्वास

याला runners high असे म्हणतात ....

रक्तात वाढणाऱ्या एंडोर्फिन मुले असे होते ...

परंतु हवा चांगली असल्याने जेवण ब्रेकात १२ मिनिटे भराभर चाललो.

२२ फेब्रु - आज पहाटे २४ नमस्कारांनी सुरुवात झालीये. फीलिंग गुड! :)

आशिष काळे's picture

23 Feb 2017 - 8:58 am | आशिष काळे

१०८ सूर्य नमस्कार

डॉ श्रीहास's picture

23 Feb 2017 - 1:05 pm | डॉ श्रीहास

मस्तंच ना...... चालू द्या जोरात _/\_

अभिजीत अवलिया's picture

23 Feb 2017 - 5:16 pm | अभिजीत अवलिया

गेला सव्वा महिना आठवड्यातून ५ दिवस '३ किमी धावणे + २ किमी चालणे' हा व्यायाम करतोय. जोडीला डायट प्लॅन घेतलाय डॉक्टर कडून.
२ किलो वजन कमी झालेय सव्वा महिन्यात. १ मार्च पासून पोहणे सुरु करतोय.
आता पोट पूर्ण सपाट होईपर्यंत माघार नाही :)

आशिष काळे's picture

26 Feb 2017 - 3:43 pm | आशिष काळे

काल कामशेत सायकल वर गेलो होतो एकूण ११० कि मि

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 6:12 pm | मित्रहो

असे दिसते. ब्रेव्हे नंतर आळस झाला, आळसच आराम नाही. आठवडाभर काहीच नाही.

२४ फेब्रु - ४४ किमी
२५ फेब्रु - ८५ किमी. (नॉन स्टॉप ७०, ORR - AIRPORT - ORR, मजा आली खूप, सर्व धरुन घर ते घर चार तासात, उन्हाच्या आधी ९ वाजता घरी.)

आधीचे सायकलींग
३ फेब्रु - २५ किमी
४ फेब्रु - ४० किमी
५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०)
८ फेब्रु - ३६ किमी
११ फेब्रु - ४३ किमी
१२ फेब्रु - १०१ किमी
१४ फेब्रु - ३८ किमी
१८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण )

एकूण- ७१९ किमी
आता हजार किमी महिन्यात चॅलेंज पूर्ण होनार नाही.